उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
दुधी आमीन
गिरीश
December 9, 2010 - 8:27 am
दुधात भेसळ ही चर्चा येथे करण्याचे कारण वेगळे आहे. ह्या उपक्रमावर तद्न व्यक्ति मार्गदर्शन करु शकतील असे वाटते म्हणून हा धागा विणला आहे.
नगर जिल्हा आणि इतर ठिकाणी दुधात रसायनं टाकून अनेकपट फायदा उपटणारे "दुधी आमीन" त्यांचे धंदे कधी बंद करतील ह्याची वाट पहाणे मुर्खपणाचे ठरेल. त्यापेक्षा अशा दुधातील भेसळ घरच्याघरी काढून टाकता येण्यासाठी एखादे उपकरण डीझाइन करण्याचा विचार आहे. त्यासाठी आपल्या सुचना मिळाव्यात ह्यासाठी ही चर्चा.
दुवे:
Comments
भेसळयुक्त दुध शोधणारे उपकरण
>>त्यापेक्षा अशा दुधातील भेसळ घरच्याघरी काढून टाकता येण्यासाठी एखादे उपकरण डीझाइन करण्याचा विचार आहे.
दुधातील भेसळ काढण्यापेक्षा भेसळयुक्त दुध शोधणारे उपकरण अधिक उपयुक्त असेल.
टू इन वन
--भेसळयुक्त दुध शोधणारे उपकरण अधिक उपयुक्त असेल--
टू इन वन करता येइल मग. भेसळ असेल तर काढणारे.
दूध
दूध विकत घेतल्यावर भेसळ काढायची का विकत घेण्यापूर्वी काढायची?
दूध का दूध आणि पानी का पानी ओळखणेवाले हंस पक्षी पाळावेत. ;-)
दोन्हीची सोय हवीच
विकत घेण्यापुर्वी आणि विकत घेतल्यानंतर - दोन्हीची सोय हवीच.
हंसांची पैदास हा ही साईड बिझ. होणार्!
राजहंस
त्यासाठी साधा हंस नाही, राजहंस लागतो. तुमचे नाव नळ असेल, तर तो मिळू शकतो. पण नाव नळ असेल, तर दुधात पाणी मिसळणे सोपे जाते.
- अल्बस्
--
|| लव्ह, टॉम, लव्ह. ||
राजहंस
नव्हे साधा हंस चालतो. पाहिजे असल्यास दुवे सादर करता येतील. ;-)
माझे नाव नळ कसे असेल? बायदवे, नाव नुसते नळ असून भागणार नाही त्यात कलीची "भेसळ" हवी.
बाकी, "राज" शब्दाशी पुराना याराना दिसतो.
दुव्यांची वाट
नीर क्षीर विवेकासाठी साधा हंस चालतो, ह्याचा पुरावा हवाय. दुवे <ए > कोंदणात नको, साधेच द्या. ही विनंती.
--
|| लव्ह, टॉम, लव्ह. ||
अमेरीकेत दुधात भेसळ
अमेरीकेत दुधात भेसळ करतात का? आमच्या ऑस्ट्रेलियात अजिबात करत नाहीत.
तुमची ऑस्ट्रेलिया
मी जे दूध विकत आणते त्यात करत नसावेत. संपूर्ण अमेरिकेत याबाबत काय चालते आणि कसे चालते यावर फारसा विचार केलेला नाही. :-(
ऑस्ट्रेलिया "तुमची" आहे हे वाचून संतोष वाटला. ;-) ह. घ्या.
चोरांच्या पंढरीत
अहो चोरांच्या पंढरीत सुद्धा दुधात भेसळ करत नाहीत. तुमच्या इंडीयात फार करतात बुवा.
शाळा
घनतेवरून दुधात पाणी आहे का हे ओळखणारे संयंत्र (?) शाळेत असताना शिकवले गेल्याचे स्मरते. एका पेन्सिलीच्या टोकाला हलके वजन बांधून ती कितपत बुडते यावरून घनता शोधणे असा काहिसा प्रकार होता. इतर भेसळीबद्दल कल्पना नाही.
डीझाइन
डीझाइन जवळपास तयार होत आले आहे. प्रगती कळवीत राहीन.
