संगणक आणि आपण

संगणक - आलिकडचा आपल्या जनजीवनातले अविभाज्य यंत्र. जेव्हा संगणक ठीक सुरू असतो तो पर्यंत सगळं काही ठीक असत. पण त्याला काही झालं, की सर्व सामान्य माणूस हवालदिल होतो. मग काय करावे सुचत नाही. योग्य मदतीची गरज असते वा संगणका विषयी सामान्यज्ञान असणे आवश्यक असते. या विषयावर आपण चर्चा करू. मी काही मुद्दे देतो आहे. आपण त्यात भर टाकू शकता.

संगणक प्रकारात खूप झपाट्याने तंत्रज्ञान बदलत असते. मग माझा संगणक जुना झाल्यावर ती अद्ययावत ठेवण्यासाठी काय करावे?
एकाच वेळी दोन प्रणाली संगणकावर कशा ठेवता येतात? त्याचा फायदा काय?
माझा विदा इतरांपासून सुरक्षित कसा ठेवावा?
-RW आणि +RW हा काय प्रकार आहे?

असे अनेक विचार/प्रश्न आपल्याला येतात. प्रत्येकाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माहीत असतेच असे नाही. चला तर मग चर्चा करू अन माहितीची देवाण घेवाण करून आपले ज्ञान वाढवू.

लेखनविषय: दुवे:

Comments

उपयोगी..

ही चर्चा आम्हाला उपयोगी वाटत असून यातून आमच्याही काही प्रश्नांची उत्तरे मिळतील असे वाटते.

माझा विदा इतरांपासून सुरक्षित कसा ठेवावा?

हा प्रश्न आम्हाला महत्वाचा वाटतो!

तात्या.

संत तात्याबांनी शरद पवारांना वापरायला सांगितले! ;)

प्रश्नांची भर..

अस्स!! मग प्रश्नांची भर घाला!!


मराठीत लिहा. वापरा.

यथावकाश व सवडीने..

अस्स!! मग प्रश्नांची भर घाला!!

सवडीने घालू!

कस्स? ;)

संत तात्याबांनी हवाईसुंदर्‍यांचेचे शिबीर घेतले! ;)

साधी टिप

संगणकाचा मूषक कधीकधी नीटसा हलत नाही. किंवा हलवला तरी योग्य तिथे दिसत नाही. मूषकाचे खालचे झाकण उघडून आतील चाकावर/गोळ्यांवर जमलेली घट्ट धूळ काढल्यास मूषक परत पूर्वीसारखा चपळ होतो.
(ही टिप्पणी इथे मूळ विषयाशी संबंधित(रिलेव्हंट) आहे का नक्की माहिती नाही, नसल्यास दुर्लक्ष करावे.)

बिन गोळ्याचा उंदीर..

संगणकाचा मूषक कधीकधी नीटसा हलत नाही. किंवा हलवला तरी योग्य तिथे दिसत नाही. मूषकाचे खालचे झाकण उघडून आतील चाकावर/गोळ्यांवर जमलेली घट्ट धूळ काढल्यास मूषक परत पूर्वीसारखा चपळ होतो.

सहमत आहे. पूर्वी आमच्या संगणकातला असा गोळेवाला उंदीर जोडलेला होता तेव्हा वरील अनुभव घेतला आहे. पण आता आम्ही एका नवीनच ष्टाईलचा उंदीर वापरतो. त्याला गोळाच नसतो. त्याच्या तळभागात एक दिवा पेटलेला असतो. या उंदरात पूर्वीच्या उंदरासारखी गोळा न सरकण्याची समस्या उद्भवत नाही.

बिपाशा बासू आणि उर्मिला मतोंडकर यांना संत तात्याबांनी शिकवले!

माझी मदत

तात्या,
आमच्या उंदराला गोळी ही नाही व ना शेपुट :))

तर,
चाणक्य साहेब,

संगणक नेहमी अद्यावत ठेवावा, ज्या ज्या प्रणाली तुम्ही वापरत आहात त्या त्या प्रणालीची अद्यावत माहीती (update) घेत राहावे. विषाणू-रोधक प्रणाली वापरा व ती देखील अद्यावत ठेवा.

नेहमी आपला कळपटल व संगणकाच्या वस्तू धुळ मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा.

