समाजमनाची घडवणूक कशी होते?

काळासोबत चालणार्‍या (मॉडर्न) समाजात मानवी मनाला ‘समाजभिमूक’ आकार देण्याचा (मोल्डिंग ऑफ माइंड चा) पहिला प्रयत्न चालू होतो तो जेंव्हा त्या समाजातील लहान मुलांना त्यांचा चिमुकला हात हातात धरुन
समाजाने प्रमाणित केलेले वर्ण त्यांच्या उच्चारासहीत गिरवायला शिकवतो तेव्हा. अशा प्रसंगी ‘अक्शरांना उच्चारत व वर्णांना गिरवत’ त्या मुलांचे कोवळे मन देखिल आकार घेत असते. त्यावेळी लहान मुलंही कुठलाही आक्शेप न घेता आवडीने अथवा मोठीमाणसं सांगतात म्हणून त्यांचा शब्द प्रेमाने स्विकारत असतात. परंतु कळत – नकळत त्यावेळी बाळाने जर प्रमाण मानलेल्या वर्णांव्यतिरिक्त वेगळ्या पद्ध्तीने लिहीलेच, वा वेगळे अक्शर उच्चारले तर , ‘ते चूकीचं आहे!’, असंच त्यांस सांगण्यात येते.
त्यानंतर ही बाळाने प्रमाण मानलेल्या पद्धती व्यतिरिक्त वेगळ्या पद्धतीने लिहीले तर त्याला ओरडा तसेच मार मिळतो. ‘तू शहाणा असशील तर, असं लिहीशील, वा उच्चारशील!’ असेही त्याच्या मनावर बिंबवले जाते. इथूनच ते बाळाची मानसिकता समाजाच्या मानसिकतेशी नकळतपणे सांधली जाते.
‘हे असेच कां’? असे जर त्या अजाण बाळाने विचारले तर त्याला ‘जे उत्तर दिले जायला हवे’ ते दिले जात नाही.
ते उत्तर काय बरं असू शकतं?
( हेतू: मला ह्या प्रश्नाची उत्तरे ‘कळफलकाचे समानीकरण व प्रमाणीकरण कशासाठी?’ या लेखाची पृश्ठभूमीसाठी हवी आहेत.
सूचकदिशा: ‘प्रश्नातच उत्तर दडलेले असते’)

लेखनविषय: दुवे:

Comments

सहमत

लेखनातील चिह्ने ही थोरल्यांनी धाकट्यांना सांगितलेले संकेत असतात. याबाबत सहमत.

बाळ समाजाचा भाग असल्यामुळे (आणि काही वर्षांमुळे स्वतःची बाळे असणारे थोरले होते त्यामुळे) समाजाची मानसिकता आणि बाळाची मानसिकता सांधलेली असते. सहमत.

ते उत्तर काय बरं असू शकतं?

अहो धनंजय, सहमती कसली दर्शवताय?

‘हे असेच कां’? असे जर त्या अजाण बाळाने विचारले तर त्याला ‘जे उत्तर दिले जायला हवे’ ते दिले जात नाही. 'ते उत्तर काय बरं असू शकतं?'
चर्चेत या प्रश्नाचे सविस्तर उत्तर मिळावे ही अपेक्शा आहे.

संकेतांना कारण असते/नसते

संकेत असण्याचे "कारण" म्हणजे संवादासाठी आणि आलेखासाठी उपयोग.

काही अर्थ एकमेकांना संवादातून सांगण्यासाठी अशा प्रकारचे संकेत जोडले जातात :
अर्थ१<->ध्वनी१
अर्थ२<->ध्वनी२
...
अर्थ-क्ष<->ध्वनी-क्ष

हे संकेत बर्‍यापैकी शिथिल असतात, सांगण्यालायक अर्थ संख्येने फार अधिक आहेत, उत्पन्न करण्यालायक ध्वनी त्या मानाने कमी आहेत.

