ऍंटि व्हायरस सॉफ़्टवेअर्स

ऍंटि व्हायरस सॉफ़्टवेअर्स

साधारणपणे संगणकावर मासॉ विंडोज टाकल्यावर पहिली गोष्ट करावी ती ऍंटि व्हायरस इंस्टॉल करणे (ड्रायवर्सच्याही आधी!). ऍंटि व्हायरसची निवड ही तशी प्रत्येकाच्या वैयक्तिक प्रेफरन्सनुसार ठरते.
ऍंटि व्हायरस निवडताना काही मुद्दे ध्यानात घ्यावे लागतात.
1) फ़ुकट की विकत?
फुकटचे ऍंटि व्हायरस वापरताना (किंवा कोणतेही फ़्री सॉफ़्टवेअर वापरताना) ते विश्वासार्ह ठिकाणावरूनच उतरवलेले असावे. विकतचे घेताना 3-4 दुकानात चौकशी करून व घासाघीस करून घ्यावे. (होय, सॉफ़्टवेअर मध्ये विक्रेत्यांना प्रचंड नफ़ा मिळतो. नेटप्रोटेक्टर या पुण्यातील ऍंटि व्हायरसची विक्रेत्यांची खरेदी किंमत 350रु। असते व विक्री किंमत 700 ते 1000 पर्यंत असते.)

2) प्रोसेसर व रॅमचा केला जाणारा वापर
प्रत्येक ऍंटि व्हायरस हे संगणक चालू असताना पार्शभूमीवर काम करत असते. तेव्हा अर्थातच त्याच्याकडून प्रोसेसर व रॅमचा काही भाग वापरला जातो. तसेच अपडेट डाऊनलोड करताना व स्कॅनिंग करताना हा वापर वाढतो. प्रत्येक ऍंटि व्हायरससाठी हे प्रमाण कमी जास्त असते. (मी पाहिलेल्या काही ऍंटि व्हायरस पैकी मॅकअफ़ी हे सर्वात जास्त प्रोसेसर व रॅम वापरते, आणि म्हणून सगणकाचा पर्फॉर्मन्स खालावतो. एव्हीजी, नॉर्टन हे सर्वात कमी रिसोर्सेस वापरतात. )

3) अतिरिक्त फ़ीचर्स
जसे की, रजिस्ट्री स्कॅनर, टेम्पररी फ़ाईल्स क्लीनर, इ. हे प्रत्येक ऍंटि व्हायरसमध्ये कमी जास्त प्रमाणात असतात. तुम्ही जर थोडेसे Geek टाईप असाल तर हे फीचर्स दुर्लक्षित करू शकता. शिवाय अशी कामे करण्यासाठी काही थर्डपार्टी टूल्सही आहेत.

मी स्वत: एव्हीजी फ्री वापरतो. मी ते 3 वर्षांपासून वापरत असून आता पर्यंत चांगले संरक्षण दिले आहे. माझ्या संगणकावर घरातील व्यक्ती इंटरनेटचा (थोडासा निष्काळजीपणे) वापर करतात, तसेच पेन ड्राइव्ज व मेमरी कार्ड रीडर्सचा मुक्त वापर होतो, तरीही माझ्या सगणकाला विषाणूची बाधा झालेली नाही.
इतर उपक्रमी त्यांच्या सगणकाचे संरक्षण कसे करतात?

(The best way to avoid malwares is to avoid MS!)

लेखनविषय: दुवे:

Comments

+१

>>मी स्वत: एव्हीजी फ्री वापरतो. मी ते 3 वर्षांपासून वापरत असून आता पर्यंत चांगले संरक्षण दिले आहे.

मी ५ वर्षांपासुन् एव्हीजी फ्री वापरत् आहे, नो प्रॉब्लेम. अर्थात् माझा इंटरनेट् वापर तसा खुप् सेफ आहे.

