कन्फर्मिटी

वैद्यकशास्त्र/माहीती या भागामध्ये हा लेख टाकत आहे कारण हा लेख प्रायोगिक मानसशास्त्राशी निगडीत आहे.
CONFORMITY या शब्दाला मला मराठी शब्द न सुचल्याने तोच इंग्रजी शब्द वापरला आहे. कृपया शब्द सुचवावा.
_________________________________________________
असे समजा की काही लोकांचा गट आहे. या गटाचा तुम्हीदेखील एक हिस्सा आहात. या गटातील सर्व व्यक्तींना एक प्रश्न विचारण्यात आला आहे. प्रश्नाचे स्वरूप असे आहे की या प्रश्नाला अचूक उत्तर नाही. उत्तर संदिग्ध आहे. आता गटातील प्रत्येक व्यक्ती काही ना काही उत्तर देते. तुमची पाळी येते. समजा तुमचे उत्तर आधीच्या लोकांच्या उत्तरापेक्षा नाट्यमयरीत्या वेगळे आहे. तरीही गटाचा तुमच्यावर नाही म्हटलं तरी प्रभाव पडतोच आणि तुम्ही आधीच्या उत्तरांच्या जवळ जाणारे उत्तर देता.

वरील जी प्रक्रिया आहे तिला प्रायोगिक मानसशास्त्रात "CONFORMITY" असा शब्द आहे.

थोडक्यात व्याख्या करायची तर - कोणताही दबाव असताना अथवा नसताना, स्वतःची वागणूक बदलून , आपली प्रतिक्रिया, अन्य लोकांच्या प्रतिक्रियेशी मिळतीजुळती ठेवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे CONFORMITY.

१९३७ मध्ये शेरीफ(Sherif) नावाच्या शास्त्रद्न्याने पुढील प्रयोग केला -
(१) एका व्यक्तीला (ज्याला गिनीपिग म्हणू या) , १५ फूटावरील दिव्याकडे पहावयास सांगीतले.
(२) तो दिवा हलला व थोड्या वेळाने दिसेनासा झाला.
(३) शेरीफ - किती लांब अंतरावर तो दिवा गेला?
गिनीपिग - मला नक्की सांगता येणार नाही पण ८ इंच दूरवर गेला असावा.
(४) २ रा दिवस - आता ३ अन्य लोक या प्रयोगात सामील झाले आहेत.
परत तोच दिवा तितकाच लांब हलवला व नाहीसा झाला.
शेरीफ - किती लांब अंतरावर तो दिवा गेला?
पहीली व्यक्ती - २ इंच
दुसरी व्यक्ती - १ इंच किंवा २ इंच
तीसरी व्यक्ती - छे छे १ पेक्षा जास्त नाही.
गिनीपिग - मला वाटतं ६ इंच हलला दिवा.
सगळेजणं त्याच्याकडे तो वेडा असल्यासारखे पहातात.
(५) ३ रा दिवस
सगळं २ र्‍या दिवसाप्रमाणे फक्त आता गिनीपिग उत्तर देतो - ४ इंच
(५) ४ था दिवस
सगळं २ र्‍या दिवसाप्रमाणे फक्त आता गिनीपिग उत्तर देतो - बहुतेक २ इंच

म्हणजे ८ इंचावरून तो २ इंचावर आला आहे केवळ गटाच्या प्रभावामुळे.
________________________________________________
वरील प्रयोगात निदान उत्तर तरी संदिग्ध होते पण .....
पुढे १९५१ साली ऍश(Asch) या शास्त्रद्न्याने दुसरा प्रयोग केला यामध्ये त्याने कंपूचा आपल्यावर कळत/नकळत पडणार्‍या दबावाचा अभ्यास केला. म्हणजे आपल्याला उत्तर जरी अगदी १००% माहीत असले तरी "गटामध्ये/कंपूमध्ये" रहाण्याकरता म्हणून आपण निखालस चूकीचे उत्तर देऊ शकतो.
___________________________________________________________________
पुढे १९५५ मध्ये क्रच्फिल्ड (Crutchfield) हा शास्त्रद्न्य या निष्कर्षाप्रत आला की - जे लोक "CONFORM" करतात ते बौद्धिकदृष्ट्या कमी परिणामकारक असतात. त्यांच्यामध्ये अहंची नभावना आणि नेतृत्वनैपुण्य हे गुण कमी आढळतात.असे लोक सामाजिक नात्यांमध्ये कमी प्रगल्भता असलेले तसेच न्यूनत्वाची भावना जोपासणारे असतात. ते संकुचित मनोवृत्तीचे, दबलेले, शरणागत वृत्तीचे अधिक असून त्यांना स्वतःबद्दलचे द्न्यान अत्यल्प असते.
त्याला हेदेखील आढळून आले की सामान्यतः स्त्रिया या पुरुषांपेक्षा अधिक "CONFORM" करतात.पुरुष हे पारंपारीक रीत्या स्वातंत्र्य आणि झगडा ह्या दोन गोष्टी स्पर्धात्मक अभिव्यक्ती म्हणून व्यक्त करताना आढळतात याउलत स्त्रिया हीच अभिव्यक्ती अधिक जुळवून घेण्यातून व्यक्त करतात.
_____________________________________________________________________
संदर्भ -
दुवा१
दुवा २

