द्यूस पिता, इंद्र, हर्क्यूलीस् इत्यादी

ह्याला खर्‍या माणसांचा इतिहास म्हणायचं की केवळ प्राचीन आख्यायिकांचा इतिहास हे तुम्हीच ठरवा, पण ह्या गोष्टी मला विषेष वाटतात -

अत्तापर्यंतच्या चर्चेत ह्या गोष्टी आल्या आहेत
१. स्ट्राबोच्या आणि अन्य काही प्राचीन ग्रीक लेखकांच्या मताप्रमाणे भारतात ग्रीक देव झीयस् ची पूजा करतात.
२. काही प्राचीन ग्रीक लेखकांनी असंही म्हणलं आहे की हर्क्यूलीसने भारतावर आक्रमण करून तो प्रांत जिंकला.

आता एक नवीन गोष्ट (ही माहिती इंग्रजी विकिपीडियामधून काढलेली आहे. मी स्वतः रुग्वेद वाचला नाहिये) :
झियस् हे नाव रुग्वेदात द्यौस पिता ह्या नावाने पृथ्वीचा पति व इंद्र व अग्निचा बाप. ग्रीक भाषेत ह्याला "झीयू पेटर" (अर्थात हे पिता झीयस्) असे संबोधतात. (लॅटिन भाषेतसुद्धा झियसला इयूपित्र (ज्यूपिटर) किंवा दिवस नाहितर दियस म्हणतात). झियसचे शस्त्र म्हणजे वीजेची काठी अर्थात वज्र. एक गोष्ट अशी आहे की इंद्राने आपल्या पित्याला म्हणजे द्यूस पित्याला मारले. हे खरे किंवा खोटे असेल, पण इंद्राने बापाच्या मृत्यूनंतर त्याचे शस्त्र धारण केले असेल - अर्थात इंद्रवज्र. अनेक गोष्टींमध्ये इंद्रानी युद्ध करून अनेक धरणं फोडून गायी व पाणी मुक्त केलं असा उल्लेख आहे. मुख्य म्हणजे इंद्र भारताचा रहिवासी कधीच नव्हता - तो तर स्वर्गात रहायचा. महाभारतातल्या पांडवांच्या वनवासातसुद्धा त्याने येऊन अर्जुनाला स्वर्गात नेले. पुढे अर्जुनाच्या मुलाच्या (परिक्षिताच्या) मारेकर्‍याला - तक्षकाला - स्वर्गात अभयदान दिले.

मग हे सगळं वाचल्यावर मग ह्या प्राचीन ग्रीक लेखकांच्या वाक्याचा विचार केला तर वाटतं इंद्र म्हणजेच हेराकलीस अर्थात हर्क्यूलीस तर नसेल?

लेखनविषय: दुवे:

Comments

स्वर्ग म्हणजे तिबेट

स्वर्ग म्हणजे तिबेट असंही मी मागे ऐकलं होतं.

इंद्र हर्क्यूलस होता की नव्हता माहीत् नाही. पण इंद्राच्या शौर्याविषयी शंका आहे. कोणी राक्षस उपटला की ह ब्रम्हा, विष्णू, महेशाकडे पळालाच. अर्थात जितकं पुराण मी वाचलं त्यावरून. जाणकार लोक बोलतीलंच.

इंद्रवज्रः दधिची ऋषींच्या हाडापासून बनवले होते.

भारत किती जुना आहे या बद्दल संशोधन् चालू आहे.(कोसला आठवलं.)

अभिजित

ग्रीस म्हणजे स्वर्ग नाही

ग्रीक कथांप्रमाणे हे देवगण माऊंट ऑलिम्पसजवळ रहात असत. जसा ग्रीस मध्ये माऊंट ऑलिम्पस आहे, तसा सायप्रसमध्येदेखिल एक माऊंट ऑलिम्पस आहे. खरा माऊंट ऑलिम्पस कुठला? ह्या दोन्हीतला का तिसराच कुठला हे माहित नाही. तशी ही आख्यायिका भारतीय पुराणांच्या काही देवांच्या मेरु पर्वताच्या वास्तव्याशी मिळती जुळती आहे.

असो. माझा मुद्दा एवढाच की अतीप्राचीन देवांबद्दलच्या समजूतीतलं हे साम्य मनोरंजक आहे, व त्यानी मनुष्यजातीतल्या अनेक शाखा निर्माण होण्यापूर्वीचा दुवा मिळण्याची शक्यता निर्माण होते.

अवांतर

अवांतर : युयुत्सु - एटले सु?!

