उपक्रमवरील प्रस्तावित बदलांविषयी निवेदन

उपक्रमला ड्रुपलच्या नवीनतम आवृत्तीवर नेण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान सदस्यांना आणि वाचकांना उपक्रमवर वावरताना काही अडचणी येण्याची शक्यता आहे. तुम्हाला जाणवणार्‍या अडचणी किंवा त्रुटी कृपया इथे नोंदवाव्यात.

तसेच पुढच्या टप्प्यात उपक्रमच्या रचनेत/बांधणीत काही बदल योजिले आहेत. त्यासबंधाने काही सूचना, मते असल्यास तीही कळवावीत.

या दरम्यान येणार्‍या अडचणींबद्दल दिलगीर आहोत.

कलोअ,
उपक्रम व्यवस्थापन

लेखनविषय: दुवे:

Comments

पूर्व परिक्षण

अक्षररंग सुविधा चालत नाही.[तिथे ReferenceError: selectTextColor is not defined असा संदेश दिसतो] आणि डोळ्याचे चिन्ह असलेल्या आकृतीवर टीचकी मारली की पूवी पूर्वपरीक्षण करता येत होते ते आता करता येत नाही.

-दिलीप बिरुटे

कोणते बदल?

कोणकोणते बदल होतील ते कृपया सांगा.
कृपया थीम साधीच ठेवा.

+१

सहमत. थीम हीच किवा साधी ठेवावी. (हे अतिशय जरुरीचे)

सहमत

थीम हिच् पाहिजे
फॅन्सी नको.

खरड

पूर्वी खरड आल्यावर खरडकर्त्याच्या नावावर टीचकी मारुन खरडकर्त्याच्या खरडवहीत जाता येत होते
आता जात येत नाही. मालक, फूल्ल मदत करतो आज उपक्रमला. :)

-दिलीप बिरुटे

आपुनबी

प्रोफेसरपरमानी आपुनबी टाकी फुल्ल मदत करनार उपक्रमाला.

धन्यवाद

माहितीबद्दल धन्यवाद.

सूचना एकच महत्त्वाची वाटते की साहित्याचा शोध घेता येणे सोपे करावे.

अजून एक.

Fatal error: Call to undefined function user_load() in /home1/upakramo/public_html/drupal/modules/og/og.module on line 158
असा संदेश उपक्रवर हल्ली दिसायला लागला आहे.

-दिलीप बिरुटे

काही अपेक्षा

'खरडवह्या' नावाच्या दुव्यावर सर्वांना मिळालेल्या खरडी एकत्र (तारखेच्या क्रमाने) वाचावयास मिळणे.
खरडलेखकाच्या नावावर टिचकी मारून खरडवहीवर जाणे ही सुविधा पूर्ववत करणे.
इतरांना दिलेल्या खरडी त्यांनी उडविल्यास विरोपाने सूचना मिळण्याची सोय.
दिलेले प्रतिसाद संपादित झाल्यासही विरोपाने सूचना मिळण्याची सोय :)
--------
स्वतःला आलेल्या खरडींवर टीप लिहिण्याची सुविधा आल्याचे दिसले. ही चांगली सोय आहे.

ही सोय मिळाली पाहिजे...

>>>दिलेले प्रतिसाद संपादित झाल्यासही विरोपाने सूचना मिळण्याची सोय :)
हो राव...! ही सुविधा मिळाली पाहिजे. आपण पुढे जातो आणि संपादक मागे काय करतात ते काही कळत नाही. :)

>>>'खरडवह्या' नावाच्या दुव्यावर सर्वांना मिळालेल्या खरडी एकत्र (तारखेच्या क्रमाने) वाचावयास मिळणे.

