कन्फेशन बॉक्सचा सदुपयोग (?)

ख्रिश्चन धर्मात "कंफेशन बूथ" म्हणून एक प्रकार असतो. तिथे जाऊन लोक आपण केलेल्या कुकर्माची/पापाची कबुली देत असतात. पलिकडे बसलेला धर्मगुरू हे सगळे ऐकत असतो.
कदाचित भूतकाळातल्या आपल्या दुष्कर्माचे देवासमोर प्रायश्चित्त घेतल्याचे समाधान भाविकास मिळत असेल. मनावरील ओझ्याचा, दडपणाचा निचरा होत असेल. आणखी काही मानसिक फायदे त्यामुळे होत असतीलही.
आपला विषय तो नाही.

माझा प्रश्न असा आहे, की पलीकडे बसलेल्या धर्मगुरूने व्यापक समाजहितासाठी ती माहिती "लीक" करावी का?

समजा, एखादा अट्टल गुन्हेगार आहे, जो बराच काळपासून पोलिसांना हवा आहे. तो मिळाला तर आणखी अनेक गुन्हे उघडकीस येणार आहेत. अशा वेळी मिळालेली माहिती त्या पोपने पोलिसांना सांगायला हवी की नको?

थोडक्यात-
एखाद्याचा अतूट विश्वास/श्रद्धा/सद्भावना आणि एखाद्या व्यक्तीचे किंवा समाजाचे हित यात निवड करण्याची वेळ आली तर कशाची निवड होणे जास्त योग्य आहे?

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगला प्रश्न

हा मुद्दा केवळ अतूट विश्वास/श्रद्धा/सद्भावना यांच्याइतका मर्यादित वाटत नाही. या विषयावर समाज ऍड-हॉक नैतिकता ठरवितो. उदा., डॉक्टरांवर तुम्ही सुचविता तसे बंधन (इतरांच्या हितासाठी रुग्णाची माहिती फोडावी) आहे परंतु वकिलांवर उलटे बंधन (अशिलाचा काहीही तोटा करू नये) आहे.

'पोप' ऐवजी तुम्हाला 'पाद्री' म्हणायचे असावे.

आय कन्फेस

"आय कन्फेस" या चित्रपटात हा प्रकार चांगला हाताळला होता हे आठवले. अमिताभ बच्चनचा एक चित्रपट असाच संदर्भ घेऊन आला होता हे देखील आठवले.

मला वाटते कन्फेशन हा प्रकार केवळ रोमन कॅथलीक्स मधेच असतो. तसेच त्यात पाद्री कोण कन्फेशन करत आहे हे पहात नाही अथवा त्याचे नाव विचारत नाही.

बाकी अट्टल गुन्हेगार हा आधीच ख्रिस्ती धर्मातील तत्वे मोडत असतो, त्यामुळे तो कशाला जाऊन खरे कन्फेशन करेल असे देखील वाटते.

धन्यवाद

धाग्याबद्दल अनेक आभार.

आपल्या मनात अशी शंका का आली? जिथं श्रद्धा असते, तीथं शंका नसते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या धर्माने सांगितलेल्या पद्धतीचा आपल्या पापक्षालनाच्या पद्धतीचे अवलंब करते, तेव्हा तीचे मन शंकेखोर नक्कीच नसते. आणि जेव्हा मन शंकेखोर नसते तेव्हाच ते आपल्या मनाचे दरवाजे सताड उघडते. मनाचे दरवाजे सताड उघडल्यानंतरच आपल्या हातून झालेली कृत्ये माणूस आपल्या तोंडाने कबूल करतो, मनातले ओकून मन स्वच्छ करतो. माझ्या मते कंन्फेशन बॉक्स ची पद्धत, आपली पापं सांगण्यासाठी नसावी ती कदाचित आपले मन शंकेखोर न होता सश्रद्ध होवून आपल्या मनातूनच उत्तरं शोधण्यासाठी असावी.