(आम्हा सोफोस फ्री मिळतो, पण् एका मित्राचा कंप्युटर सोफोजवर् असतानाही इन्फेक्ट् झाल्याचे उदाहरण् आहे.) बाकी कुठला ऍन्टीव्हायरस सर्वात् चांगला यावर् एकमत् होणे फार् कठिण्. आणि हो, लिनक्सवाले "लागतोय् कशाला तुम्हा ऍन्टीव्हायरस्" करत येतातच. ;-)

-Nile

लिनक्सवाले

आणि हो, लिनक्सवाले "लागतोय् कशाला तुम्हा ऍन्टीव्हायरस्" करत येतातच. ;-)

माझंही तेच मत आहे. ऍन्टीव्हायरस् नकोच या मताचा मी आहे. पण, काउंटर स्ट्राईकसाठी मासॉ लागतेच आणि मासॉ साठी ऍन्टीव्हायरस्!!

||वाछितो विजयी होईबा||

ऐकीव माहिती

सीएसचा लिनक्स पोर्ट आहे असे ऐकले होते. एओईचा लिनक्स पोर्ट मात्र माहिती नाही. वाईन किंवा वर्च्युअल मशीन वापरून लिनक्सवर एओई चालवता येते. या दोन्ही पर्यायांमध्ये व्हायरस आला तरी त्याचा प्रभाव मर्यादित ठेवता येतो.
विंडोजसाठी मी एव्हीजी वापरतो.

इतरही खेळ

:-) सीएस्, एओई, क्रिकेट, सिम्स हे सगळेच लागतात हो. आणि वाईन मध्ये परफॉर्मन्सला मर्यादा येतात.

||वाछितो विजयी होईबा||

खेळ

खेळासाठी पीएस२/३, वी वगैरे वापरणे जास्त चांगले, त्याच्या सीडीज/डीविडीज मात्र 'महाग' 'पडू' शकतात. ;)

तरीदेखील विषाणूरोधक प्रणाली हवीच, मी स्वतः क़्विकहील(पुण्याचे वगैरे म्हणून) वापरत असे पण ते खूप किचकट आहे व संरक्षण देखील अपुरे आहे, मला सिम्यान्टेक ची एन्ड पॉइंन्ट प्रणाली आवडते(कामाच्या ठिकाणी होती), पण महाग आहे सो फुकट एविजी वापरतो. म्याक्याफी खूपच र्याम खातो, संगणकासाठी विषाणू-रोधक कि विषाणू रोधाकासाठी संगणक हेच कळेनासे होते.

अवांतर - नास्तिकांचे एक वाक्य आहे, "देवळात जावे लागेल असा वागूच नये माणसाने (पापक्षालन वगैरेसाठी)..त्याच धर्तीवर विषाणू येईल असे वागूच नये" (हळू घ्या). :)

लिनक्सवाले "लागतोय् कशाला तुम्हा ऍन्टीव्हायरस्" करत येतातच. ;-)

हा ! हा !
मी तेच म्हणतो. कशाला हवी विंडोज प्रणाली. घरी काम करण्यासाठी लिनक्स उत्तम आहे. व्हायरस ची झंझट नाहि. आम्ही तर घरी आणि दारी (कार्यालयातही) तेच वापरतो.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

नो ऑप्शन्.

>>कशाला हवी विंडोज प्रणाली.

आमच्या कामासंबंधित अनेक प्रणाल्यांना विंडोजच लागते, त्यामुळे ऑप्शन नाही.

-Nile

अविरा!

मी मॅकेफी,नॉर्टन,एव्हीजी,ऍव्हास्ट इत्यादि वापरून पाहिले(सगळे फुकट)...त्या सर्वात मला ऍव्हास्ट उत्तम वाटले...पण त्यानंतर मला अविरा(हे ही फुकटच) हा अधिक चांगला पर्याय मिळाला..गेले जवळपास वर्षभर मी तेच वापरतोय...अगदी भरोसा ठेवण्यालायक आहे..असे म्हणू शकतो.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

ऍव्हास्ट व मॅकअफी

ऍव्हास्ट थोडे आणि मॅकअफी लयी जड आहे. आय हेट दोज...अविराही हलके आहे पण एव्हीजी इतकं चांगलं संरक्षण नाही देत.
अरे बाप रे! हा विषय ज्वालाग्रही तर नाही?

||वाछितो विजयी होईबा||

अविरा

सध्या फुकट डाऊनलोड केलेले अविरा वापरतो.
लवरकच कास्पारस्की विकत घ्यायचा विचार आहे.

बाकी विंडोज का वापरतो ह्या प्रश्नाला उत्तर् नाही, मला ते आवडते म्हणुन वापरतो.

