गांधीजींचे प्रसिद्ध वाक्य

"Live as if you were to die tomorrow. Learn as if you were to live forever."
हे महात्मा गांधी यांचे प्रसिद्ध वाक्य. यातील पहील्या अर्ध्या वाक्याचा अर्थ कळणं बर्‍यापैकी सोपं आहे की जणू काही उद्यावर मृत्यू येऊन ठेपला आहे अशा भीतीने, जीवन अधिक अर्थपूर्ण जगा. प्रत्येक क्षण सार्थकी लावा.

परंतु दुसर्‍या अर्ध्या वक्याचा अर्थ मला समजत नाही. असे वाटते की गांधीजींना म्हणायचे आहे की "मधमाशी ज्याप्रमाणे अविरत मध गोळा करते त्या सातत्याने आणि चिकाटीने द्न्यान गोळा करा" पण तर्कदृष्ट्या तो अर्थ मला या वाक्यातून काढता येत नाही.त्याची कारणे पुढीलप्रमाणे -

(१) जी व्यक्ती चिरकाल जगणार आहे तिला सातत्याने अविरत द्न्यान गोळा करायची आवश्यकता काय? ती व्यक्ती तर उलट द्न्यानसंवर्धन (प्रोकास्टिनेट करू शकते) पुढे पुढे टाळू शकते.
(२)आपण विद्या/द्न्यान ग्रहण करतो त्यामागे आनंदप्राप्ती हा दुय्यम उद्देश् असतो बरेचदा, 'सरव्हायव्हल" अर्थात स्वतःचे अस्तित्व टिकविणे हाच प्रमुख उद्देश असतो. जर मला माहीत आहे की मी चिरकाल जिवंत राहीन तर मग मी कामापुरती विद्या ग्रहण करून आरामच नाही करणार का? मी का म्हणून शिकत राहीन?

मी चिरकाल जगणार नाही हे माहीत असल्याने मी शिकत नाही असे काही आहे का? मी चिरंतन जगणार हे कळल्याने असा काय मोठा फरक पडेल?

या वाक्याचा अर्थ आपणांस नक्की काय वाटतो?

लेखनविषय: दुवे:

Comments

एक शक्यता

ज्या गोष्टी शिकून काही फायदा होणे अपेक्षित असते, त्या गोष्टी मन लावून शिकल्या जातील.
"आजच मरायचे" म्हणजे मर्यादित भविष्यात अगदी थोड्याच गोष्टींचे ज्ञान मिळवण्याची गरज वाटेल. आज गरज कळत नाही, पण दीर्घ काळात कधीतरी गरज वाटू शकेल, असा विचार करून अधिकाधिक शिकावे.

हे थोडेफार तुमच्या पर्याय (२) सारखे आहे. पण त्यात तुम्ही अगदी उलट निष्कर्ष काढला आहे. "सर्व्हायव्हल आश्वस्त आहे" तर व्यक्ती आजच्या कामापुरतीच विद्या शिकेल असे तुम्ही म्हणता. विचार करा - या क्षणी मी सर्व्हायव्हिंग-जिवंत आहे, तर या क्षणाच्या कामाची विद्या तरी का शिकावी? लगेच लक्षात येईल, की सर्व्हायव्हल झाले, तरी त्या काळात जे काय काम असेल त्या कामाकरिता विद्या शिकावी. दीर्घ काळ जिवंत राहू, तर त्या काळात अगदी वेगवेगळी कामे करायची वेळ येऊ शकेल. त्या अनुषांगाने खूप वेगवेगळ्या प्रकारची विद्या शिकावी.

"मन लावून शिकणे" हा पैलू पटण्यासारखा आहे.

"मन लावून शिकणे" हा पैलू पटण्यासारखा आहे.

पहील्या भागात उद्याच मरणाची भीती आहे तर दुसर्‍या भागात अमतरत्व आहे.
हे वाक्य साकल्याने पाहीले तर - पहील्या अर्ध्या वाक्यातून "त्वरा करा" असा संदेश मिळतो पण दुसर्‍या अर्ध्या भागातून मला वाटतं "टेक युअर ओन टाइम" आणि कोणतीही गोष्ट शिकताना सांगोपांग विचार करून, सर्वांगीण दृष्टीकोनातून ती गोष्ट शिका, मनःपूर्वक शिका असा संदेश मिळतो असे वाटते. म्हणजे शिकताना घाई गडबड करू नका हा संदेश द्यायचा असावा असेदेखील वाटते.

पटले

हे वाक्य साकल्याने पाहीले तर - पहील्या अर्ध्या वाक्यातून "त्वरा करा" असा संदेश मिळतो पण दुसर्‍या अर्ध्या भागातून मला वाटतं "टेक युअर ओन टाइम" आणि कोणतीही गोष्ट शिकताना सांगोपांग विचार करून, सर्वांगीण दृष्टीकोनातून ती गोष्ट शिका, मनःपूर्वक शिका असा संदेश मिळतो असे वाटते. म्हणजे शिकताना घाई गडबड करू नका हा संदेश द्यायचा असावा असेदेखील वाटते.

