श्रीमंत महाराज भोंसले यांची बखर

ही बखर मी या दुव्यावर ठेवली आहे. ज्यांना रुची आहे ते वाचू शकतात.
प्रस्तुत पुस्तकाच्या प्रस्तावनेत ही बखर कोणाच्या ताब्यात होती व कोणाकडून प्राप्त झाली याचा पूर्ण उल्लेख आहे. तसेच छापलेला मजकूर मूळ कागदपत्राप्रमाणे आहे की नाही हे तीन प्रतिष्ठित व्यक्तींकडून तपासून घेतल्याचा उल्लेख व त्या व्यक्तींचे तसे प्रशस्तिपत्रक आहे.
हे पुस्तक ठाण्याचे कै. विनायक लक्ष्मण भावे या इतिहास संशोधकांनी प्रसिद्ध केलेले असल्याने पुस्तकाच्या व कागदपत्रांच्या जेन्युइननेस बद्दल शंका घेण्याचे कारण नाही असे वाटते.
शिवाजी महाराजांच्या कालातल्या व सध्या विवादास्पद असलेल्या अनेक गोष्टींच्याबद्दल या बखरीत काय लिहिलेले आहे हे वाचनीय आहे. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे याम्च्यापासून सुरुवात करून ही बखर आपल्याला १८४० पर्यंत सातार्‍याच्या गादीवर असलेल्या महाराजांपर्यंतचा या कुलाचा इतिहास सांगते.
मी इतिहास संशोधक नाही परंतु विनायक लक्ष्मण भावे या इतिहास संशोधकाने प्रसिद्ध केलेले हे पुस्तक मराठ्यांचा इतिहास बर्‍याच प्रामाणिकपणे सांगते असे वाटते.

लेखनविषय: दुवे:

Comments

हम्म!

शिवाजी महाराजांच्या कालातल्या व सध्या विवादास्पद असलेल्या अनेक गोष्टींच्याबद्दल या बखरीत काय लिहिलेले आहे हे वाचनीय आहे.

:-) मी बखर उतरवून घेतली पण तुम्हीही वरल्याबद्दल इथे लिहा ना. आता घाईत असल्याने बखर चाळली. पान १८ वर अतिशय त्रोटक संदर्भ दिसला. ब्रिगेडच्या माणसे अद्याप इथे पोहोचलेली नाहीत. (तिथे पोहोचली असे काल कळले. ;-))

असो. बखरीबद्दल धन्यवाद.

संदर्भ

सध्याच्या विवादांसंबंधी संदर्भ पृष्ठ 16, 18, 33,34 व 66 येथे सापडतील.

चन्द्रशेखर

१८९ पाने

१६, १८, ३३, ३४ व ६६ या पृष्ठांवरचा संबंधित मजकुराचा गोषवारा इथे वाचायला मिळाला तर बरे वाटेल. सध्या मी दुसर्‍याचा संगणक वापरत आहे, त्यावर १८९ पाने उतरवून घेणे योग्य नाही. उतारा इथेच मिळाला तर सगळ्यांच्या दृष्टीने फायद्याचे होईल.--वाचक्नवी

पृष्ठ १६ आणि १८

पृष्ठ १६

शिवाजीराजे पुंडाई करून पादशाहीचे मुलुख काबीज करू लागले या संदर्भात खालील वाक्य येते -

तेव्हा त्याचे वडील शाहाजीराजे महाराज वडील त्याचे वेळचे दादो कोंडदेव कारकून ब्राह्मण हा शिवाजीराजे याजला बाळपणी सिक्षाधारी विद्याभ्यास करणारा तो फार शाहाणा व मोठा शूर होता.

हे टैपत राहणं भारी कठिण काम म्हणून फोटो अपलोड केले आहेत. जे काही या पानांत आहे तेच आतापर्यंत माहित होते. विश्वासार्ह मानले जात होते. जे शिक्षक असतात ते गुरु असतात हे मानण्यास त्रास का होतो ते कळत नाही.

पृष्ठ १८

page 18

बखर?

बखर म्हणजे काय कुणीतरी सरळ साध्या सोप्या भाषेत सागावे. .