जेव्हा एखादी व्यक्ती आपलं मन सताड उघडं करतं तेव्हा समोरच्या व्यक्तीला ही आपलं मन मोठ्ठं करूनच त्याचं/तीचं एकून घ्यावं लागतं. त्या व्यक्तीच्या मनातलं जाणून त्याचा वापर इतर कोणत्या गोष्टीसाठी करायचा विचार जरी त्याक्षणी वा त्यानंतर आणला तर ते एकून घेण्यार्‍यालाच त्याचा भयानक त्रास होऊ शकतो. (अशा नाजूक क्षणी दोन मने एकमेकांसमोरील आरश्यातील अनेक प्रतिबिंबासारखे असते.) हे असे असे इतर नियम पाद्रींना शिकवले जात असावेत, त्यानंतरच ते पाद्री होतात. त्यामुळेच तुमची शंका निराधार वाटते.

"पाद्र्यांना काही नियम शिकविले जातात म्हणून ते असे वागतात" हे जरी मान्य केले तरी "त्या शिकवणुकीला 'योग्य' म्हणावे काय? का?" हा शाहिस्तेखान उर्फ ज्ञानेश... यांचा प्रश्न आहे.

चर्चेत तुम्ही तुमचे मत मांडले होते नां? मग हा प्रतिसाद कशासाठी?

रिटे.
तुम्हाला प्रत्येक चर्चेत 'अँकरींग' करण्याची खूप आवड आहे. चांगली गोश्ट आहे.

"जेव्हा एखादी व्यक्ती आपलं मन सताड उघडं करतं तेव्हा समोरच्या व्यक्तीला ही आपलं मन मोठ्ठं करूनच त्याचं/तीचं एकून घ्यावं लागतं. त्या व्यक्तीच्या मनातलं जाणून त्याचा वापर इतर कोणत्या गोष्टीसाठी करायचा विचार जरी त्याक्षणी वा त्यानंतर आणला तर ते एकून घेण्यार्‍यालाच त्याचा भयानक त्रास होऊ शकतो. (अशा नाजूक क्षणी दोन मने एकमेकांसमोरील आरश्यातील अनेक प्रतिबिंबासारखे असते.)"
हा नियम केवळ वाचू नका त्यात काय लिहीलंय ते समजून घ्या, आकलून घ्या. नसेल समजत तर तुमची आकलन शक्ती कमी आहे अशी धारणा तुम्ही कायमची करून घ्या!
तुम्ही नेहमीच डोंगराच्या पायथ्याच्याशी असलेल्या पायर्‍यांकडे पहाता, 'डोंगराच्या कळसाकडे'* तुम्ही पाहू शकत नाहीत, आणि म्हणूनच तुम्ही तिथे* पोहचू शकत नाहीत.

:)

"जेव्हा एखादी व्यक्ती आपलं मन सताड उघडं करतं तेव्हा समोरच्या व्यक्तीला ही आपलं मन मोठ्ठं करूनच त्याचं/तीचं एकून घ्यावं लागतं. त्या व्यक्तीच्या मनातलं जाणून त्याचा वापर इतर कोणत्या गोष्टीसाठी करायचा विचार जरी त्याक्षणी वा त्यानंतर आणला तर ते एकून घेण्यार्‍यालाच त्याचा भयानक त्रास होऊ शकतो. (अशा नाजूक क्षणी दोन मने एकमेकांसमोरील आरश्यातील अनेक प्रतिबिंबासारखे असते.)"

मला सगळं समजतं. तुम्ही सांगता की "पाद्र्यांची मनोवृत्ती अशी बनविली जाते की गुपिते फोडली तर त्यांना भयानक मानसिक त्रास होईल". परंतु प्रश्न असा आहे की "पाद्र्यांची मनोवृत्ती अशी बनविण्यास 'योग्य' म्हणावे काय? का? १९८४ मधील ओ-ब्रायनला काहीही मानसिक त्रास झाल्याचे नमूद नाही. तशा मनोवृत्तीचे लोक पाद्री म्हणून नेमावे काय?" (तुमची आकलनशक्ती कमी आहे अशी माझी धारणा असली तरी ती मी कायमची करून घेतलेली नाही त्यामुळे पुन्हापुन्हा वेगवेगळ्या मार्गांनी मी प्रश्न समजावून देण्याचा प्रयत्न करतो आहे.) "समोरच्या व्यक्तीला ही आपलं मन मोठ्ठं करूनच त्याचं/तीचं एकून घ्यावं लागतं." हे विधान निराधार आहे. विश्वासघात करणे शक्य असते, त्यासाठी उपजत मानसिकता किंवा प्रशिक्षण लागते.

