पानिपत लढाईचे रेखाचित्र

१७७० मधे फैझाबाद पद्धतीने काढलेले एक पे न्सिल् रेखाचित्र बीबीसी लायब्ररी ऑन लाईन च्या या दुव्यावर सापडले. ते चित्र व मुख्य सेनानींची नावे असलेले चित्र मी खाली देत आहे. मूळ दुव्यावर फ्लॅश पद्धतीने मोठे करण्याची व्यवस्था आहे. ज्यांना रुची असेल ते बघू शकतात.

मूळ रेखाचित्र

panipat

सेनानींची नावे

लेखनविषय: दुवे:

Comments

आभार

चित्राबद्दल आभार.

सदाशिवराव भाऊ

या चित्रात सदाशिवराव भाऊ फक्त जखमी झाल्याचे दाखवले आहे. श्री. योगप्रभू यांच्या धाग्यात सदाशिवराव भाऊ पानिपतावर मारले गेले की नाही? या बाबत संदेह असल्याचे दिसते. या चित्रावरून तरी ते फक्त जखमी झाले असावेत असे वाटते.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

चित्र

हे चित्र विकीवरही असल्याने पाहिले होते परंतु त्यातील अब्दाली सोडून इतर सेनानी माहित नव्हते. ते माहित करून दिल्याबद्दल आभार.

या चित्रात सदाशिवरावभाऊ हे जखमी झालेले दाखवले तरी सदर चित्रात निर्णायक लढाई दिसत नाही त्यामुळे लढाईचा नेमका कोणता दिवस/प्रहर लक्षात ठेवून चित्रकाराने हे चित्र काढले हे लक्षात येत नाही. त्यामुळे भाऊंविषयी अधिक खात्रीशीर वक्तव्य करण्यास हे चित्र पुरेसे नाही. चित्रातील खालच्या बाजूस अत्याचार आणि कत्तल असे म्हटले आहे, तेथेही कत्तल दिसली नाही (चू.भू.दे.घे.) चित्रकाराला कदाचित असे सुचवायचे असावे की बायकांना रणभूमीवर सोबत आणल्याने मराठ्यांचा वेळ मौजमजेत जात होता.

चित्रात विश्वासराव आहेत की नाहीत हे देखील कळत नाही. होळकर, शिंदे यांच्या जागाही कळत नाहीत. चित्रात वरील मध्यभागी तोफेवर इब्राहिमखान गारदी असावा असे वाटते.

-----

अवांतरः

अशाचप्रकारे शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीत मीर मोहम्मद या चित्रकाराने राजे कैदेत असताना त्यांचे चित्र काढण्याची परवानगी मागितली. ती राजांनी दिली असता, त्याने खालील चित्र राजांना सादर केले. त्यावर राजांनी त्याला विचारले की 'मला इतक्या लवाजम्यासह घोड्यावर बसून जाताना कोठे पाहिले? मी तर येथे कैदेत आहे.' तेव्हा मीर मोहम्मदने उत्तर दिले की 'ज्या दिवशी तुम्ही प्रथमत: आग्र्यात शिरलात तेव्हा तुम्हाला बघायला जी गर्दी झाली होती त्यात मी होतो; तो प्रसंग लक्षात राहिला.'

5921

चित्रकार आपली कलाकारी नेमके काय मनात ठेवून काढेल हे सांगणे कठिण वाटते.

कत्तल

चित्रात अगदी खालच्या कडेजवळ, अनेक मानवी धडे व शेंड्या राखणारी मुंडकी दाखवली आहेत. त्याच प्रमाणे मराठा छावणी मधेही अनेक धडे पडलेली दाखवलेली आहेत. यांना उद्देशून मी कत्तल असे लिहिले आहे.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

धन्यवाद.

चित्राबद्दल धन्यवाद.
मला जरा शिवाजी राजांनंतरच्या मराठ्यांच्या इतिहासाच्या पुस्तकांची नावे हवी होती. कुणाला देता येतील का? शेजवलकरांचं पानिपत वाचलं पण त्याआधीच्या इतिहासाची मराठी पुस्तके आहेत का? कादंब-या नको आहेत.

-सौरभ.

==================

डुंबा हो रे डुंबा हो रे डुंबा हो रे!