खरं म्हणजे असा पर्याय पाहिजे. रिटे यांनी कोणाला खरड केली आणि ज्यांना रिटेंनी खरड केली त्यांचा खरड व्यवहार आपल्याला वाचता यावा. थोबाडपुस्तिकेवर जशी सोय असते तशी. [फेसबूकला थोबाड पुस्तिका हा शब्द प्रमोद देवांनी वापरला होता असे आठवते त्यामुळे त्या शब्दांचे श्रेय त्यांना]

-दिलीप बिरुटे

अजून

'खरडवही' हा दुवा डावीकडील दुव्यांमध्ये थोडा वर आला आहे (त्याबद्दल धन्यवाद), तो 'लेखन करा' या क्वचितच लागणार्‍या दुव्याच्याही वर आणल्यास कष्ट अजूनच कमी होतील.
'जाण्याची नोंद' या logout च्या शब्दशः भाषांतरापेक्षा 'निघून जा', 'निरोप घ्या', 'गमन', असे काही लिहिल्यास अधिक अर्थपूर्ण होईल.
विशिष्ट कालात किमान एकदा तरी उपक्रमला भेट देण्याचे बंधन घालावे काय याचाही कृपया विचार करा. (दुसर्‍या टोकाला, विशिष्ट कालात कमाल अमुकच वेळा पान रीफ्रेश करता येणे, कमाल अमुकच प्रतिसाद देता येणे, इ. मर्यादा मात्र नको!)

च्च

>>>>विशिष्ट कालात किमान एकदा तरी उपक्रमला भेट देण्याचे बंधन घालावे काय याचाही कृपया विचार करा.

असे केले तर, बर्‍याच कालावधीनंतर येणारे आणि सदस्यत्त्व घेऊन केवळ वाचनमात्र असलेले जुनेच सदस्य नव्या आयडीने येतील. सध्याही ते येतच असतात. तेव्हा असा काही विचार करु नये असे वाटते. :)

नियमित आयडीच्या ऐवजी एखादा टेंम्प्रररी आयडीची सुविधा घेता आली पाहिजे असे करता येईल का ?

बाकी, लॉगाऊट साठी निरोप घ्या, निघून जा, आता कटा, असे पर्याय उत्तम आहेत. हे 'गमन' काढा राव त्याचा कै तरी वंगाळ अर्थ आहे म्हणे.

नमोगतकडून उसनवारी करुन ते शुद्धचिकित्सक इथे लावता येईल काय ? शुद्धलेखन करणार्‍यांना त्याचा उपयोग होईल.

-दिलीप बिरुटे

उद्धट

'निघून जा', 'निरोप घ्या', असले उद्धट पर्याय नकोत. गमन तर अजिबात नको, त्यापेक्षा आहे तो 'जाण्याची नोंद' बरा आहे, तोच राहू द्यावा.
लिहिण्याची पद्धत बदलण्यासाठी आणि टंकलेखन साहाय्यासाठी कंट्रोल किंवा तत्सम कळ वापरून लेखनादरम्यान कधीही फायदा घेता यावा. दरवेळी पान वर सरकवून बदल करावे लागतात.---वाचक्नवी

या हं!

जाण्याची नोंद हेच बरे वाटते याच्याशी सहमत आहे. निघून जा, निरोप घ्या हे थोडेसे उद्धट वाटतात याच्याशीही सहमत आहे. :-)

"जातो/जाते ऐवजी येतो/येते" म्हटले जाते. तेव्हा या हं! असा पर्यायही बरा दिसेल पण गोंधळात टाकेल असे वाटते.

लेखन उतरवून घेण्याची सुविधा.

लेखन उतरवून घेण्याची सुविधा.

उपक्रम येथील लेखकांचे लेखन एकगट्ठा rtf / pdf / doc मध्ये उतरवून घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. धन्यवाद.

--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

पीडीएफ साठी

हैयो हैयैयो, फायरफॉक्स वापरत असाल तर 'प्रिंट' अशी आज्ञा द्या आणि 'प्रिंट टू फाईल' असा ऑप्शन वापरा. 'इंटरनेट एक्स्प्लोरर'मधे क्यूट पीडीएफ असा काही प्रकार आहे तो वापरतात. मी स्वतः विण्डोज वा इंटरनेट एक्स्प्लोरर वापरत नाही त्यामुळे मला याची जास्त कल्पना नाही.

धन्यवाद.

धन्यवाद.

धन्यवाद. र्त्फ् आणि दोच् साठी अशी काही क्लृप्ती असल्यास सांगावे.