सविस्तर प्रतिसादाची वाट पाहत आहे.

विश्वासघात करणे शक्य असते, त्यासाठी उपजत मानसिकता किंवा प्रशिक्षण लागते.

तुम्ही आतापर्यंत कितीजणांचा विश्वासघात केलेला आहे? त्यासाठी 'तुमच्यात उपजत मानसिकता आहे' असे तुम्हाला ठाम वाटते का? किंवा तुम्ही त्याचे प्रशिक्शण कोठून घेतले? कृपया याबद्दल मला सविस्तर माहिती हवी आहे. जग खूप मोठं असतं. आणी म्हणूनच माझे अनुभवातून व्यक्त केलेले विधान खरचं निराधार आहे कि नाही याची देखील मला चाचपणी करता येईल.

सतीश रावले

:)

तुम्ही आतापर्यंत कितीजणांचा विश्वासघात केलेला आहे?

०. (ट्रस्ट मी :D)

त्यासाठी 'तुमच्यात उपजत मानसिकता आहे' असे तुम्हाला ठाम वाटते का?

नाही. (ट्रस्ट मी :D)

किंवा तुम्ही त्याचे प्रशिक्शण कोठून घेतले?

प्रशिक्षणही नाही. (ट्रस्ट मी :D)
--------
विश्वासघाताची कितीतरी उदाहरणे आहेत. भले नंतर विश्वासघातक्याला त्रास होतही असेल, परंतु विश्वासघात केला जातो हे नक्की. अन्यथा त्याला सर्वात मोठे पाप ठरवून मोठ्ठ्या शिक्षेची भीती घालावी लागली नसती, शुकबहात्तरी, काकोलुकीय, इ. लिहिलीच गेली नसती.

चल खेळ खेळू दोघं! तुझी तंगडी माझ्या हातात....!

दोन ही प्रतिसादासाठीचे नाव देताना तुम्ही स्मीतहास्य दाखवले आहे. हे स्मीतहास्य का टाकलेले आहे?
त्याचा अर्थ काय? ह्या विदूशकी हास्याच्या मागे कोणता चेहरा आहे?
1)
तुमच्या मला उल्लेखून वरील प्रतिसादात तुम्ही म्हणत आहात,- (तुमची आकलनशक्ती कमी आहे अशी माझी धारणा असली तरी ती मी कायमची करून घेतलेली नाही त्यामुळे पुन्हापुन्हा वेगवेगळ्या मार्गांनी मी प्रश्न समजावून देण्याचा प्रयत्न करतो आहे.)
ठिक आहे मग आता कोणाची आकलन शक्ती कमी आहे ह्या वर खेळूया.

चर्चेचा विशय आहे 'कन्फेशन बॉक्स'.
तुम्ही ह्या संकेतस्थळावर आतापर्यंत प्रत्येकाच्या लिखाणातील अर्थाकलनासाठीच्या निम्न स्तरावरील चूका शोधून चर्चा भरकटवत नेता. तसे करून तुमचे मनोरंजन होते. चांगली गोश्ट आहे. पण तुम्ही जसे येथे मनोरंजन करायला येता, तसेच दुसरे देखील मनोरंजन करायला येतातच ना! अब मेरी बारी है!

2) तुम्ही माझे विधान चूक व निराधार आहे असे म्हणत आहात.
"समोरच्या व्यक्तीला ही आपलं मन मोठ्ठं करूनच त्याचं/तीचं एकून घ्यावं लागतं." हे विधान निराधार आहे.
हे विधान निराधार आहे असे केवळ तुम्ही लिहीले आहे. त्याबाबत स्पश्टीकरण दिलेले नाही. मी तुम्हाला सविस्तर प्रतिसाद द्या असे म्हटले होते. तुम्ही तसा दिला आहे का?
उत्तर द्या.
3)
तुमचा ह्या क्शणापर्यंत (मंगळ, 10/26/2010 - 18:27) च्या प्रतिसादानुसार तुम्हाला 'विश्वासघाताचा' प्रत्यक्श अनुभव नाही. (खरे कि खोटे माहित नाही.) म्हणजे तुम्ही माझे जे विधान निराधार आहे असे म्हटले त्या आक्शेपाला अर्थ नाही. असेच म्हणावे लागेल.
'शुकबहात्तरी, काकोलुकीय, इ. लिहिलीच गेली नसती.'
हे वाचून कळू शकते कि तुम्ही केवळ पुस्तक वाचून पोपटपंची करता. पुस्तकात लिहीलेलं कोठून येतं? हे आपल्याला माहित आहे का?
असो!
मी वरील पुस्तके वाचलेली नाहीत. तुम्ही ती वाचलेली आहेत असे तुम्ही तुमच्या प्रतिसादातून त्यांचा आधार घेत तुम्ही म्हणत आहात. तेव्हा कृपया ह्या दोन पुस्तकावर सविस्तर लेख लिहून तुम्हाला ती कशी व किती आकळली आहेत हे दाखवून द्या.

