भारतातील ख्रिश्चन स्टेटस्

आपल्या देशाच्या संविधानातच हा देश सेक्यूलर असल्याची घोषणा करण्यात आली असतांना एखादे राज्य स्वतःला ख्रिश्चन स्टेट असे कसे काय म्हणवून घेवू शकते? हा प्रश्न ना सामान्यजनांना पडत ना कोणत्याही पक्षाच्या केंद्र सरकारला!
अन्य एखाद्या देशात असे घडू शकेल काय? याचे उत्तर निश्चितपणे नकारार्थिच असेल.

नको त्या विषयावर लिहावयाचे कारण म्हणजे जानेवारी महिन्यात गारो-रभा जमातीत उडालेला हिंसाचाराचा भडका. वरवर पाहता या हिंसाचाराचे स्वरुप वांशिक भासले तरी ख्रिस्ती झालेल्या गारोंना पारंपरिक जमातधर्म पाळणाऱ्या रभा नागरिंकावर केलेले हल्ले हेच या हिंसाचारामागचे मुळ कारण आहे.

स्वातंत्र्यानंतर नागालैंड आणि मिझोराम राज्यांनी, केंंद्र सरकारच्या नाकावर टिच्चून , स्वतःला ख्रिश्चन स्टेट, असे अधिकृत आणि जाहीरपणे म्हणवून घेतले. या देशाच्या संविधानातच हा देश सेक्यूलर असल्याची घोषणा करण्यात आली असतांना , एखादे राज्य स्वत; ला ख्रिश्चन स्टेट असे कसे म्हणवून घेवू शकते?

अगदी ताजे उदाहरण म्हणजे मेघालय सरकारने ही मेघालय हे ख्रिश्चन स्टेट आहे, असे अधिकृत उत्तर. मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते, निव्रूत्त व्यवस्थापकीय अधिकारी श्री हरिश्चंद्र पवार यांनी माहितीच्या अधिकाराखाली मेघालय सरकारला एक प्रश्न विचारला होता. त्याला लिखीत स्वरुपात उत्तर देताना, जनसंपर्क आणि माहिती विभागाच्या उपसचिव श्रीमती मणी यांनी 'आमचे राज्य ख्रिश्चन स्टेट असल्यामुळे आमच्या इथे रविवारीच सार्वजनिक सुट्टी असते. सर्व बाजार रविवारी बंद असतात त्यामुळे रविवारी कामकाज सुरू ठेवण्याआ प्रश्नच उदभवत नाही' असे उत्तर दिले आहे.

प्रश्न असा आहे की असाच पायंडा पडत गेला आणि प्रत्येक राज्य सरकार स्वतःला 'धर्माधिष्ठित राज्य' म्हणवून घेऊ लागले तर या देशाच्या घटनेतील सेक्यूलर संकल्पनेचे काय होईल? देशातील सर्वसामान्य जनतेचे काय होईल? आणि भविष्यात त्यांना कोणत्या संकटांशी सामना करावा लागेल? पण भविष्याची बात कशाला? आज इशान्य भारतातील अजूनही ख्रिस्तिकरण न झालेल्या , आपल्या जमातीच्या श्रद्धा आणि परंपरा मानणाऱ्या जनजाती-जमातींवर संकट ओढवले आहे.

मिझोराम मधील हिंदू मैतेयी आज संकटात आहेत. इनर लाईन परमीट नाही, याचे निमित्त करून वर्षानुवर्ष मिझोराममध्ये राहणाऱ्या वैष्णवपंथी मैतेयी नागरिकांना मिझोराम बाहेर घालवून देण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. जेंव्हा काही मणिपुरी पत्रकारांनी अशा हाकलून लावलेल्या मैतेयींचे ट्रकचे ट्रक भरून जातांना पाहिले, तेंव्हाच त्यांना या विदारक परिस्थीतीचा अंदाज आला.

एकविसाव्या शतकात संपूर्ण आशिया खंड ख्रिस्तमय करण्याच्या योजनेची सुरुवात ईशान्येतील नागरिकांचे ख्रिस्तिकरण करण्याने होत आहे. आणी म्हणूनच अशा प्रकारच्या घटना घडत आहेत.