--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

नक्की?

त्या सुविधेने केवळ prn फाईल बनते ना? pdf फाईल बनविण्याची सोय आऊट ऑफ द बॉक्स होते काय?
शिवाय, त्यांना एका सदस्याच्या सर्व लेखांची pdf हवी आहे ना? चर्चासंस्थळ या संकल्पनेलाच ती मागणी छेद देते. "येथे येऊन वाचा, बॅकप घेऊ नका" असे सांगण्याऐवजी संस्थळे विकिपीडियासारखी pdf सोय देणार नाहीत असे मला वाटते.

समजले नाही.

कोणत्या सुविधेने केवळ prn फाईल बनते? (मुळात prn फाईल नक्की काय असते?)

मी फायरफॉक्समधून अनेकदा pdf फाईल्स् बनवलेल्या, वापरलेल्या आणि इमेल्सवर शेअर केल्या आहेत. त्यात आत्तापर्यंत मला काही त्रास झालेला नाही. विण्डोजबद्दल मला फारशी कल्पना नाही.

काही जुन्या आणि चांगल्या (= माहितीपूर्ण असूनही अवांतर नसलेल्या, चिखलफेक न केलेल्या) चर्चांच्या पीडीएफ बनवून बॅकअप ठेवण्याची कोणाची इच्छा असेल तर त्यात मलातरी काही गैर वाटत नाही. इंटरनेटची सुविधा नसलेल्या ठिकाणीही अशा चर्चा वाचता येऊ शकतात. संस्थळाने काय करावे हे संस्थळाच्या मालकाने ठरवावे.

खुलासा

उबुंटूमधील फायरफॉक्समधून पाहिले तर मलासुद्धा ps आणि pdf बनविणे हे पर्याय दिसले. विंडोजच्या फाफॉमध्ये मात्र केवळ prn हाच एक पर्याय आहे. कदाचित, कोणतेतरी पॅकेज घातल्यामुळे उबुंटूच्या फाफॉला ते पर्याय मिळाले असावेत असे शक्य आहे (पण prn हा पर्याय का गायब झाला?). पण ते पर्याय त्याला नेटिवपणे असतात की नाही ते शोधेन.

webpage to pdf हे

webpage to pdf हे टाकुन गुगल मध्ये शोधले. बरेच पर्याय मिळाले. http://www.web2pdfconvert.com/ हे वापरुन पाहीले. पीडीएफ् फाईल बनते पण बुकमार्क मध्ये ???? दिसत आहेत.
अधिक शोधल्यास योग्य पर्याय सापडु शकेल.

हे वापरुन पहा.

cute pdf वापरुन पहा.

-Nile

टंकलेखन सुविधा

लिहिण्याची पद्धत मराठी-देवनागरी/रोमन असा बदल करण्यासाठी कळयोजना आवश्यक आहे. (ctrl + \) असे उपक्रम दिवाळी अंकात चालते तेच इथे चालल्यास उत्तम.

उपक्रमाचे फोनेटिक टंकलेखन वापरणाऱ्यांना अतिरिक्त हलन्त घालवावा लागतो ते अनावश्यक आहे.

मुखपृष्ठ अद्ययावत करावे

प्रतिसादांची उघडझाप?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

प्रतिसादांची उघडझाप?

प्रतिसादांची उघडझाप?

वाचून झालेले प्रतिसाद झापलेले दिसावेत. नवीन प्रतिसाद उघड दिसावेत. ही सुविधा करता आल्यास उत्तम!

--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

प्रतिसादांची उघडझाप

प्रतिसादांची 'उघडझाप' ही सुविधा हवी. व ती मनोगत वर जशी असते तशी असायला हवी.

त्यातही सगळे प्रतिसाद 'झाकलेल्या' अवस्थेतच असू द्यावेत. कारण तसे नसल्यामुळे मोबाईलवर उपक्रम पहाताना 'लय म्हणजे लय' त्रास होतो. सगळे प्रतिसाद 'झाकलेल्या' अवस्थेत असतील तर मोबाईलवर ते पान उघडणे सहज व जलद होईल व जे प्रतिसाद वाचलेले आहेत (व जे व ज्यांचे प्रतिसाद ठरलेले असतात) त्यावरून स्कोल करावे लागणार नाही.