'इतिहासातल्या वार्ताहराची डायरी'

बखर म्हणजे लिहून ठेवलेला वृत्तांत. थोडक्यात, 'बखर' म्हणजे 'ठराविक कालातील खबर'

हे माझ्या समजूती प्रमाणे आहे.

आभार...! [बखर व्युत्त्पत्ती दुरुस्ती]

श्रीमंत महाराज भोंसले यांची बखर उतरवून घेतली आहे. श्री चंद्रशेखर साहेब, आपले मनःपूर्वक आभार.

''बखर या शब्दाचा अर्थ हकीकत,बातमी ,इतिहास,कथानक,चरित्र असा कोशात आढळतो. हा शब्द 'खबर' या फारशी शब्दापासून वर्णव्यत्यासाने आला असावा. बखरी ज्या काळात लिहिल्या गेल्या त्या काळात मराठी भाषेवर फारशी भाषेंचे असलेले वर्चस्व लक्षात घेता वरील व्युत्त्पत्ती बरोबर असावी असे वाटते. वि.का.राजवाडे यांच्या मते 'बख=बकणे, बोलणें' या शब्दापासून बखर शब्द मराठीत आला असावा. राजवाड्यांना 'खबर' पासून 'बखर' ही व्युत्त्पत्ती मान्य नाही. राजवाडे म्हणतात 'बखर' हा शब्द भष् ,भख् ,बख् ,या धातूपासून निघाला आहे. तसा 'बखर' हा शब्द बख् या अपभ्रष्ट धातूपासून निघाला आहे. पूर्वी भाट लोक मोठमोठ्या वीरपुरुषांच्या 'बखरी' तोंडाने बोलत असत. त्यावरुन 'बखर' हा शब्द प्रथमतः तोंडी इतिहासाला लावू लागले आणि नंतर लेखी इतिहासालाही तो शब्द लावण्यात आला. (राजवाडे ले.सं.भा.३) या प्रमाणे 'बखर' या शब्दाची व्युत्त्पत्ति 'खबर' (फारशी) आणि भख् (संस्कृत) अशा दोनही शब्दापासून सांगता येते. या दोनही शब्दाचे मूळ एकच असण्याची शक्यता आहे''.*

*कृष्णाजी अनंत सभासद-कृत श्रीशिवप्रभु-चरित्र बखरीला श्री.स.रा.गाड्गीळ यांनी एक दीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. प्रस्तावनेत पृ.क्र.४ व ५ वर 'बखरी' वरील व्युत्तपत्ती व माहिती वाचावयास मिळते

'बखर' म्हणजे काय याबद्दल मराठी विकिपीडियात भर घातली आहे. श्रीमंत महाराज भोसले यांच्या बखरीबद्दल भर घालणे बाकी आहे. :)

-दिलीप बिरुटे
[मराठी विकिपीडिया सदस्य]

धन्यवाद

'बखर' शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल थोडेफार माहिती होते. सविस्तर प्रतिसाद लिहिल्याबद्दल धन्यवाद.

धन्यवाद

बखरीसाठी आभार.

कल्याणच्या सुभेदाराची सून|ऐतिहासिक चोप्य-पस्ते

या बखरीच्या पृष्ठ २२-२३वर एक किस्सा मिळाला.

वाईनजीक गोळेवाडीतील गोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराज स्वतः फौज घेऊन गेले होते. गोळ्यांचा बंदोबस्त झाला आणि ते मारले गेले तरी त्यांची सून रडतोंडीच्या घाटातून पळून जाण्याच्या प्रयत्नांत होती पण पकडली गेली. प्रतापगडाच्या खालील चौकीत तिला डांबून ठेवण्यात आले. तिथल्या सुभेदाराने बाईस नजरबंदी केले आणि महाराज सातार्‍यास होते तेथे नेले. वर महाराजांना कळवले की मी एक जिन्नस आणला आहे. महाराजांनी तो कचेरीत सादर करण्याची आज्ञा दिली. पुढे शेम टू शेम कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची "अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती आम्हीहि सुंदर झालो असतो, वदले छत्रपती" गोष्ट म्हणून पुढे लिहित नाही. :-(

असो. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कथा कपोलकल्पित असून वरील काव्यामुळे ऐतिहासिक असल्याचे अनेकांना वाटते. इथे तर ही गोष्ट जशीच्या तशी बखरीत आहे, फक्त कल्याणच्या सुभेदाराऐवजी वाईचे गोळे आहेत.