संगणकावर जर दोन प्रणाली वापरणार असाल तर
जर विन ९८ व एक्स पी जर वापरणार असाल तर पार्टीशियन FAT32 च वापरा.
संगणकावर दोन प्रणाली असणे गरजेचे नाही आहे जर तुम्ही एक्स पी वापरत असाल, कारण एक्स पी ची दुरुस्ती प्रणाली देखील बरोबर येते व ह्याच्या वापराने मलातरी खुप चांगला निकाल दिला आहे.

अजून माहीती पुढील प्रतिसादामध्ये (वेळ मिळाला तर रात्रीच)

राज जैन

मदत.

मी मेडीया सेंटर ही ओप्रेटींग सिस्टीम वापरतो.ती काही(मूळ) ओरीजनल कॊपी नाही.त्यामूळे संगणक वापरण्यात काही अडचण येते का ?एक्टीव्ह करून घ्या चा संदेश येतो. मी तो प्रयत्न ही केला .ते म्हणाले हे जूनीयन नाही.आता आम्ही फॊर्मेट मारण्याच्या विचारात आहोत.ओरीजनल कॊपी च्या ऐवजी नियमित करून घेण्याचे काही मार्ग आहेत का ?

ओरिजीनल कॉपी?

डॉक्टर साहेब,
एकतर ओरिजीनल असेल किंवा कॉपी असेल, ओरिजीनल कॉपी म्हणजे काय?
सन्जोप राव

आभार अन प्राचार्य.

रावसाहेब,
फरक समजून सांगितल्याबद्दल मनापासून आभारी.
अवांतर :- अशा लहान सहान चूकांमूळे मी प्राचार्य पदाची संधी घालवेल असे वाटते आहे.पण प्राचार्य झालो तर उपक्रम किंवा मिसळपाव डॉट कॉम वर सोम्या,गोम्या,अशा नावाने वावरेन.म्हणजे ना राहतील सूर, ना वाजेल बासरी.

क्रेक्

मिडीया सेंटर च्या सिडीमध्ये क्रेक म्हणून फाईल असेल ती रन करा

वा ढापाढापी?

क्रेक? तमे सू कहे छे?
आ तो क्रॅक छे!

अने ढापाढापीना खुल्लमखुल्ला प्रोग्राम?
सु काम?
(हमे पण मार्निम मा 'स्नेक ' खावी आवियो)
गुंडो

सध्या आम्ही समर्थनमुक्त आहोत!

अन्वयार्थ

एकतर ओरिजीनल असेल किंवा कॉपी असेल, ओरिजीनल कॉपी

म्हणजे काय?
मूळ प्रत आणी नक्कल असा तो फरक आहे.

काही उत्तरे

संगणक प्रकारात खूप झपाट्याने तंत्रज्ञान बदलत असते. मग माझा संगणक जुना झाल्यावर ती अद्ययावत ठेवण्यासाठी काय करावे?
-सध्यातरी हे एक दुष्टचक्र आहे आणि त्यात ग्राहकांची लूट करणे हेच एकमेव उद्दिष्ट आहे असे म्हणावेसे वाटते.उदा. काही मातृपाट्यांवर (मदरबोर्ड) आता विन् ९८ चालत नाही. विन् xp साठी २५६ दशलक्ष बाईट(?) स्मृती पुरेशी नाही. मेडिया सेंटर नंतर विन विस्ता (विष्टा नव्हे) आली आहे. तिला साधा पेंटियम (२.क्ष दशकोटी वारंवारतेचा) चालत नाही. इत्यादी आणि वगैरे...
तेंव्हा आपल्याकडील प्रणाली कमीत कमी ५ वर्षे कोणताही बदल न करता ठेवावी. त्यानंतर (खिशाला विचारून) नवी प्रणाली घ्यावी. कोणतीही प्रणाली १ वर्षानंतर जुनी होणार हे ध्यानी ठेवावे. जुन्या प्रणालीची कठीण तबकडी (हार्ड डिस्क) नव्या प्रणालीत गुलाम तबकडी म्हणून घालावी आणि तिचा विदा नव्या कठीण तबकडीवर पुनर्लिखीत करावा.