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

माहिती सुखद आहे.

एकांगी संशोधन

वर दिलेले संशोधन व त्यातील मत एकांगी वाटले. विशेशकरून 'स्त्रीयांच्या बाबतीतील मत' हे नियम म्हणून स्विकारणे योग्य नाही. कारण वरील संशोधनातील पद्धत पुरूशांच्या गुणांना पूरक होती. संशोधनाची पद्धत अजून सुधारायला हवी होती. कारण बायका आधि दुसर्‍याची मते स्वबचावासाठी दबावाखातर स्विकारतील पण नतर त्याच बायका त्या गोश्टींचा दुसर्‍यावर दबाव आणण्यासाठी उपयोगात आणतात तेंव्हा पुरुशांना 'विचारायची' व 'विचार करायची' देखील सोय नसते.

सुसंगती

कन्फॉर्मिटी- सुसंगती ? (नॉन-कन्फर्मिटी - विसंगती?)

अचूक उत्तर नसणार्‍या / संदिग्ध प्रश्नाचे उत्तर बहुमताच्या कलाने देणे फारसे न्यूनत्वाचे वाटत नाही.

सुसंगती
सदा घडो सुजनवाक्य कानी पडो :)

गूगलवर उपक्रम

स्वतःवर विश्वास नसणे

परंतु एक लक्षात घ्यावे - जरी उत्तर संदिग्ध होते तरी गिनीपिगची खात्री पटली होती की अंतर ८ इंच असावे. पुढे क्रमाक्रमाने हेच अंतर केवळ काल्पनिक अशा अप्रत्यक्ष दबावतंत्रामुळे कमी कमी होत गेले आणि गटाच्या उत्तरास अनुरुप , उत्तर दिले गेले.

जर तुम्हाला विश्वासा आहे की तुमचे उत्तर बरोबर आहे तर दबावतंत्राला तेही काल्पनिक दबावतंत्राला बळी पडण्याचे काहीच कारण नाही. ज्याअर्थी असे होते त्याअर्थी तुमचा स्वतःवरचा विश्वास दृढ नाही. एक्स्टर्नल फॅक्टर्स तुमच्यावर त्वरीत परिणाम. करतात. म्हणजे न्यूनता म्हणायवयास हरकत नाही.

उपक्रमवरील प्रतिसाद व कन्फर्मिटी

कोणत्याही विवादास्पद चर्चा विषयावर येणारे प्रतिसाद बघितले तरी साधरण हेच निरिक्षण करता येते. पहिले एक दोन प्रतिसाद स्वतंत्रपणे विचार करून दिलेले आढळतात. प्रतिसादांची संख्या वाढत जाते तसतसे पुढचे प्रतिसाद बहुसंख्य प्रतिसादात जो सूर असतो त्या सुराशी आपल्या प्रतिसादाची कन्फर्मिटी राहील याच पद्धतीने दिलेले असतात. यावर लेखिकेला काय वाटते ते वाचायला आवडेल.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

असेच म्हणतो

असेच म्हणतो.
प्रकाश घाटपांडे

पंचतत्र

असेच म्हणतो.

हे देखील कन्फर्मिटीचे उदाहरण नाही ना? ;)

बाकी मला तीन ठग एका माणसाला वेगवेगळ्या ठिकाणी थांबवून त्याच्या बोकडाला कुत्रे म्हणतात आणि पर्यायाने त्या माणसाला आपल्याकडे बोकड नसून कुत्रेच आहे असे वाटून तो ते बोकड सोडून देतो आणि ठग तो बोकड पळवतात, ही पंचतत्रातील गोष्ट आठवली.