इतिहासातल्या चोप्य-पस्तेचा उत्कृष्ट नमुना हे उदाहरण असावे. ;-)

----

धन्यवाद! काही कळले, काही नाही कळले, काही पुसले गेले.

एक शंका!
पान एक व दोन वर लिहील्याप्रमाणे,
आमेदशा पादशाहने त्यांची चाकरी करणार्‍या खेलकर्ण उर्फ खेलोजी ह्यांचा पाण्यात बुडवून खून केला, असे तर सुचवत नाही ना?
कारण खेलोजी ने जी दौलत अर्जित केली होती ती त्याच्या नातवांना (खेलोजीच मुलगा बाबाजी राजे बाबाजी राजेची मुले - मालोजी व विठोजी) त्यांनी कर्तबगारी दाखवणे सुरी केली तेंव्हा देण्यात आली.

इतिहासापेक्शा मला जूनी भाशा वाचायला मिळाली त्याबद्दल चंद्रशेखर यांचा आभारी आहे.

नवे शब्द कळले, काही नाही कळले, काही पुसले गेले.
कालक्शेप = आयुश्य व्यतीत करणे.आजच्या काळात टाईमपास ह्या शब्दासाठी पूरक शब्द
संनिध = सोबत, साथ
जासूद = विशीश्ठ कामगिरी सोपवलेला निरोप्या
वडिलार्जित= वडिलांनी कमावलेली ( मराठीत 'वडिलोपार्जित' असे का प्रचलित आहे?) पण बखरीत पुढे-पुढे 'वडिलोपार्जित' हा शब्द देखील आलेला आहे.

रुजु असणे - अटॅच्ड ऍंड अंडर कंट्रोल
रुजु घालणे = ?
मनात बादी येणं = मनात कटूता येणे
सांडणीस्वार =?
चिनून ठेवणे - भिंतीत गाडणे
नेमोत्तर ठरवणे - कमिंग टू अ कनक्लूजन
लश्कराचा झाडा घेणे = ?
शास्त करणे = सध्याच्या प्रचलित मराठीनुसार 'शिक्शा करणे'
शासन करणे = एडमिनीस्ट्रेशन चालवणे
नावाजी करणे = सर्वांसमक्श त्याचे कौतुक करणे
वरांता देणे = पगाराव्यतिरीक्त वरील कमाई (संड्री) देणे
झाडा करणे = ?
मोकासे/शी देणे =?
निवडक निवड = सिलेक्टीव सिलेक्शन
पारीपत्य करणे = वाट लावणे
संचणी करणे = तुकड्या (सेटस) बनवणे
हेजीब = दूत
दस्त करणे = एखाद्याला सापळा रचून/ चालाखीने पकडणे
समागम = साथ, संगत
समागमे = साथीला, संगतीला
इतक्या उपरातीक = ?
बेबदल= दिलेला शब्द फिरवणे
वृत्तीपत्रे = एखाद्याच्या नावावर एखादी वस्तू करण्यासाठीचे सरकारी कागदपत्रे
जोहार करणे= एक्सप्रेसींग अ ग्रॅटीट्युड. पण ह्या संबंधिची 'आप-आपसातील कृती' रामदास स्वामींनी महाराजांना बंद करण्यास सांगून जनतेमध्ये 'राम राम' म्हणण्याची प्रथा चालू करण्यास सांगितले. (मग हिच प्रथा -'जय रामजी की' उत्तरेत कधीपासून स्विकारली गेली? )
तक्शीमा = ?
शिवाजी महारांजांच्या अंगात देवी ( अवतरून) यायची (आणण्यासाठी साधना करायचे या अर्थाने ) व त्याप्रसंगी भविश्यात घडणार्‍या गोश्टीं त्यांच्या मुखातून वदल्या जायच्या व ते शब्द तत्परतेने लिहून ठेवले जायचे, व त्या शब्दांचा सूचक अन्वयार्थ काढून महाराज व त्यांचे कार्यकारी मंडळ पुढची रणनिती कशी रचायची हे ठरवायचे. हे वाचून 'बापरे! केवढा हा प्रोऍक्टीवपणा!' असे वाटले. या माहितीवरून हे लिखाण खरे वाटते.
बाजीप्रभू देशपांडे यांची माहिती या बखरीत वेगळी आहे. (मला तीच सत्य वाटते.)
शालेय पुस्तकात सांगितलेल्या कोंडाणा किल्ला घेण्याआधीची घटना आता ही बखर वाचून चूकीच्या वाटतात. 'राजमातेने कोंडाणा स्वराज्यात यायला हवा असे सांगितले म्हणून शिवाजींनी तानाजी मालूसरेला त्याच्या घरातील लग्नकार्य टाकून येवून कामगिरीवर पाठवले.' हे खोटे वाटते. ह्या बखरीनुसार किल्ले परत मिळवण्याची महाराज व त्यांच्या सरदारांमधील बोलणी आधिच झालेली होती.

