चेहऱ्यांचे राजकारण..................

चेहरा म्हणजे काय ?
दोन डोळे, दोन कान, एक नाक, ओठ, गाल, कपाळ,
थोडी त्वचा, त्याच्या मागे रक्त-मांसाचा चिखल. सगळ्यांचा चिखल सारखाच, त्वचा जवळजवळ सारखीच, सर्व अवयव एक ठराविक प्रमाणात, तरीसुद्धा विधात्याने प्रत्येकाचा चेहरा वेगळा केला आहे. शाहरुख खान संपूर्ण देशाला भुलवतो, तिथेच क्रूर कसाबचा चेहरा समोर आले कि मनात संताप येतो. सर्व चित्रपट जग ह्या एक चेहऱ्यावरचा आपले पोट भरते. आजकाल नेते सुद्धा चेहरा वापरून अभिनय ह्याच एका गुणाने यशस्वी होऊ पाहतात. कामावर मालकासमोर क्षणोक्षणी हा चेहराच साथ देतो. रडणारे मुलसुद्धा आईचे केवळ तोंड बघूनच शांत होते. संपूर्ण देशाला इंग्रज विरुद्ध बंड करून उठविण्यास प्रवृत्त केले ते सुद्धा एक महान चेहर्यानेच. आज सुद्धा हा देह नतमस्तक होतो ते एका चेहर्यापुढेच. चेहऱ्याची हि महती मी काय वर्णावी ? माझे शब्द, माझे लेखन शुल्लक आहे.

चेहर्याबद्दल मिपाकरांच्या काय भावना आहेत. उपक्रमियांना काय वाटते ?

(काही पक्ष मात्र उगाचच ह्या चेहऱ्याच्या नावाने राजकारण करू इच्छितात त्यांच्याबद्दल न बोललेलेच बरे.)

लेखनविषय: दुवे:

Comments

मुखवट्याचा आक्शेप..............

चेहर्याबद्दल उपक्रमियांना काय वाटते ?

दिल को देखो
चेहरा ना देखो
चेहरोने लाखोंको (संख्या फसवीले गेलेल्यांची व पैशाचा आकडा) लुटा,
दिल सच्चा और चेहरा झुटा!!

भगवे कपडे खालून राजकारण करण्याएवजी थेट धर्मशास्त्री होवून, 'शरीरातून प्रसारीत होणारे तेज (समाजात वावरताना) झाकले की काय होते? त्याचे सामाजाला काय दुश्परीणाम भोगावे लागतात.' हा वीशय समाजाला मुद्द्यासहीत पटवून दिला गेला पाहीजे. नाहीतर, तशा आक्शेपाला अर्थ नाही.

या जगात काहीजण मुखवटा लावतात तर काही आपला चेहरा लपवतात.

लपवलेल्या चेहर्‍यांना मुखवठाधारींचा आक्शेप!

चर्चा प्रस्तावाला नाव मस्त दिले आहे. अभिनंदन!

अहाहा

>>>>मिपाकरांच्या काय भावना आहेत.
एक मिपाकर म्हणून मला असे वाटते की उपक्रमवर वावरणार्‍यांचे चेहरे मख्ख, गंभीर चेहर्‍यावर पुसटशी सुद्धा हास्याची रेषा नाही. सतत एका बंद खोलीत संशोधनासाठी मांडलेल्या कोर्‍या कागदावर आकडेमोड चालू आहे, त्यामुळे त्रासलेला चेहरा. बंद खोलीत वीज गेलेली असल्यामुळे दवबिंदूप्रमाणे चेहर्‍यावर ओघळणारे घामाचे थेंब. पण, चेहरा माणसाच्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो. [टाळ्या]तुमच्या मनातील भाव चेहर्‍यावरुन टीपता येतात. काहींचे चेहरे वाचता येत नाही. प्रश्नपत्रीकेतल्या अवघड प्रश्नासारखे त्याचे स्वरुप असते. बाकी, काही चेहरे हवेहवेसे वाटतात. काही चेहरे नुसते निरखावे वाटतात. काही चेहर्‍यांकडे पाहिल्यावर ताबडतोब तोंड फिरवावेसे वाटते.