किलीमांजारो, मेरु पर्वत - टांझानिया

हे दोन आफ्रिकेतील खरे पर्वत, ज्वालामुखी आहेत हे मध्यंतरी माझ्या वाचनात आले. वरचे ग्रीक पुराणाबद्दल माहिती नाही.

मेरू?

किली मांजारो (मंदार?)

मेरु !

कमालच आहे १ इतके साधर्म्य !
आपण मंदार पर्वताबद्द्ल काय म्हणालात ते समजले नाही.
-- लिखाळ.

पाळामुळांच्या लोणच्याचे चाहते आणि पुराणातल्या वांग्याच्या भाजीचे वाढपी.

अपभ्रंश?

खरे खोटे काय माहिती नाही, मी काही वाचत होते तेव्हा नाव पाहिले. मंदार आणि मांजारो यात मला थोडे साम्य वाटले. भाषातज्ञ यात काही तथ्य आहे किंवा काय ते सांगू शकतील. तसेच हे दोन्ही पर्वत टांझानियातच आहेत. ह्या दोन्ही पर्वतांचा काही इतर संबंध लावल्याचे माझ्या ऐकिवात नाही.

चित्रा

नावांतील साम्य

तुम्ही म्हणता हे नावातील साम्य विलक्षण आहे. एक नाव योगायोगाने सारखं निघू शकतं पण दोन नावं त्याच संदर्भात योगायोगाने सारखी निघणं अवघड आहे. शिवाय मेरू पर्वताच्या ८,००० वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीचं आणि पौराणिक समुद्रमंथन कथेच मध्ये मेरु पर्वत फुटण्याची गोष्ट पण ह्या विचारांना दुजोरा देते.

हा ज्वालामुखी होण्याआधी मेरु पर्वत किती ऊंच असेल ह्याचे अनुमान उपलब्ध आहे का?

इंद्र.

आमचा इंद्र वेगळा आहे.ग्रीकांच्या हर्क्यूलीस अन आमचा काही संबध नाही.

नाना.

मि काय म्हणतो....

तिबेट व हिमाचल प्रदेश ला देवभुमी असे संबोधले जाते, मी मागे तिबेट फिरलो आहे , पण ह्या नजरेने कधी पाहीले नाही तिबेट व हिमाचल कडे....

ग्रीक देवता व वैदिक देवता ह्यांच्या काही साम्य आहे का ? जर आहे तर कुठले ? नाव, रुप अथवा अवतार ?

मान्य :- इंद्रवज्रः दधिची ऋषींच्या हाडापासून बनवले होते.

हाती वीज असलेली देवता आपल्यामध्ये कुठली आहे ?

पण इंद्राच्या शौर्याविषयी शंका आहे. कोणी राक्षस उपटला की हा ब्रम्हा, विष्णू, महेशाकडे पळालाच.

रास्तच आहे कारण इंद्र हा एक व्यक्ती नसून अधिकार/ पद / राजा (स्वर्गाचा) आहे, व कालानूसार इंद्र हा बदलत राहीला आहे , ज्या मानवाने खुप जास्त पुन्य (कसा लिहले जाते पुन्य ?) केले आहे / तप केले आहे त्याला इंद्रपद मिळते. असे आपले ग्रंथ सांगतात, त्यामुळे इंद्र हा शुर व क्षत्रियच असावा हे गरजेचे नाही ना !

अजून एक कल्पना माझ्या मनात आली आहे ;)
एखादा तपोबलाने देवत्वाला पोहचू नये ह्यासाठीच देवांनी केलेली युक्ती असावी इंद्रपद कारण ठरावीक काळ तुम्ही इंद्रपद भोगले की तुमचे तपोबल कमी कमी होत जाते व दुसरा व्यक्ती ज्याचे तपोबल जास्त आहे तो इंद्रपदला प्राप्त होतो.... पण देवत्वामध्ये असे नाही आहे ना... तुम्ही एकदा का देव झालात की बाकी जिंदगी.... समजून घ्या........... आहे की नाही मस्त गेम देवांचा :))

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

कॅपिटल

पुण्य लिहायला कॅपिटल N काढा

:-)

धन्यवाद

ते माहित होते हो पण पुन्य असे लिहतात की पुण्य असे लिहतात ह्याचा थोडा गोधंळ झाला होता, पण तुमची मदत भेटली ह्या बद्दल आपले आभार.

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

तिबेटला कसे जातात?

तिबेटला कसे जावे? तेथे जाण्यास विसा लागतो का? तिबेट हे चीनमध्ये येते ना? यावर थोडे अधिक लिहाल का?

जरी थोडे विषयांतर होत असेल तरी ते माहितीपूर्ण ठरेल असे वाटते.