पटले व सहमत.

सहमत

+१ सहमत.

लवकरच मरायचे आहे तर सायकल,पोहणे इत्यादी का शिकायचे?
कधीतरी उपयोग होईल म्हणून शिकायचे. 'कधीतरी' च्या संधी मोठ्या आयुष्यात जास्त येणार हे साहजिक आहे. तेंव्हा भरपूर शिका, आयुष्य मोठे आहे, त्याचा फायदा होईल असा तो अर्थ आहे.

प्रमोद

"तहान लागली की विहीर खोंदत बसावे लागणार नाही " ह्या अर्थाने..

टिकेल/लक्षात राहिल/व्यवस्थित समजेल / पुन्हा पुन्हा समजावून घ्यावे लागणार नाही(कारण खूप ज्ञान आहे जगात आणि तुम्हाला खूप वर्षे जगायचे आहे ) / खूप उपयोग होइल इत्यादी अर्थाने ते वापरले असावे.

उदा. लांबचा प्रवास आणि जवळचा प्रवास करताना तुम्ही काय काय करता हेच पहा. लांबच्या प्रवासाला तुम्ही सर्व छोट्या - छोट्या गोष्टींचा विचार
करुन तयारी करता जेणेकरून प्रवासात अडचणी कमी येतील. म्हणजेच तहान लागली की विहीर खोंदावी लागणार नाही .

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

त्या वाक्याचे अर्थ अनेक असतील.

"Live as if you were to die tomorrow. Learn as if you were to live forever."
या वाक्याचं मराठीत अनुवाद काय होईल?

जगा! हे ध्यानात घेवून की तुम्हाला उद्या मरावे लागेल/ लागणार आहे.
शिका! हे ध्यानात घेवून की तुम्ही अनंत काळ 'जगू शकाल'/जगणार आहात.

वरील वाक्यात बापूजी असे सांगत असावेत. कि 'जगत जगत शिका, शिकत शिकत जगा'

'आयुश्य शिकणं' म्हणजे मनाच्या पाटीवर 'काहितरी समजलेले लिहून ठेवणं' पण (दुसर्‍या बाजूने) नवनवे शिकायचे म्हणजे 'जुने शिकलेले मनाच्या पाटीवरून मिटवून टाकणे'.

'शिकलेले मिटवून टाकणे' ही अल्पकालीन 'मृत्यू घटना'. (म्हणूनच वाद-विवादात भिन्न भिन्न मते समोर आली की खटाके उडतात, भांडणे होतात.) या उलट, 'नवे शिकलेले लिहणे/ लक्शात ठेवणे' हा वैचारीक पुनर्जन्म!
वैचारीक स्तरावरील मृत्यूघटना व पुर्नजन्म ह्या नाममात्र अवस्था. जीवनाचा प्रवाह हा अखंड अव्याहत चालूच राहणार. पण हे कळायला आधि 'आयुश्य शिका' तर खरं!

'आयुश्य शिकणं' ही बाजू उजेडाची, द्न्यानाची! 'आयुश्य न शिकणं' ही बाजू अंधाराची अद्न्यानाची!

जगण्यासाठी, जीवीतार्थ चालवण्यासाठी जे शिक्शण लागतं त्याला 'विद्या' म्हणता येईल.
आयुश्य समजून, ते शिकण्यासाठी व आधि शिकलेलं मिटवण्यासाठी जे शिक्श्ण लागतं त्याला 'द्न्यान' म्हणता येईल.

विद्या 'विदीत' होण्याने जीवितार्थ चालवता येतो.
द्न्यान 'प्राप्त' होण्याने 'नवे शिकता येते, आयुश्य नव्याने जगता येते, पहाता येते.'

संस्कृत सुभाषित

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
गांधीजींचे हे वाक्यद्वय कधी वाचनात आले नव्हते.मात्र याच्याशी अर्थसाधर्म्य असलेले एक सुभाषित आठवते. ते असे:
..

अजरामरवत्प्राज्ञो विद्यामर्थं च साधयेत् |
गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत् |

..
अन्वयः-प्राज्ञः अजरामरवत् (मत्वा) विद्यां (च) अर्थं च साधयेत्|
(अहं) मृत्युना केशेषु गृहीत: इव (अस्मि) (इति मत्वा सः) धर्मं आचरेत्|
..
अर्थः--बुद्धिमान व्यक्तीने आपण अजरामर आहोत असे समजून विद्या आणि धन मिळवावे.
(तर) यम माझी शेंडी धरून आहे (कोणत्याही क्षणी ओढून नेईल) असे मानून धर्माचरण करावे.
( धर्माचरणाविषयी आज बघू, उद्या बघू अशी चालढकल करू नये. मृत्यू कोणत्याही क्षणी येऊं शकतो. मला दीर्घायुष्य लाभले तर ज्ञान आणि धन या गोष्टी
उपयोगी पडतील म्हणून आयुष्यभर मिळवत राहाव्या. काय करायचे आहे मिळवून? उद्या मेलो तर सगळे इथेच राहील असा विचार मनात आणू नये.)

 
^ वर