उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
काय अर्थ दडला असेल यांत?
शरद् कोर्डे
May 15, 2007 - 2:10 pm
आपल्या वाचनांत अनेक बोधवाक्ये, सुविचार, सुभाषिते, कोटेशन्स येत असतात. त्यांतील काही आपल्याला चटकन आवडतात. काहींच्या बाबतींत खोलांत विचार केल्याशिवाय डोक्यांत ट्यूब पेटत नाही. असेच एक सेंट् थॉमस् चे कोटेशन अलीकडे माझ्या वाचनांत आले. ते असे
A strong error is better than a weak truth.
यांत कोणता अर्थ दडलेला असावा?
दुवे:
Comments
बेसूर आणि कणसूर..संत तात्याबांचे मौलिक विचार!
कोर्डेसाहेब,
सेंट थॉमस ह्या इसमाबद्दल आम्हाला माहिती नाही. परंतु ज्याअर्थी त्याची कोटेशन्स वगैरे अभ्यासली जातात त्यावरून तो कुणीतरी ग्रेट असावा असा आमचा कयास आहे. आम्हीही ग्रेट असल्यामुळे दुसर्या एका ग्रेट माणसाचे विचार आम्ही समजून घेऊ/सांगू शकतो असे वाटते! ;)
पुढे जाऊया! ;)
आमची ही ष्टाईल आज मराठी ब्लॉगस् वर लोकप्रिय होत चालली आहे याचा आम्हाला आनंद आहे! ;)
मौखिक परंपरेनुसार(!) आम्हाला संगीताबद्दलची थोडीफार माहिती आहे. त्यामुळे वरील प्रश्नाचे आम्ही आमच्या सांगितिक भाषेत उत्तर द्यायचा प्रयत्न करू. ते आपण कसं समजून घ्यायचं हा अर्थातच आपला प्रश्न आहे! ;)
बरं का कोर्डॅसाहेब, एखादा गायक जेव्हा गात असतो, तेव्हा त्याच्याकडून सोबत वाजणार्या तंबोर्यांच्या पार्श्वभूमीवर एकूण तीन प्रकारचे स्वर लागत असतात/किंवा लागू शकतात.
१) सुरेल.
२) बेसूर
३) कणसूर
या चर्चेच्या संदर्भात आम्ही वरील तीन प्रकारांचे अनुक्रमे खालीलप्रमाणे वर्गीकरण करू!
१) Absolute Truth!
2) Strong Error ;)
3) Weak Truth!
१) Absolute Truth - सुरेल
कोर्डेसाहेब, जसा सुरेल स्वराला पर्याय नसतो, त्याचप्रमाणे जे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे/असतं त्यालाही पर्याय नसतो. म्हणूनच कदाचित सुरेल स्वराला सच्चा स्वर असेही म्हणत असावेत! Right? ;)
२) Strong Error - बेसूर
एखादा गायक जेव्हा गाताना बेसूर होतो, तेव्हा तो ठार बेसूर झाला असं श्रोत्यांबरोबरच त्याला स्वतःलाही कळतं/कळत असावं! पण ते बेसूर होणं एक वेळ परवडतं! कारण तिथे सुधारायला संधी असते. त्यामुळे एखादा गायक बेसूर गात असला तरी त्याला प्रयत्न करून तो बेसूरपणा नाहीसा करता येऊ शकतो.त्याचप्रमाणे Strong Error च्या बाबतीतही म्हणता येईल. Strong Error म्हणजे घोडचूक! पण चुका, घोडचूका या सर्वांच्याच हातून होत असतात. पण त्यातूनच मनुष्य सुधारत असतो, बिनचूक होत असतो!
३) Weak Truth - कणसूर
कोर्डेसाहेब, आपण गाणं किती ऐकलं आहे हे मला माहीत नाही, परंतु गाण्यात एक 'कणसूर' नावाचा फार धोकादायक प्रकार असतो. हा प्रकार जी मंडळी बर्यापकी संगीत जाणतात, त्यांनाच समजतो. बाकीच्यांना ते गाणं सुरेलच वाटतं. परंतु ज्यांचे कान तयार आहेत (अर्थातच, मौखिक परंपरेनुसार!) त्यांना तंबोर्याच्या किंवा आधारस्वराच्या पार्श्वभूमीवर हा कणसूरपणा लक्षात येऊ शकतो. संबंधित गायकाच्या बाबतीतही हा प्रकार धोकादायकच असतो. कारण आपण कणसूर गात आहोत हे खुद्द त्यालाही बरेचदा समजत नाही आणि तो तसाच गात राहतो! तसंच आम्ही तुमच्या Weak Truth विषयी म्हणू. आम्ही Weak Truth या प्रकाराला या चर्चेसंदर्भात अर्धसत्य असं म्हणणं पसंत करू. जसं कणसूर गाणं हे जसं धोकादायक तसंच Weak Truth किंवा अर्धसत्यही धोकादायकच! कारण दोन्हीमध्ये संदिग्धता असते. हो हो, नाही नाही हा प्रकार असतो! Not exactly, पण 'Half knowledge is always dangerous' असं जे संत तात्याबा सांगून गेले आहेत तोदेखील Weak Truth किंवा कणसूराचाच एक प्रकार!