विषयांतराबद्दल क्षमस्व!

मूळ विषयावर लिहिण्यास सध्या जमणे अशक्य आहे, पुढच्या आठवड्यात काही टाकता येईल.

ग्रीक देवांची

ग्रीक देवांची माहीती येथे आहे असे वाटत आहे ... पाहा खालील दुवा
http://www.mythweb.com/gods/index.html

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

स्वर्ग इत्यादि

स्वर्ग इत्यादी संदर्भ हे अध्यात्मिक अथवा कल्पित आहेत की ऐतिहासिक असा प्रश्न मला अनेकदा पडतो.
त्या केवळ कल्पना आहेत आणि जून्या लोकांनी त्यांचा उपयोग अथवा त्या कल्पनांचे प्रक्षेपण तत्कालात केल्याने हा घोळ निर्माण झाला असेल का? उदा. मेल्यावर स्वर्गप्रप्ती ही कल्पना कालांतराने रुळून नव्या भूभागातील मानावास प्रथम तो स्वर्गातून आला असेल असे समजून त्याच्याशी वर्तन आणि असे भूभाग स्वतःपाहून आल्यावर तो भ्रम आहे असे वाटणे. पण तोवर इतर लोक मात्र सवयीने त्यां विशिष्ट भूभागाला स्वर्गीय वगैरे उपाधी लावून मोकळे झालेले आणि यामूळे अनेक अशा स्वर्गांची इतिहासात उदाहरणे असे काही झाले असेल काय?

आणि जर हे स्वर्ग ही अतिंद्रिय अशी काही प्रतले आणि त्यात राहणारे जीव अशी जर काही कल्पना असेल तर सुद्धा वरिल उदाहरणात म्हटल्या प्रमाणे चुकीचे समज आणि प्रक्षेपण यामूळे वेगळ्या वर्णाच्या लोकांना प्रथम देव समजणे इत्यादी घोळ होणारच.

तर मुद्दा असा की तिबेट हा स्वर्ग की ग्रीक या मध्ये एके काळी लोक ग्रीक ला स्वर्ग मानीत पण कालांतराने तो भ्रम आहे सिद्ध झाले मग ते तिबेटला स्वर्ग मानू लागले आणि काळाच्या ओघात तो सुद्धा भ्रम ठरला असे पुढे पुढे... आणि आज आम्ही एका अतिंद्रीय प्रतलात तो आहे आणि तीन मितींमध्ये राहणार्‍या आम्हाला तो इंद्रियगोचर नाही असे मानतो..आणि पुढे....
आपला,
-- (अतिंद्रीय) लिखाळ.

आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे; त्याचा उच्चार आजच्यासारखाच होता की नाही याचा निर्णय होत नाहिये :)

ग्रीक देव आणि आम्ही

१. स्ट्राबोच्या आणि अन्य काही प्राचीन ग्रीक लेखकांच्या मताप्रमाणे भारतात ग्रीक देव झीयस् ची पूजा करतात.
२. काही प्राचीन ग्रीक लेखकांनी असंही म्हणलं आहे की हर्क्यूलीसने भारतावर आक्रमण करून तो प्रांत जिंकला.

अलेक्झांडर भारतात आला तेव्हा बर्‍याच मोठ्या प्रदेशाचा अनुभव गाठीशी घेऊन आला. जग पादाक्रांत करत असता जिंकलेल्या भागावर अधिपत्य टिकवायचे असेल तर त्या प्रदेशातील लोकांना आपण त्यांच्यापैकीच एक आहोत असे भासवावे लागते हा सर्वात मोठा धडा तो पर्शियात शिकला. उदा. पर्शियात त्याने आपले चित्र असलेली नाणी पाडली. या नाण्यांत त्याने सिंहाची कातडी परिधान केल्याचे दिसते. यामागे त्याचा हेतू सिंहासारख्या निधड्या छातीच्या प्राण्यावरही विजय प्राप्त करणारा विजयी वीर असा होता परंतु पर्शियाच्या लोकांना त्यात अपमान वाटला कारण त्यांच्या पुराणाप्रमाणे दुष्ट देवता पृथ्वीवर उत्पात घडवण्यासाठी सिंहाच्या रुपांत पृथ्वीवर प्रकटल्याच्या आणि पर्शियन राजांनी त्या सिंहाचा नि:पात केल्याच्या गोष्टी मिळतात, म्हणजे त्यांच्यामते अलेक्झांडर सिंहाची कातडी पांघरून आलेला दुष्ट होता. काही विश्वासू सरदार आणि पर्शियन क्षत्रप यांच्या एकनिष्ठेमुळे तो या प्रकरणातून निभावून जाऊ शकला.