खरच दबाव येतो

जेव्हा अन्य लोक तोंड भरभरून स्तुती करत असतात तेव्हा त्या लेखातील/ कवितेतील खुसपट काढण्यावर खूप दबाव येतो हे अगदी मान्य आहे.
पण यातही एक मजा आहे -
जर लोक एखादी प्रतिकृती वाईट म्हणत असतील तर, सौम्य का होईना पण "स्तुतीचा" सूर जरा तरी लावता येतो.
तेच जर लोक स्तुती करून राहीले असतील तर "निषेधाचा" सूर लावणे फार कठीण वाटते.

काही अंशी असहमत

काही अंशी असहमत - लेखातील कंटेंट जर चांगले असेल तर पैलुदर्शी (कर्टसी - श्री.रावले) प्रतिसाद येतातच, लेखातील महत्वाचे मुद्दे संपल्यावर एकतर चर्चा थांबते किंवा आहे त्याच प्रतीसादंवर उप-प्रतिसाद येत जातात. "मुद्दे संपणे" हे सापेक्ष असू शकते. गर्दीच्या वैचारिक बुद्धिमत्तेवर किती वेगळे प्रतिसाद येतील हे अवलंबून असते.

अनुगामिता/अनुगमन

कन्फर्मिटी = अनुगामिता?

छान

पर्याय आवडला. अनुगमन/अनुगतिक/अनुगुगतिकता/अनुगामी वगैरे शब्दरूपे करण्यासाठी सोय होते.

("गतानुगमन, गतानुगतिकता, प्रवाहपतित, प्रवाहपतितता" यांच्यावरून मला सुचलेले थोडे बोजड पर्याय - "प्रवाहानुगमन किंवा प्रवाहानुगतिकता". श्री. विसुनाना यांचा पर्याय सुटसुटीत म्हणून अधिक आवडला.)

प्रवाहानुगमन

प्रवाहानुगमन छान आहे

अनुसरण

ह्याशिवाय अनुसरण, अनुसारिता हे शब्द बहुधा प्रचलित आहेत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

"गर्दीची मानसिकता" किंवा "गर्दीचा मानसिक दबाव"

एकार्थी "गर्दीची मानसिकता" किंवा "गर्दीचा मानसिक दबाव" असे म्हणता येईल का? निरीक्षण नक्कीच योग्य आहे. सबमिसीव वृत्ती ह्यास कारणीभूत असते.

स्त्रियांबद्दल केलेले निरीक्षण देखील गर्दीच्या संदर्भात काही अंशी खरे असल्याचे जाणवते, वयक्तिक पातळीवर स्त्रिया व हे गिनिपिग वेगळे वागतील हि शक्यता नाकारता येत नाही.

मी पुढील वाक्य अतिशय गंभीररित्या सांगू इच्छितो - पुण्यात ह्याच्या नेमके उलटे होताने दिसते...निदान मत प्रदर्शन करतेवेळी बहुमताच्या विरुद्ध मत देणे हे बुद्धी(अति) असल्याचे द्योतक आहे हा (गैर) समज आहे.

हाहाहा

>> मी पुढील वाक्य अतिशय गंभीररित्या सांगू इच्छितो - पुण्यात ह्याच्या नेमके उलटे होताने दिसते...निदान मत प्रदर्शन करतेवेळी बहुमताच्या विरुद्ध मत देणे हे बुद्धी(अति) असल्याचे द्योतक आहे हा (गैर) समज आहे. >>
हाहाहा...... इतकी हसतेय मी ....... मस्त!!!!!!!!!
ओह माय गॉड!!!!

शब्दच्छल

शब्दच्छल करीत बसणे हे ही बुद्धी(अति) असल्याचे द्योतक आहे

ही ही ही

हा हा हा...... बुद्धी का कुबुद्धी??

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

चांगली माहिती

यावर लिहिण्यासारखे आहे पण आता वेळ नाही. नंतर टंकेन.

शुचिंना काय वाटते? त्यांनी आपली लिखाणाची पद्धत बदलली का? उपक्रमावरील त्यांचे लेखन आणि मिपावरील लेखन यांत फरक दिसतो. त्यांच्यावर विषय बदलण्याचा दबाव आला का?

आतून वाटल्याने

>> शुचिंना काय वाटते? त्यांनी आपली लिखाणाची पद्धत बदलली का? उपक्रमावरील त्यांचे लेखन आणि मिपावरील लेखन यांत फरक दिसतो. त्यांच्यावर विषय बदलण्याचा दबाव आला का? >>
होय लिखाणाची पद्धत बदलली. येथे माहीतीप्रधान लेख लिहीण्याचा पायंडा आहे. आणि सध्या तरी मी उपक्रमाच्या "प्रेमात पडले आहे" त्यामुळे दबावाने नाही तर अंतरातून वाटल्यामुळे बदल घडला आहे.