- शंत्रुंतप

वीकतच् घ्यायचे आहे तर् एव्हीजी घ्या

जबर्दस्त् प्रोटेक्शन् भेटते. अगदी आयडेन्टीटी थेफ्ट् पासून ते पर्सनल फायर वॉल पर्यंत एकदम मस्त फासीलीटीज आहेत.

कच्चा.

मी संगणक ह्या विषयात बराच कच्चा आहे, नेटचा युजही कामापुरताच आहे.
मग मला खरेदी करताना 'आयडेंटि थेप्ट / पर्सनल फायर वॉल' इत्यादी बाबी पाहणे गरजेचे आहे का ?
मला ह्यातली माहिती नाही, मिळाल्यास आनंद होईल.

सल्ल्यासाठी आभारी आहे.

- शंत्रुंतप

मी केवळ एव्हीजी (फ्री अथवा पेड) वापरले असल्याने....

आपला नेटचा युजही कामापुरताच आहे ?
तसे असेल तर एखादे चांगले एंटी व्हायरस पूरेसे आहे. फक्त कोणतीही फाइल् डाऊन्लोड करण्यापूर्वी ती विश्वासू स्त्रोतापासून घेत् आहात् ना याची काळजी घ्या आणी मूख्य म्हणजे डाऊनलोड केल्या केल्या लगेच स्कॅन कराच. पण नेट वर आपण बराच वेळ व बरेच ऊद्योग करत असाल तर मात्र कीमान स्पायवेअर व फायरवॉल असलेच पाहीजे. या दोन्ही गोश्टी योग्यप्रकारे कॉनफीगर केल्या तर त्या तूमच्या नकळत होणार्‍या नेट कम्यूनीकेशन वरती गदा आणतात.

पण आपण होम युजर असाल वर घरातील सर्व वयोगटातील लोक स्वतंत्रपणे नेट वापरत असतील तर मग मी एव्हीजी घ्याच असेच सांगेन कारण ते सर्वप्रकारच्या धोक्यांबाबत अत्यंत संवेदन्शील आहे आणी संशयास्पद कार्य आढळल्यास लगेच सूचना देते अथवा आवश्यक कार्यवाही करते. एव्हीजीबाबत फक्त एकच प्रोब्लेम आहे ते म्हणजे ते तूम्हाला वीकत घेता येत नाही तर त्याचे सबस्क्रीपशन घ्यावे लागते म्हणजे थोडक्यात् भाड्याने घेणे म्हणा. मी एक वर्षांपूर्वी एका ऑफरमधे $७० देऊन दोन वर्षांचे सबस्क्रीपशन घेतले आहे. यामधे एंटी व्हायरस, एंटी स्पायवेअर, एंटी स्पॅम, लिन्क स्कॅनर, एंटी रूट्कीट, एमेल स्कॅनर, आयडेंटि प्रोटेक्शन, रेसीडंट शील्ड व ओनलाइन शील्ड या गोश्टी येतात. घरात जर कोणी संगणक् अशीक्षीत् असेल् तर हे हवेच(वीशेषतः लहान मूले वापरत असतील् तर).

अर्थातच ह्याचे अत्यंत कार्यक्षम असे फ्री व्हर्जन पण भेटते पण त्यात् फक्त एंटी व्हायरस व त्याचे रेसीडंट शील्ड येते जे तूमचा वैयक्तीक् नेटचा वापर बघता पूरेसे वाटत आहे.

धन्यवाद.

तुर्तास माझा नेटचा वापर हा केवळ अत्यावश्यक कामे, काही इमेल अकाउंट्स आणि सर्वसाधारण वापरातल्या वेबसाईट्स ( फेसबुक, वर्तमानपत्रे, ब्लोग्स, स्काईप आणि तत्सम ) ह्यापुरताच मर्यादित आहे. टोरंटचा वापर काही वेळा केला आहे पण तो अगदीच नगण्य आहे.
ह्याव्यतिरिक्त मी नेट वापरत नाही.
इतरांकडुन माझ्या नेट कनेक्शनचा वापर होण्याची शक्यता अलमोस्ट् नाहीच, लहान मुले वगैरेचा तर् प्रश्नच नाही.

आता मी जरा बाजारात चौकशी करुन माझ्या गरजा भागवणारे करेक्ट ऍन्टी व्हायरस् घेईन.
हे सर्व करत असताना माझ्याकडुन होत असणारा डेटा ट्रान्सफर ( पेन् ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क ) आदी पण् बघावे लागेल् असे वाटते.
आपण दिलेली माहिती मला निश्चितच उपयोगी पडेल, मी खरेदी करताना उपरोक्त बाबींची चौकशी करुन योग्य तीच सेवा घेईन.

