उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
उपक्रमावर् स्पॅम् बॉट्स्?
Nile
October 27, 2010 - 4:09 am
नुकत्याच केलेल्या बदलांमुळे असेल्, पण् इथे स्पॅमबॉट्सना प्रवेश घेणे सहज शक्य झाले आहे का? गेल्या काही दिवसात अनेक् बॉट् सदृश सदस्य पाहिल्यासारखे वाटत आहे. मराठीत मजकुर् असण्याच्या अटीमुळी ते पोस्ट करु शकले नसावेत? संबंधितांनी कृपया लक्ष द्यावे.
नक्की कुणाला संपर्क करावा हे माहित् नसल्याने धागा काढला, धाग्याचे काम् झाल्यावर् तो काढावयास हरकत नाही.
दुवे:
Comments
शक्य
मला वाटले होते की वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये सदस्यत्व घेता येते की नाही ते सेवादात्यामार्फत तपासले जाते आहे परंतु हे आता खूप काळ चालू असल्यामुळे तुम्ही दिलेली शक्यताच मोठी वाटते.
सदस्यत्व स्वीकारण्याच्या प्रक्रियेत कॅपचा टाकणे हा सर्वोत्तम उपाय वाटतो.
उपक्रमाचा अविभाज्य भाग
पण मला वाटत होते स्प्यामबॉटस् हा उपक्रमाचा अविभाज्य भाग आहे. आणि मराठीसुद्धा त्यांना लिहीता येते.
:)
असा खराच बॉट अल्गोरिदम लिहिणे आज शक्य आहे. त्यात थोडी आभासी यदृच्छाही घालता येईल. परंतु त्याचे दोन इन्स्टंस बनविले तर ते बॉटकर्त्याचे (किंवा एकमेकांचे) डुप्लिकेट आयडी म्हणता येतील काय?
जर
जर एक बॉट दुसर्या बॉटच्या लेखाला "वा, वा! आणखी येऊ द्या!" म्हणत असेल तर असे नक्कीच म्हणता येईल. :)
--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/
रामराज्य
-"वा, वा! आणखी येऊ द्या!" - नाही ,नाही! ते एव्हढेच नाही करत, ते पुण्या-मुंबईतल्या मध्यमवर्गातील कृती-षंढत्व घालवन्ञाचा एक्कलमी कार्यक्रम राबवतात. त्यांना वाटते की, असे केल्याने भारत भ्रष्टाचार मुक्त होऊन रामराज्य अवतरेल.
रामराज्य अवतरेल.
कृती-षंढत्व घालवन्ञाचा एक्कलमी कार्यक्रम राबवतात. याचा अर्थ षंढत्व मान्य तर आहे हे हि काय कमी आहे. का आपणास भ्रष्ट्राचार मुक्त भारत होणे आवडणार नाही? फक्त परदेशाचे गुण गात किती दिवस घालवणार .होय आम्ही भ्रष्ट्राचार मुक्त भारत घडवू असे आपणास का वाटत नाही. कि भ्रष्ट्राचारी व्यवस्थेचे गुलाम झाल्या मुळे विवश आहात. स्वता:ची बायको स्वत:च्या मोठेपणासाठी वनवासात पाठवणार्याचे रामराज्य आम्हाला नको.
thanthanpal.blogspot.com
डुप्लिकेट
एकच आयडी स्प्लिट पर्सनॅलिटी असणारा असेल तर? ह्यालाही डुप्लिकेट आयडीचाच प्रकार म्हणायचे का? की डुप्लिकेट सदस्य म्हणायचे?
काही मजकूर संपादित. कृपया आपले लेखन उपक्रम च्या लेखनविषयक धोरणाशी सुसंगत असेल याची काळजी घ्यावी.
असे आहे होय!
माझ्या डोक्यात स्प्यामबॉटची शक्यता आली नव्हती. मला वाटले आपले नेहेमीचेच यशस्वी दशावतारी कलाकार. :)
--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/
मला ही असेच वाटले होते.
मला ही असेच वाटले होते.
सहमत
मलाही
मलाही
मलाही
बॉट आहे की
बॉट आहे की माणूस हे ओळखायचे कसे?
बरीच माणसेही प्रतिसाद न देता वावरत असतात. :)
--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/
निकष
निकष पुष्कळ आहेत्, तो एखाद्या विवेचनपर लेखाचा विषय होउ शकतो. ;-)
तुर्तास हे दशावतार नाहीत. (इतक्यानेच बरेच सुटकेचे निश्वास सुटतील) ;-)
-Nile
कल्पना नाही
याबद्दल साशंक आहे. दशावतारांची संख्या बॉट संख्येशी कंपेरेबल आहे. :)
सुधारणा : आणि जर संख्या कमी असली तरी एक दशावतार सौ बॉट्स के बराबर आहे. :)
--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/
शत्रू
हा मला शत्रू पक्ष/राष्ट्र/कंपू यांचा कावा वाटतो. ;-)
शक्य
शत्रू संस्थळाचा कावा असण्याची काही शक्यता?
त्याआधी
त्या आधी शत्रू संस्थळ कोणते? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून माझ्यातर्फे पास. ;-)
नाही
अज्ञात हल्लेखोरांविरुद्धसुद्धा एफ आय आर दाखल करता येतो. पूर्वी नाही का चित्रपटांत केवळ दुश्मन देश असा उल्लेख असे, तसे काहीतरी सूचक :)