उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
नीकोन कुलपीक्स एल ११० बद्दल आधीक जाणुन घ्यायचे आहे...
अभय पाटील
November 30, 2010 - 6:54 pm
मला नीकोन च्या या Nikon COOLPIX L110 यंत्रा च्या कार्यकुशलते बद्द्ल तुमची मते हवी आहेत..
आशा करतो आपण थोडा वेळ द्याल....
आपला आभारी....
दुवे:
Comments
अनुभव
मी नुकताच हा निकॉन एल ११० घ्यायला म्हणून गेलो होतो. पण कॅनन एस् एक्स् १३० घेऊन आलो.
निकॉनमध्ये १५ एक्स् झूम आहे तर एस् एक्स १३० मध्ये १२ एक्स् झूम आहे. बाकी ऑटोमेशन कॅननमध्ये जास्त वाटले म्हणून तो घेतला.
दोन्हीची किंमत सारखीच आहे.
वापरायला अजूनतरी कॅननचा काही प्रॉब्लेम नाही.
(अवांतर : चांगले फोटो येण्यासाठी कॅमेर्याबरोबरच फोटो काढणार्याचे व्हिज्युअलायझेशनही महत्त्वाचे असते).
नितिन थत्ते
झूम
एक ठोकताळा!
"जितका झूम जास्त तितकी छायाचित्राची स्पष्टता/दर्जा कमी"
नेट वर बरेच रिव्ह्यू उपलब्ध आहेत. जसे की इथं.
त्यात काही वानगीदाखल काढलेले चित्रंही उपलब्ध आहेत.
-भालचंद्र
झूम
हे डिजिटल झूमबाबत खरे असते. ऑप्टिकल झूमबाबत नाही. ऑप्टिकल झूममधली स्पष्टता ही लेन्सच्या दर्जावर अवलंबून असते. त्यात निकॉन आणि कॅनन दोघेही प्रसिद्ध आहेत.
नितिन थत्ते
निकॉन व कॅनन
मागच्या वर्षी मी एक नवीन कॅमेरा घेतला त्यावेळी माझ्यापुढे हाच प्रश्न होता. (अर्थात मॉडॆल नंबर्स दुसरे होते.) मी जालावरून दोन्ही मेक च्या कॅमेर्यांची तुलना केल्यावर माझ्या एक लक्षात आले की निकॉन चे कॅमेरे सर्वसाधारणपणे जास्त महाग असतात. म्हणजे एकाच स्पेसिफिकेशनच्या या दोन मेक च्या कॅमेर्यांची तुलना केली तर निकॉनची किंमत जास्त असते. त्याच प्रमाणे कॅमेर्यामधे बॅटर्या कोणत्या वापरतात हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. ज्या कॅमेर्यात ए ए साइजच्या बॅटर्या बसतात तो केंव्हाही जास्त चांगला कारण स्पेअर बॅटर्या तुम्ही चार्ज करून जवळ ठेवू शकता. त्याच प्रमाणे कॅमेर्याबरोबर काय काय ऍक्सेसरीज मिळणार आहेत हे बघा. मला 4 जीबी ची दोन कार्डे, ट्रायपॉड 4 ए ए साईझ बॅटर्या व चार्जर हे त्या डीलमधेच मिळाले होते.
कॅननचे डील चांगले वाटले म्हणून मी कॅनन घेतला होता. व नंतर माझा निर्णय योग्य होता असे वाटू लागले. 6 महिन्याच्या वापरानंतर स्क्रीनवर एक काळा डाग दिसू लागला. मी कॅमेरा सिंगापूरला खरेदी केला होता. पण हा डाग भारतात असताना दिसू लागला. पुण्यामधे कॅननचे सर्व्हिस सेंटर मुकुंदनगर भागात आहे. तेथे मी कॅमेरा घेऊन गेलो. त्यांनी गॅरंटी योग्य असल्याची खात्री करून घेतली व कॅमेरा ठेवून घेतला. 4 दिवसांनी त्यांनी फोन करून मला कॅमेरा तयार असल्याचे कळवले. मी जाऊन तो घेऊन आलो. त्यानंतर कॅमेरा व्यवस्थित चालू आहे. धुळीचा एक कण स्क्रीनवर येऊन बसल्याने काळा डाग येत होता. कॅननचे पुण्यातले सर्व्हिस सेंटर फारच चांगली सर्व्हिस देते. कारण माझा दुसरा एक कॅनन कॅमेरा (10 वर्षे जुना) मी त्याच वेळी दुरुस्त करून घेतला. अतिशय माफक खर्च आला.
