छायचित्र टिका - अग्निशलाका

होमातिल ज्वाळा टिपण्याचा माझा प्रयत्न मांडत आहे.

अग्निशलाका1
अग्निशलाका1
अग्निशलाका2

प्रतिक्रिया जरुर कळवाव्यात.
-पराग्

लेखनविषय: दुवे:

Comments

तुम्ही सांगा

तांत्रिक किंवा मांडणीबाबत काय वैशिष्ट्य आहे, चित्र काढताना काही आडथळे आले का? ते कसे दूर केले? याबद्दल तुम्ही विवेचन करावे, अशी विनंती.

(असे केल्यामुळे ललितकलेच्या अनुषंगाने ललितकलेबद्दल माहिती देण्याचे संकेतस्थळाचे उद्दिष्ट्य साजरे होईल.)

हेच मत

+१
असेच म्हणतो.

धन्यवाद्

प्रथम महितिपुर्ण प्रतिसादांबद्द्ल सर्व प्रतिसादकांचे आभार् मानतो. शेवटच्या लिंका चांगल्या आहेत. माहितिचा वापर करण्याचा प्रयत्न करेन्

माझा प्रयत्न हा ज्वाळा आणि त्यात् बनणारे आकार टिपण्याचा होता. तांत्रिक अडथळे फारसे नव्हते. जि काहि कमतरता आहे ति माझ्या तात्रिक सफाइमध्ये आहे.

अवांतरः अडथळा एवढाच होता कि "हा माणसांचे सोडुन होमाचे का फोटो घेतोय?" हे काहि लोकांच्या चेहर्यावर् स्पष्ट दिसत होते

पहिलं चित्र छान,

पहिलं चित्र छान, दुसरं चित्र खास नाही..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

पुर्णपणे असहमत

दुसरं चित्र खास, पहिलं चित्र छान नाही!
सुवर्णा.

सहमत-असहमत. पण कारणे काय ?

दुसर्‍या छायाचित्रात काय खास आहे आणि पहिल्या छायाचित्रात काय खास नाही.

मला दुसर्‍या छायाचित्रात त्या ज्वाळा आहेत असे छायाचित्रकार म्हणतो म्हणून मी विश्वास ठेवतो. दुसर्‍या छायाचित्रात एखद्या चित्रकाराने काही तरी रेषांच्या माध्यमातून काहीतरी अनाकलनीय असे चित्र काढले असे वाटले.

मला तर दोन्हीही छायाचित्रे आवडली.

बाकी ते फोकस,स्पीड, वगैरे आपल्याला काही कळत नाही हे नम्रपणे नमुद करतो.

-दिलीप बिरुटे

ठीक

चला बरे, 'छान' आणि 'खास' या संकल्पनांच्याही व्याख्या करा ;)

पुन्हा व्याख्या

छान्-- मनाला आनंद् (व्यक्तिविशेष नाही) देइल् ते.
खास-- एखाद्या गोष्टीत काही वेगळे आणि वखाणण्याजोगे आढळले कि ते.

दिवानेआम-दिवानेखास

दिवानेआम आणि दिवानेखास मधे जो फरक आहे तो मला छान आणि खास मधुन जाणवतो. छान म्हणजे सो-सो, तर खास म्हणजे अधिक सुंदर. :) बाकी व्याख्या, संकल्पना जरा वेळ द्या. :)
[नेट कासवाच्या गतीने चालू आहे मला पुण्याहून [http://www.tscholars.com/browser/ पुणतांबा यावे लागते. ]:)

-दिलीप बिरुटे

खुलासा

पहिल्या चित्रात मागची रंगोली रसग्रहणात अडथळा आणते आहे. त्यामुळे छान नाही.
आणि दुस-यात धुर आणि ज्वाळा यांचा छान् इफेक्ट आला आहे त्यामुळे खास.

ज्वाळेचा रंग

कार्बनचे रेणू इंधनातून मुकत होऊन गरम हवेमुळे वर जातात व ऑक्सिजनबरोबर संयोग पावल्यामुळे जेथे तापमान जास्त आहे तेथे ते रेणू पेट घेतात. ऑक्सिजनच्या पुरवठ्याप्रमाणे ज्वाळेचा रंग अझ्रुद्दीन किंवा "बिजला"नीसारखा होतो. (वीजा, ज्वालांशी खेळणारा माणूस!) त्या लवलवत्या ज्वाळा चित्रीत करण्यासाठी श्टर स्पीड खूप कमी हवा. पुन्हा चित्रे काढून पहा.

लिंका

तसेच खालील लिंका पहायला विसरु नका-
एक
दोन
तीन

छायाचित्र उत्तम

छायाचित्र उत्तम.दुसरे अधिक उठावदार. धूर नसता तर अधिक सुंदर दिसले असते. माझे मत - होमात तूप/समिधा टाकल्या टाकल्या काढला असता तर अधिक ज्वाळा दिसल्या असत्या.

अवांतर -ते ''होमाचे'' छायाचित्र आहे ह्यावर 'कोणीचचचच' कसे 'बोलले' नाही? :)

चचचचच!

ते ''होमाचे'' छायाचित्र आहे ह्यावर 'कोणीचचचच' कसे 'बोलले' नाही? :)

हेचचचचचच म्हणते. ;-)

मला दोन्ही चित्रे आवडली. थंडीच्या या दिवसात होम, शेकोटी, फायरप्लेस सर्व चालेल. धग लागल्याशी कारण.

पहिल्या चित्रात होमकुंडासभोवतीची रांगोळी दिसते आहे का?

:)

>>थंडीच्या या दिवसात होम, शेकोटी, फायरप्लेस सर्व चालेल. धग लागल्याशी कारण.
:) बरोबर, पण 'आम्हाला' कदाचित हि अशी 'कर्म-कांड' प्रेरित/निर्मित धग नको असावी.

>>पहिल्या चित्रात होमकुंडासभोवतीची रांगोळी दिसते आहे का?
हो, बहुदा ती सारवलेल्या विटांवर रांगोळीच असावी. दुसऱ्या चित्रात देखील तसा भास होतो आहे.

+१

पहिले चित्र अधिक आवडले.

ते ''होमाचे'' छायाचित्र आहे ह्यावर 'कोणीचचचच' कसे 'बोलले' नाही? :)

यातून अंधश्रद्धा प्रगट होते आहे असे वाटते.

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

:)

>>>>ते ''होमाचे'' छायाचित्र आहे ह्यावर 'कोणीचचचच' कसे 'बोलले' नाही? :)

>>यातून अंधश्रद्धा प्रगट होते आहे असे वाटते.

ज्वाळा प्रगट होत आहेत एवढे नक्की, बाकी गुलदस्त्यात. :)

फोटोकाराची मते

स्कोअर बोर्ड हलता ठेवण्यासाठी हा प्रतिसाद. फोटोकाराची मते वरील प्रतिसादावर वाचायला आवडली असती

मते

बर्‍याच मुद्यांबद्दल प्रतिसाद वरच दिला आहे. पुन्हा सर्व प्रतिसादकांचे आभार् मानतो. माहितिचा वापर करण्याचा प्रयत्न करेन्

होमातिल ज्वाळांचा फोटो आहे हे माहितिकरता सांगितले होते. क्रुपया या धाग्याचा संबंध धार्मिकतेशि जोडु नये. (व त्याला आस्तिक्- नास्तिक वादाचा आखाडा बनवु नये)

 
^ वर