मोबाईलवर देवनागरीतून लॉगीन करता येत नाही. आणि म्हणून लॉगीन न करताही ही सुविधा असायला हवी.

सुचना

लोक सूचना करीत आहेत ते कोठे पाहून करीत आहेत?

१. शेवटचा 'ए' टंकायला लागू नये.

२. मिपाचा अनुभव पाहता- नवा निरोप आल्याची सूचना पानाच्या वर मिळत नाही ती हवी.

नितिन थत्ते

मिळते

मिपाचा अनुभव पाहता- नवा निरोप आल्याची सूचना पानाच्या वर मिळत नाही ती हवी.

ती सोय सुरू करण्याची सुविधा सदस्यत्वाच्या संपादन पानात आहे.

खरडवही

आत्ता दिसतंय त्याप्रमाणे दुसर्‍याच्या खरडवहीतून तिसर्‍याच्या खात्यावर जाता येत असे ते आत्ता येत नाही असे दिसते.

नितिन थत्ते

खरडवह्यां

खरडवह्यांची आयझेड झाली आहे. :( विशेषतः खरडीला उत्तर देणे.

ऍ चा प्रॉब्लेम सोडवा बुवा.

नितिन थत्ते

शुभेच्छा

उपक्रमाला नविन सुधारणांसाठी शुभेच्छा!

-डॉन कोर्लिओनी

काही सुचवण्या

१. हलन्ताची अडचण. प्रत्येक अकारांत शब्दात अ मिसळावा लागू नये.
२. हल्ली उपक्रमावरील चर्चा सहज शंभरी गाठत असतात. पन्नास प्रतिसादांनंतर कोण कुठे काय लिहिते ते कळत नाही. (रिटेंनी स्क्रिप्टवगैरे लिहून मदत केली तरी त्रुटी आहेत. ऑफिसातून त्रास होतो.) तेव्हा ५० पेक्षा अधिक प्रतिसाद एका पानावर राहावेत किंवा ५० प्रतिसादांनंतर दुसरा भाग सुरु व्हावा.
३. थीम साधी असावी. चित्रे वगैरेंची गरज नाही. (स्मायली मिळाल्या तर मला चालेल. ;-)
४. मुख्यपृष्ठ अपडेट करण्याची गरज आहे.
५. स्वसंपादन वगैरेंसारख्या सोयींवर अजिबात विचार करू नये. (हा मुद्दा अद्याप कोणी मांडला कसा नाही? ;-) की मीच वाचला नाही.)
६. निरोप-प्रतिनिरोपांचा एकच धागा बनावा. ज्यामुळे निरोप आणि उत्तरे एकत्र राहतील.

काही अडचणी:

१. सध्या अक्षरांचे रंग आणि पार्श्वभूमीचे रंग बदलता येत नाहीयेत.
२. डावीकडची बाजू इंग्रजी-मराठीत गंडली आहे.
३. बाकीचे व्य. नि. ने कळवते.

>>५.

>>५. स्वसंपादन वगैरेंसारख्या सोयींवर अजिबात विचार करू नये. (हा मुद्दा अद्याप कोणी मांडला कसा नाही? ;-) की मीच वाचला नाही.)

सहमत आहे. स्वसंपादनाची मागणी फक्त तिकडेच आहे. नसलेली सोय नाही दिली तर कोणाला काही वाटत नाही. असलेली सोय गेली की आक्षेप येतो.

नितिन थत्ते

+१

तशी सोय मुळीच देऊ नये.