असो, वरील मुद्दा क्रमांक २ व मुद्दा क्रमांक ३ वरून,
A strong error is better than a weak truth.
असं तुमचा सेंट थॉमस का म्हणतो हे सूज्ञांच्या लक्षात यावं! ;)
आपला,
सेंट तात्या.
१०० टक्के पटले
आपण संगीताचे उदाहरण घेऊन दिलेला प्रतिसाद १०० टक्के पटला. मला वाटतं हीच गोष्ट इतर क्षेत्रांनाही लागू व्हायला हरकत नाही. विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
धन्यवाद..
धन्यवाद कोर्डेशेठ!
मला वाटतं हीच गोष्ट इतर क्षेत्रांनाही लागू व्हायला हरकत नाही.
हम्म्. हो सकता है!
तात्या.
वा तात्या!
वा तात्या,
छानच लिहीता आपण!
(चक्क!) सर्किटरावांशी सहमत!
(तसं एक जोतिष सोडले तर बर्याच बाबतीत आपले पटते असे निदर्शनांस येते आहे.)
(नको तिथे बेसूर)
गुंडो.
"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो!"
जगातल्या प्रत्येक गोष्टीचा शास्त्रीय संगीताशी संबंध लावता येतो
दुसर्या एका चर्चेत आम्ही हेच पूर्वी म्हटले होते. 'रोजच्या जीवनात शास्त्रीय संगीत लग्नातल्या प्यांटीत दोन वर्षांनंतर ढेरी कोंबून बसवावी तसे बसवलेच पाहिजे' हे आमचे त्या वेळचे शब्द. एखाद्याला अपचन झाले तरी त्याचे समर्थन शास्त्रीय संगीतातली उदाहरणे देऊन करता येईलच की! रेल्वेच्या खडखडाटी पंख्याच्या आवाजात पु. लं. ना सतारीच्या गती सापडल्या, मग आपल्याला चिखलात घसरून राप्पकन पार्श्वभागावर आपटल्यावर एखादा मुलतानी आठवेल, जोरदार शिंक येऊन मान लचकली की एखादा कल्याण आठवेल, पगाराच्या दिवशीच बायकोचा भाऊ उसने पैसे मागायला आला की एखादा अहीरभैरव आठवेल! शेवटी काय, विषय कोणताही असो, आपल्याला येते ती रेकॉर्ड लावल्याशी मतलब!
सन्जोप राव
काळजी घ्या,
काय रावदादा,
तब्येत बरी नाही वाटतं? नाही, तुमच्या पोटात खूप दुखतंय असं समजलं! बघायला येऊ काय पुण्यात अर्जन्टली? काळजी घ्या, आणि लवकर बरे व्हा बघू!
आपल्याला बसायचंय ना तुमच्या घरी? नाही, टीचर्स आणून ठेवल्ये असं म्हणला होता म्हणून विचारतो! ;)
आपलाच,
तात्या.
एकं सत्
येथे मी तात्यांना पाठिंबा देत नाहीये किंवा शास्त्रीय संगीताची बाजू घेत नाहीये, पण...
एकं सद्विप्रा: बहुधा वदन्ति
(एकच सत्य विविध विद्वान लोक वेगवेगळ्या प्रकारे सांगतात)
एवढेच ध्यानात आणून देऊ इच्छितो.
प्रत्येक माणूस आपापले ग्रह-पूर्वग्रह बरोबर घेऊन फिरत असतो, त्याला त्याच्याच चष्म्यातून सगळे दिसते. प्रत्येकाला त्याच्यात्याच्या परीने सत्याचा साक्षात्कार होतो, त्यात काय एवढे मनावर घ्यायचे?
हे मात्र खरे की तुम्हा दोघा शब्दप्रभूंचे तम्बोरे मात्र बारकाईने सुरात लागलेले आहेत. एकाची तार छेडली की बहुधा लगेच दुसरा झंकारतो.
- दिगम्भा
अहो दिगम्भाशेठ,
ते संजोपदादा इथे दिवसभर आमच्याशी भांडतंय बघा, अन् संध्याकाळी पुन्हा आमच्याच ग्लासात व्हिस्की ओततंय बघा! ;)
हे मात्र खरे की तुम्हा दोघा शब्दप्रभूंचे तम्बोरे मात्र बारकाईने सुरात लागलेले आहेत. एकाची तार छेडली की बहुधा लगेच दुसरा झंकारतो.
क्या बात है..! वो तो हैईच! ;)
तात्या.