मात्र संकेत कुठला असावा, त्यासाठी अंततोगत्वा कुठलेच "कारण" नसते. अमुक संकेताऐवजी तमुक संकेत-यादी वापरली, तरी उपयोग साधतो.

---
काही ध्वनी एकमेकांना आलेखातून सांगण्यासाठी अशा प्रकारचे संकेत जोडले जातात :
ध्वनी१<->चिह्न१
ध्वनी<->चिह्न२
...
ध्वनी-क्ष<->चिह्न-क्ष

हे संकेत बर्‍यापैकी शिथिल असतात, उत्पन्न होणारे ध्वनी संख्येने फार अधिक आहेत, आलेख करण्यासाठी चिह्ने त्या मानाने कमी आहेत.

मात्र संकेत कुठला असावा, त्यासाठी अंततोगत्वा कुठलेच "कारण" नसते. अमुक संकेताऐवजी तमुक संकेत-यादी वापरली, तरी उपयोग साधतो.

---

कुठलेही संकेत चालणार असे असले, तरी ते जे काय संकेत आहेत, ते संवादकांना दोघांना - म्हणजे वक्त्याला आणि श्रोत्याला दोघांना, किवा लेखक आणि वाचक दोघांना - ठाऊक आणि समसमान मान्य असले पाहिजेत. नाहीतर संवाद होत नाही.

समाजात वडील व्यक्ती संकेतांचा व्यापक वापर आधीच करत असतो, तर नवजात बालकाकडे वाटेल ती संकेतयादी आत्मसात करण्याची ग्रहणशक्ती असते. म्हणून वडीलधार्‍या व्यक्तिची संकेत-यादी बालके वापरतात. सोयीनुसार पिढ्या-पिढ्यांमध्ये पारंपरिक संकेतयादीत फरक होत जातात.
- - -
"हे असेच का?" याची दोन उत्तरे :
१. कुठलेच कारण नाही - चिह्नांसाठी कुठलाही संकेत चालेल.
२. सोयीसाठी. एक तयार संकेतयादी उपलब्ध असताना नवी संकेतयादी बनवण्यापेक्षातौपलब्ध असलेली यादीच वापरण्यात सोय आहे. आणि जर कुठली गैरसोय दिसत असेल, तर उपलब्ध यादीत बारीकसारीक फरक करून गैरसोय काढता येईल.

संक्शिप्त व छान उत्तर!

"हे असेच का?" याची दोन उत्तरे :
१. कुठलेच कारण नाही - चिह्नांसाठी कुठलाही संकेत चालेल.
२. सोयीसाठी. एक तयार संकेतयादी उपलब्ध असताना नवी संकेतयादी बनवण्यापेक्षा उपलब्ध असलेली यादीच वापरण्यात सोय आहे. आणि जर कुठली गैरसोय दिसत असेल, तर उपलब्ध यादीत बारीकसारीक फरक करून गैरसोय काढता येईल.

हे उत्तर देखिल छान आहे. धन्यवाद धनंजय!
तुमच्या उत्तरावरून बाळाला देण्याजोगे उत्तर असे असू शकेल, बाळा तूला इतरांशी पुढे व्यवहार करावा लागेल, तेंव्हा इतर सगळे जे संकेतपद्धती वापरतात, व ते ती जशी वापरतात, तशीच तुला वापरावी लागेल. म्हणून तूला असे उच्चारायचे आहे, असे लिहायचे आहे.

प्रश्नामध्ये उत्तर दडलेले असते तसेच, उत्तरा मध्ये देखील नवे प्रश्न दडलेले असतात. मी ते नवे प्रश्न देखील शोधत आहे.

परंपरा

फिडलर ऑन द रूफ नावाच्या नाटकाची सुरूवात होते नायकाच्या तोंडच्या ट्रॅडिशन या गाण्याने होते. रशियातल्या छोट्या ज्यूइश खेड्यात राहाणारा हा गवळी
'हे असेच का?' या प्रश्नाला आपल्या बुलंद आवाजात 'ट्रॅ़डिशन!' असं उत्तर देतो.
'या परंपरा सुरू कशा झाल्या?' 'मी सांगतो ना.... (विचार करतो) मला माहीत नाही' असं म्हणतो. पण त्या परंपरा अतिशय उपयुक्त आहेत असंही ठामपणे सांगतो.

