ग्रहांचे खडे व प्रादेशिक पसंती

एखादा माणूस तो तोंड उघडायच्या आत वंगाली आहे की नाही हे ओळखायचे असेल तर त्याच्या हाताच्या बोटातील अंगठ्या पहा. वेगवेगळ्या रंगाचे खडे व सोने-चांदीत केलेल्या फुगीर अंगठ्या लक्ष वेधुन घेतात. मराठी लोक पुष्कराज वापरतांना सर्रास दिसतात पण वंगाली लोक जे खडे वापरतात ते आपल्याकडे फारसे वापरले जात नाहीत. ह्याला काय कारणे असावीत हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

तसेच असेही म्हणण्याचे धाडस करतो की, काही विशिष्ठ्य खडे वापरल्यामुळेच आज वंगाली माणूस मोठ-मोठ्या पदांवर दिसतोय, जे मराठी माणसाला जमलेले नाही. हा त्या खड्यांचाच परीणाम असावा असे वाटते.

लेखनविषय: दुवे:

Comments

कायतरी नवे हवे

संकेतस्थळाची ओळख झाली.

एका वेगळ्याच संकेतस्थळाची ओळख झाली. विषय जुना आहे म्हणजे चर्चा झाली आहे असे ना?

वंगाली?

वंगाली म्हणजे बंगाली का? हा शब्द फारसा वापरला जात नाही म्हणून विचारले.

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

वंगदेश

होय, वंगदेशाचे ते वंगाली.

ओक्के

पुलंच्या अविस्मरणीय वंग-चित्रे नंतर हा शब्द फारसा वाचनात आला नाही.

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

माहित नाही

तसेच असेही म्हणण्याचे धाडस करतो की, काही विशिष्ठ्य खडे वापरल्यामुळेच आज वंगाली माणूस मोठ-मोठ्या पदांवर दिसतोय, जे मराठी माणसाला जमलेले नाही. हा त्या खड्यांचाच परीणाम असावा असे वाटते.

माहित नाही. माझा एक व्यावसायिक मित्र सांगत असे की बंगाली लोक अतिशय आळशी* असतात म्हणून आयटी वगैरे सारखे उद्योग मुंबई, पुणे, बंगलोरकडे वळतात. कोलकत्याकडे नाही.

बाकी, मी आयटीत आहे. अंगठ्या घालून काम करताना त्या किबोर्डावर आपटतात म्हणून आवडत नाहीत. ;-) बंगाली लोकांपेक्षा मराठी लोक आयटीत अधिक असण्याचे हे एक कारणही असू शकेल.

* ही बंगाली लोकांवर टीका नसून एका व्यक्तीचे वैयक्तिक मत मानावे.

वंगाली आणि आंगठ्या

पुण्यात एक आयटी कंपनी आहे. त्यात दाबुन वंगाली लोक भरले जातात. क्वालीफिकेशन- वंगाली आणि आंगठ्या किती.
वंगाली स्त्रीया किंवा मराठी स्त्रीया ग्रहांचे पुरुषांइतके खडे घालत नाहीत. त्यांना दिलेल्या खड्यांचा आकारही लहान असतो. ग्रहांच्या वक्रदृष्टीच्या परीणामानुसार किती क्यारेटची आंगठी घालावी ते मोजमाप दिले जाते. अमुक-तमुक ग्रह फेवर मधे नसेल तर समजा ते परीमाण ३ असेल तर त्याला साजेशी ५ क्यारेटची आंगठी पुरुषाला घालायला सांगितली जात असेल तर तेच परीमाण स्त्रीसाठी का नाही लागू होत?

त्या खड्यांमुळे नाही

तसेच असेही म्हणण्याचे धाडस करतो की, काही विशिष्ठ्य खडे वापरल्यामुळेच आज वंगाली माणूस मोठ-मोठ्या पदांवर दिसतोय, जे मराठी माणसाला जमलेले नाही. हा त्या खड्यांचाच परीणाम असावा असे वाटते.

मला वाटते विशिष्ठ खडे बंगाली माणसांनी वापरले म्हणून तो मोठ मोठ्या पदांवर (नक्की कुठे?) दिसतोय असे असण्यापेक्षा स्वतःच्या पाट्या टाकण्यापलीकडे आपल्याला काय करायचे आहे असे कानाला खडा लावत वागण्याच्या पद्धतीने तसे वागणार्‍या (सगळ्या नाही) मराठी माणसाचे नक्की नुकसान झाले असावे.