याच प्रकारे बारा वर्षापूर्वी पारंपरिक श्रद्धा पाळणाऱ्या मिझोरम मधील ३५०००(पस्तीस हजार) रियांग जमातीच्या लोकांना , हिंसाचार घडवून आणून , मिझोरमच्या सीमेबाहेर आश्रय घेण्यास भाग पाडण्यात आले. आज मिझोरम सरकार, केंद्र सरकारच्या दबावामुळे निर्वासीत झालेल्या रियांग नागरिकांचे पुनर्वसन करण्यास (निदान वर वर आणि कागदोपत्री तरी) तयार आहे. परंतु त्रिपुरातील शरणार्थी शिबीरात भयानक परिस्थितीत जगणारे हे रियांग इतके भयभीत झालेले आहेत की, मिझो सरकारवर आणि स्पष्ट शब्दात म्हणायचे तर ख्रिस्ती मिझोंवर ते विश्वास ठेवायला तयार नाहीत आणि अर्थातच मिझोरम मधील आपापल्या मूळ गावी परत जाण्यास तयार नाहीत.

जी परिस्थिती काल रियांग जमातीच्या लोकांवर ओढवली, तीच आज मैतेयी व अधिक भायानक प्रकारे रभा जमातीच्या हजारो नागरिकांवर ओढवली आहे. मात्र एखाद्या चर्चच्या विटेलाही धक्का लागला तर आकाश पाताळ एक करणाऱ्या आमच्या पत्रकारांना , विचारवंतांना आणि न्युज चैनल्स वर पक्षपाती चर्चा घडवून आणणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मिडीयातील पत्रकारांना हा विषय जनतेपुढे आणावा असे वाटत नाही.

त्यामुळेच रभा जमातीवर इतका भयंकर प्रसंग ओढवला असतांना या देशातला कुणीही सेक्युलर त्यांच्या बाजूने कांही करायला, नव्हे साधे रडायलाही तयार नाही. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की वरील प्रकारे स्वतःच्याच देशात निर्वासित होण्याची पाळी आणखी कुणाकुणावर येणार? आणि केंद्र सरकार यावर काही कठोर आणि कायम स्वरुपी इलाज करणार आहे की नाही?

संदर्भ-साभार- ईशान्य वार्ता-फेब्रुवारी २०११ लेख-श्री पुरुषोत्तम रान

Comments

!

हे 'अगदी ताजे उदाहरण' गेल्या ऑक्टोबरमध्ये हिंदू सायटींवर प्रसिद्ध झाले होते. इतक्या काळात ती बातमी कोणत्या विश्वासार्ह वृत्तपत्रात/वाहिनीवर प्रसिद्ध झाली काय? ती बातमी सत्य असेल तर कठोर कारवाई आवश्यक आहे.
विस्थापितांच्या मुद्यावर आधीच्या धाग्यात प्रमोद सहस्रबुद्धे यांनी मत मांडलेच आहे.

धर्माधिष्ठित राज्य

धर्माधिष्ठित राज्य असू नये याबाबत आपले एकमत असावे असे वाटते.
धर्माधिष्ठित राज्याच्या दोन संघटनात्मक बाजु असतात. एकात राज्यकारभारात धर्माची लुडबुड असते. (असे नसले की त्यास सेक्युलर म्हणण्याची प्रथा आहे.) दुसर्‍यात एका धर्माच्या लोकांना विशिष्ट दर्जा दिला जातो. (इतरांना त्यांचा धर्म सार्वजनिक ठिकाणी अनुसरण्यास बंदी, वेगळे कर इत्यादी.)
भारतातील कुठलेही सरकार या प्रकारच्या धर्माधिष्ठित सरकारांमधे नसावे अशी माझी समजूत आहे.
थोडीफार शिथील विधाने, राजकारण्यांचे धार्मिक सत्तेशी लागेबांधे अशा सारख्या गोष्टी घडतात हे त्याबरोबर मान्य करावे लागते. असे घडणे योग्य नसले तरी फारसे जाचक नसल्याने त्याकडे कानाडोळा केला जातो.

तुम्ही लिहिलेल्या विधानात शिथील विधानांचा वास येतो, किंवा योग्य विधानाचा शिथील अर्थ काढल्यासारखे भासते.
माहितीच्या अधिकारात मिळालेल्या उत्तराची छायाप्रत कुठे उपलब्ध असल्यास कळवावे.

यापूर्वी तुम्ही लिहिलेल्या धाग्यात तुम्ही काही प्रश्नांची उत्तरे देणे बाकी आहे. त्यांस वेळ न मिळता तुम्ही नवीन धागा काढू शकला याबद्दल थोडे आश्चर्य वाटते.