हीच उत्तरं इथेही लागू होतात. ते गाणं नीट मन लावून ऐका. त्या गावाबद्दल, धर्माबद्दल बोलतो ते बरंचसं भाषेलाही लागू होतं असं तुम्हाला जाणवेल कदाचित. नाही जाणवलं तरी गाणं छान आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सुंदर प्रतिसाद

श्री. घासकडवी,
तुमचा प्रतिसाद सुंदर आहे. धन्यवाद!

तुमच्या प्रतिसादातून मला उत्तर मिळाले, 'बाळा, हि आपली परंपरा आहे. त्यानुसार तुला बोलायला, लिहायला, वाचायला शिकावे लागेल. परंपरेतील रीती-भाती बदलतात, पण परंपरा कायम असतात.'

असेच काही नाही

>>‘हे असेच कां’? असे जर त्या अजाण बाळाने विचारले तर त्याला ‘जे उत्तर दिले जायला हवे’ ते दिले जात नाही.

उत्तर दिले तरी कधीकधी बाळ अडेलतट्टू असेल तर काही उपयोग होत नाही.

बाळ जर दोन वेगळी असलेली अक्षरे एकच समजून काढत असेल तर मोठी माणसे त्याला "अरे, ती दोन वेगवेगळी अक्षरे आहेत" असे समजावून सांगू शकतात. मग तो बाळ म्हणतो "दोहोत काय फरक आहे ते मला कळले नाही". तेव्हा मोठी माणसे बाळाला त्या अक्षरातला फरक दाखवणारे रेकॉर्डिंग ऐकवतात" तर बाळ म्हणतो, "आतापर्यंत त्या अक्षराशी माझी ओळख '............!' अशीच झाली आहे. तेव्हा माझा नाईलाज आहे. मी '...' असेच लिहीणार"

(हा प्रतिसाद चर्चाप्रस्तावातील भावना आणि प्रस्तावकाची प्रत्यक्ष कृती यातील विसंगती दाखवण्यासाठी लिहिला आहे. तो अस्थानी वाटल्यास उडवायला हरकत नाही).

नितिन थत्ते

अडेलतट्टू!!!!

थत्ते धन्यवाद!

'जे उत्तर दिले जायला हवे ते दिले जात नाही.' तर मग 'कोणते उत्तर दिले गेले पाहिजे?' हा प्रश्न होता.

तुमचे -'उत्तर दिले तरी कधीकधी बाळ अडेलतट्टू असेल तर काही उपयोग होत नाही.'
हे उत्तर मुळ प्रश्नाशी संबंधित नाही. ते उत्तर नंतरची प्रतिक्रिया दर्शवत आहे.
बाळ अडेलतट्टू असेल तर...? असा प्रश्न विचारला गेला नव्हता.
पण तुम्ही बाळ अडेलतट्टूच असेल असे ठाम मत करून प्रतिसाद दिलात.
उपक्रमच्या व्यवस्थापकांनी पुढे काय करायचे हे ही तुम्ही आधीच ठरवू पाहताय?

तुम्ही खूप जोरात धावता बुबा!, घोड्याच्या ही पुढे!!!

हे पटत नाही...

'जे उत्तर दिले जायला हवे ते दिले जात नाही.' तर मग 'कोणते उत्तर दिले गेले पाहिजे?' हा प्रश्न होता.

काही काही वेळा प्रश्नांना उत्तरं देताना मूळ प्रश्नात नसलेली माहिती द्यावी लागते.