स्वसंपादन

आपल्या लिखाणापाठोपाठ जर कुणाचा प्रतिसाद आलेला नसेल तर हल्ली स्वसंपादन करता येते, ती सोय चालू ठेवावी.
२. स्वयंसुधारणा(शुद्धलेखनातल्या दुरुस्त्या) ही सोय ठेवायला हरकत नाही, अर्थात तिची खास गरज आहे असे नाही. सुदैवाने उपक्रमावरील बहुतेकजण सुयोग्य लिखाण करतात.
३. मराठी जोडाक्षरे लिहिताना उभी मांडणी आणि आडवी मांडणी हे दोन्ही पर्याय उपलब्ध असावेत.
४. महाराष्ट्र सरकारच्या आदेशाप्रमाणे मराठीतला जुना शेंडीफोड्या श आणि गोलमटोल ल यांची सोय हवी. शृंगारमधला सुटा श लिहायची व्यवस्था पाहिजे.
५. मूळचा संस्कृत ख पाहिजे. हल्लीच्या खला र जोडता येत नाही. ज्यांचे शेपटे उजवीकडे वळलेले असतात अशी पाच अक्षरे देवनागरी लिपीत आहेत. ख, झ, र, श आणि स. यांना तिरप्या रेघेचा र जोडणे अवघड जाऊ शकते. झ-सला मध्ये आडवी दांडी आहे, त्यामुळे जोडलेला र शेपट्याला स्पर्श करीत नाही. रला र सहसा जोडावा लागत नाही. लागलाच तर रफार देऊन काम भागते. श्+र साठी श्रची सोय आहे. प्रश्न फक्त खचा आहे. तेव्हा निदान र जोडण्यासाठी जुना ख परत लिपीत आणावा. ---वाचक्नवी

अंशतः सहमत

आपल्या लिखाणापाठोपाठ जर कुणाचा प्रतिसाद आलेला नसेल तर हल्ली स्वसंपादन करता येते, ती सोय चालू ठेवावी.

+१
पहिला प्रतिसाद येईपर्यंत मूळ लेख/चर्चाप्रस्तावांनाही ही सोय दिली तर चांगले.
--------
बाकीच्या मागण्या पूर्ण करणे कोणत्याही संस्थळाला शक्य नाही. त्यासाठी नवा फाँट बनवून, वाचकांना आपआपल्या संगणकांवर वापरावा लागेल. तुम्ही दिलेल्या काही मागण्या पूर्ण करणारा फाँट बनविणे सोपे ठरेल तर काही मागण्या पूर्ण करणारा फाँट अवघड असेल असे मला वाटते.

+१

पहिला प्रतिसाद येईपर्यंत मूळ लेख/चर्चाप्रस्तावांनाही ही सोय दिली तर चांगले.

याबद्दल मागेही चर्चा झाली होती पण काही तांत्रिक अडचणी असल्यास कल्पना नाही. मनोगतावर अशी सोय होती/ असावी.

जुना फॉण्ट

त्यासाठी उपक्रमाला काही करण्याची गरज नाही.

आपण फायरफॉक्स वापरत असाल तर

१. या दुव्यावरून Sanskrit 2003 हा फॉण्ट डाउनलोड करून घेणे.

२. फा फॉ च्या टूल्स् > ऑप्शन्स् > कण्टेण्ट > फॉण्टस् & कलर्स > ऍडव्हान्स्ड मध्ये जाऊन देवनागरी लिपीसाठी डिफॉल्ट फॉण्ट म्हणून हा फॉण्ट निवडावा.

मग तुम्हाला उपक्रम त्या फॉण्ट मध्ये वाचता येईल. त्यात श, ल आणि ख तीनही जुन्या पद्धतीत दिसतात.

वरील सूचना फायरफॉक्स ३.६.१२ साठी लागू आहेत.

नितिन थत्ते

माझी मागणी अवास्तव असावी कदाचित.....

माझी मागणी अवास्तव असावी कदाचित.....पण शेवटचा हात फिरविण्याअगोदर दोन /तीन साध्या थीम्सचे स्क्रीनशॉटस टाकून त्यावर सदस्यांची मते घेता येतील काय ? शेवटी बाह्यरंगापेक्षा उपक्रमचे अंतरंग महत्वाचे हे मान्य पण अंतरंग सुरुवातीसच उघडे करुन दाखविणे / बघता येणे शक्य वाटत नाही.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

काही अपग्रेडेशन झालं का नाही ?

