द स्टोरी ऑफ द वीपींग कॅमल

द स्टोरी ऑफ द वीपींग कॅमल

मंगोलियात घडणारी ही कथा आपल्याला एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जाते.
द स्टोरी ऑफ अ वीपींग कॅमल ही एक आणुस आणि प्राणि यांच्या संबंधांचे नितांत सुंदर चित्रण असलेली कथा आहे.

भटक्या लमाणांचा एक तांडा उंटांचा सांभाळ करत फिरत असतो. सांडणींच्या विणीचा हंगाम होऊन त्यांना आता पिले होणार असतात. एक नवीनच आई होऊ घातलेली सांडणी पिलाला जन्म देत असते. पण दुर्दैवाने हा बाळंत होण्याकाळ दोन दिवस सुरु राहतो. पिलू होते. पण वेदनेतून गेलेली ही पहिलटकरिण सांडणी पिलू स्विकारायला नकार देते. दूध देत नाही. काफिल्यातली एक बाई जी सून आणि आई ही आहे, पिलाची काळजी घेऊ लागते. तिने पिलू स्विकारावे यासाठी धडपड करते. त्यासाठी ते त्यांना माहिती असलेल्या पूजा करतात, झेंडे उभारतात. पण तरीही सांडणी हट्टीपणाने पिलाला स्विकारतच नाही. शेवटी त्या बाईची दोन लहान मुले - भाऊ - पाठवून दूरच्या वस्तीतील लामा वादकांना बोलावले जाते. वादक आपले वाद्य सांडणीच्या वाशिंडाला आपले वाद्य अडकवून ठेवतात. वाहणर्‍या वार्‍यामुळे त्यातून नैसर्गिकरित्या स्वरू घुमू लागतात. काही काळाने हे वादक व्हायोलिन सारखे तंतूवाद्य वाजवू लागतात. त्यासोबतच ही बाई संडणीच्या पाठीवरून आश्वासक हात फिरवत गाऊ लागते. तेच सूर वादक उचलत राहतात. स्वरांची जादू आसमंतात भरत जाते. हळूहळू सांडणी शांत होते. तिचे आईपण जागे होऊ लागते. डोळे पाझरू लागतात. पिलूही हळुहळू आपल्या आई कडे येते आणि दूध पिण्याचा प्रयत्न करू लागते. सांडणीच्या डोळ्यातून अश्रु पाझरत राहतात.

साधीशी आणि सुंदर कथा असलेला चित्रपट आवर्जून पाहावा असा आहे.

उंट अभिनय करतात असे कसे म्हणावे? पण खरोखर यात उंटांनी व्यक्त केलेले भाव किंवा टिपपलेले भाव अप्रतिम आहेत. सांडणीने आपल्याला पिलाला जवळ घेतल्यावर आपल्याही खरोखर हायसे वाटते. मंगोलियात घडणारी ही कथा आपल्यला एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जाते.
साध्या-सोप्या मंगोलियन-तिबेटी जीवनाचे विलोभनीय दर्शनही हा चित्रपट घडवतो.

हा चित्रपट पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय आहे.

निसर्गाशी आपला असलेला संबंध विसरून जायला झाले आहे आपल्याला ही जाणीव प्रखरतेने झाली मला हा चित्रपट पाहिल्यावर. शिवाय संगीताची वैश्विक भाषा आहे हे अजून एक सत्य हलकेच जाणवून गेले...
कोणताही बडेजाव न आणता, साध्याशा या चित्रिकरणाने आणि संगीताने भारावून टाकले.

इंग्रजी नाव - द स्टोरी ऑफ द वीपींग कॅमल The Story of the Weeping Camel
वर्ष - २००४
लेखक दिग्दर्शक - ब्यामसुरेन दावा आणि लुईजी फालोर्नी Byambasuren Davaa, Luigi Falorni
अभिनय - जांचीव आयुर्झाना शिमेद ओहिन Janchiv Ayurzana, Chimed Ohin
पिलू उंट - बोतोक Botok, सांडणी - इंगेन तेन्ने Ingen Tenne

Comments

कुठे मिळेल ह्याची सीडी ?

कुठे मिळेल ह्याची सीडी ?
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

टोरेँटवर मिळेल हा चित्रपट

ThePirateBay.Org
वर मिळेल या चित्रपटाचे टोरेंट. . टोरेंट घेतल्यावर चित्रपट घेण्यासाठी युटोरंट किंवा बिटटोरेँट नावाचे डाऊनलोड मँनेजर वापरुन चित्रपट डाऊनलोड होईल. .

गुगल

गुगल व्हिडियोवरही याची प्रत आहे...
-निनाद

 
^ वर