'घरांची छपरं उतरती का असतात?' त्याला उत्तर देताना 'काही घरांच्या आसपास पाऊस पडतो - तो वाहून जाण्यासाठी. काही घरांच्या आसपास बर्फ पडतो तो घसरून जावा म्हणून. काही घरांची छपरं उतरती नसतात' असं उत्तर द्यावं लागतं. या उदाहरणात अर्थातच तीनच शक्यता मांडल्या गेल्या. पण काही प्रश्नांना उत्तर देताना या शक्यता वाढतात. उदाहरणार्थ गणितात फोर कलर प्रॉब्लेम नावाचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर शोधताना अब्जावधी शक्यतांचा एक एक करून विचार करावा लागतो.

थत्त्यांनी अडेलतट्टू या वर्गीकरणापासून सुरूवात केली आहे. त्यांचं उत्तर 'या केसमध्ये कुठचंही उत्तर दिलं गेलं तरी फरक पडत नाही.' आता इतरांनी मुलांना लागू पडणारी सर्व वर्गीकरणं (शहाणी, हुशार, मध्यम हुशार, दांडगट, चक्रम, उंच, बुटकी...) विचारात घेतली व प्रत्येक वर्गीकरणासाठी जर उत्तर मिळालं तर तुमचा प्रश्न सुटला. थत्तेंचं उत्तर अपुरं असेल कदाचित, पण असंबद्ध नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

कळाफलकाचे प्रमाणीकरण

रावले यांचा हा लेख लिहिण्याचा उद्देश या विषयासंबंधी पार्श्वभूमी तयार करणे हा आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांना ष या आद्याक्षराबद्दल प्रचंड राग आहे. व हे अक्षर मराठी सारस्वतातून कायमचे नष्ट झाले पाहिजे असा त्यांचा हेतू आहे.
माझ्या पाहण्यात नुकताच नागरी(देवनागरी) लिपी कालानुसार कशी बदलत गेली त्याचा एक तक्ता आला. या तक्त्याचा मी फोटो काढला आहे व तो खाली देत देत आहे. दुर्दैवाने या फोटोची गुणवत्ता पाहिजे तेवढी चांगली नाही. म्हणून खुलासाही करतो आहे.
nagari script development

नागरी किंवा तत्समान नावाची एक लिपी भारतात सम्राट अशोकच्या कालापासून ते आजपर्यंत वापरात आहे. आज या लिपीला देवनागरी असे नाव आहे. या लिपीत कसे बदल होत गेले हे वरील तक्त्यात दर्शवलेले आहे. सम्राट अशोकाच्या कालात या लिपीवर असलेली यावनी (ग्रीक) झाक स्पष्ट दिसून येते. प्रतिहार कालानंतर ही लिपी पुष्कळशी आजक्या लिपीसारखी झालेली आढळते. पश्चिम चालुक्य किंवा राष्ट्रकूट कालापासून (सातवे किंवा आठवे शतक) ही लिपी प्रचलित लिपीशी बरेच साम्य दाखवते.
वरील तक्यातील शेवटची आद्याक्षरे विचारात घेतली (य,र,ल,व,श,ष,स,ह) तर हे स्पष्टपणे लक्षात येते की सम्राट अशोक ते आजतागायत एक प्रतिहार राजांचा काल सोडला तर वर्णमालेत श व ष अशी दोन अक्षरे वापरात सतत आहेत. प्रतिहार कालात फक्त ष हे आद्याक्षर वापरात होते.
मला रावले यांना एवढेच सांगायचे आहे की 2000 वर्षे जी दोन अक्षरे(श,ष) या नागेरी लिपीमधे सतत वापरात आहेत ती त्यांची उपयुक्तता आहे म्हणूनच वापरात आहेत. तेंव्हा कळफलकाच्या समानीकरणांच्या त्यांच्या प्रयत्नात त्यांनी ही दोन्ही अक्षरे विचारत घेणे गरजेचे आहे. रावले यांचे मत काहीही असले तरी ही दोन्ही अक्षरे वापरात राहणारच आहेत. रावले यांनी ष हे अक्षर त्यांच्या वर्णमालेतून काढून टाकले तर एवढेच होईल की त्यांचा कळाफलक सामान्यत: मान्य अशा देवनागरी लिपीचा नसेल.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

हा प्रतिसाद चर्चेला धरून नाही.