अपग्रेडेशन नंतर उपक्रमवर येत असलेल्या तक्रारी बद्दल आम्ही काम-धाम सोडून प्रतिसाद लिहिले. त्यानंतर आपण केलेले काही बदल तर दिसलेच नाही. उपक्रमींना नुसतेच कामाला लावले की काय ?

काही तरी पोच देत जा राव....!

-दिलीप बिरुटे

खरडीला प्रतिसाद

  1. खरडीला प्रतिसाद देता येत नाही.
  2. एडिटरचा टुलबार गंडलेला आहे. सगळ्या कमांड्स चालत नाहीत. टेक्स्ट कलर, ब्याकराऊंड कलर, प्रिव्ह्यु, क्लिअर फॉर्मॅटिंग इत्यादी चालत नाहीत.
  3. थीम हिच असावी.
  4. मुख्यपृष्ठ डायनॅमिक असावे.
  5. शक्य असल्यास ट्विटर बरोबर जोडणी असावी.
  6. एका पानावरच्या प्रतिसादांची संख्या वाढवावी.
  7. एखादी चर्चा/लेख चांगला वाटल्यास महाजालावर शेअर करण्यासाठी सुविधा असावी.
  8. समुदायविषयक प्रसूचना हा भाग पण कामातून गेलेला आहे.

बाकी सुचेल् तसे वाढवत जाईन. जाता जाता, एक प्राध्यापक येथे वेब टेस्टर बनलेले दिसत आहेत. नोकरी बदला राव :) फाँटचा रंग बदलता येत नसल्याने मधले वाक्य लपवता अले नाही :)


मुख्यपृष्ठ आणि नवे लेखन

कालपासून 'मुख्यपृष्ठ' आणि 'नवे लेखन' या दोन्हींवर टिचकी मारल्यास एकच म्हणजे 'नवे लेखन' चेच वेबपेज दिसत आहे.

इनस्क्रिप्टची सोय हवी

इनस्क्रिप्ट कळफलकाची सोय देता आली तर बरं होईल. सध्याच्या प्रणालीत टंकणे खूप जिकीरीचे होते.

एखादी चर्चा/लेख चांगला वाटल्यास महाजालावर शेअर करण्यासाठी सुविधा असावी.

सहमत. 'share this'चा वापर करता आल्यास उपक्रमबद्दल अन्य लोकांना कळविता येईल.

'share this' साठी

'share this' साठी फायरफॉक्समध्ये 'File>Send Link' वापरता येईल.

प्रतिसादा

प्रतिसादात विषय लिहिणे सक्तीचे राहिलेले नाही.

नितिन थत्ते

सोशल मिडिया

"एखादी चर्चा/लेख चांगला वाटल्यास महाजालावर शेअर करण्यासाठी सुविधा असावी."
चाणक्यच्या या म्हणण्याशी १००% सहमत आहे. अशाने उपक्रमाची सदस्यता वाढण्यास नक्कीच मदत होईल.
ट्विटर सोबतच उपक्रमाचे फेसबूक पृष्ठ बनविल्यास उत्तम.

त्याचबरोबर:
१. 'रिपोर्ट अब्यूज' प्रमाणे "असभ्यता कळवा" असे बटन प्रत्येक प्रतिसादाखाली असावे. असभ्य प्रतिसादांवर संपादकांना लागलीच कारवाई करण्यास मदत होईल.

२. मुखपृष्ठावर विषयानुरुप नव्या लेखनाचे वर्गीकरण मथळ्यांच्या स्वरुपात दिसले तरी चालेल. उदा. राजकारण समाजकारण्, सांस्कृतिक, उद्योग व्यवसाय, इत्यादी सेस्क्शन्स अंतर्गत संबंधित विषयाच्या ३ किंवा ४ नव्या चर्चा/लेखांचे मथळे दिसावेत.

३. चर्चा लांबल्या की स्क्रोल करण्याचा त्रास वाढतो त्यामुळे प्रतिसादाशेजारी "वर" (टॉप) असा दुवा द्यावा.