मराठ्यांच्या इतिहासाबद्दलची पुस्तके

मी पुस्तकांची नावे दिण्यासाठी म्हणून हा प्रतिसाद लिहिण्यास घेतला खरा पण नंतर लक्षात आले की या यादीतली बहुतेक पुस्तके तुम्हाला कोठेच मिळणार नाहीत. लायब्रर्‍यांमधे एखाद वेळेस शोधून सापडतील. माझ्या दृष्टीने इंग्रजीमधले ग्रांट डफ याचे हिस्टरी ऑफ मराठाज( 3 व्हॉल्यूम्स) हे पुस्तक आपल्याला साधारणपणे जो इतिहास माहीत आहे तो सांगते. जास्त खोलात जायचे असले तर सरदेसाईंची रियासत वाचावी. अतिशय छान माहीती आहे. (अर्थात सध्याच्या जाणकार इतिहासकारांच्या मतांशी त्यांची मते जुळतीलच असे नाही. )
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

धन्यवाद!

माहितीसाठी धन्यवाद. रियासतकारांचे खंड मिळवण्याचा प्रयत्न करतो.

-सौरभदा.

==================

डुंबा हो रे डुंबा हो रे डुंबा हो रे!

माधवराव पेशव्यांसंबंधीचा रियासतीचा खंड

प्रस्तुत खंडाची सॉफ्टकॉपी माझ्या संग्रहात आहे. परंतु या पुस्तकाच्या कॉपीराईटबद्दलची स्थिती मला नीट माहीत नसल्याने हा खंड मी माझ्या स्क्राईब्ड अकाऊंटवर ठेवणे योग्य होणार नाही. कोणालाही ही प्रत हवी असल्यास मला व्यनि वरून आपला ई-मेल पत्ता कळ्वल्यास हा खंड मी त्यांना ई-मेलद्वारे पाठवू शकेन.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

पुसटशी माहिती

रियासतींचे खंड पुनर्मुद्रित होऊन सवलतीच्या दरात उपलब्ध असल्याच्या जाहिराती गेल्या महिनाभरात अनेक वर्तमानपत्रांमध्ये वाचल्याचे आठवते. पुस्तकांच्या दुकानदारांकडे चौकशी केल्यास अधिक माहिती मिळू शकेल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मराठ्यांच्या इतिहास सांगणारी आणि बाजारात उपलब्ध असणारी पुस्तके

शिवकाल, पेशवाई मध्ये लिहिलेल्या अनेक बखरी सध्या प्रकाशित झालेल्या आहेत. तसेच शिवकालानंतरचा इतिहास सांगणारे कुलकर्णी व खरे यांचे ' मराठ्यांचा इतिहास ' हे ३ खंड असणारे ग्रंथ देखील सध्या बाजारात उपलब्ध आहे. मराठ्यांचा सलग इतिहास सांगणारी पुस्तके फार कमी लेखकांनी लिहिली आहेत. त्यापैकी राजवाडे आणि सरदेसाई हे दोघे प्रमुख आहेत. राजवाड्यांचे संशोधन अपु-या सामग्रीवर आधारीत असल्याने त्यांच्या लेखनात अनेक दोष आढळतात. त्यामानाने सरदेसाई यांच्या रियासती अव्वल समजायला हरकत नाही. त्यापैकी राजवाडे यांचे खंड तर मिळणे दुर्लभ आहे. सरदेसाई यांच्या मराठी व ब्रिटीश रियासती सध्या प्रकाशित होत आहेत. ब्रिटीश रियासत २ खंडांची असून त्यात ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून १८५७ पर्यंतच्या घडामोडींचा विस्तारपूर्वक आढावा घेतला आहे. सरदेसाई यांची मते पटो अथवा न पटो पण त्यांच्या इतके तपशीलवार लेखन करणारा व भरपूर अवांतर माहिती देणारा इतिहास लेखक माझ्या वाचनात तरी अजून कोणी आलेला नाही.
याशिवाय स.मा. गर्गे यांची करवीर रियासत देखील उपयुक्त आहे. तसेच सदाशिव आठवले यांचे सरदार बापू गोखले हे पुस्तक देखील वाचनीय आहे. पेशवाईच्या अस्ताची थोडी माहिती त्यात मिळेल. याशिवाय भरपूर पुस्तके आहेत पण अडचण एकाच आहे व ती म्हणजे दर्जेदार लेखकांनी लिहिलेली पुस्तके बाजारात सहजासहजी प्राप्त होत नाहीत.' मराठ्यांचा इतिहास : ग्रंथसूची ' हे कविता भालेराव यांचे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये मराठ्यांच्या इतिहासावर आधारीत जवळपास सर्व मराठी व इंग्रजी भाषेतील ग्रंथांची संदर्भ सूची आहे. तसेच यापैकी कोणती उपलब्ध आहेत, अनुपलब्ध आहेत, प्रकाशन वर्ष, प्रकाशन संस्था, लेखक इ. तपशीलवार माहिती यात नमूद केलेली आहे.

 
^ वर