डावा की उजवा?
डावखुर्या व्यक्तींना बरेचदा चित्र विचित्र प्रसंग आणि नजरांना तोंड द्यावे लागते. सध्याच्या जमान्यात अजून ही किती लोक या गोष्टीला महत्व देतात ते माहीत नाही, पण एक काळ नक्की असा होता (अगदी ९८-९९ पर्यंत) की समारंभात (जसे की लग्न, मुंज, बारसे ई ई) सगळ्यांच्या देखत डावा हात वापरून जेवणे हे अतिशय कठीण काम असायचे. बरेचजण - विशेषतः आजी आजोबांच्या वयाची माणसं अशी बघायची की मी नुकताच परसाकडे जाऊन आलो आहे आणि हात न धुताच जेवायला बसलो आहे. एकदा तर एका आजींनी मला पकडून ४०-४५ मिनिटे भाषणं दिले की डाव्या हाताने खाणे कसे चुकीचे आहे. त्यांच्या लॉजीक प्रमाणे संडासला जो हात वापरतो त्यानेच खाणे म्हणजे महापाप. मी बिचारा त्यांना काकुळतीला येऊन सांगत होतो की अहो माझं सगळचं ऊलट असतं हो :)
अजून एक भयंकर ऑकवर्ड् करणारा प्रसंग म्हणजे प्रसाद घेणे. मी हटकून डावा हात पुढे करणार आणि प्रसाद देणारा मला दहा हजार् आठ्या घालून सांगणार की हा नाही तो हात. आजू बाजू ला माझी आई असेल तर् तिच्याकडे काय् हे एव्हढ ही नाही शिकवलं असं बघणार. त्या बाबतीत मी फार् सुखी होतो. आईने मला लहाणपणी फक्त् एकदाच् बदडून काढल. पण माझ्यावर ढिम्म् परिणाम झाला नाही. नंतर तीनी डॉक्टरना विचारल तर ते म्हणाले की असू द्यात, हे नैसर्गिक आहे. बस्स त्या नंतर कधीही मार पडला नाही.
तुमच्या पैकी किंवा जवळच्या नातलगांपैकी कुणी डावखुरे आहे का?
असल्यास तुमचे काही सुरस अनुभव आहेत का?
अजून ही भारतात अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं का?
Comments
रेफ्रीजरेटर्स्
बहुतेक सर्व शितकपाटांचे दार हे डाव्या किंव्या उजव्या बाजुला बदलता येते असे माझे निरि़क्षण् आहे. फक्त काही स्क्रु काढुन् ब्रॅकेटची जागा बदलायची इतकेच करावे लागते.
एकंदरीत उजव्या-डाव्या विषयी, मी फक्त डाव्यांकरता बनवल्या जाणार्या नित्योपयोगी वस्तुंच्या निर्मीतीबद्दल कुठेतरी वाचले होते. हे होतच नाही असे नाही, पण् डिमांड फार् नसल्याने याला प्रोत्साहन मिळालेले दिसत् नाही.
-Nile
दोनदा आल्याने
प्रकाटाआ.
डाव्यावर भार
हे मला सोयीचं जातं कारण जड वस्तू डाव्या हातातच ठेवायला सोप्या पडतात :-)
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
आठवण
एक आठवण -
पुण्यात गोरे पंचेवाल्यांकडे पंचे आणायला गेलो होतो, पंच्याचे पैसे दिले, सुट्टे पैसे परत घेताना उजव्या हातात समान असल्याकारणाने डावा हात पुढे केला तर गोरे (किंवा मंडळी) ह्यांनी डाव्या हातात पैसे देण्यास चक्क नकार दिला, मला समान डाव्या हातात घेऊन उजवा हात पुढे करावा लागला. :) मग मी पण हात/पैसे "कपाळाला" लाऊन खिशात टाकले :)
:)
मी डावरी नाही. पण मुलगी लहान असताना मला तिला कडेवर घेताना उजव्या हातावर कधीही घेता येत नसे याची आठवण झाली. डाव्या हातावर तिला घेणेच मला सोयीचे व्हायचे.
तुमचे अनुभव नव्याने जाणीव निर्माण करून गेले की डावर्यांना अशा काही प्रथा म्हणजे कटकटी वाटू शकतात. माझा मेव्हणा डावरा आहे.
तोही देवाला जात नाही. गेल्यास पर्यटन म्हणून जातो. तेथे गेल्यावर प्रसादाचे काय करतो हे त्याला आता मुद्दाम विचारेन. :) पण तो बरोबर असताना जेव्हा म्हणून देवळात गेलो तेव्हा विशेष प्रश्न आलेला नाही असे स्मरते. बहुतेक तो उजवा हात पुढे करत असावा.
बाकी, असंवेदनाशील व्यक्ती सगळीकडे असतात. बॉस, को-वर्कर्स, म्हातारी न बदलणारी माणसे, शेजारी, नातेवाईक, स्वकीय, परकीय, मित्र, शत्रू सगळे वेगवेगळ्या वेळी असंवेदनाशील असू शकतात. त्यांचा आपल्याला किती त्रास करून घ्यायचा हे या गोष्टीने स्वत:च्या आयुष्यात नक्की किती महत्त्वाचा फरक पडणार आहे त्यावर ठरवावे.
याचा अर्थ काय?
चित्रा,
'असंवेदनाशील व्यक्ती सगळीकडे असतात.' असे म्हणत आपण 'म्हातारी न बदलणारी माणसे' असे का बरे लिहीले आहे? या वाक्याचा अर्थ मला कळला नाही. कोणती म्हातारी बदलायची?
वैचारिक
निव्वळ वैचारिक, तात्विक आणि ऐतिहासिक गप्पांमध्ये थोडास बदल म्हणून ही चर्चा वर आणत आहे.
--मनोबा
अनुवांशिक आहे का?
मी स्वतः अंशतः डावखुरा आहे. (कात्रीने कापणे,) लिहिणे आणि जेवणे वगळता इतर बहुतेक सर्वच कामे मी डाव्या हाताने करतो. माझा डावा हात उजव्या हाताच्या तुलनेत अधिक बळकट आहे.
माझी पावणेतीन वर्षांची मुलगीही बव्हंशी डावखुरी आहे आणि आम्ही तिला बदलण्याचा प्रयत्न करत नाहीत.
डावखुरेपण किंवा उजवटपण (!) अनुवांशिक आहे का?
वामन देशमुख
या इथे विशाल तरुतळी, सुरई एक सुरेची, खावया भाकरी अन् वही कवितेची!
अमिताभ
अमिताभ-अभिषेक पितापुत्र डावखुरे आहेत.
सचिन व अर्जुन तेंडुलकरही डावखुरेच आहेत.
--मनोबा
लेख् आनि चर्चा
हा हा हा हा ......!!!