मुद्दा क्रमांक 1 व 2 ची 'सविस्तर उत्तरे' येथेच द्या. 3 च्या बाबत तुमच्या 'सविस्तर लेखाची' वाट पाहत आहे. हि दोन कामे केल्याशिवाय दुसरी कोणत्याही चर्चेत सहभागी होवू नका. उगीचच तुम्हाला मानसिक त्रास होईल.

:)

दोन ही प्रतिसादासाठीचे नाव देताना तुम्ही स्मीतहास्य दाखवले आहे. हे स्मीतहास्य का टाकलेले आहे?
त्याचा अर्थ काय?

तुमचे लिखाण हास्यास्पद वाटले म्हणून!

ह्या विदूशकी हास्याच्या मागे कोणता चेहरा आहे?

निरागस.

तुम्ही ह्या संकेतस्थळावर आतापर्यंत प्रत्येकाच्या लिखाणातील अर्थाकलनासाठीच्या निम्न स्तरावरील चूका शोधून चर्चा भरकटवत नेता. तसे करून तुमचे मनोरंजन होते.

आरोप नामंजूर.

2) तुम्ही माझे विधान चूक व निराधार आहे असे म्हणत आहात.
"समोरच्या व्यक्तीला ही आपलं मन मोठ्ठं करूनच त्याचं/तीचं एकून घ्यावं लागतं." हे विधान निराधार आहे.
हे विधान निराधार आहे असे केवळ तुम्ही लिहीले आहे. त्याबाबत स्पश्टीकरण दिलेले नाही. मी तुम्हाला सविस्तर प्रतिसाद द्या असे म्हटले होते. तुम्ही तसा दिला आहे का?

तुम्हाला "तुम्ही आतापर्यंत कितीजणांचा विश्वासघात केलेला आहे? त्यासाठी 'तुमच्यात उपजत मानसिकता आहे' असे तुम्हाला ठाम वाटते का? किंवा तुम्ही त्याचे प्रशिक्शण कोठून घेतले?" याविषयी सविस्तर माहिती हवी होती. जर मला उपजत ज्ञान असते किंवा प्रशिक्षण घेतलेले असते तर सविस्तर माहिती देता आली असती. तुम्ही निराधारतेविषयी स्पष्टीकरण मागितलेलेच नव्हते.

तुमचा ह्या क्शणापर्यंत (मंगळ, 10/26/2010 - 18:27) च्या प्रतिसादानुसार तुम्हाला 'विश्वासघाताचा' प्रत्यक्श अनुभव नाही. (खरे कि खोटे माहित नाही.) म्हणजे तुम्ही माझे जे विधान निराधार आहे असे म्हटले त्या आक्शेपाला अर्थ नाही. असेच म्हणावे लागेल.

असहमत. त्या विधानाची सार्वत्रिकता सिद्ध करणारा पुरावा देण्याची तुमची जवाबदारी तुम्ही पार पाडेपर्यंत ते विधान निराधार राहते. मानसिक त्रास न होणारी एकजरी व्यक्ती मला सापडली तरी तुमचे विधान असत्य ठरते.

हे वाचून कळू शकते कि तुम्ही केवळ पुस्तक वाचून पोपटपंची करता.

मी तसे करीत नाही. मी त्यांच्या विधानांवर स्वत:ची अक्कल वापरून निष्कर्ष काढतो.

पुस्तकात लिहीलेलं कोठून येतं? हे आपल्याला माहित आहे का?

