परतीचा मॉन्सुन

परतीचा मॉन्सुन- एकदम झकास संज्ञा. ढग आले, भारतवर्षावर पाऊस वर्षाव करुन आता परत चालले आहेत असे चित्र डोळ्यासमोर रंगवले जाते. खरे म्हणजे, ह्यावर्षी जितका पाऊस पडला, त्यातील ५०% पेक्षा जास्त पाऊस बंगालच्या उपसागरातील ढगांमुळे झाला होता. आणि अजुनही हेच होते आहे.
दरवर्षी, उन्हाळ्यात जो वळीवाचा पाऊस पडतो, तो ही बंगालच्या उपसागरात झालेल्या चक्रीवादळाचा परीणाम असु शकतो. त्यामुळे बंगाली पाऊस हे नवे झेंगट नाही.

१५ ऑक्टोबरच्या आसपास, बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण झाले. कल्पना उपग्रहाचे फोटो जर तुम्ही पाहीले, तर सहज लक्षात येईल की, ते ढग महाराष्ट्राकडे पसरु लागले होते व त्यामुळे पावसाची शक्यता होतीच.
दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी जो पाऊस पडला तो "अचानक" आलेला पाऊस नव्हताच; अगदी सहजपणे प्रेडीक्ट करता येईल असा तो पाऊस होता. पण तशी शक्यता वर्तवलीच गेली नसल्याने, अनेक दुकानदारांचे नुकसान झाले, लोकही सणासाठी बाहेर पडले होते ते भिजले.

भारतातील हवामानाच्या अंदाजाविषयी केले जाणारे जोक खूप जुने आणि परंपरागत आहेत. पण आता आयएमडी सारख्या अनेक संस्था उपग्रहाचे फोटो उपलब्ध करुन देत असल्यामुळे थोड्या प्रयत्नाने व अभ्यासाने आपल्यापुरते अंदाज आपल्याला करता येतात.

Comments

येथे पाहू शकता...

अजुन पाऊस येणार

आज गोव्यात पाऊस चालू आहे

बीबीसी वेदर

मी बीबीसी वेदर ही वेबसाईट वापरते. पुढच्या पाच दिवसांपर्यंतचा अंदाज मिळतो जो आत्तापर्यंत मलातरी चुकीचा आढळलेला नाही. नकाशावर देश, राज्य, मोठी शहरं अशा खुणा नाहीत, पण इंटरनेट वापरत असताना आपण रहातो ती जागा खुणा न केलेल्या नकाशात अजिबात माहित नसणं भूषणास्पद नसावं.

झेपलं नाही

--पण इंटरनेट वापरत असताना आपण रहातो ती जागा खुणा न केलेल्या नकाशात अजिबात माहित नसणं भूषणास्पद नसावं-- झेपलं नाही- जरा समजावुन सांगा..

दीवाळीत पावसाची शक्यता आहे

दीवाळीत पावसाची शक्यता आहे- जर खालील प्रेशर ढगांना वर ढकलत राहीले तर.

पावसाची शक्यता आज दिवाळीला!

आसुरी आनंद

आमच्या इथेही आज हिमवर्षाव होण्याची दाट शक्यता आहे. ;-)

फटाके भिजले

सगळे फटाके भिजले पाहीजेत.

भिजतील भिजतील पण...

या काळात पडणारे हिम ओलसर असते त्यामुळे फटाके भिजतील अशी शक्यता आहेच पण नुकत्याच पाहिलेल्या हवामानानुसार संध्याकाळी ७ नंतर पाऊस/ हिम नाही.

येऽऽऽऽऽऽऽ!!!!

 
^ वर