दिवाळी अंकांतील फराळ

यंदाच्या दिवाळीसाठी आम्ही कंबर कसून कामाला लागलो होतो. त्या लेखनकष्टाचं फळ पदरात पडलं आहे. एकूण डझनभर दिवाळी अंकांमधून आमच्या घरगुती फराळाची चव रसिक वाचकांना चाखायला मिळणार आहे. सदरहू अंक आपणाला नक्कीच रुचकर वाटतील आणि त्यात समाविष्ट झालेल्या आमच्या कुरकुरीत साहित्याचा आपण चौकसतेने आस्वाद घेऊन आम्हांला जरुर पोचपावती द्यावी ही विनंती.
आमच्या हातचा हा मामुली फराळ कसा काय झालाय? तिखट मीठ व्यवस्थित घोळले गेलेय ना? आंबट लागतोय की गोड? तुरट झालाय की कडू वाटला? अशा सूचक व चोखंदळ सूचनांचे आमच्या 'घरी' स्वागत आहे...

आमचा छोटेखानी फराळ आपणापर्यंत पोहचवणारे दिवाळी अंक पुढील प्रमाणे...

१. फिरकी
संपादक- विनोद कुलकर्णी. पुणे.
विनोदी कथा- स्वामी काव्यानंद आणि मी.

२. पुरुष उवाच्
संपादक द्वय- मुकुंद-गिताली. पुणे.
विनोदी लेख- प्रिय पत्नीस अनावृत्त पत्र.

३. चपराक
संपादक- घनश्याम पाटील. पुणे.
विनोदी लेख- संपादकांच्या फुलक्या.

४. माझी वहिनी
संपादक द्वय- श्री व सौ पटवर्धन. पुणे.
स्फूट लेख- दिपावली आणि तुम्ही आम्ही.

५. झुंज
संपादक- अनिल वडघुले. पुणे.
विनोदी कथा- पांडूचा रंग.

६. स्वयंभू
संपादक- डॉ. नीलेश लोणकर. पुणे.
विनोदी लेख- डॉक्टरांच्या तऱ्‍हा.

७. भन्नाट
संपादिका- वर्षा ढवळीकर. पुणे.
विनोदी कथा- ठेंगूरामची गोष्ट.

८. हाऽहाऽहाऽ
संपादक- जितेंद्र औंधकर. सातारा.
विनोदी कथा- पेपराचं फेफरं.

९. धमाल धमाका
संपादक- नसीर शेख. अहमदनगर.
विनोदी कथा- शंकऱ्‍याची युक्ती.

१०. महाराष्ट्राची जत्रा
संपादक- अशोक श्रीराम. शिरपूर, धुळे.
विनोदी कथा- मी स्वामी सत्यानंद.

११. हास्यजत्रा
संपादक- रवी पुणेकर. अकलूज, सोलापूर.
विनोदी कथा- मोबाईल वेडा.

१२. रत्नभूमि
संपादिका- धनश्री पालांडे. रत्नागिरी.
विनोदी ललित लेख- माझं वाचनवेड.

सर्व संपादक, लेखक, वाचक, रसिकांना दिपावलीच्या व नवीन संवत्सराच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!
ता.क. माझी विनामूल्य ई-पुस्तके (लेखसंग्रह)-- मिश्किली, पुणेरी आजोळ.

आपला स्नेहांकित,
डॉ.श्रीराम दिवटे.
पुणे.

*******

 
^ वर