मी त्या पुस्तकांमधील विधानांचा आधार घेत नाही आहे. परंतु, विश्वासघाताविषयी पुस्तके लिहिली गेली म्हणजे जगात विश्वासघात केला जातो (भले मग विश्वासघातक्यांना मानसिक त्रास होत असेल किंवा नसेल). कृपया , ही उदाहरणे पहा. किमान २% लोकांना मानसिक त्रास होत नाही.

हि दोन कामे केल्याशिवाय दुसरी कोणत्याही चर्चेत सहभागी होवू नका. उगीचच तुम्हाला मानसिक त्रास होईल.

इतर चर्चांमध्ये भाग घेऊन मग येथे आलो आहे, मला काहीही मानसिक त्रास झालेला नाही.

:)

तुम्ही निरागस आहात हे आम्ही कशावरून समजावे?
चर्चा कंफेशन बॉक्स बाबत आहे पण तुम्ही भलतेच काहीतरी बोलत आहात. तुम्हाला असे का करत असाल असे तुम्हाला वाटते?

तुम्ही ह्याचर्चेच्या बाबतीत कोणतेही रास्त मत मांडलेले नाही. म्हणून मी पुन्हा चर्चेबाबतच बोलतो.

हा मुद्दा केवळ अतूट विश्वास/श्रद्धा/सद्भावना यांच्याइतका मर्यादित वाटत नाही. या विषयावर समाज ऍड-हॉक नैतिकता ठरवितो. उदा., डॉक्टरांवर तुम्ही सुचविता तसे बंधन (इतरांच्या हितासाठी रुग्णाची माहिती फोडावी) आहे परंतु वकिलांवर उलटे बंधन (अशिलाचा काहीही तोटा करू नये) आहे.
जे वरील मत आपण मांडलेले आहे त्यात कोणतीही गोश्ट स्पश्ट केलेली नाही.
म्हणजे 'अतूट विश्वास/श्रद्धा/सद्भावना यांच्याइतका मर्यादित वाटत नाही.' ह्या वाक्याचा अर्थ काय? ह्या तीनही गोश्टी 'कंफेशन बॉक्स'च्या विशयापेक्शा मर्यादित कशा काय? ह्यावर कृपया सविस्तर स्पश्टीकरण द्या.

ऍड-हॉक नैतिकता म्हणजे काय? दिलेली उदाहरणे अजून स्पश्ट कराल का? ह्याचा लेखी पुरावा कुठे-कुठे आहे ह्याचा पुरावा देखील द्या.

मी तसे करीत नाही. मी त्यांच्या विधानांवर स्वत:ची अक्कल वापरून निष्कर्ष काढतो.
माझे विधान निराधार आहे असे तुम्ही म्हणता. पण ते निराधार कसे? हे तुम्ही कशाच्या आधारावर ठरवले. ते सविस्तर व जमल्यास उदाहरण देवून स्पश्ट करा.

इतर चर्चांमध्ये भाग घेऊन मग येथे आलो आहे, मला काहीही मानसिक त्रास झालेला नाही.
होणार नक्की होणार. ते स्लोपॉयजन आहे. तुम्ही दुसर्‍या चर्चेत भाग घेतला हे मी पाहिले आहे पण तुमचे प्रतिसाद नेहमी सारखे नव्हते. तुम्हाला मानसिक त्रास होणे चालू झालेले आहे हे तुमच्या तेथील प्रतिसादासावरून ओळखता येतय.

खी खी

चांगली चर्चा सुरू आहे. रावले यांचे शुद्धलेखनही बरे झाल्यासारखे वाटते. तेवढा श चा ष केला की त्यांना पूर्णपणे शुद्ध लिहिता येईल.

खुलासा

चर्चा कंफेशन बॉक्स बाबत आहे पण तुम्ही भलतेच काहीतरी बोलत आहात. तुम्हाला असे का करत असाल असे तुम्हाला वाटते?

चर्चा कन्फेशन-बॉक्सशी संबंधित विश्वासघाताबाबत आहे आणि मी विषयांतर केलेले नाही.

जे वरील मत आपण मांडलेले आहे त्यात कोणतीही गोश्ट स्पश्ट केलेली नाही.
म्हणजे 'अतूट विश्वास/श्रद्धा/सद्भावना यांच्याइतका मर्यादित वाटत नाही.' ह्या वाक्याचा अर्थ काय? ह्या तीनही गोश्टी 'कंफेशन बॉक्स'च्या विशयापेक्शा मर्यादित कशा काय? ह्यावर कृपया सविस्तर स्पश्टीकरण द्या.