उपक्रमच्या व्यवस्थापकांना माझी विनंती आहे की त्यांनी वरील प्रतिसाद ह्या चर्चेतून हटवून, (हवं तर) वेगळा चर्चा प्रस्ताव म्हणून सुरू करावा. हा प्रतिसाद चर्चेला धरून नाही.

चर्चेचा विशय ध्यानात घ्यावा.

वरील प्रतिसादांमध्ये फक्त श्री. घासकडवी यांचाच प्रतिसाद चर्चेला धरून आहे.
इतरांचे प्रतिसाद प्रस्तावामध्ये 'जास्तीची माहिती' दिली गेल्यामुळे भरकटले गेले आहेत.
जास्तीची माहीती मध्ये चर्चे नंतरचा माझा अंतस्थ हेतू व
'प्रतिसादकांना विचार करण्यासाठी उपयोगी पडावे' म्हणून एक सूचक दिशा दिली होती.
एवढ्यावरून एवढे शिकता आले की,
'अजाण बाळाला देखील तेवढेच सांगणे गरजेचे आहे जेवढे त्याच्या स्तरावर योग्य आहे.'

इतर प्रतिसादकांना विनंती आहे की, चर्चेचा विशय, 'समाजमनाची घडवणूक कशी होते?' हा आहे, हे ध्यानात घ्यावे.

प्रतिसाद चर्चेला धरून की भरकटत

रावले हे एखाद्या हुकुमशहाचे उपक्रमी अवतार असावेत असे त्यांच्या या प्रतिसादावरून वाटते आहे. प्रतिसाद त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नसला व त्यांची कशी चूक होते हे दाखवणारा असला की एकदम तो प्रतिसाद भरभटत चालला आहे असा साक्षात्कार त्यांना होतो असे दिसते. असे असल्यास चर्चा बंद करणे योग्य ठरावे. त्यांनी दिलेल्या सूचक दिशेने प्रतिसाद असला तर तो योग्य बाकीचे भरभटत हे तर्कशास्त्र मोठे अजब आहे. रावले यांचा अंतस्थ हेतू समजल्यानेच इतर मंडळी असे प्रतिसाद देत आहेत हे त्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे असे वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

टिळक 'अडेलतट्टू' होते कां?

चर्चेचा दुसरा टप्पा:
आधीच्या टप्प्यावर आपण 'समाजमनाची घडवणूक' होताना -
- समाजाच्या परंपरांचे पालन करता याव्या यासाठी,
- समाजात राहतो तेंव्हा त्या समाजाशी भविश्यात व्यवहार करणे सुलभ होण्यासाठी भाशा बोलणे, लिहीणे शिकतो.
ह्या दोन गोश्टी समोर आल्या. (मराठी)'समाजाची घडवणूक' होण्यासाठी हे दोन मुलाधार समजावेत का?

परंतु जग सरळ रेशेत चालत नाही. बदल तर घडतच असतात. पण मग बदल कसे व कुठे घडतात? हे कसे समजून घ्यायचे?

आता या टप्प्यावर बाळ थोडे मोठे झालेले आहे, बरं कां? ते तर्क करू शकते, वाद घालू शकते. इथून वेगळी उत्तरे हवी आहेत. चर्चा चौकट - 'समाजमनाची घडवणूक कशी होते?'

लहानपणी वाचलेलं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावरील एका छोट्या पुस्तकातील त्यांच्या बालपणीचा एक किस्सा सांगतो.

