हसन अली

हसन अली ह्या इसमा कडे ३७, ००० कोटी रुपयाची करबाकी आहे असे एक दोन वर्षापूर्वी वाचनात आले होते.
त्या नंतर आता म्हणे त्याच्या कडे ५०, ००० कोटी रुपयाची कराची थक बाकी आहे.

हा इसम पुण्याचा.

१. हा कोण आहे. कोणाला माहीत आहे का. माझ्या माहिती प्रमाणे ह्या माणसाचे स्टड फार्म आहे पुण्यात. स्टड फार्म एवढा पैसा मिळवून देत असेल तर आतापर्यंत मोठ मोठ्या उद्योजकांनी त्यात पैसा ओतून बरेच असे फार्मस् निर्माण केले असते. मग एवढा पैसा आला कोठून.

२. टाइम्स नाऊच्या नुसार हा कोण्या राजकीय पुढाऱ्याचा मोहरा आहे. कोण असेल तो पुढारी. ५००००० कोटी रुपये जर कर बाकी असेल तर स्विस बॅंकेत त्याच्या तिप्पट पैसा जरुर असणार - म्हणजे साधारण १५०००० कोटी रुपये झाले. ह्या पैशात किती अतिरेकी संघटनांना पैसा पुरवता आला असेल. २०१० - २०११ मध्ये भारताचा सगळा मिळून संरक्षण खर्च १४७००० कोटी रुपये झाला. ह्या राष्ट्रात अराजक माजवण्याचे सामर्थ्य ह्या माणसा कडे आहे. हा विचार डोक्यात येतो. आपल्याला काय वाटते.

एवढे सगळे असून सरकार अजून सुद्धा चुप का. मला वाटते सरकार ने ह्या पैशाचा जर प्रामाणिकपणाने शोध लावला व ही गोष्ट पुर्णत्वाला नेऊन जर देशा समोर एक केस स्टडी म्हणून ठेवली तर त्यातून फार मोठे कार्य होणार आहे. हे घडवून आणण्यासाठी लागणारी यंत्रणा सरकार कडे आहे, पैसा आहे. फक्त इच्छा शक्ती नाही असे वाटते. ह्याचीच खंत आहे. पैसे खाऊ पणा पुर्वी पण होता पण आता पाणी डोक्यावरून जाऊ लागले आहे. लोक हतबल आहेत का लोकांच्या संवेदना बोधट झाल्या आहेत. त्यांना उठवणारा व जागे करणारा एखादा जांबूवंत पाहिजे आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

कुख्यात आर्म्स डीलर अदनान खशोगी शी जवळचे संबंध

ह्या राष्ट्रात अराजक माजवण्याचे सामर्थ्य ह्या माणसा कडे आहे.

बरोबर आहे, हसन अलीचे कुख्यात आर्म्स डीलर अदनान खशोगी शी जवळचे संबंध
आहेत, या अदनान खशोगी वर अल कायदा,लिट्टे यांना हत्यारे पुरवल्याचा आरोप आहे,या दोघांची NASDAQ मध्ये काही अरब डॉलर्स ची गुंतवणूक सुद्धा आहे.
हसन अली वर चौकशी बसली तेव्हाच हा परदेशी पसार झाला,आता पुन्हा हातात येईल असे वाटत नाही.

हल्ली

हल्ली भ्रष्टाचाराची SI युनिट्स बदलली आहेत. लाख, कोटी वगैरे छाटछूट रकमा इतिहासजमा झाल्या आहेत. :)

1Crore = 1 Khoka;
500Cr = 1 Koda;
1000Cr = 1 Radia;
10000Cr = 1 Kalmadi;
100000Cr = 1Raja;

सौजन्य :भुंगा.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.......

बेरिज

हसन अली संदर्भात मागे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक सीडी पुरावा म्हणुन पुढे आणली होती .त्या सीडी मधे हसन अली यांच्याबरोबर एका बैठकीत राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांपैकी आर आर व काँग्रेसचे अहमद पटेल उपस्थित होते . हसन गफुर यांच्या पोलिस आयुक्त म्हणुन केलेल्या नियुक्ती वरुन हा वाद झाला होता.सिआयडी कडे या प्रकरणाची चौकशी सोपवली होती पण त्यानंतर मात्र त्या तथाकथित चौकशीच्या नाटकाचे काय झाले हे कळण्यास मार्ग नाही
हसन अली हा फक्त या अर्थकारणातला एक छोटासा प्यादा आहे..बाकि याचे कर्तेकरविते कुणी वेगळेच आहेत.या सगळ्या प्रकरणाचे लागे बांधे कुणाशी असू शकतात हे सहज ताडता येण्याजोगे आहे कारण शेवटी त वरुन ताकभात ओळखण्या इतपत भारतिय जनता नक्कीच सुज्ञ आहे..
सध्या प्रचलित असलेला एक एसएमएस शुद्ध मराठीत
.एक कोटीला म्हणतात एक खोका.

पाचशे कोटींना एक "कोडा"

आता एक हजार कोटींचा अर्थ आहे एक "राडिया"

दहा हजारकोटी म्हणजे एक "कलमाडी"

एक लाख कोटीला एक "राजा"

दहा कलमाडी अधिक एक राजा यांची बेरिज म्हणजेच शरद पवार

"अनामिका"

हसन अलि

दहा शरद पवार म्हणजे एक मनमोहन.

 
^ वर