वकिलाकडे अशील मन सताड उघडे करतो तेव्हा त्याला अतूट विश्वास असतो की वकील आपली माहिती फोडणार नाही. परंतु ही खात्री होण्यामागे तो सद्भावना गृहीत धरीत नाही. वकिलाने माहिती फोडली तर त्याला शिक्षा होईल असे त्याला माहिती असते. त्याचप्रमाणे पाद्र्याने माहिती फोडली तर त्याला पाप लागेल असे लोकांना माहिती असते म्हणून ते पाद्र्याकडे मन उघडे करतात. परंतु तेथेही पाद्र्याच्या ठिकाणी सद्भावना असल्याचे गृहीत धरणे आवश्यक नसते. धनंजय यांनी दिल्याप्रमाणे एखाद्या पाद्र्याने गुपिते फोडली तर काही काळाने लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत.

ऍड-हॉक नैतिकता म्हणजे काय? दिलेली उदाहरणे अजून स्पश्ट कराल का? ह्याचा लेखी पुरावा कुठे-कुठे आहे ह्याचा पुरावा देखील द्या.

ऍड हॉक नैतिकता म्हणजे एकसूत्रीपणा नसलेली नैतिकता. वकिलांना एक नियम आहे आणि डॉक्टरांना दुसरा नियम आहे म्हणजे या दोन्हींमागे एकसमान विचार केलेला नाही.

माझे विधान निराधार आहे असे तुम्ही म्हणता. पण ते निराधार कसे? हे तुम्ही कशाच्या आधारावर ठरवले. ते सविस्तर व जमल्यास उदाहरण देवून स्पश्ट करा.

"विश्वासघात करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला मानसिक त्रास होतोच" हे तुमचे विधान तुम्ही सिद्ध केले नाहीत तोवर निराधार राहते, त्याला निराधार ठरविण्यासाठी अतिरिक्त आधाराची आवश्यकता नाही.

होणार नक्की होणार. ते स्लोपॉयजन आहे. तुम्ही दुसर्‍या चर्चेत भाग घेतला हे मी पाहिले आहे पण तुमचे प्रतिसाद नेहमी सारखे नव्हते. तुम्हाला मानसिक त्रास होणे चालू झालेले आहे हे तुमच्या तेथील प्रतिसादासावरून ओळखता येतय.

:)

तो मीच !

तिथला 'शाहिस्तेखान' मीच आहे, हे नम्रपणे नमूद (कबूल !!) करतो.

मनात रावलेंची भीती होतीच, ती खरी ठरली !
रावलेंच्या स्मरणशक्तीला कुर्निसात. (;-)

माहीत नाही

एखाद्याचा तूट विश्वास/श्रद्धा/सद्भावना आणि एखाद्या व्यक्तीचे किंवा समाजाचे हित यात निवड करण्याची वेळ आली तर कशाची निवड होणे जास्त योग्य आहे?

बहुधा हा शब्दखेळ आहे. "अ"तूट असेल तर तुटणार नाही आणि "निवड" आहे तर तुटू शकेल असे अध्याहृत आहे. असल्या प्रकारचे शब्दखेळ लहानपणी खेळायला मजा येते.
अनावर बल अचल पिंडावर कार्यरत झाले तर काय होईल? (इर्रेझिस्टिबल फोर्स पॅरॅडॉक्स) वगैरे.

नियम काही का असेना, वागणे अनुमानधपक्याने, प्रसंगावधानाने असेल असे वाटते. पाद्री जर अधूनमधून पोलिसांना माहिती पुरवतो, हे समाजात ठाऊक झाले, तर भविष्यातले अपराधी पाद्र्याला कबुली देणार नाहीत.

अशा प्रकारचा प्रश्न पुरता ऐहिक सुद्धा असू शकतो.

