तर्कक्रीड १०:प्रमेयाचे वय

......... प्रा.प्रयुत आणि त्यांचा मुलगा प्रमेय काही पुस्तके आणण्यासाठी चालले होते.वाटेत प्रा.परार्ध भेटले. ते प्रयुतांचे मित्र.गणित हा दोघांचा आवडता विषय. त्याच विषयावर ते रस्त्यात बोलू लागले. प्रमेय चुळबुळला.
......."हा माझा मुलगा प्रमेय" प्रयुतांनी ओळख करून दिली. प्रमेयाने 'नमस्ते'केले.
......." वय किती तुझं ,बाळ?'
बाळाने वय सांगितले.(पूर्ण वर्षे)
......."तुला भावंडे किती?"
प्रमेयाला राग आला. खरे तर 'बाळ' म्हटल्या बद्दल त्याला राग आलाच होता.
......."काका,तुम्ही गणिताविषयी बोलता आहात.म्हणून तुम्हाला एक कोडे घालतो."
......."अरे, ते गणितात पारंगत आहेत.ते कधी चूक न करता अनेक गणिते तोंडी सोडवतात.तुझी ती बाष्कळ कोडी इथे नकोत."
........"असूंदे रे.तु़हा मुलगा बुद्धिमान दिसतो.सांग रे तुझे कोडे."
........"मला तीन बहिणी आहेत.त्या तिघींच्या वयांचा गुणाकार ३६(छत्तीस) असून तिघींच्या वयांची बेरीज माझ्या वया एवढी आहे."(सर्व वये पूर्ण वर्षांत).तर तिघींतील सर्वांत मोठीचे वय किती?"
........"छान!छान!थांब हं जरा.तिचे वय ...इतकी वर्षे?"
प्रमेयाने नकारार्थी मान हलविली.
........तेव्हा प्रा.परार्ध यांनी त्या तिन्ही बहिणींची वये सांगितली.
......."अगदी बरोबर. काका तुम्ही ग्रेट आहात." प्रमेय आनंदाने म्हणाला.
तर .....प्रमेयाचे वय किती वर्षे?

{या कोड्यासाठी थोडी लेखी आकडेमोड करावी लागेल.(प्रा.परार्ध यांची तोंडी आकडेमोड बिनचूक असते. आपल्याला ते जमेलच असे नाही)}

लेखनविषय: दुवे:

Comments

१४ का नाही?

९, ४, १ बहिणी व १४ प्रमेय का नाही?

प्रा. परार्धांनी आधी एक चुकीचे उत्तर सांगितले व मग बरोबर उत्तर सांगितले, त्यातलाच घोळ दिसतो.

माझे उत्तर २, ३, ६ ब व ११ प्र किंवा ९, ४, १ ब व १४ प्र.

सहमत

१४ चे चान्सेस जास्त !! (कारण बाळ म्हटल्यावर राग आला)

त्यामुळे दिलेल्या माहितीवरून एकच उत्तर काढता येत नाही, असा निष्कर्ष निघतो का?

११?

प्रमेयला जुळ्या बहिणी नाहीत ना?

१३ वर्षे

३६ चे अवयव आणि त्यांच्या बेरजा खालीलप्रमाणे

१) १ २ १८ (बेरीज २१)
२) १ ३ १२ (बेरीज १६)
३) १ ४ ९ (बेरीज १४)
४) १ ६ ६ (बेरीज १३)
५) २ २ ९ (बेरीज १३)
६) २ ३ ६ (बेरीज ११)
७) ३ ३ ४ (बेरीज १०)

यातील पर्याय ४ व ५ यांची बेरीज सारखी आहे. प्राध्यापकमहाशयांना प्रमेयाचे वय माहीत होते, व त्यांना २ प्रयत्नात त्याच्या बहिणींची वये काढता आली म्हणजे प्रमेयाचे वय १३ वर्षे आहे.
बरोबर?

१३

अगदी असेच!
अमितराव, तुमच्या यादीत एक अवयव उरला - १, १, ३६ पण हा तपासण्याची गरज् नाही. :)

तर्क.१०:प्रमेयाचे वय

प्रा.परार्ध यांना ३६ गुणाकार असलेल्या तीन संख्यांची बेरीज (प्र.चे वय) माहीत आहे.त्यांची आकडेमोड कधीही चुकत नाही .(हे पुनःपुन्हा दिले आहे).तरी त्यांचे पहिले उत्तर चुकले.यावरून तीच बेरीज असलेली एकाहून अधिक त्रिकुटे असली पाहिजेत.सर्व त्रिकुटांचा विचार केला तर (९,२,२) आणि (६,६,१) यांत बेरीज समान (१३) दिसते.अन्य प्रत्येक बेरीज एकमेव आहे.प्र.चे वय १३ व्यतिरिक्त अन्य कोणतेही असते तर परार्ध यांचे पहिले उत्तर बरोबर आलेच असते.तसे झाले नाही.
म्हणून प्रमेयाचे वय १३ वर्षे.(बहिणींची वये विचारलेली नाहीत.कारण उत्तर एकमेव नाही. तरी ती च काढण्याचा अनेकांचा हट्ट का होता नकळे).
श्री.अमित कुलकर्णी यांनी हे विश्लेषण योग्य प्रकारे केले आहे.
*****माझ्या मते आजवरच्या(१ते १०) कोणत्याही तर्कक्रीडेत कुठलाही घोळ नसावा.असा दोष राहू नये याची शक्य तेवढी दक्षता घेतो.तसेच कोडे अगदीच प्राथमिक स्वरूपाचे हो ऊ नये हेही पाहातो.('रामनाम'-'पेढे' हा अपवाद असू शकेल.)
.........यनावाला.

आले ल़क्षात

१३ व्यतिरिक्त अन्य कोणतेही असते तर परार्ध यांचे पहिले उत्तर बरोबर आलेच असते.तसे झाले नाही.

आत्ता कळले !!

 
^ वर