यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट!
यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट!
ही लेखमाला यु.जी. कृष्णमूर्ती या व्यक्तीमत्वावर आहे. युजींची एका शब्दात ओळख म्हणजे "कॉस्मिक नक्सलाईट!" युजींचा सर्व गोष्टींना नकार होता. सर्व प्रकारच्या आध्यात्मिक साधना केल्यानंतर आणि त्या सोडून दिल्यानंतर वयाच्या ४९ वर्षी युजी एका पूर्णत: शारीरिक रूपांतरणातून (त्यांचा शब्द कॅलॅमिटी/चक्रीवादळ) गेले. या घटनेनंतरची युजींची मते अगदी टोकाची बनलीच, पण नंतर ते त्यांच्या शारीरिक रूपांतरणात कसलाही आध्यात्मिक "कंटेट" नसल्याबद्दल, ते "एन्लायटन्मेंट प्राप्त" व्यक्ती नसल्याबद्दल आणि कसल्याही प्रकारचे गुरू नसल्याबद्दल सांगत राहिले. त्यांनी भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वच आध्यात्मिक गुरू आणि साधनापध्दतींचे अक्षरश: वाभाडे काढले आहे.
मन असते का?
नाही! मन नसते. पण पिढ्यान पिढ्यांपासून अनुभव ज्यात साठत आले आहेत ते "वैश्विक मन" असू शकते.
व्यक्ती असते का?
नाही! व्यक्ती नावाची कुठलीच गोष्ट कुठेही अस्तित्वात नसते. ते फक्त एक अनुभवाचे गाठोडे असते.
देवाबद्दल काय मत आहे?
या सार्या पसार्यात देव "इर्रेलेव्हण्ट" आहे.
एन्लायट्न्मेंण्ट/ मुक्ती/ मोक्ष असतो काय?
असली कुठलीही गोष्ट नसते. वैदिक काळच्या ऋषिंपासून अगदी अलिकडच्या तथाकथित जागृत पुरूषांपर्यंत सर्वांनी अगोदर स्वत:ला मूर्ख बनवले आणि नंतर जगाला.
लिंक्स दिलेली लेखमाला या जगावेगळ्या व्यक्तीमत्वाबद्दल (!) मला निर्माण् झालेल्या कुतूहलातून् लिहीली आहे आणि त्यात युजींच्या आयुष्याचा त्रोटक मागोवा घेण्यात् आला आहे.
वरील लेखमाला उपक्रमवर टाकत असताना, पूर्वप्रकाशित लेखन इथे पुन:प्रकाशित न करण्याबद्दलचा नियम असल्याबद्दल मला कल्पना नव्हती. उपक्रम ने दिलेल्या सूचनेनुसार इच्छुक सदस्यांना वाचण्यासाठी इथे या पूर्वप्रकाशित लेखमालेच्या लिंक्स देत आहे.
यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग एक
यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग दोन
यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग तीन
यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग चार
यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग पाच
यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग सहा
Comments
हं
'कॉस्मिक' आणि 'नक्सलाईट' हे दोन शब्द आहेत.
मग गप्पच बसावे की!
ठीक, कदाचित आध्यात्मिक गुरूंपासून लोकांना त्यांनी वाचविले असल्याची शक्यता आहे, पण ईहवादापेक्षा वेगळी विचारसरणी म्हणजे कनिष्ठ विचारसरणीच होय.