:)

दबावाने नाही तर अंतरातून वाटल्यामुळे बदल घडला आहे.

असे वाटविणे हेच खरे कौशल्य!

कौतुकच्

वाटते. पण इथे कोणचे करावे?

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

पावरपॉइंट माहितीपूर्ण

पावरपॉइंट माहितीपूर्ण आहे.

हे व्याख्यान कुठल्या संस्थेत कोणी दिलेले आहे. (दुव्यावरून कळणे कठिण जात आहे, आणि पावरपॉइंटमध्ये केवळ "व्याख्यान क्रमांक ६" असा उल्लेख सापडला.

कन्फॉर्म

कन्फॉर्मिटि(इंग्लिश)---- सुसरबाई तुझी पाठ मऊ.... (मराठी)
आता याला न्युनगंड म्हणायच कि अक्कलहुशारी?
पाळलेला पोपट पण जे आजुबाजुला बोललं जात तेच बोलतो. याला तुम्ही न्युनगंड म्हणता का? शिकवलेल बोलतो म्हणजे किती हुशार आहे.
पण मैना स्वतःला वाटतं त्याप्रमाणे गाते.. तर ती मात्र हुशार नाही!
????????
________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

शंका.

लेख आवडला.

शंका- कन्फर्मिटी आणि पिअर् प्रेशर यात फरक काय?/किती?

एक्स्टर्नल्

कन्फर्मिटी आणि पिअर् प्रेशर यात फरक काय?/किती?
>> कन्फॉर्मिटि मधे बाहेरून दबाव असतो तर प्रिअर् प्रेस्शर् मधे आतून (अंतरात्मा?) दबाव असतो.
किती?-- हे कोण कोणता दबाव सहन करु शकतं आणि कोणता नाही यावर अवलंबून आहे. जर कोणि आतिल दबाव सहन करु शकत असेल तर त्याला तो सहज दाबता येतो व त्यावर बाहेरील दबाव सत्ता गजवतो. प्रत्येकाची स्वतःची मर्जी आहे त्याने कोणता दबाव प्रमाण मानावा!

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

ऍक्शन-रिऍक्शन

>> कोणताही दबाव असताना अथवा नसताना, स्वतःची वागणूक बदलून , आपली प्रतिक्रिया, अन्य लोकांच्या प्रतिक्रियेशी मिळतीजुळती ठेवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे CONFORMITY.>>
म्हणजे कन्फॉर्मिटी ही रिऍक्शन आहे. तर पीअर प्रेशर ही ऍक्शन आहे.

एक्शन्

मग पिअर् प्रेशर हे एक्शन् कसे ते स्पष्ट नाही झाले. एक्शन घडायला कोणतातरी फोर्स(दबाव) लागतोच ना! तो कोणता?

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

दोनही शब्दांच्या भावार्थांचे स्तर वेगवेगळे आहेत.

प्रवाहानुगमन (कंनफर्मिटी) कि एक क्रिया आहे. पण येथे तो भावर्थ मत ठरवण्याच्या प्रक्रियेला उद्देशून आहे. हि घडलेली क्रिया सहज व नकळत घडते.
पीअर प्रेशर म्हणजे ओळखीच्या वा 'जवळच्या वर्तुळातील' लोकांचे सांगण्यामुळे आलेला दबाव. हा दबाव आहे, पण हा दबाव एखादि क्रिया करावी की करू नये हे ठरवण्याच्या आधिचा आहे.
प्रवाहानुगमन हि क्रिया बरीचशी 'संसर्गजन्य अवस्थेमुळे' तसेच 'जे जास्त योग्य त्याचा जास्त स्विकार व वायसे वरसा' यामुळे झालेली असते.
पीअर प्रेशर हा दबाव 'आपली आंतरीक-उर्मी किती आहे'? व 'आपण इतरांच का व किती ऐकतो?' यावर 'क्रिया काय व कशी घडणार?' हे बेतलेले असते.

ह्या दोनही संकल्पनांचा स्तर वेगवेगळा आहे. द्न्यानेश यांना त्यांची तुलना करावीशी का वाटली?

सहमत आहे

>> ह्या दोनही संकल्पनांचा स्तर वेगवेगळा आहे >>
सहमत आहे

 
^ वर