अत्यंत कार्यक्षम असे फ्री व्हर्जन पण भेटते पण त्यात् फक्त एंटी व्हायरस व त्याचे रेसीडंट शील्ड येते जे तूमचा वैयक्तीक् नेटचा वापर बघता पूरेसे वाटत आहे.
बहुदा हे योग्य आहे असे वाटते, मी शक्य तितक्या लवकर ह्याची मोफत प्रत वापरुन बघतो व त्या आधारे पुढिल बाबी ठरवतो.
आभारी आहे.

- शंत्रुंतप

डेटा पोर्टेबिलिटी


हे सर्व करत असताना माझ्याकडुन होत असणारा डेटा ट्रान्सफर ( पेन् ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क ) आदी पण् बघावे लागेल् असे वाटते.

अर्थातच!
विषाणू संसर्ग फैलावण्याचा सर्वात सोपा व सर्वात कॉमन प्रकार आहे तो....तेव्हा जरा जपूनच.
प्रत्येक रिमूव्हेबल वस्तू जोडल्यावर आधी स्कॅन करून घेणे सर्वात उत्तम.
||वाछितो विजयी होईबा||

कास्पारस्की

दोन वर्षांपेक्षा जास्त कास्पारस्की वापरतो आहे. उत्तम आहे.
मायक्रोसॉफ्टचे स्युकिरिटी इसेन्शिअल सुद्धा फुकटच आहे.


+१

>>> दोन वर्षांपेक्षा जास्त कास्पारस्की वापरतो आहे. उत्तम आहे.
असेच म्हणतो. वर्षा वर्षाला कास्पारस्की विकत घ्यावं लागतं
लाईफ टाइमचा कै फॉर्म्यूला नै का ?

-दिलीप बिरुटे

एका वेळी अनेक वर्षे

मला पहिल्यांदा फुकट मिळाले होते एका वर्षासाठी. पण मग आवडले म्हणून २ वर्षांसाठी विकत घेतले.


धन्यवाद.

आपल्या प्रतिसादामुळे माझ्या कास्पारस्की घेण्याच्या निर्णयाला गुंजभर् बळ मिळाले.

मासॉ मालवेअर रिमूवल

मासॉचे मालिशिअस सॉफ्ट्वेअर रिमूव्हल टूल हे चांगले स्कॅन करते. त्यामध्ये क्विक, फुल आणि कस्टमाइज्ड असे पर्याय आहेत. पण त्यामध्ये लाईव स्कॅनिंग होत नाही. म्हणजे ते वेळोवेळी मॅन्युअली स्कॅन करावे लागते. येणार्‍या व्हायरस/मालवेअरला ते थांबवत नाही तर फक्त असलेले इन्फेक्शन काढून टाकते.
तरीही अधून मधून त्याने संगणक स्कॅन करणे चांगले.

||वाछितो विजयी होईबा||

झिरो-डे प्रोटेक्शन

कोणतेही ऍंटि व्हायरस सॉफ़्टवेअर झिरो-डे प्रोटेक्शन देऊ शकत नाही. त्यामुळे एकदा व्हायरस, ट्रोजन हॉर्स येऊन गेला की (किंवा इतर व्हायरस कंपन्यांनी बनवुन टाकला की, ) त्यावरील उत्तर शोधणे नो-ब्रेनर असते. त्यालाच आपण सिग्नेचर म्हणतो. अशा सिग्नेचर डाउनलोड करत राहणे अत्यंत आवश्यक असते, नाहीतर सोन्याने मढवलेला ऍंटि व्हायरस जरी घेतला तरी तो बुजगावणेच ठरतो.

इस्कॅन

गेलि काही वर्षे इस्कॅन विकत घेउन वापरत आहे , काही समस्या नाही

आणखी काही

वरती उल्लेख केल्याप्रमाणे अजून काही व्हाइरस रिमूव्हल टूल्स आहेत.
माझ्या आवडीची आहेत कॉम्बोफिक्स आणि मालवेअर बाईट्स
हे दोन्ही अगदी खोलवर(रजिस्ट्रीपर्यन्त) जाऊन सफाई करतात. पण हे दोघेही लाईव संरक्षण नाही देऊ शकत.

||वाछितो विजयी होईबा||

नॉर्टन

कॉमकॅस्टकडून इंटरनेटसोबत फुकट मिळतो म्हणून डेस्कटॉपवर आहे. लॅपटॉपवर मी अँटीवायरस टाकलेला नाही पण लॅपटॉपवरून माझा जालसंचार खूप मर्यादित आणि सुरक्षित असतो.

