एक (दुर्दैवी) फरक.....................

महाकाय चीन कसा निर्दयी आहे ह्याच्या चर्चा घडतात. पण हेही वाचा.......

दिनांक १५ नोव्हेंबर २०१०, रोजी नियतीने दोन ठिकाणी आपली वक्र नजर टाकली.

बातमी क्र. एक
दिल्ली : नवी दिल्ली - पूर्व दिल्लीत काल इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 66 झाली आहे. शहरातील विविध रुग्णालयांत 130 जखमींवर उपचार करण्यात येत असून,
मूळ बातमी

बातमी क्र. दोन
शांघाई : चीनमधील शांघाय शहरात काल एका इमारतीत आग भडकल्याने 53 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, 70 जण गंभीररीत्या भाजले आहेत. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
मूळ बातमी

सामान्य माणसे तर दोन्ही ठिकाणी बळी गेली, तर आपण म्हणाल ह्यात फरक काय ?

१) भारत : दिल्ली सरकारने मृतांच्या नातेवाइकांना दोन लाख, तर जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

२) चीन : The government would pay 960,000 yuan (144,450 U.S. dollars) in compensation and subsidies for each of those who died in the fire, Zhang added. The residents whose apartments and belonging in them were destroyed in the fire will be fully compensated for their loss of property.
हा दुवा

बाकी भ्रष्टाचार हा मुद्दा सध्या सोडून द्या, पण चीन सरकार त्यांच्या लोकांना इतकी किंमत देत आहे हे बघून भारावून आले.

ईश्वर सर्व मृतात्म्यांना शांती देओ.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर : मागे एक बातमी वाचली होती, चीनच्या एका शहरात एक उच्च सरकारी पोलीस पदाधिकाऱ्याच्या मुलाने दारू पिऊन गाडी चालवून झालेल्या अपघातात २ जण ठार झाले होते आणि अंदाजे १० जण जखमी झाले होते. 'त्या' मुलाला सहा महिन्याच्या आत फाशीची (हो हो.. ...फाशीचीच आणि ते सुद्धा सहा महिन्यात) शिक्षा सुनाविण्यात आली होती. परत कोणाची हिम्मत होईल का, दारू पिऊन गाडीला हात लावण्याची ?

लेखनविषय: दुवे:

Comments

जे जे

आपल्या शत्रुचे चांगले गुण सुद्धा घेतले पाहीजेत. तरच आपण पुढे जाऊ

धन्यवाद.

>>जे जे आपल्या शत्रुचे चांगले गुण सुद्धा घेतले पाहीजेत. तरच आपण पुढे जाऊ
असहमती दाखविण्याचा प्रश्नच येत नाही. सहमत आहे.

इतिहासाने चीनचा चेहरा नेहमी एक शत्रूच्या रूपाने मांडला आहे. मागील ३०-३५ वर्षांपूर्वीचा चीन आणि आजचा चीन ह्यात जमीन आस्मानचा फरक आहे. आजच्या चीनला आपण अजूनहि 'शत्रू' कि 'मित्र' म्हणून ओळखलेले नाही. (शत्रू म्हणून अजून शिक्का मोर्तब झाले नाही, हे नशीब आहे.)

राजकीय पातळीवर काय चालते याचे जरी योग्य विश्लेषण मी करू शकलो नाही तरी,
माझा चीन मधील काही सहकार्यांशी कामानिमित्त संबंध आलेला आहे. त्यावरून असे आढळून आले आहे कि, तिथल्या सामान्य माणसांना देखील भारतीय संस्कृतीचा एक आदर आहे, भारतातील काही माणसे प्राण्यांना न खाता (vegetarian) राहू शकतात , बरेच जण योगा जाणतात, विस्तारलेले संगणकीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, शेकडो देवी देवता, उत्सव, सन, धर्म आदी ह्याची त्यांना खूप आपुलकी वाटते.
अगदी काही सहकाऱ्यांना मी दिवाळी सणाबद्दल माहिती दिल्यानंतर त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देखील पाठविल्या.

मला असे वाटते कि हे राजकारण बाजूला ठेऊन जन-सामान्यांमध्ये मैत्रीचे बीज नक्कीच पेरावे आणि भविष्यात त्या वटवृक्षाखाली दोन्ही देशांनी आपली प्रगती साधावी.

सर्व प्रतिसादधारकांना आणि वाचकांना धन्यवाद.

धागा आवडला.

हो! खरचं फरक आहे.
चिन्यांची 'काम करण्याची पद्धत' व त्यांचा 'स्वतःच्या कामाकडे पहाण्याचा दृश्टीकोन' देखील आपण भारतीयांपेक्शा वेगळा आहे.
आताच्या शूद्रयुगात नैतिकता, धर्म ह्या गोश्टींवर अनाठायी जोर देण्या ऐवजी वरील दोन गोश्टींवर भारतातील राजकिय पक्शांनी जोर देत, तसेच त्या विकसित करत, (सत्ता मिळाल्यानंतर) सरकारी यंत्रणेतून सर्व देशात झिरपवला तर भारत नक्कीच 'प्रगत देश' म्हणण्याच्या लायकिचा होईल.

शूद्रयुग म्हणजे ?

आताचे युग हे शूद्रयुग का बरे? हे नामाभिधान कोणी दिले?

चिन्यांची फाशी

मी असे ऐकले होते की चीन हा फाशी देण्यासाठी कुप्रसिद्ध आहे.
दरवर्षी ४-५ हजारांना फाशी होते. त्यांच्या देहावर सरकारचा हक्क असतो. मग याच वेळी अवयवारोपणासाठी लोक गर्दी करून चीन मधे येतात.

बाकी नुकसानभरपाईचा मुद्दा विचारार्ह आहे.

प्रमोद

फाशी

अवांतर वाचेपर्यंत ठीक चालले होते की हो...

परत कोणाची हिम्मत होईल का, दारू पिऊन गाडीला हात लावण्याची ?

फाशीच काय तुमच्या 'लाडक्या' धर्मातील लोकांच्या एका देशाततर म्हणे ह्याहून भयानक शिक्षा असतात. तुम्ही त्यांचे फॅनच असाल.

तुम्ही चीनमध्ये का जात नाही

तुम्ही चीनमध्ये जाऊन माओवादी होऊ शकता.

फाशीची शिक्षा

परत कोणाची हिम्मत होईल का, दारू पिऊन गाडीला हात लावण्याची ?

ज्या देशांत फाशीची शिक्षा मान्य आहे त्या देशांत एखाद्या गुन्हेगाराला सर्वप्रथम फाशी दिल्यावरही भविष्यात असे गुन्हे घडले की काही गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी लागली. त्यामुळे परत हिम्मत होईल का वगैरे प्रश्न बिनकामाचे आहेत.

विषय लिहिण्याची सक्ती काढुणटाका . .

मला नेहमीच वाटते भारतापेक्षा चीन परवडला.
तिथल्या कठोर कायद्यांचे आणि अंमलबजावणीचे नेहमीच कौतुक वाटते. .भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे त्यात लोकशाहीची भर (लोकशाही म्हंजे श्रीमंत लोकांची आणि मंत्र्यांची हुकुमशाही).
मला चीन बद्दल आणखी जाणून घ्यावे वाटते . . साम्यवाद म्हंजे तिथे नेमकं काय आहे? त्याला हुकुमशाही म्हणायचे का? तिथे निवडणुका होतात का?
काहितरी चांगला विषय असल्यास वाद घालायला मजा येते. .

 
^ वर