एकाच वेळी दोन प्रणाली संगणकावर कशा ठेवता येतात? त्याचा फायदा काय?
-कांही वर्षांपूर्वी विन्xp ही वापरप्रणाली नवी होती तेंव्हा तिच्यात बरेच किडे होते. म्हणून ती वारंवार लटकत असे. कधी कधी तर तिला अपघात होऊन सार विदा नष्ट होण्याची भिती होती. म्हणून तिच्या आधीची विन्९८ एस्.ई. ही प्रणाली सुद्धा त्याच कठीण तबकडी वर अंकित केली जात असे. त्यासाठी तबकडीवरील वेगळा प्रभाग (ड्राईव्ह) वापरण्याची पद्धत आहे.
आता विन्xp बर्‍यापैकी स्थिर झाल्यावर आणि नव्या मुक्त प्रणाली (लैनूक्स्) उपलब्ध होत असल्यामुळे xp आणि लैनूक्स् दोन वेगळ्या फाळण्यामध्ये (पार्टिशन!?) अंकित करण्याची प्रथा आहे.
आपण जर फक्त अव्यावसायीक (नॉन्-प्रोफेशनल) कारणासाठी वापरत असाल तर एकच प्रणाली पुरेशी आहे.

माझा विदा इतरांपासून सुरक्षित कसा ठेवावा?
-इतरांपासून म्हणजे नक्की काय? विन्xp किंवा लैनूक्स् मध्ये विदासुरक्षा करण्याच्या सोयी आहेत. त्या त्या प्रणालीच्या 'मदत' मध्ये वाचाव्यात. त्यामुळे आपण आपला विदा -इतरांपासून लपवू शकता, इतरांना फक्त वाचू देऊ शकता अथवा इतरांना त्यात बदल करण्याची मुभा देऊ शकता.
पण एकुणच महत्वाचा सर्व विदा गूगल च्या जीमेल सारख्या ठिकाणी (आपल्याच पत्त्यावर) पाठवून ठेवणे हे विदा सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे.
काही स्थळे फक्त अशा साठवणूकीसाठीच असतात. त्यांचा वापर करू शकता. पण एकंदरच गूगल बराच काळ जिवंत राहू शकेल असे वाटते. म्हणून ते जास्त सुरक्षित वाटते.

-RW आणि +RW हा काय प्रकार आहे?
-हे सुद्धा लोकांना लुटण्याचे एक तंत्र आहे. लवकरच 'निळा किरण' (ब्लू - रे) हेही मोठ्याप्रमाणात झळकताना दिसेल. तेंव्हा पाच वर्षाचा नियम तेथेही लागू होतो. याबद्दल इथे पाहू शकता.

वा वा!!

विसुनाना, तुम्ही खुपच मोलाची माहिती दिली आहे. धन्यवाद. विस्ता मध्ये किडे कितपत आहेत?


मराठीत लिहा. वापरा.

वॉव !!

म्हणजे wow !!!

कारण हे सगळं मराठीतून लिहिता येतं हे माहितच नव्हतं !!

संगणकाविषयीचं ज्ञान यथातथाच असल्यामुळे वरीलपैकी काही गोष्टी कळल्या नाहीत पण वाचताना मजा आली.

ड्युएल कोअर

ड्युएल कोअर म्हणजे काय? सध्या प्रत्येक संगणाकाच्या जाहिराती मध्ये हे वाचायला मिळते...


मराठीत लिहा. वापरा.

तसे नाही हो...

मला थोडे फार माहित असते. पण तुमच्या इतके नाही. दुसरा एक हेतु म्हणजे हि चर्चा वाचणारे, काहिंना हे प्रश्न जास्त माहिती मिळवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतील. आता मला सांगा ज्यांनी अलिकडे हे ड्यएल कोअर संगणक घेतले त्यातल्या किती जणांना हे माहित आहे?

एक आज्ञावली त्यातल्या एका संगणकावर चालणार आणि दुसरी दुसर्‍या संगणकावर.
जन सामान्यांसाठी दिसणारा संगणक एकच. मग हे वरचे वाक्य जास्त समावून सांगितले तर बरे होइल. याचा अर्थ असा आहे का कि मी माझ्या संगणकाच्या संचावर एका वेळी २ संगणक वापरू शकतो? म्हणजे एकावर विंडोज आणि एकावर लिनक्स? जर असे असेल तर् या बद्दल थोडी आणखी माहिती द्याल का?

ए आय एक्स, एच पी आणि इतर अविंडोज प्रणाल्यांवर चार पडदे असतात. ते कसे काय?


मराठीत लिहा. वापरा.
 
^ वर