धन्यवाद

बखरीसाठी अनेक धन्यवाद. डाऊनलोड करत आहे, सविस्तर प्रतिक्रिया वाचून कळवेन.

उपयोगी दस्तऐवज

हा उपयोगी दस्तऐवज उपलब्ध करून दिल्याबद्दल चंद्रशेखर यांचे आभार मानतो.

बखरकार सातार्‍याच्या महाराजांच्या विश्वासातला असावा. बखरीतील शेवटची नोंद शके १७७६ (~इसवी सन १८५४) मधील आहे. लेखनही कदाचित त्याच काळातले असू शकेल.

दादोजी कोंडदेव याला युद्धकलांचा शिक्षक आणि महत्त्वाचा राजकीय सल्लागार म्हणून मानायची पद्धत त्या काळापर्यंत तरी भोसल्यांच्या राजघराण्यात होती.

- - -
पान ७०वर एक वाक्य (पुढील परिच्छेदातले दुसरे वाक्य) कोण्या वाचकाने प्रश्नचिह्नासह अधोरेखित केलेले आहे :

श्री रामदास स्वामी हे मारुतीचा अवतार. त्यास चार आंगुलें पुछ होते व शिवाजी राजा हा सिवाचा अवतार. परंतु हे उभयता मानव देहास मात्र आले. ह्मणोन स्वामीस गुरु केले. १५७१ विरोधी नाम संवत्सरे फसली सन १०५९ मीती वैशाख श्रु॥ ९ रोजी श्री रामदास स्वामी याणी सिवाजी राजे यास रामघळीत आनुग्रह तेरा आक्षरी मंत्र कानात सांगीतला.

वेगवेगळ्या काळांत शुभलक्षणांबद्दल संकेत बदलत असावे.
पुढे राज्याभिषेक करण्याबाबत रामदास स्वामींची अनुमती घेतल्याची नोंद आहे (पान ८०).

धन्यवाद.

हा उपयोगी दस्तऐवज उपलब्ध करून दिल्याबद्दल चंद्रशेखर यांचे आभार मानतो.

हेच् म्हणतो.

-Nile

पान ३३,३४ आणि ३६

पान ३३

page 33

पान ३४

page 34

पान ३६

page 36

पृष्ठ ६६ वरही वरील प्रमाणेच लेखन आहे त्यामुळे चित्र बनवून,चढवून इथे लावण्याचा कंटाळा करते. सर्व संदर्भांवरून दादोजी हे अनुभवी, कार्यकुशल आणि कर्तव्यदक्ष होते. त्यांच्या देखरेखीमुळे राजांना उत्तम शिक्षण मिळाले आणि कारभाराची माहिती झाली असेच दिसते.

एक प्रश्न

प्रामाणिकपणे पडलेला प्रश्न विचारतो : या उत्तरकालीन बखरीमधून हल्लीच्या "गुरू कोण?" या ज्वाज्वल्य प्रश्नाबाबत काय मार्गदर्शन मिळते?