जेथे नागरिक शासकाविरुद्ध जातात तेथे बंडाळी माजायला वेळ लागणार नाही हे अलेक्झांडर जाणून होता त्यामुळे पद्धतशीरपणे राजकारणातील चाल म्हणून त्याने, मॅगेस्थेनिसने प्रचार सुरु केला आणि त्यात ग्रीक देव भारतात येऊन राहून गेले आहेत आणि त्यामुळे ग्रीक भारतीयांना जाणून आहेत किंवा त्यांच्यातीलच एक हिस्सा आहेत, परकीय नाहीत आणि त्या अनुषंगाने तुमच्यावर कोणीही परकीय शक्ती राज्य करत नाही, अलेक्झांडर हा भारतीय देवांपैकीच एक आहे (राजा हा देवाचा अवतार असतो इ.) हे दाखवण्याची ती एक राजकिय खेळी होती.

हेरॅकलिस कृष्ण असून डायोनायसिस शिव-शंकर आहे आणि स्वतः अलेक्झांडर स्कंध आहे, येथे नावातील साधर्म्यही पहा -- सिकंदर-स्कंध, असाही प्रचार केला गेला होता.

असो. हे सर्व देव एक आहेत असे मला वाटत नाही. याचा अर्थ अलेक्झांडर पूर्वी ग्रीक भारतात येऊन गेलेच नाहीत असा घेऊ नये.

जगातील सर्व पुराणकथा, परीकथा, वीरकथा इ. मध्ये एकप्रकारचे साम्य आढळते. (जसे बर्‍याच लोकांना गौतम बुद्ध आणि येशु ख्रिस्त यांच्यात साम्य आढळते.) तेवढेच साम्य येथे आहे असे वाटते.

शक्य आहे

तुम्ही म्हणता तसं असणं शक्य आहे. परंतू मी ज्या वाक्यांचा संदर्भ देत आहे ती वाक्य ग्रीक लिखाणातून आली आहेत. हे लिखाण अर्थातच ग्रीक लोकांसाठी असावं (भारतीयांमध्ये गैरसमज पसरवायचे असतील तर ते तात्कालीन भारतीय भाषांमधून प्रसारित करणं जास्त प्रभावी होईल).

असो ह्या बाबतीत अजून काही पुरावे असल्याशिवाय बोलणं फोल आहे.

ग्रीक लेखन

भारतात ग्रीक लेखन होत होते आणि भारतात ते वाचलेही जात होते. याची अनेक उदाहरणे मिळतात. भारतातील विद्वानांनी होमरची महाकाव्ये वाचल्याचेही सांगितले जाते. अर्थात, याला पुरावा द्यायला सध्यातरी माझ्याकडे फारसे नाही. योग्य पुरावा मिळाल्यास देईन. भारतात असा प्रचार केला गेला असावाच परंतु भारतात लेखी पुरावे ठेवण्याची पद्धतच तेव्हा नव्हती. किंवा असेलतरी ते नष्ट झाले आहे. तसेही, नंतर मौर्य घराणे प्रबळ झाल्याने अलेक्झांडरचा प्रभाव भारतातून कमीच झाला.

परंतु, भारतात वापरली गेलेली ग्रीक नाणी आणि अशोकाचे शिलालेख पाहिले तर ग्रीक लिपी आणि भाषा भारतात वापरली जात असावी असे वाटते.

स्ट्राबोने लिहिले ते अलेक्झांडरनंतर सुमारे २५०-३०० वर्षांनी. तोपर्यंत धारणा पक्क्या होत गेल्या असाव्यात. स्ट्राबोच्याही आधी हे मेगॅस्थेनिसने लिहिले त्यापैकी काही त्याने ऐकिव गोष्टींच्या आधारे तर काही त्याने प्रचारा करताच लिहिल्याचे सांगितले जाते. मेगॅस्थेनिस इंडिकामध्ये चक्क लिहितो की हेरॅकलिस् भारतात येऊन राहिला, त्याने अनेक लग्न केली. त्यापासून त्याला अनेक मुले झाली आणि त्याने आपले राज्य या मुलांना वाटून दिले. यासर्वावरून अलेक्झांडर हा परका नाही त्याचे पूर्वज भारताचे शासक होते हेच मेगॅस्थेनिसला पटवायचे होते असे वाटते.

स्ट्राबोने लेखनासाठी मेगॅस्थेनिसच्या इंडिका ग्रंथाचाच वापर केल्याचे सांगितले जाते.

 
^ वर