नवशिक्यांकरता ईंग्रजी शब्द?

मी या संकेतस्थळावर नवीन आहे. अनेक सुंदर मराठी शब्द न कळल्याने उत्तम लिखाण तुटक वाटते. कालांतराने सवय नक्कीच होईल. पण अनेक नवीन लोक सवय होण्याची वाट न पाहता उपक्रमाला रामराम ठोकत असण्याची शक्यता आहे. निव्वळ वाचनाकरता देखील ते बहुदा पुन्हा इकडे फिरकत नसणार. याबद्दल आधी नक्कीच विचार झाला असणार.
अशा शब्दांवरून उंदीर फिरवल्यास ईंग्रजी शब्द दिसतील अशी व्यवस्था (किंवा तत्सम काही) करता येऊ शकेल का? येथील सदस्य जेंव्हा ते नवीन् होते तेंव्हा काय करायचे?

लेखनविषय: दुवे:

Comments

ऑन्लाईन डिक्शन-या व गुगल ट्रान्सलेटर

मराठी शब्द न कळल्यास अनेक ऑन्लाईन डिक्शन-या व गुगल ट्रान्सलेटर वापरुन सुरुवात करता येइल, असे वाटले. येथे तुम्ही सुचवलेला तांत्रिक बदल होइल किंवा कसे हे मी सांगु शकत नाही पण तोपर्यंत सोय हवी असल्यास वरील पर्याय सांगावेसे वाटले.

गुगल ट्रान्सलेटवर मराठी?

हिन्दी आहे हे माहीत आहे. मराठी पण आहे?
मराठी-ईंग्रजी अणी ईंग्रजी-मराठी शब्दकोशांचे दुवे कुठे मिळतील?

दुवा

दुवा

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

 
^ वर