जवळजवळ शिवकालीन अशा सभासदाच्या बखरीत दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामींबद्दल त्रोटक उल्लेख आहेत. त्या त्रोटक उल्लेखांमधून या विभूतींचे गुरूपण सिद्ध झाल्याचे हल्लीच्या विवादांमध्ये मानत नाहीत. नंतरच्या बखरींमध्ये दादोजी, रामदास यांचे महत्त्व सांगितले जाते, हेसुद्धा विवादकांपैकी मातब्बरांना ठाऊक आहे, पण पुढील बखरींमध्ये कपोलकल्पना फार आहेत, असे मानले जाते.

(अर्थात : कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या कथेचे चोप्य्-पस्ते लक्षणीय आहे. ही बखर गद्यवाङ्मय म्हणून वाचनीय आहे खास. उत्तरपेशवाई काळातल्या काही चमत्कारिक कल्पनांबद्दल माहितीसुद्धा सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने मोलाची आहे... फारतर दुसर्‍या बाजीरावाबद्दल सातार्‍याच्या दरबरात काय भावना होत्या त्यांची तुलना लावणी-शाहिरी वाङ्मयातल्या दुसर्‍या बाजीरावाबद्दल भावनांशी करता येईल - इतपत इतिहासाबद्दल माहिती मिळते. दस्तऐवज उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार कायम आहेत - गैरसमज नसावा.)

बखर् आणि इतिहास

बखरीतून इतिहास अचूकपणे सांगितला जातो असे कोणीच म्हणणार नाही. किंवा बखरीत एक गोष्ट सांगितली आहे म्हणून ती तशीच असली पाहिजे असेही म्हणता येणार नाही. ज्या कोणी बखर लिहिलेली असते त्याला किंवा समकालीन लोकांना इतिहास कसा ज्ञात असतो त्याप्रमाणे आणि ज्याच्यासाठी बखर लिहिली जाते (या ठिकाणी सातारचे महाराज) ती व्यक्ती व त्याचे घराणे हे चांगल्या दृष्टीकोनातून कसे दिसतील ही काळजी बखरकार घेत बखर लेखन केले जाते. त्यामुळे ते नेहमीच पिंच ऑफ सॉल्ट सह घेणे आवश्यक असते.
माझ्या दृष्टीने या बखरीचे महत्व इतकेच आहे की ही भोंसले घराण्यातील व्यक्तींच्या संग्रही असलेली बखर आहे. त्यामुळे तिची विश्वासार्हता थोडी जास्त आहे.
धनंजय
मला या बखरीविषयी काही खास आत्मियता वगैरे नाही. मागच्या वर्षी मी दुसर्‍या बाजीरावावर एक लेख लिहिला होता त्या वेळी आंतरजालावर शोधा शोध करताना मला सापडली होती. परवा सहज परत सापडली. उपक्रमीना रुची असेल म्हणून जालावर परत ठेवली इतकेच.या बखरीतील मजकूर सत्य की असत्य हे तपासण्याचे काम तज्ञ लोकांनी करावे.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

ज्वाज्वल्य की जाज्वल्य

या ज्वाज्वल्य प्रश्नाबाबत काय मार्गदर्शन मिळते?

आपल्याला "जाज्वल्य" म्हणायचे असावे. अर्थ खाली दिलेल्या पहिल्या दुव्यावर पहा. "ज्वाज्वल्य" हा शब्द कोशात मिळाला नाही. मात्र हा शब्द "संग्रहणीय" शब्दासारखाच अगदी अलिकडे प्रचारात आला आहे असे खाली दिलेल्या दुसर्‍या दुव्यावरून दिसते. आपण वापरला त्या अर्थी तो व्याकरणशुद्ध आणि योग्यच असणार यात शंका नाही आणि सध्यातरी कुठला गैर अर्थ जाणवला नाही त्यामुळे "शब्द ओळखीचा नाही, भाषा जास्त खोलात समजत नसल्याने व्याकरणशुद्ध आहे याचीही खात्री नाही" यापलिकडे आक्षेप नाही. जाज्वल्य शब्द जुना आणि परिचयाचा असल्याने मी तरी तोच वापरीन असे वाटते. शक्य असल्यास ज्वाज्वल्य शब्दाचे व्याकरण समजावून सांगावे.