त्यावेळी लहान बाळ पुण्याच्या सिटी स्कूलमध्ये शिकत होता. ऐकदा मराठीचा तास चालू होता. मास्तर शुद्धलेखन सांगत होते. मुले लिहीत होती. सगळे सांगून झाल्यावर मास्तरांनी तपासायला सुरवात केली. एक एक करता बाळ गंगाधर टिळकांची पाळी आली. “पाहू टिळक़, तुझी पाटी.” मास्तर तपासू लागले.
त्या उतार्‍यात ‘संत’ हा शब्द तीन वेळा आला होता. तो या मुलाने तीन ठिकाणी तीन प्रकारे लिहीला होता. मास्तरांनी पहिला प्रकार अचूक ठरविला आणि दुसर्‍या दोन ठिकाणी चूक ठरवून फुल्ल्या दिल्या.
संत...............अचूक
स-न्त............चूक
सन्-त.............चूक
(येथे तसे लिहीता येत नाही म्हणून '-' हि चिन्ह मध्ये घातलेले आहे.)

’घे आपली पाटी, दोन चुका’ असे म्हणून त्यांनी बाळ टिळकला पाटी परत दिली. ’दोन चुका, हे कसे शक्य आहे?’ – चकित होवून बाळाने आपली पाटी पाहिली आणि तो मास्तरांना म्हणाला, “गुरुजी, हे चूक कसे ते मला समजावून सांगा” मास्तर म्हणाले,” हे बघ, पहिल्यांदा तू ‘संत’ असे लिहिलेस ना, तसेच लिहायचे” बाळ टिळक म्हणाला,”गुरुजी, ‘न’ अर्धा काढून त्याला ‘त’ जोडला काय किंवा ‘न’ चा पाय मोडून पुठे ‘त’ लिहिला तरी त्यात चूक काय आहे? तिन्ही प्रकारे लिहिले तरी ‘संत’’ उच्चार होतोच. त्यात काहीही फरक पडत नाही. मग माझे लिहीणे चूक कसे ते सांगा?”
मास्तर रागावून म्हणाले,”जास्त बोलून माझ्याशी वाद घालू नकोस. ‘संत’ हा शब्द ‘स’ वर अनुस्वार आणि ‘त’ असाच लिहायचा. समजले.”,
त्यावर मास्तर रागावून म्हणाले,” नाही समजले तर चालता हो वर्गातून.”

बाळ टिळक वर्गातून बाहेर आला. तो सरळ हेडमास्तरांकडे गेला. हेडमास्तरांना त्याने आपली बाजू सांगितली. त्यांनी ती शांतपणे ऐकून घेतली. मग ते म्हणाले’” तुझे म्हणणे मी ऐकून घेतले. आता मी गुरुजींना विचारीन आणि मग काय ते सांगेन” “ मी पाठविले आहे म्हणून गुरुजींना सांग आणि वर्गात जावून बैस. गुरुजींचा अपमान होईल अशा कोणत्याही प्रकारे वर्गात वागू नकोस.”

आत्ता मला सांगा! लोकमान्य टिळक अडेलतट्टू होते असे म्हणणे योग्य आहे का? त्यांना गुरुजींकडून 'काय उत्तर मिळायला हवे होते?'

टिळकांच्या आकारापेक्षा बाळाचा अडेलतट्टूपणा मोठा आहे.

टिळकांच्या मागे लपणे शक्य नाही.

वर अडेलतट्टू बाळाचे जे उदाहरण सांगितले आहे त्यात बाळाने मला काय फरक आहे हे माहिती नाही असे म्हटले होते. आणि मोठ्या माणसांनी फरक समजावून सांगितल्यावर "तरीही मी असेच करणार" असे म्हटले. म्हणून बाळ अडेलतट्टू.

टिळकांनी "मला माहिती नाही" असे म्हटले नव्हते. मला माहितीच आहे आणि ते बरोबर आहे असा स्टॅण्ड घेतला होता. अर्थात टिळकांनाही अडेलतट्टू म्हणता येईल. (हेडमास्तरांचा निकाल टिळकांच्या बाजूने लागला की कसे हे कळले नाही).

नितिन थत्ते

बेडुक कितीही फुगला.....!

अर्थात टिळकांनाही अडेलतट्टू म्हणता येईल.

सामाजिक कार्याचे जावू देत. लोकमांन्यांनी गीतारहस्य लिहीले होते. त्यांची अडेलतट्टू म्हणून संभावना करणार्‍या थत्त्यांनी आत्तापर्यंत किती दर्जेदार पुस्तके लिहीली आहेत?