नक्की काय?
नक्की काय डीझाइन करत आहात?
इनोव्हेटीव्ह फिल्टर
एक इनोव्हेटीव्ह फिल्टर असेल ते.
विनंती
आपण खरेच असे काही बनवत असल्यास, उत्पादन संशोधन समुदायात टाकावे. त्या बद्दल चर्चा केल्यास उत्पादन चांगले होण्यास व दोष शोधण्यास मदत होईल.
हं
अजून शॉप ऍक्ट या आधीच अस्तित्वात असलेल्या मजकुराचा संदर्भ येणे आहे, चॉकोलेटचे नाव येणे आहे. 'बनवणार आहे' टाईप वांगी विसराच!
--------
हा प्रतिसाद वसुलि यांच्या पुण्यस्मृतीस समर्पित आहे.
बर
अहो संकेतस्थळ काय माझ्या स्मृती संवर्धनासाठी नाहीये. :) लेख/चर्चा पुढच्या पानावर अथवा प्रतिसाद ५० च्या वर गेल्यास आम्ही विसरुनच जातो. कोणाला चांगले काही बनवायचे असल्यास त्या बद्दल चर्चा करण्यासाठी तो समुदाय बनवला आहे. ते फक्त सांगितले. बाकी काळजी घेण्यासाठी तुम्ही आहातच. :)
धन्यवाद.
धन्यवाद. रिकामटेकडा हे ज्या पद्धतीने प्रतिसाद् देत् आहेत त्याला उत्तरे देणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे.
मी तुम्ही सुचवल्याप्रमाणे पहातो.
खुले मन की बुद्धिप्रामाण्य?
असा मी आसामी यांच्या वरील प्रतिसादातील दाव्याच्या मदतीने खुले मन आणि बुद्धिप्रामाण्य यांतील रेषा ठरविता येईल.
वेगवेगळ्या प्रकारची भेसळ असू शकते
भेसळ वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. कुठल्याही एकाच प्रकारची चाचणी केली, तर फसू शकते. भेसळ करणारा व्यक्ती दोन वेगवेगळे पदार्थ अशा रीतीने दुधात मिसळू शकतो, जेणेकरून चाचणी फसू शकते.
उदाहरणार्थ "लॅक्टोमीटर" म्हणजे दुधाच्या घनतेचे मोजमाप करणारे यंत्र घेऊया. पाण्याची भेसळ घातली, तर दुधाची घनता कमी होते. पण त्यात मीठ, साखर किंवा यूरिया ची भेसळ घातली, तर घनता अधिक होते. दोन्ही प्रकारची भेसळ घातली, तर घनता अधिक-उणे होऊन समान्य दुधाइतकी होऊ शकते.
भेसळ शोधण्याकरिता अनेक चाचण्या करणे बरे. अशा तर्हेने वेगवेगळ्या प्रकारची भेसळ ओळखता येते. या दुव्यावरती अनेक चाचण्यांचे वर्णन केलेले आहे.
आणि चाचण्या कशा होतात - कसली भेसळ अपेक्षित आहे, त्यावर चाचणी ठरते. कुठल्याशा अनपेक्षित पदार्थाची भेसळ असली तर चाचण्यांमध्ये कळणार नाही. उदाहरणार्थ "मेलामीन" या पदार्थाच्या भेसळीने दुधात प्रथिनांचे प्रमाण अधिक भासते. प्रथिनांचे प्रमाण मोजायची चाचणी दुधातील नायट्रोजन मोजते. (सामान्यपणे दुधात प्रथिनांमध्येच नायट्रोजन मूलद्रव्य मोजण्याइतपत असते.) मेलामीन मध्ये नायट्रोजन मूलद्रव्य असते, पण हे प्रथिन नाही.
- - -
(वेगळ्या संदर्भात) अनेक विषारी द्रव्ये सापडवीत अशा प्रकारचा "एका स्लाईडवर एकत्रित" चाचणी-संच मिळतो, असे वाटते. एकाच "स्लाईड"वरती (काचेचा चौकोन) चाचणी-रसायनांचे छोटेछोटे ठिपके लावून वाळवले जातात. मग चाचणी करायचे द्रव त्यावर पसरवले की प्रत्येक रसायन-ठिपक्यावर एक-एक चाचणी होते. दुधाच्या बाबतीत असे काही करता येईल असे वाटते. पण हा हाय-टेक प्रकार महाग पडेल.