प्रमोद

अवांतर: (शक्य) खुलासा

यापूर्वी तुम्ही लिहिलेल्या धाग्यात तुम्ही काही प्रश्नांची उत्तरे देणे बाकी आहे. त्यांस वेळ न मिळता तुम्ही नवीन धागा काढू शकला याबद्दल थोडे आश्चर्य वाटते.

माझ्यामते हे नवे धागे कॉपीपेस्ट असावेत. बहुधा ब्लॉगवरून वगैरे. अनेक "सिनिअर" सदस्यांना प्रतिसादांसाठी टंकन करणे वगैरे थोडे कठिण पडते असे वाटते. किंवा विचारलेल्या प्रश्नांची आपण उपक्रमावर उत्तरे देऊ लागतो हे माहित नसते (पण हे विधान धाडसी वाटते). मागे नानावटीं*नीही प्रतिसाद देण्याबाबत अडचण व्यक्त केली होती. तसेच काहीसे असावे अशी शक्यता.

* नानावटी सिनिअर असण्याबाबत कल्पना नाही. तसे दर्शवण्याचा उद्देशही नाही.

खुलासा

मागील धाग्यावरीला आपल्या प्रश्नास उत्तर दिले आहे. मला इशान्य भारतातील घडामोडीमध्ये रुची असल्याने मी ईशान्य वार्ता या मासिकाचा सभासद आहे. त्यात अधिकृत व सत्य परिस्थीतीबाबत माहिती असते. ती सर्व माहिती उर्वरित भारतातिल मुख्य वर्तमान पत्रात येतेच असे नाहि आणि आली तरी ती अतिशय त्रोटक शब्दात येत असते. त्यामुळे ही माहिती इकडे अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी या उद्देशाने हा माझा प्रयत्न असतो. त्यानिमीत्ताने या विषयावर चर्वण होत आहे यात च माझ्या अल्पशा प्रयत्नाचे यश आहे ही माझी भावना आहे. तिथे वर्षानुवर्षे कार्य करणारे आणि त्यांना येणारे अनुभव मी माझ्या वार्षीक भेटित ऐकत व अनुभवत असतो. तेथील मोबाईल डिस्पेन्सरीला सातत्याने मिळत असलेली सरकारी आंशिक अनुदानही जेंव्हा त्याची आता आवश्यकता नाही या कारणाने बंद होते तेंव्हा खंत वाटते. या विरोधी वातावरणात हि काही सामाजिक संस्था तिथे आपली सेवा देण्याचे कार्य अविरत करतच आहेत्. या विषयावर http://www.christianaggression.org/ वर आपण अधिक माहिती घेउ शकता.

जी माहिती सविस्तर पणे इतरत्र उपलब्ध आहे ती येथे देण्याचे प्रयोजन नाही केवळ अद्ययावत माहिती येथील मित्रांना मिळावी व त्यावर चर्चा होवून या विषयावर प्रकाशझोत पडावा एवढाच उद्देश.

विश्वास कल्याणकर

गंमत

प्रियाली यांच्या जवळपास प्रत्येक प्रतिसादात 'उपक्रम' चा उल्लेख असतो, याची गंमत वाटते.
(प्रतिसाद अवांतर आहे, याची कल्पना आहे.)

धर्माधिष्टीत राज्य

माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती च्या आधारेच ईशान्या वार्ता मध्ये माहिती दिली आहे. तिकडीस सविस्तर माहिती आपले कडिल वर्तमानपत्रात येत् नाही हीच तर खरी शोकांतिका आहे. हा भाग सर्व केंन्द्रिय सरकारांकडुन दुर्लक्षित राहिला आहे. त्याचे कारण काय याचा शोध घेणे देखील गरजेचे आहे. उर्वरित भारतियांना या प्रदेशाबाबत कमीतकमी माहिती व्हावी हा उद्देश पर्यायाने या प्रदेशाबाबत माहिती दिल्याने टी. आर. पी वाढन नसावा. त्या भागातील राजकारणी चर्चशी बांधील असल्याइतके सुस्पष्ट दिसुन येते. हे तिथे काही वर्षे काम केल्यावरच लक्षात येउ शकते. तिकडील माहीती दिल्यानंतर त्याबाबत काही मित्र पुरावे मागतात पण एकदा त्या भागात रहाण्याचा अनुभव घेतल्यास नक्किच त्यांचे मत परिवर्तन होईल यात शंका नाही.