जाज्वल्य

ज्वाज्वल्य

सुयोग्य सूचना - टंकनदोष

"जाज्वल्य" रूढ आहे, आणि तोच वापरायची माझी मनीषा होती. "ज्वाज्वल्य" हा टंकनदोष आहे.

अवांतर :
मात्र "ज्वाज्वल्य" आजकाल बरेच लोक वापरू लागले आहेत, असे तुम्ही दिलेल्या दुव्यावरून दिसते. हे रूप मराठीभाषकांच्या शिष्टसमाजात रूढ होत आहे काय? हा विचार सुद्धा करण्यालायक आहे. जर काही लोक मराठी स्वभाषक म्हणून आत्मविश्वासाने "ज्वाज्वल्य" हे शब्दरूप वापरत असतील, तर त्यांचा वापर ठीकच आहे. पण त्यांच्यापैकी मी नाही - माझ्या बाबतीत हा टंकनदोष आहे.
जर "ज्वाज्वल्य" हे शब्दरूप रूढ किंवा अधिक सहज होऊ लागले असेल, तर मराठीभाषकांमध्ये या भृशार्थक (संस्कृतात सन्नन्त) शब्दप्रयोगात होणारे वर्णबदल संस्कृतापेक्षा वेगळे आहेत की काय? या विचाराला चालना मिळते. परंतु हा संशोधनाचा विषय आहे.
वेगळ्या एका भृशार्थ शब्दरूपाबाबत ("देदीप्यमान/दैदीप्यमान"बाबत) मोल्सवर्थने घेतलेले धोरण बघावे. त्यानंतर १९८४मध्ये याच देदीप्यमान/दैदिप्यमान जोडीबाबत द.ह.अग्निहोत्र्यांच्या कोशात साधारण हेच धोरण घेतले गेले. दोन्ही रूपे दिलेली आहेत. पण "दैदीप्यमान" शब्दाचे मूळ देदीप्यमान म्हणून सांगितले आहे, पण त्याला विशेषकरून भ्रष्ट रूप म्हटलेले नाही. मराठीमध्ये भृशार्थ द्वित्व करायचे सहज नियम संस्कृतापेक्षा वेगळे असू शकतील, असावेत असे वाटते.

काही का असेना - "ज्वाज्वल्य" हे रूप प्रतिष्टित झाल्यानंतरही पुष्कळ काळापर्यंत "जाज्वल्य" तत्सम म्हणून वापरणे इष्टच राहील. "जाज्वल्य" हेच रूप वापरण्याबद्दल तुमची सूचना (माझ्यापुरती*) सुयोग्य वाटते.
- - -
*"माझ्यापुरती" - जे लोक मराठी स्वभाषक म्हणून आत्मविश्वासाने "ज्वाज्वल्य" हे शब्दरूप वापरत असतील, तर त्यांचा वापर ठीकच आहे. जिवंत भाषेतील शब्दप्रयोग लिखित-व्याकरण-निरपेक्ष असे स्वायत्त असतात, याबद्दल माधव देशपांडे यांचा निबंध मागे श्री. विनायक यांनी चर्चिला होता. त्याचा दुवा त्यांच्यापाशी असेलच.

अजून संशोधन हवे

दादोजींचे स्थान थोरल्या महाराजांच्या आयुष्यात नक्कीच ठळक होते,परंतु ते स्थान एका पथदर्शक,गुरु चे होते का...हा नक्कीच सखोल संशोधनाचा विषय आहे.कारण गुरुपद हे अढळस्थानी असतं, आणि याचा उल्लेख हर प्रकारच्या शिवचरित्रात यायला हवा होता, मुख्यत्वे कुठलेही तत्कालीन परदेशी इतिहासकार वा उत्तरेतील महाराजांचे चरित्रकार याचे दाखले देत नाहीत. मेहेंदळेसरांनी सुद्धा यासंदर्भात कोणतेही संदर्भ दिले नाहीत, अजून हजारो कागदपत्रे प्रकाशात यावयाची आहेत.कदाचित त्यात ते गुरु असण्याचे पुरावे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.घाईघाईत निष्कर्षप्रत पोचण्यापेक्षा,तटस्थ राहून अधिक अधिक संशोधन व्हायला हवे.