-दिलीप बिरुटे
[प्रसन्न आणि हसमूख चेहरा असलेला]

चेहरा

[प्रसन्न आणि हसमूख चेहरा असलेला]

बर्‍याचदा अगदी घाई असल्यावर एखाद्याला सुलभ दिसावे आणि मग सुलभ मधुन बाहेर आल्यावर चेहरा प्रसन्न आणि हसमूख असावा असं वाटलं. असो, आता आम्ही सुलभ आणि कोणाची तुलना केली आहे समजु नका. कॄपया वैयक्तिक घेऊ नये.


या सर्व मुखवट्यात भोंगळ निधर्मीवादाचा , अहिंसावादाचा या दोन ....

जब भी जी चाहे नयी दुनिया बसा लेते है लोग एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग –
असे चेहरया चे राजकारण आहे. भगव्या चेहरया प्रमाणेच भोंगळ निधर्मीवादाचा , समाजवादाचा जातीयवादाचा , मानवतावादाचा. प्रामाणिकपणा( mr.clean politician) आणि जागतिक दहशदवादाचा त्याच बरोबर टोकाच्या अहिंसावादाचा सुद्धा असे अनेक मुखवटे भारतात आहेत . हे विविध मुखवटे असली चेहरा लपवण्यास वेळोवेळी उपयोगी पडतात. या सर्व मुखवट्यात भोंगळ निधर्मीवादाचा , अहिंसावादाचा या दोन मुखवट्या ची सध्या चलती आहे. हे दोन मुखवटे वापरले तर जनतेवर आपला भ्रष्ट्र चेहरा लपवून राज्य करता येते. हे गेल्या ६० वर्षात सिद्ध झाले आहे.
त्याच बरोबर एक कलावंताचा मुखवटा असतो जो प्रत्यक्ष जीवनातले दुख:लपविण्यास उपयोगात येतो. या मुखवट्यावर राजकपूर यांनी मेरा नाम जोकर मध्ये कहता है जोकर सारा ज़माना आधी हक़ीक़त, आधा फ़साना चष्मा उतारो फिर देखो यारों , दुनिया नही.....म्हणत सुंदर चित्रपट काढला पण या खोट्या मुखवट्याच्या जमान्यात हा चित्रपट त्या काळाच्या सिनेरसिकांना मात्र फारसा भावला नाही. हे सत्य वेगळे .

मुखवटा

ठणठणपाळ यांना ६० व ६५ एवढेच आकडे माहिती आहेत असे दिसते.

गेल्या दहा वर्षांपासून धर्मांध चेहर्‍यावर विकासवादाचा मुखवटा चढवलेल्यांची पण चलती सुरू झाली आहे.

नितिन थत्ते

विनंती.

एवढ्या मुश्किलीने, (कधी नव्हे ते) एक कलात्मक धागा काढूया म्हणालो, तर तिथे सुद्धा राजकारण.
(छ्या... आमच्या कळफलकातच काय तरी मिस्टेक हाय.)

शिर्षक

एवढ्या मुश्किलीने, (कधी नव्हे ते) एक कलात्मक धागा काढूया म्हणालो, तर तिथे सुद्धा राजकारण.

कारण शिर्षकात पण राजकारण आहे. ;)

विकासवादाचा मुखवटा....भारताशी याचा कांही संबंध नाही

ठणठणपाळ यांना ६० व ६५ एवढेच आकडे माहिती आहेत असे दिसते.

गेल्या दहा वर्षांपासून धर्मांध चेहर्‍यावर विकासवादाचा मुखवटा चढवलेल्यांची पण चलती सुरू झाली आहे.

गेल्या ६०-६५ वर्षाच्या पापाचे धर्मांध चेहरा हे फळ आहे. आणि विकासवादाचा मुखवटा हा फक्त INDIA करता फायद्याचा आहे भारताशी याचा कांही संबंध नाही.

म्हणजे

चेहर्याबद्दल मिपाकरांच्या काय भावना आहेत.

म्हणजे काय? जे मिपाकर उपक्रमी आहेत त्यांच्या काय भावना आहेत?

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

३ चेहरे

गांधीवादी ह्यांचे अभिनंदन. खूप वेगळा विषय आहे. चेहरा हा विषय निघाला की, मला पुढील ३ चेहरे आठवतात-

 
^ वर