फक्कड

कानाला खडा - ही कोटी फक्कड आहे. मजा आला.

मेरा 'काय' होगा फिर?

माझ्या हातात वा पायात वा इतर कुठल्या अवयवांमध्ये/वर वा अंगावर इतरत्र एकही अंगठी नाही वा तसल्या प्रकारची खड्यांयुक्त गोष्टसुद्धा माझ्याकडे नाही, त्यामुळे माझं काय होणार मग? :P

(कमरेला करदोडा अन् उजव्या हाताच्या मनगटात मैत्रीणीने बांधलेला जेजुरीचा लाल धागा—बॅक राहिलेले विषय निघावेत याकरता; एवढंच माझ्याकडे आहे!)

कोणत्या रंगाचा करदोडा ?

>>>कमरेला करदोडा
कमरेला करदोरा (डा) बांधण्याबद्दल काही धार्मिक माहिती आहे का कोणाला ?
धर्मशास्त्र काय म्हणते ? की गळ्यातले जाणवे घसरत घसरत कंबरेत अटकले ?
लहाणपणी चड्डी फिट राहावी म्हणून करदोर्‍याचा उपयोग व्हायचा.
आणि आता परंपरा म्हणून कंबरेला करदोरा बांधावा लागतो.
उपक्रमींनी काही उद्बोधन-प्रबोधन केले तर करदोरा ठेवण्याबद्दल, न ठेवण्याबद्दल निर्णय् घेता येईल. :)

-दिलीप बिरुटे

:)

X6 चे वजन करदोर्‍याला झेपले का?

एक्स ६?

X6 चे वजन करदोर्‍याला झेपले का?

नोकियाच्या X6 या सिम्बिअन स्मार्टफोनबद्दल आपण बोलत आहात का? त्यापेक्षा हल्ली फूटपाथवर मिळणारा एखादा स्वस्तातला चायना मोबाइल फोन ("वजन"दार असतातच वजनाने!) टेस्टिंगसाठी परवडेल... कारण, नोकियाचा एवढा महागडा फोन तुम्ही जर गळ्यात मिरवण्यासाठी करदोर्‍याला अडकवून टेस्ट करणार असाल, तर त्यासाठी चायना मोबाइल फोन नक्कीच परवडेल, नाही? :P

करदोरा आणखी कशा-कशासाठी उपयोगात आणला जाऊ शकतो बरं...?

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी X6 विकत घेतला असे समजले म्हणून चौकशी केली, बाकी काही नाही.

लाल अन् काळा करदोरा

आत्ताच्या भाऊबीजेला बहिणींना (बक्कळ!) भाऊबीज देऊन तो दोरा (दोन—लाल, काळा) कंबरेला अडकवलाय; परंपरेमागचे कारण अद्याप समजले नसले तरी प्रथा आहे पटणारी आहे आपल्याला...

मी तरी असं ऐकून आहे की, हा-हा माणूस हिंदू आहे म्हणून ओळखण्याचा सर्वात महत्वाचा उपाय (पर्याय) म्हणजेच हा कंबरेला बांधलेला करदोरा... (चलता है!)

लहाणपणी चड्डी फिट राहावी म्हणून करदोर्‍याचा उपयोग व्हायचा.

ते तर सगळेच शेंबडे-सुंबडे पोरं करत्यात हो, मी तर अजुनही कित्येकदा कंबररपट्टा (बेल्ट) नसला ना की शर्टाची विन (इन?) न करता चड्डी करदोर्‍याने घट्ट अडकवतो, करदोरा नसता तर किती फजिती झाली असती अशा क्षणी!

प्रथेच्या जाऊ द्या...

परंपरा आहे, हिंदू म्हणून ओळखता येते, आणि करदोर्‍याचा सापेक्ष असा उपयोग तेही समजले. माझा प्रश्न असा आहे की लाल आणि काळ्या दो-यामागे काही धार्मिक कारण किंवा त्याला काही आधार आहे काय, माहिती असेल तर सांगा ?

-दिलीप बिरुटे

 
^ वर