पांडुरंग बलकवडे

पांडुरंग बलकवडे यांनी दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याची लाल महालात पुनर्प्रतिष्ठापना करावी यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी दिलेले पुरावे या लेखात मांडलेले आहेत. त्यात श्रीमंत महाराज भोसले व इतर बखरींना इतिहास मानलेले दिसते. शिवाय ही अशी वाक्ये पाहून या गृहस्थाच्या इतिहासतज्ज्ञ असण्याच्या दाव्याविषयी शंका उपस्थित होते.

दादाजी कोंडदेवाच्या त्या पत्रात जिजाबाई साहेबांचा उल्लेख ‘सौभाग्यवती मातुश्री जिजाआऊ साहेब’ असा आला आहे. राजमाता जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज आणि दादाजी कोंडदेव यांच्याविषयी खोटा, गलिच्छ व हलकट मजकूर लिहिणारा जेम्स लेन आणि त्या हलकट मजकुराचा प्रचार व प्रसार करणारी मंडळी यांना दादाजीच्या पत्रातला हा ‘मातुश्री जिजाआऊ साहेबांचा’ उल्लेख हे चोख उत्तर नाही का?

एकंदरीत सध्या तरी असे दिसते आहे की दादोजी कोंडदेव शहाजीराजांचे पाईक व मर्जीतले कारभारी होते, शिवाजीराजांस त्यांच्याविषयी आत्मीयता होती आणि त्यांच्या पध्दतीने राज्याचा कारभार चालत असे एवढेच स्पष्ट सांगता येते. शिक्षणाचे उल्लेख बखरींतलेच आहेत.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

या बखरीतील काही नोंदी गोंधळात पाडणार्‍या...

शिवाजीराजांची ज्येष्ठ स्त्री सईबाई ही विठोजी मोहिते अमीरराव नेवासकर यांची कन्या असून हा विवाह शके १५७५ रोजी झाल्याचे या बखरीत दोन ठिकाणी नमूद केले आहे. आपण आजवर वाचलेल्या इतिहासात सईबाई ही फलटणच्या मुधोजीराजे नाईक निंबाळकरांची मुलगी असा उल्लेख आहे. मग हे विठोजी मोहिते अमीरराव नेवासकर कुठुन आले?
ही नोंद खरी मानल्यास भोसले-निंबाळकर नातेसंबंध आणि पुढच्या आनुषंगिक घटनांबाबत (महाराजांनी मेव्हणा बजाजी निंबाळकरला शुद्धीकरण करुन हिंदू धर्मात घेणे किंवा त्याचा मुलगा महादजी याला आपली सगळ्यात मोठी मुलगी देणे) प्रश्नचिन्ह उभे राहते.
दुसरीकडे ही नोंद असत्य असल्यास भोसले घराण्याने ती बखरीत कशी राहू दिली? ही बखर जेव्हा केव्हा लिहिली गेली त्यावेळी भोसल्यांची जुनीजाणती मंडळी व कारभार्‍यांच्या नजरेखालून नक्कीच गेली असणार मग या नोंदीची दुरुस्ती का झाली नाही?

'अशीच आमुची आई असती' कथेत राजांसमोर उभी केलेली ती सुंदर स्त्री नक्की कोण? वाईच्या गोळ्यांच्या कुटूंबातील की कल्याणच्या सुभेदाराची सून? बखर म्हणते तिला प्रतापगडच्या ब्राह्मण कारभार्‍याने नजर केली, तर कादंबर्‍यांत रंगवले आहे, की कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आबाजी महादेव याने नजर केले होते. नक्की कशावर विश्वास ठेवायचा? असो. आपल्याकडे खूपसे दुवे लुप्त झालेले असल्यामुळे हे गोंधळ होणारच.

:)

नक्की कशावर विश्वास ठेवायचा?

त्याला आधुनिकोत्तर संहिता म्हणावे काय?

 
^ वर