हा अनुभव अशा साठी सांगितला की तुम्हाला निर्णय घेण्यास मदत हो ऊ शकेल. अर्थात निकॉन च्या सर्व्हिस मद्दल मला माहिती नाही. तीही कदाचित उत्तम असू शकेल. दुसरे कोणी त्याबद्दल लिहू शकेल.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
निकॉन
निकॉनची सेवा सुद्धा चांगली आहे.कॅम्पमध्ये आहे. माझ्याकडे निकॉनचा फिल्म एसेलार आहे. कोणा विकत हवा असल्यास सांगा :) आणि कुलपिक्स पी ३ आहे. दोन्ही कॅमेरे भारता बाहेर घेतले आहेत आणि उत्तम आहे. पण. कॅनॉनची सेवा भारतात जास्त पसरली आहे असे वाटते.
अमेरीकेतील स्टोर्स
अमेरीकेतील स्टोर्स मधे जो कुलपिक्स मिळतो आणी ज्या किंमतीला मिळतो, त्याच्या एक-दोन नॉच खालच्या दर्जाचा क्यामेरा भारतात १.५ पट महाग मिळतो. इतर इले. वस्तूंनाही हे लागू आहे.
कॅमेरा कशासाठी वापरणार
त्यावर ह्या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे.
म्हणजे तुम्हाला साधे नेहेमीचे (घरगुती) फोटो काढायचे असतील तर् कुठलाही बर्यापैकी कॅमेरा चालू शकेल. आजकाल सर्वच कॅमेरे 'बेसिक्' गोष्टी उत्तम तर्हेने हँडल करतात. चांगला प्रकाश असताना आणि फार झूम वापरले नसेल (त्रिपदी नसताना) चांगले फोटो येउ शकतात. त्याचप्रमाणे फोटो कुठे/कसे वापरणार त्यावर पण् अवलंबून आहे. (म्हणजे काँप्यूटर् वर बघणार का छापणार (कुठल्या साईझ मधे)
(खूप फंडे मारले.. आता तुमच्या मूळ् मुद्द्याकडे)
हा कॅमेरा चांगला आहे, मला न आवडलेल्या २ गोष्टी - AA बॅटरी आणि आणि ७२० पर्यन्त् मर्यादित व्हिडिओ -बाकी खूप गोष्टी चांगल्या आहेत.
इथे सगळे रिव्ह्यूज् एकत्र वाचता येतील.
सुपर झुम
तुम्हाला डीएसएलार घेण्या ऐवजी सुपर झूम घ्यायचा आहे का? असल्यास् कॅनॉनचा हा पहा :)
नीकोन कुलपिक्स एल ११० चा अविष्कार :)
आतापर्यन्त नक्कीच तुम्ही एक कॅमेरा घेतला असावा... नसेल तर नीकोन कुलपिक्स एल ११० च्या मायक्रो मोड मधुन टीपलेले खिडकीच्या काचावरील हे तुषारांचे छायाचित्र तुम्हाला या कॅमेर्याच्या गुणवत्तेची कल्पना देइल :)
बोकेह
"बोकेह"चं चांगलं उदाहरण.
बोकेह??
बोकेह म्हणजे काय??
:)
दुवे: [१] [२] [३]
धन्यवाद
चांगली माहिती आहे.
विषेश सुचना
तांत्रिक अडचणींमुळे मुळ आकारमानामध्ये छायाचित्र टाकणे जमले नाही.. तरी सुस्पष्टता अनुभवण्यासाठी छायाचित्र झूम करुन बघावे.