अनेक चाचणी-रसायनांचा संच रु.३०/-ला विकत आहेत, अशी या दुव्यावरती बातमी आहे. (दुवा). तसेच नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटनेही असा संच बनवलेला आहे, असे त्यांच्या विकीपानावरून समजते. हे पर्याय त्या मानाने स्वस्त वाटतात.
प्रश्न असल्यास विचारेन
धनंजय धन्यवाद. मी प्रतिसादातील माहीती नीट समजावून घेऊन काही प्रश्न असल्यास विचारेन.
सहकारी दूध संघांचे फायदे
सहकारी दूध संघांमध्ये गावपातळीवर दूधाचे संकलन करून डेअरीत प्रक्रियेसाठी पाठवले जाते. त्याचबरोबर गायी म्हशींना खाद्य पुरवणे आदि कामेही सहकारी संघांमार्फत केली जातात. त्यामुळे कोणत्या शेतकर्याकडे किती गायी म्हशी आहेत हे संकलन केंद्रावरच्या लोकांना ठाऊक असते. अश्या वेळी दुधात भेसळ करून दूध वाढवणे अवघड पडते. याच्याकडे दोनच गायी आहेत तर हा २५ लीटर दूध कसे घेऊन आला? अशी शंका येऊन भेसळीची चाचणी केली जाऊ शकते.
नितिन थत्ते
सहमत पण
सहमत पण सध्याची भेसळी ही दुधाच्या पॅकिंग नंतरची असते. त्याचे काय करायचे हा मुख्य चिंतेचा विषय आहे.
नास्क्या दुधाचा ट्यांकर
खरे आहे. संकलन करुन झाल्यानंतर दुधाच्या ट्यांकर मधे ते गेले की, पुढे तो ट्यांकर १२ हजार लीटरचा होतो. अनेकदा दुध नासलेलेही असते. दुध प्रक्रिया केंद्रावर असा नास्क्या दुधाचा ट्यांकर इतर १०-२० ट्यांकर मधे मिसळला जातो. रासायनिक भेसळीपेक्षा हे परवडले पण हे नासके दुध भेसळयुक्त असते त्यामूळे डबल घातक होते.
दुधाचे महाभारत
महाभारतातील द्रोणा प्रमाणे प्रत्येकाने गाई मिळवुन २१ व्या शतकाचा आदर करावा.
पार्कींग बरोबरच गोठा
गाई पाळणे हा पर्याय उत्तम आहेच. पार्कींग बरोबरच गोठा अशी जाहीरात फार लांब नाही असे वाटते.
:)
त्यापेक्षा गुरांवर बसूनच फिरता येईल की! कार कशाला घेता?
दुगणी
म्हणजे दुगणी(या) बचत! सुपीक कल्पना आहे बरका तुमची!
अपघात
गायींवर बसून फिरल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल असे वाटते. सध्या जे अपघात होतात ते बाईक, कार इत्यादि यंत्रांना मेंदू नसल्यामुळे होतात. म्हणजे गायीवर बसलेल्याला मेंदू नसला तरी गायींना तो असल्यामुळे त्या कोणावर धडकण्याची शक्यता नाही.
नितिन थत्ते
खरतर
खरतर ही कल्पना बरेच दिवसांपासून डोक्यात आहे. सोसायट्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन दुर्गंधी होणार नाही, बायोगॅस प्लांट होईल असे आणि थोडेफार अभ्यासाने असे प्रकल्प राबवायला हरकत नाही. एक सामाजीक बदल म्हणून पहा खरतर. यावर वेगळी चर्चा करता येईल.
लक्ष
महाभारतातील द्रोणाला गाई मिळाली का नाही, हे कोणाला माहीत आहे का?
माहिती नाही
माहिती नाही. मला मात्र गाई-गाई येऊ लागली आहे.
नितिन थत्ते