लाचखोरी प्रतिबंध

भारतातील लाचखोरीला आळा घालण्यासाठी http://www.ipaidabribe.com/ अशी साइट् सुरू केल्याची माहिती मिळाली. साइटचा उद्देश विविध ठिकाणांहून लाच दिल्याचे/ देण्यास भाग पाडल्याचे प्रसंग लोकांनी नोंदवावेत असा आहे. लाचखोरी विरोधात कुठलीही आघाडी उघडणे हे कौतुकास्पदच आहे. पण अशा साइटचा नक्की काय उपयोग होइल? लाच देणार्‍यांपैकी किती जणांना इंटरनेटचा ऍक्सेस आहे आणि त्यातील किती जणांना ही साइट माहित असेल? उपक्रमींपैकी कुणाला माहित असल्यास ह्याविषयी अजून माहिती मिळेल का? अन्यथा ह्या साइटचा प्रचार करण्यास हरकत नसावी.

लेखनविषय: दुवे:

Comments

विश्वासार्हता

पण नोंदलेल्या प्रसंगाची सत्यासत्यता कशी पडताळणार? खोटे दावेदेखील या साईटवर येऊ शकतात :(

प्रति

हा ही मुद्दा आहेच. पण मुद्दाम खोटे बोलण्यात प्रसंग नोंदवणार्‍यांचा काही फायदा नाही. त्यामुळे असे वर्तन आटोक्यात राहील असे वाटते.

मार्केट रेट

राजकीय इच्छाशक्ती किंवा पूर्ण उठाव ह्याशिवाय ह्या खादीवर उपाय नाही.

तरीदेखील हे बरे होईल. "कुठे" "कोणाला" "किती" लाच दिली कि "कोणते" काम होईल ह्याचा डेटाबेसच म्हणता येईल हा. मार्केट रेट ठरवण्यास मदत होईल. :)

लाच लिगल केल्या जावी.

लाच लिगल केल्या जावी. आणि लाच घेणाराने लाचेच्या रकमेचे पक्के बिल (सीएसटी बिएसटी नंबर सह) देणे अणिवार्य करावे. तरंच हे सगळे आटोक्यात येईल .

- त्सुनामी

घाट घातलेला दिसतोय

--पण अशा साइटचा नक्की काय उपयोग होइल? लाच देणार्‍यांपैकी किती जणांना इंटरनेटचा ऍक्सेस आहे आणि त्यातील किती जणांना ही साइट माहित असेल?--

हे असले प्रश्न विचारुन उपक्रमींना कामाला लावण्याचा घाट घातलेला दिसतोय.

 
^ वर