-----------------------------------------
बामणाचा अपमान बामणच करू शकतो.
क्शत्रियाचा सन्मान क्शत्रियच करू जाणतो.

कारण

टिळकांचे गीतारहस्य बरेचसे वाचले आहे. त्यात टिळकांनी अशा करामती केलेल्या नाहीत. त्यामुळे शाळकरी वयात केलेले कृत्य शिक्षकांची अपेक्षित प्रतिक्रिया जाणून त्यांच्यावर कुरघोडी करण्याच्या उद्देशाने आणि अडेलतट्टूपणाने केलेले वाटते.

असो. आपण प्रमाणीकरणाच्या गोष्टी करीत आहात आणि आपले लेखन मात्र त्या विचाराशी पूर्ण विसंगत असते हे दाखवण्यासाठीच वरची प्रतिसाद मालिका होती. आपले आपल्या पद्धतीचे प्रमाणीकरण आपल्यालाच लखलाभ होवो.

(यापुढे भाच्या पुतण्यांना गोष्टी सांगताना रावले सतीश याम्चीपण गोष्ट सांगेन).

चर्चेची सांगता

चर्चेत सहभागी झालेल्या सगळ्यांचा आभारी आहे.
चर्चेच्या अखेरीस बाळाला कोणते उत्तर द्यायला हवे, याचे उत्तर असे असू शकेल असे वाटते.-
‘समाज-पुरुष’ हाच सर्वांपेक्शा मोठा असतो. समाजपुरुषाचं अस्तित्व हे लिखित रुपात असलेले नियम, ठराव किंवा निर्धारीत प्रमाणां अतंर्भूत असते! सामाजातील प्रत्येक व्यक्ती म्हणूनच समाजाचे छोटे अंग असतो म्हणून त्या नियमांना मान द्यायला हवा, ते लिखित नियम पाळायला हवेत.’

‘पण हे नियम कोण लिहीतो? नियम कसे काय ठरवले जातात?’, असे जर त्या अजाण बाळाने विचारले तर त्याचे उत्तर काय बरे असू शकते? (येथे बाळाच्या दृश्टीने शुद्धलेखनाचे नियम याच अनुशंगाने लिहीले आहे)
उत्तर:
समजा पुरुशाचे अनेक अंग, भाग असतात, त्यात देखिल अनेक स्तर असतात. त्या-त्या स्तरावर त्या-त्या अंगाकडून विशिश्ट काम होत गेले कि हे नियम आकारत जातात.
अजाण पण कुतुहल असलेले बाळ विचारेल, ‘ते कसे’?
इथे, लोकमान्य टिळकांच्या काळात त्यांच्या गुरुजींकडून काय उत्तर दिले जायला हवे होते ते पाहू- आपला राज्यकारभार सुरळीत चालावा, या हेतूने भारती (हिंदी- प्रचलित: भारतीय) लोकांना पाश्चात्य द्न्यान देण्यासाठी ब्रिटिशांनी शाळा काढल्या. हे द्न्यान ज्या देशी भाशांतून द्यावयाचे, त्या देशी भाशांचा शास्त्रशुद्ध आभ्यास व्हावा, यासाठी त्या आभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तके लिहिली जाणे आवश्यक होते. हा प्रयत्न ‘हैंदशाळा मंडळी’ (1822) या संस्थेमार्फत सरकारने केला. मराठीला आवश्यक असलेले असे शालेय पातळीवरील व्याकरण जॉर्ज जार्विस याने चार पंडितांकडून 1824 मध्ये लिहवून घेतले. मराठीचे व्याकरण इंग्रजांच्या आणि इंग्रजी व्याकरणाच्या प्रभावी सहवासातून प्रथम रचले गेले आणि इंग्रजांच्या ‘अनुद्न्येने म्हणा वा आदेशाने’ संस्कृतपंडितांनी मराठीला व्याकराणाच्या मांडणीत बसवण्याचा प्रयत्न केला. हे चार पंडित जगन्नाथ क्रमवंत, रामचंद्रशास्त्री जान्हवेकर, बाळाशास्त्री घगवे आणि गंगाधरशास्त्री फडके हे होते. त्यापैकी जान्हवेकरांनी इतर कामांत गुंतले असल्यामुळे ह्या कामात लक्श घातलेले नव्हते.'- हे सगळे असे प्रक्रियेतून गेल्यामुळे त्या प्रक्रियेचा मान तुला राखावा लागेल. जर तुला त्यात काही चूका-त्रूटी जाणवत असतील तर तु मोठा झाल्यावर अशाच प्रक्रियेतून जावून सुधारणा करू शकतोस. तुर्तास, तुला ‘हे नियम पाळणे’ क्रमप्राप्त आहे.