विश्वास कल्याणकर

अजून माहिती

तुमच्या माहिती मुळे इकडचा टी आर पी वाढलेला दिसतो. तो लक्षात घेऊन मिडियात अधिक आले तर बरे.

इशान्य वार्ता या नियतकालिकाबद्दल अधिक माहिती मिळाली तर आवडेल. तुमच्या माहितीची दोन स्थळे दिसतात ईशान्य वार्ता आणि तुमच्या प्रत्यक्ष भेटीतली माहिती. प्रत्यक्ष माहिती मिळवण्याचा प्रयत्न चांगला असला तरी तो सर्वांना जमण्यासारखा नाही. त्याऐवजी ईशान्य वार्ता नियतकालिक वाचण्याचा प्रयत्न करीन. याचे प्रकाशक कोण? कुठून प्रसिद्ध होते? हे जाणून घेण्याची इच्छा आहे.

तुम्ही नॅशनल मिडीयात बातमी येत नाही असे म्हणालात. पण त्यात रभा-गारो विवादावर व्यवस्थित माहिती आली होती. त्यातील माहिती आणि तुम्ही दिलेली माहिती यात बर्‍याच अंशी तफावत होती. (संदर्भासाठी दुवे पाहावेत.) तुमचा स्वतःचा अनुभव मेघालयशी संबंधीत नसावा असे तुमच्या आजवरच्या लेखावरून वाचले. तेव्हा तुमचा सोर्स ईशान्य वार्ता आणि हिंदू सारखी वर्तमानपत्रे यातील तफावतीत ईशान्य वार्ता जास्त विश्वासार्ह का वाटते याबद्दल तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल. (तुम्ही त्या धाग्यावर या तफावतीबद्दल लिहाल अशी आशा होती.)

हरिश्चंद्र पवार हे नाव मराठी असावे असे मी धरून चालतो. त्यांच्या कडे माहितीअधिकारात मागवलेल्या कागदाची प्रत असणार. (ज्यात ख्रिश्चन स्टेट असा उल्लेख आहे.) ती मिळवता येणे शक्य आहे का?

प्रमोद

ईशान्य वार्ता

या मासिकाचे प्रकाशक जयवन्त् कोन्डविल्कर असुन ते ९ जय गायत्रि, गोपालनगर, रोड न्. १ डोम्बिवली(पुर्व) ४२१२०१ येथुन प्रसिध्द होते. रु. १००(वार्षिक) पाठविल्यास ते घरपोच पाठवितात्. मी मेघालय, नागालैण्ड, अरुणाचल व आसाम या राज्यात दरवर्षी जात असतो तेथे माझा प्रवास १-२ महिने असतो.

विश्वास कल्याणकर

धर्माधिष्ठित राज्य

ईशान्य भारतातील धर्मांतरणा मागील पार्श्वभुमी येथे पहावी

विश्वास कल्याणकर

चर्चचे कौतुक

अन्य भारतीयांना जिथे जाणे सहसा जमत नाही अथवा फारसा रस नाही तिथे जाउन इतक्या मोठ्या संख्येने धर्मांतर करणे हे नक्कीच मोठे काम आहे. चर्चने ते कसे केले याचा अभ्यास नक्कीच रोचक असेल.

ईशान्य भारताच्या बाजुला भूतान, ब्रम्हदेश व बांगलादेश. येथे प्रामुख्याने बुद्धधर्मीय, मुस्लीम व अन्य ट्रायबल लोक असताना फक्त इशान्य भारतात हे ख्रिस्ती धर्मांतर काम कसे झाले यावर अजुन वाचायला आवडेल. भारतातील कायदे याबाबत भूतान, ब्रम्हदेश, बांगलादेश पेक्षा अपूरे आहेत काय? भारतातील हिंदूंचे कैवारी पक्ष भाजपा, शिवसेना केंद्रात सत्तेत असताना असे घाउक धर्मांतर थांबावे किंवा पुन्हा हिंदूधर्मात इच्छूक लोक यावेत म्हणुन केलेले कार्य असले तर ऐकायला आवडेल.

माओवादाच्या अथवा चीनच्या प्रभावाखाली देशविघातक कामात गुंतण्याऐवजी ते लोक ख्रिस्ती होउन जर व्हॅटीकनचरणी श्रद्धावान होणार असतील तर ते भारताला कमी उपद्रवकारक असेल असे मला वाटते.