यू.एस. कायद्यात "स्वतःचा अपराध कबूल करणारी साक्ष" देण्यापासून व्यक्तीला ऐच्छिक सूट असते. (यू. एस. केंद्रीय घटनेची पाचवी दुरुस्ती.) युद्धाबाहेरचा गुन्हा किती का गर्हणीय, देहांतशासन लागू करण्यालायक का असेना. याचा इतिहास बघता प्रत्यक्षात असा अर्थ लावला जातो, की गुन्हा कबूल करणारी साक्ष देण्यास भाग पाडले, तर त्या साक्षीच्या आधारावर शिक्षा होऊ शकत नाही. शासन अशा प्रकारचे अभयवचन देते.

अशा प्रकारे साक्ष मिळवून त्याहून मोठ्या गुन्हेगारांना पकडता येईल, वगैरे धोरण सरकारी वकील बघून घेतात.

आता एका कोर्टात अशा प्रकारे "शिक्षा करणार नाही" असे वचन देऊन गुन्हाच्या कबुलीची साक्ष घेतली, तर ती साक्ष पोलिसांनी वापरावी काय? उदाहरणार्थ "अमुक एक खून केला" ही साक्ष ऐकून "त्याच हत्याराने दुसरा खून झाला होता", त्याबद्दल या माणसावर आरोप आणावा काय? तर साक्षीवरून असे करता येत नाही. साक्षीपेक्षा पूर्णपणे स्वतंत्र पुरावे मिळवूनच त्या दुसर्‍या खुनाचा तपास करता येतो, अटक करता येते. आणि एकदा का साक्ष प्रसिद्ध झाली की "पूर्णपणे स्वतंत्र पुरावा नाही" असे पुढच्या खटल्यातल्या न्यायाधीशाला पटवणे आरोपीला सहज शक्य होते. म्हणूनच अशा प्रकारचे अभयदान सरकारी वकील क्वचितच देतात.

मात्र जर पहिल्या साक्षीसाठी अभयदान दिले, तर ते अभयदान काढून टाकता येत नाही (नियमानुसार). प्रत्यक्षात "हा प्रसंग म्हणजे युद्धच मानले पाहिजे" वगैरे विशेष अपवाद करून प्रसंगाप्रमाणे नियमांना कधीकधी मुरड घालतही असावेत.

(सामांतर्य काय आहे? पाद्री भाविकाला "तुझे म्हणणे कुणाला सांगणार नाही" असे अभयदान देतो. त्याप्रमाणे शासनाचा एक अधिकारी "साक्ष तुझ्याविरुद्ध वापरली जाणार नाही" असे अभयदान देतो. दोन्ही बाबतीत "समाजहितासाठी अभयदान भंगावे काय?" असा प्रश्न उभा राहातो. वगैरे.)

साक्ष

एकदम टिळकांच्या चुगली प्रकरणाची आठवण झाली.

कबुलीजवाबाच्या आधारे शिक्षा देता येत नाही हे बहुधा सर्वच देशांच्या कायद्यात मान्य आहे. जरी कबुली जवाब दिला असला तरीही पोलीसांना त्याने गुन्हा केल्याचे इतर पुराव्यांनी सिद्ध करावेच लागते.

माफीच्या साक्षीदाराला मात्र शिक्षेतूनही सूट मिळत असावी.

नितिन थत्ते

खरंच?

माफीच्या साक्षीदाराला मात्र शिक्षेतूनही सूट मिळत असावी.

(सुचना: खालील उदाहरण काल्पनिक आहे.)