.....
देव, धर्म, ऐतिहासिक व्यक्ती, ज्योतिष्याचे सर्व प्रकार इत्यादी विषयांवर काही काळापुरती बंदी आणता आल्यास बरे होईल. अशा हमखास गल्लाभरु चर्चांनी अलिकडच्या काळात नुसता वात आणला आहे. अशा चर्चांमध्ये वैयक्तिक रोखाने आलेले प्रतिसाद अधिक प्रमाणात असतात.

जयेश

फेसबुक पासून ते इ- वर्तमान पत्रे जोडणी

'ट्विटर सोबतच उपक्रमाचे फेसबूक पृष्ठ बनविल्यास उत्तम.' ह्या वाक्याचा अर्थ मला समजला नाही. पण ज्यासाठी लिहीले असावे ते समजू शकतो.

येथील संकेतस्थळावरील उपलब्ध लेखन 'शेअर' करण्यासाठी फेसबुकची लिंक प्रत्येक पानावर असायला हवी. म्हणजे जे लेखन, चर्चा आवडली ते फेसबुकवर शेअर करत येवू शकते.

तसेच लोकसत्ता, म.टा. ह्या वर्तमान पत्रावर देखील जशी फेसबुक, ट्वीटरची लिंक असते, ज्यामुळे ती बातमी जशीच्या तशी इतरांसोबत शेअर करता येते तशी लिंक हवी.
इतर संकेतस्थळावरून आलेली ती बातमी आधी आपल्या 'लेखन करा' ह्या विभागात यायला हवी. त्यानंतर ती चर्चेसाठी, लेखना साठी वापरता येवू शकेल. त्यासाठी लिहीण्याचा जो फळा असतो त्या फळ्याच्या वरील बाजू जी 'वर्ण संपादनासाठीची पट्टी' असते तेथेच ती लिंक मिळाली तर बरे होईल.

खरडवही

नव्या खव रचनेतली अडचण. एक उदाहरण.

वाचक्नवींच्या खरड वहीतली एक खरड.

प्रियाली
शनि, 10/23/2010 - 00:35

मला एक सांगा.

उदा. तो तिथे गेला आणि ४ दिवस राहिला. यातला हि र्‍हस्व का दीर्घ?

राहिला की राहीला?

याला वाचक्नवींनी काय उत्तर दिले हे पहायला पूर्वी प्रियालीवर क्लिकवून प्रियालींच्या खरडवहीत जाता येत असे आणि उत्तर पाहता येत असे. आता प्रियाली हे सदस्यनाम शोधून त्यातून खरडवहीत जावे लागते.

जुनी पद्धत चांगली होती. अर्थात खरडवह्यांची उचकापाचक होऊ नये असे उपक्रमाचे धोरण असेल तर गोष्ट वेगळी.

नितिन थत्ते

धन्यवाद

उपक्रमींच्या उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.

सर्वांच्या माहितीसाठी नमूद करावेसे वाटते की आधीच्या असलेल्या कोणत्याही सुविधा काढलेल्या नाहीत किंवा त्यात दर्शनी बदल केलेले नाहीत. जिथे बदल दिसत आहेत ते तांत्रिक बदलांमुळे दिसत आहेत आणि ते पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

संपादन खिडकीच्या वर असणारे सर्व पर्याय (अक्षरांचा रंग, चित्रे इ.) आता पूर्ववत झाले आहेत.

इतर गोष्टींबद्दलही वेळोवेळी इथे माहिती दिली जाईल.

कृपया आपले प्रतिसाद देत राहावेत. पुन्हा एकदा आभार!

कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक

समीकरणे

समीकरणे लिहिण्यासाठी अनेक उपाय उपलब्ध आहेत. ASCIIMathML हे जावास्क्रिप्ट संस्थळाने पुरविले तरच चालते परंतु ते वापरण्यास सोपे वाटले. विशाल तेलंग्रे यांनी एक उदाहरण दिले आहे. उपक्रमच्या प्रणाली नूतन करताना ASCIIMathML (किंवा इतर कोणतीही) सुविधा दिल्यास समीकरणांवर आधारित विषयांत लेखन सोपे होईल.

 
^ वर