भारताच्या इतर भागात जे ख्रिस्त धर्मीय आहेत त्यांचा भारताला प्रचंड त्रास होतो आहे अशी काही माहीती आहे काय?

हिंसाचार फक्त धर्मामुळेच असेल असे वाटत नाही. त्यामागची कारणे वेगळी असणार. 'हुतू आणि तुत्सी' जमातीत अफ्रिकेतील नरसंहार, १९९० मधील भुतानमधील नेपाळीवंशीय व भूतानमधील मुळनिवासी यांच्यातील संहार यातील अभ्यास ह्या समस्येकरता कदाचित उपयुक्त होईल किंवा हा येथील जुना प्रश्न असेल जो परत चिघळला असावा.

यावर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.

दुवा

वरील लेख वाचून बऱ्यापैकी धक्का बसला, म्हणून अजून थोडे वाचन केले असता हा दुवा सापडला, ह्यामध्ये बऱ्याच प्रश्नांचा उहापोह केला आहे. हा दुवा म्हणजे अरिझोना विद्यापीठाच्या रिचर्ड एटोन ने नागालॅंडच्या इतिहासाचा केलेला/घेतलेला अभ्यास/मागोवा आहे.

चर्च ने हे कसे साध्य केले ह्यास ब्रिटीश-राज ची पार्श्वभूमी आहे असे वरील दुव्यावरून वाटते आहे. नागा लोक ज्या देवाला मनात होते त्याची सांगड मोनोथीइझमशी घालण्याचा प्रयत्न केला, तसेच व्यापाराच्या माध्यमातून ख्रिस्तीकरणाचे प्रयत्न झाल्याचेही त्यात सांगितले आहे.

भारतातील हिंदूंचे कैवारी पक्ष भाजपा, शिवसेना केंद्रात सत्तेत असताना असे घाउक धर्मांतर थांबावे किंवा पुन्हा हिंदूधर्मात इच्छूक लोक यावेत म्हणुन केलेले कार्य असले तर ऐकायला आवडेल.

मला देखील वाचायला आवडेल.

माओवादाच्या अथवा चीनच्या प्रभावाखाली देशविघातक कामात गुंतण्याऐवजी ते लोक ख्रिस्ती होउन जर व्हॅटीकनचरणी श्रद्धावान होणार असतील तर ते भारताला कमी उपद्रवकारक असेल असे मला वाटते.

ह्याबद्दल मला थोडी शंका वाटते, येथील देशविघातक कामे स्वार्थी राजकारणाचे बायप्रोडक्ट आहे, धर्म/पंथ बदलून त्यात फरक पडेल असे वाटत नाही. त्याऐवजी, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली किंवा त्यांच्या समस्यांचे निराकरण झाले तर बदल होऊ शकेल.

केरळ मध्ये देखील बऱ्याच प्रमाणात हा धर्मप्रसार झाला पण तिथे इतर पंथांना किंवा भारताला उपद्रव किती आहे हयची कल्पना नाही. इथे देखील जमातींमधील वांशिक हिंसाचार हे प्रमुख कारण असू शकेल.

एकूणच वाचून परिस्थिती गंभीर असल्याचे जाणवते, पण सरकारी/राष्ट्रीय मिडिया ह्याकडे लक्ष कसे वेधत नाही ह्याचे आश्चर्य वाटते आहे.

यावर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.

हेच म्हणतो.

धर्मांतरण

पहिला मिशनरी या भागात १८६१ मध्ये आला तेंव्हापासुन त्यांचे कार्य अव्याहत चालु आहे. ब्रिटीश राज्यकर्त्याचे पाठबळ त्यांना होते. हिंदु संघटनेने तेथे १९५० पासुन कार्य तुटपुज्या व विरोधी वातावरणात सुरु केले. १९९० नंतर् आज तेथे थोडे फार आपले काम दिसु लागले. आपला उद्देश केवळ त्या त्या जमातीच्या श्रध्दा जपणे एवढेच आहे जेणे करुन धर्मांतराला आळा बसेल. त्यांना हिंदू करुन घेणे अजिबात नाही. पण आपल्या कार्यकर्त्यांना तेथील विरोध तर असतोच पण आपले उर्वरित सिक्युलर बांधव देखील विरोधच करतात. ख्रिश्चनांना मिळणारा कोट्यावधी रुपयांसमोर आपली संसाधने खुपच तोकडी पडतात. आपल्या संस्था तेथे वैद्यकिय मदत, शैक्षणीक मदत व स्वयंरोजगार अशा योजना राबवतात्. त्या देखील बिना अनुदान व केवळ लोकांच्या देणगी वर हेही नसे थोडके.

