थोरले माधवराव पेशवे व नाना फडणविस यांच्यातील गुप्त पत्रव्यवहाराचे इंग्रजी भाषांतर

सातार्‍याच्या महाराजांच्या दरबारात असलेला इंग्रजांचा रेसिडे न्ट लेफ्ट. कर्नल जॉन ब्रिग्ज याने थोरले माधवराव पेशवे व नाना फडणविस यांच्यातील गुप्त पत्रव्यवहाराचे भाषांतर केले होते. हे भाषांतर मी या दुव्यावर ठेवले आहे. इतिहासामधे रुची असणार्‍यांना हे कागदपत्र जरूर वाचण्यासारखे आहेत.

लेखनविषय: दुवे:

Comments

रोचक!

इतिहासाची रुची असलेल्यांना खजिना गवसेल! रोचक!

एकाच धाग्यात सगळी माहीती

प्रत्येक वेळी नवीन धागा काढण्यापेक्षा एकाच धाग्यात सगळी माहीती देता येईल का? म्हणजे भविष्यात ही माहीती शोधणे सोपे जाईल.

अवांतर: 'विषय भरणे अनिवार्य आहे.' हे पुन्हा चालू झाले.

सगळी माहिती

सगळी माहिती म्हणजे काय? मागे यनावाला यांनी या संदर्भात लेख लिहिला होता. त्या वेळी अनेक सभासदांनी हे कागदपत्र वाचायला मिळतील का? म्हणून पृच्छा केली होती. माझ्या जवळच्या संग्रहात या कागदपत्रांची इंग्रजी भाषांतरे सापडली. ती मी उपक्रमच्या सर्व वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. ही दोन्ही कागदपत्रे संपूर्णपणे निराळी आहेत म्हणून दोन निरनिराळे धागे सुरू केले. माझ्याकडे यापेक्षा अधिक कोणतीच कागदपत्रे किंवा माहिती नाही.नवीन पुणेकरांची एक्झॅक्टली काय अपेक्षा आहे हे मला तरी समजले नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

'ऐतिहासिक कागदपत्रे'

'ऐतिहासिक कागदपत्रे' असा विभाग करुन जर सगळी कागदपत्रे एकत्र् ठेवली तर शोधण्यास सोपे होईल.

ऐतिहासिक कागदपत्रे

मला तरी काहीच अडचण दिसत नाही. तुम्ही हे कागदपत्र उतरवून घ्या. व पुन्हा दुसर्‍या खात्यात अपलोड करा.

चन्द्रशेखर

धन्यवाद

अनेक धन्यवाद.

या दोन्हीचे (आत्मचरित्र आणि पत्रव्यवहार) ओसीआर वापरून रुपांतर करता येईल का? ही पुस्तके जुनी असल्याने स्वामित्वहक्काचा प्रश्न राहू नये.
मराठीपुस्तकेवर याचे टेक्स्ट रुप ठेवायला आवडेल.

प्रमोद

रूपांतर

श्री. प्रमोद सहस्त्रबुद्धे म्हणतात तसे या कागदपत्रांचे रूपांतर करायला कॉपीराईट वगैरेची अडचण नाही. कारण हे कागदपत्र त्या कायद्याच्या बाहेर आहेत. फक्त रूपांतरावर या कागदपत्रांचा संदर्भ म्हणून उल्लेख करणे योग्य ठरेल असे वाटले. श्री. प्रमोद जर असे रूपांतर करण्यास तयार असतील तर प्लीज गो अहेड.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

 
^ वर