कसं काय?

पण लॅपटॉपवरून माझा जालसंचार खूप मर्यादित आणि सुरक्षित असतो.

कसं काय बुआ? शिवाय लॅपटॉपमध्ये डेटा येण्याचे जालसंचार सोडून इतरही मार्ग आहेतच की.(फ्लॅशड्राइव्ज, इ.). अशा गोष्टी वापरताना काय काळ्जी घेता?

||वाछितो विजयी होईबा||

एव्हीजी....

गेले बरेच दिवस संगणक आणि लॅपटॉपवरही एव्हीजीची मोफत प्रणाली वापरत आहे. रोजच्या तपासणीचे वेळापत्रक लावून टाकल्याने संगणक नेहमीच सुरक्षित असतो. मात्र कोणतेही पेनड्राईव्ह, युएसबी हार्ड डिस्क लावताना पहिल्यांदा नीट स्कॅन करुन घेण्याची कायमची सवय लावलेली आहे.
उपचारापेक्षा प्रतिबंध कधीही चांगला.

==================

डुंबा हो रे डुंबा हो रे डुंबा हो रे!

एव्हीजी, कास्पारस्की

घरात एव्हीजी, कास्पारस्की वापरून बघितले आहे. ह्या अँटीव्हायरसांमुळे संगणक मंदावत असल्यामुळे सध्या कुठलेच वापरत नाही.फायरफॉक्सवर नोस्क्रिप्ट वापरतो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अँटी व्हायरस स्थळे आहेत उदंड.. विवाह एकाशीच करावा..

मी अविरा वापरतो. तक्रार नाही. फुकट आहे. सोपा आहे. सतत अपडेट होतो.
बरोबर स्पायबॉट सारखं अॅटी स्पायवेअर पण वापरायला हवं.
विंडोजला टाळता येत नाही. नुसत्या दरवाजाने काही जणांची दमछाक होते. खिडकी लागतेच एखाद्या तरी टर्मिनलला.
लिनक्स लीन आहे, विंडोजची दादागिरी नाही म्हंटली तरी चालतेच हो...

मासॉ इसेन्शियल्स् वापरतो

पूर्वी नॉर्टन आणि मॅकफी वापरलेले आहेत. (कामाच्या ठिकाणून फुकट मिळत असत.)
पण प्रोसेसर/रॅम ही संसाधने फार वापरली जात असावीत - संगणकाचा वेग कमी होत असे.
मासॉ इसेन्शियल्स् बद्दल अजून ही तक्रार नाही.

लिनक्स यंत्रावर अजून कुठलेही प्रतिवैषाणुक वापरत नाही. हे किती धोकादायक आहे, त्याची कल्पना नाही. विषाणूनिर्माते लिनक्स यंत्रांना पछाडणारे विषाणू फारसे बनवत नाहीत असे ऐकून आहे.

(लिनक्स सुधारण्याचे कौशल्य असणारे लोक जगात आहेत, तर पछाडू शकण्याचे कौशल्य असलेलेही लोक असतील ना.)

एक् नंबर्

हा हा हा .. लेख आणि प्रतिसाद वाचुन फारंच मनोरंजन झाले तसेच नववनविन माहिती देखील मिळाली.

मी सायबर कॅफे चा पिसी वापरतो. त्यामुळे जे काही झंगाट आहे ते त्याच्या गळ्यात. मी मला जे हवे ते करायला मोकळा आणि कसली रिस्क पण नाही. मासिक ९०० रुपयांचा प्लान घेतल्याने माझे स्वतःचे इंटरनेट चे बिल , लाईट बील , संगणक खराब होणे आणि इतर सगळ्या त्रासांपासुन मला कायमची सुटका झाली आहे.

- टारझन

आयडिया

बाकी आयडीया झक्कास आहे. ९०० रु मध्ये नो टेन्शन!!

||वाछितो विजयी होईबा||

 
^ वर