विश्वास कल्याणकर

रोल ओवर अँड डाय

आपल्या संस्था तेथे वैद्यकिय मदत, शैक्षणीक मदत व स्वयंरोजगार अशा योजना राबवतात्. त्या देखील बिना अनुदान व केवळ लोकांच्या देणगी वर हेही नसे थोडके.

उठाठेव करायची तर करावी परंतु 'आपला' म्हणजे काय? तुम्ही 'आमचा' असा शब्दप्रयोग करावा ही विनंती.

आपला

आपला हाच शब्द योग्य आहे. रि टे हे चर्च पुरस्कृत पात्र असावे किंवा सुमार केतकरांचा तो डू आय असावा असा दाट संशय मला येतो.

ते नेहमी फक्त सो कॉल्ड विज्ञान आणि तर्काच्या नावाखाली फक्त हिंदू गोष्टींवरच राळ उडवतांना दिसतात. त्यामुळे त्यांच्या लेखनाकडे दुर्लक्ष करून आपले लिखाण असेच चालू द्यावे ही विनंती.

आपला
गुंडोपंत

तुमचा दृष्टिदोष

मी चर्च पुरस्कृत असल्याचा आरोप मान्य केला तरी 'आपला' हा शब्द चूकच ठरतो ना?
या बातमीत उल्लेखिलेला निषेध प्रमोद सहस्रबुद्धे यांनी केला होता. तीच बातमी अजून एका वृत्तपत्रात येथे वाचता येईल.

स्पष्ट

मी चर्च पुरस्कृत असल्याचा आरोप मान्य केला
माझा मुद्दा स्पष्टच आहे. आता तुमचे पुर्वीचे अनेक वाद विवाद अनेकांना आता चर्च पुरस्कृत या वेगळ्या दृष्टीने पाहिले तर ते कसे बुद्धीभेदी होते हे लक्षात येईलच.
कितीही लपवले तरी कुठेतरी खोटेपणा उघड पडतोच, तो पडला!
आता 'मी आरोप मान्य केलाच नाही' वगैरे नेहमी प्रमाणे सुरू करालच. ते चालू द्या! ज्याना जे समजायचे आहे ते नेमकेपणाने यातून समजले असेलच!
आपला
गुंडोपंत

शीर्षक संपादित

'तरी' या शब्दामुळे अर्थ वेगळा होतो.

आता

उघडे पडल्यावर आता तुम्ही असे म्हणणारच हे अपेक्षितच आहे.
तेव्हा रिटे टीम आता इतर काही तरी हिंदू विरोध करण्यासाठी अंध विश्वास, बुवाबाजी आणि ज्योतिष या व्यतिरिक्त स्ट्रॅटेजी शोधा.

आवांतर (पण तसे आवांतरही नाही):
तुमच्या या पद्धतशीर हिंदू विरोधी प्रचार मोहिमेत थत्ते नि घाटपांडेंसारख्या माणसांचे उगाच बळी जातात.
सदस्य हो, लक्षात घ्या, हिंदू विरोध आणि पर्यायाने भारत विरोधासाठी हे लोक टीम वर्क करून अतिशय कुशलतेने बुद्धीभ्रम उत्पन्न करणारे विचार सामान्य माणसाच्या मनात पेरतात. त्याला खरोखरीचे बुद्धीवादी असलेले लोक बळी पाडतात. इतकेच नाही तर त्यांना आपल्या कार्यासाठी नकळतपणे वापरून घेतात.
आशा आहे की चर्च पुरस्कृत रिटे या उदाहरणातून हा मुद्दा स्पष्ट झाला असेल.

आपला
गुंडोपंत

चर्च पुरस्कृत रिटे प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी हे लोक कोणत्या थरापर्यंत जातात हे पाहू या.
माझ्या प्रतिसादांचे संपादन तर सुरूच आहे!

:)

आरोप अमान्य.