आजच्या काळातील मुलांना परीस्थिती बदलल्यामुळे आजच्या काळाचे उदाहरण द्यावे लागेल, जसे-
‘सरकार द्वारे अधिकृत असलेल्या अमुक अका संस्थेने वा नियक्त केलेल्या अनेक अभ्यासू व भाषापंडितांच्या स्वाक्शरीयुक्त अहवाल’ जेंव्हा निवडून आलेल्या सभासद त्या अहवाला अनुसार अमुक एक लिहीण्याची पद्धत योग्य वा ‘तमुक एक लिहीण्याची पद्धती’ अयोग्य आहे असे ‘प्रमाण ठरावा’ द्वारे विधिमंडळात पारीत करतात. तेंव्हा तो अहवाल नियम म्हणून आकारात येतो.’ हे सगळे असे प्रक्रियेतून गेल्यामुळे त्या प्रक्रियेचा मान तुला राखावा लागेल. जर तुला त्यात काही चूका-त्रूटी जाणवत असतील तर तु मोठा झाल्यावर अशाच प्रक्रियेतून जावून सुधारणा करू शकतोस. तुर्तास, तुला ‘हे नियम पाळणे’ क्रमप्राप्त आहे.

हे झाले बाळासाठी चे उत्तर पण मला मोठ्यांसाठी देखिल काही प्रश्न आहेत, त्याचे उत्तर कोण देईल?

मानवी जीवनात येणा-या नव्या बदलाची चाहूल लहान व युवा मुलांच्या वाग्ण्या-बोलण्यातूनच दिसून येत असते. ते बदल टिपून त्यानुसार समाज सुधारणा करणं गरजेचं आहे. याउलट लहान व युवा मुलांना भेडसावणारे प्रश्न ध्यानात न घेता ते जाणवणारे बदल ओळखण्याएवजी ते दडपण्यात काय अर्थ आहे?

जी प्रचलित लिपी व व्याकरण आपण एका निश्पाप बालकाला शिकवितो त्यातच काळानूसार सुधारणा वा विकास न केल्यामुळे चूका किंवा त्रुटी समोर येत असतील तर त्या त्रूटी वा चूका दुरुस्त करायला नकोत कां?
आज ‘बरोबर’ हा शब्द व ‘णार’ हे प्रत्यय देखिल उठसुठ वापरले जात आहेत. हे भाशेतील किडणे (इं.:डिके) आहे.
जर बालमनाला आपण शिक्शणाने (व शिक्शन देण्याच्या पद्ध्तीने) समाजमनाप्रमाणे घडवू पाहतो, तसेच समाजालाही नव्या पिढीच्या मानसिकतेनुसार बदलायलाच हवेच. ‘आम्ही परंपरा म्हणून स्विकारले आता तुम्ही देखिल परंपरा पाळण्याचे कर्तव्य करा,’ अशी भुमिका घेणे भाशेच्या अस्तित्वाच्या दृश्टीने योग्य होईल का? हिच बाब कळफलकाचे स्वरूपाबाबत आहे. लोकशाही यंत्रणा आपल्या शिक्शण –प्रशिक्शणातून दिसू नये का?

 
^ वर