समजा, राग हा सूड उगवूनच शांत करता येतो, असा माझा समज आहे. माझं एका कॉलीजकालीन-मित्राशी काही वैयक्तिक कारणांतून उद्‍भवलेलं (एका मुलीमुळे घडलेलं—२० वर्षे होताहेत) खूप जुनं वैर (द्वेषात्मक अन् तणावयुक्त शित-भांडण) आहे. जरी त्याच्याही मनात माझ्याबद्दल कटू द्वेषाची भावना अजुनही सलत असली तरी प्रत्यक्षात मात्र ते वैर घडल्यापासूनच्या काळापासून आमच्या दोघांमध्ये कसलेही भांडण झालेले नाही वा तसे वर्तन आजपर्यंत केलेले नाही, जरी कधी-मधी दोघांची भेट होत राहतेच. दोघंही आयटी क्षेत्रात उच्चभ्रू पदांवर स्थित आहोत. ज्या मुलीमुळे आमच्यांत भांडण झालं होतं, कारण—प्रेम-त्रिकोण; ती मुलगी त्याची बायको आहे. भांडणं मुळात शाब्दिक चकमक जरी असली तरी त्यातून एकमेकाबंद्दल द्वेषाच्या अनेक ठिणग्या आम्हा दोघांमध्ये संचारल्या व त्या द्वेषाग्निचा भडका आजवर आम्ही दोघांनी उडू दिलेला नाहिये. भांडणात मी त्याला बोलून गेलो होतो की ती जर माझी नाही झाली तर मी माझा सूड उगवेन म्हणून... या काळापासून त्याचा मनात माझ्याबद्दल तीव्र चीड आहे, व तेव्हापासूनच आम्ही एकमेकांचे वैरी झालो. दोघांचेही जरी तीच्यावर तेव्हा प्रेम असले तरी त्याचे तीच्यावर व तीचे त्याच्यावर अधिक प्रेम होते, त्या प्रेमाचे रुपांतरण नंतर त्यांच्या लग्नात झाले. या घटनेमुळे माझ्यातील त्याच्याबद्दलचा द्वेषाग्नि आणखीणच भडकला. त्याची आता कायमची विल्हेवाट लावायची असा मी निर्धार केला आहे. त्याची बहुदा खात्री पटलेली असेल की मी त्याचे काहीच वाकडे करु शकत नाही किंवा जाणून-बुजूण करणार देखील नाही म्हणून! याच त्याच्या माझ्याबद्दलच्या विश्वासाचा मी विश्वासघात करण्याचे ठरवले आहे. मी त्याला काहीतरी आमिष दाखवून व ५०-५०% हिस्सा देण्याची कबूली देऊन माझ्या ऑफिसशेजारीच असलेल्या बँकेमध्ये तिजोरीपर्यंत पोहोचून ती लुटण्याच्या योजनेत त्याला सहभागी केले आहे. (लूट करण्याची योजना नेमकी काहीही असू शकते, येथे केवळ उदाहरण म्हणून काहीतरी देण्याचा मी प्रयत्न केला आहे.) त्याच्या हाती मी बंदूक दिलेली आहे. आम्ही लूट करतांना आम्हाला एक सुरक्षा-रक्षक पाहतो, मी माझ्या या मित्राला त्याला गोळी मारुन ठार करण्याचा आदेश देतो. भितीपोटी व वेळ अतिशय कमी असल्याने अनाहूतपणे तो त्या सुरक्षा-रक्षकाला ठार करतो. माझ्या प्लॅनप्रमाणे, प्लॅनमध्ये सहभागी असलेले पोलीस (माझ्याकडून आधीच पैसे खाल्लेले!) आम्हाला लूट करतांना रंगेहाथ पकडतात. पण योजनेनुसार मी त्याला तेथूनच पळ काढण्याची मुभा देतो. तो आता फरारी आहे. मी चोरी करतांना पकडलो गेलो असल्या कारणाने माझी न्यायालयात हजेरी चौकशी केली जाते. न्यायालयाने विचारल्यावर मी थोड्या खोट्या नाट्यानंतर माफीचा साक्षीदार होण्यास तयार होतो. मुळात चोरी झालेलीच नसते आणि खून देखील त्याने केलेला असतो व तो सध्या फरारी आहे, या बाबी पुढे करत मी स्वतः साक्ष देऊन व मला मिळालेल्या पोलीसांकरवी त्याच्या विरोधात न्यायालयात युक्तिवाद करतो.

आपणास काय वाटते, मी माफीचा साक्षीदार झाल्यामुळे माझी चोरी करण्याची शिक्षा न्यायालय माफ करुन माझी निर्दोष सुटका करेल काय? आणि माझा मित्र चोरी, खूण व फरारी (न्यायालयात हजेरी न लावणे) इत्यादी कारणांमुळे फासावर चढवला जाईल काय, कारण सर्व पुरावे व साक्षीदार त्याच्याच विरोधात आहेत?

जर असे झाले तर माझी सूड उगवण्याची इच्छा पूर्ण होईल व नंतर मी त्याच्या बायकोलासुद्धा आपले करुन घेऊ शकेल!

न्यायव्यवस्थेशी असा खेळ करणे, सोपे आहे का? किंवा यात काही अडचणी येतील अन् मीच गुंतल्या जाईल?

 
^ वर