कोनराड एल्स्ट

कोनराड एल्स्ट ने या सर्व भयानक प्रकार बद्दल पूर्वीच लिहिले आहे. तसे असूनही आमच्या कडच्या विद्यापीठातल्या अति शहाण्या डाव्या विद्वानांनी लोकसत्ता सारख्या वर्तमान पत्रातून पद्धतशीर पणे कोनराड विरूद्धच प्रचार केला.
भारताचे विभाजन करून ख्रिस्चन राज्य स्थापन करण्याचे हे अमेरिकेचे कारस्थान होते. रशिया वर नजर ठेवण्या साठी त्यांना इथे तळ हवा होता. दरम्यान रशिया नेस्तनाबूत झाल्या मुळे तो उद्देश संपल्यात जमा आहे. देशातले हिंदू जागे झाले की या झुरळांचा नायनाट करता येईल.

माहिती

समतोल दृष्टीकोनातून निर्भयपणे भारतीयांबद्दल विचार मांडणार्‍या
कोअनराद् एल्स्ट (Koenraad Elst) विषयी विकीवर अधिक माहिती येथे आहे.

(कृपया कुणी हे इंग्रजी पान मराठी विकीवर मराठीत द्याल का?)

एक अनुदिनी येथे पाहता येईल.

अर्थातच चर्चच्या डिसेप्टीव दृष्टीकोनातून शिक्षण झालेल्या भारतीयांना त्यांचे विचार फार पटत नाहीत हे दिसतेच.

आपला
गुंडोपंत

सुब्रह्मण्यम स्वामी आवृती?

कोनराड एल्स्ट ने या सर्व भयानक प्रकार बद्दल पूर्वीच लिहिले आहे.

त्यापेक्षा सनातन प्रभातचेच संदर्भ द्या की!

भारताचे विभाजन करून ख्रिस्चन राज्य स्थापन करण्याचे हे अमेरिकेचे कारस्थान होते.

अमेरिकेवर ज्यूंचे नियंत्रण असल्याचे संशय सिद्धांत ऐकले तरी होते.

त्रास

बरोबर आहे, आता लक्षात आले. तुमच्या चर्च पुरस्कृत रिटे टीमला हिंदू विरोध करण्यासाठी सनातन चा फारच त्रास होत असणार. म्हणून येता जाता त्यावरही बुद्धी भ्रम उत्पन्न करणारे शेरे देत असता.
आता एल्स्टचे विचारही तुम्हाला त्रास देत असतील नाही?
ते विचार कसे दाबायचे, याची काय पद्धती आखली आहे तुम्ही?

आपला
गुंडोपंत
चर्च पुरस्कृत रिटे प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी हे लोक कोणत्या थरापर्यंत जातात हे पाहू या.
माझ्या प्रतिसादांचे संपादन तर सुरूच आहे!

नाही

बुद्धी भ्रम उत्पन्न करणारे शेरे

तुम्हाला बुद्धी असल्याचे सिद्ध केलेत तर या आरोपाचासुद्धा मी इन्कार करेन. तोवर तो आरोप लोडेड असल्याकारणाने मी अमान्य करीत आहे.

चर्च पुरस्कृत रिटे

आरोप अमान्य.

संभव

रिकामटेकडा हे नाव धारण करण्यामागे त्यांचा उद्देश त्यांच्या व्यक्तव्याला फारसे गंभीर घेउ नये हा असावा.

विश्वास कल्याणकर

:)

तुम्ही ईशान्य भारताचे कल्याण करणार आहात असा विश्वास सर्वांनी ठेवावा अशी तुमची अपेक्षा आहे.

I mean, that's what I'm here promoting - doubt. That's my product. The other guys are selling certainty, not me. I'm on the corner with doubt. - Bill Maher
क्ष्

इतर

बिल सारख्या इतरांचे नाव कशाला पुढे करता?

I mean, that's what I'm here promoting - doubt. हेच तर मी आधी म्हणालो आहे. आता तोंडावर पडल्यावर उगाच याची त्याची वक्ये फेकू नका.
हिंदूंच्या, भारतीयांच्या मनात स्वधर्माविषयी आपल्या जीवन पद्धती विषयी किंतु निर्माण करणे हेच काम तुम्ही करत आहात. त्यासाठी काही सदस्यांचा त्यांच्या चांगल्या कामाचा, तुमच्या हेतु साठी चतुरपणे वापर करत आहात हे सातत्याने दिसून येते आहे.
आपला
गुंडोपंत

?

कोणत्या सदस्यांच्या कोणत्या चांगल्या कामाचा मी वापर केल्याचा आरोप आहे?
मी तोंडावर पडल्याचे सिद्ध करा.

 
^ वर