हिंदुस्थानी रागदारी संगीत

राम राम मंडळी,

हा समुदाय हिंदुस्थानी रागदारी संगीताला वाहिलेला समुदाय आहे.

या समुदायांतर्गत खालील मुद्द्यांचा मुख्यत्वेकरून समावेश असेल.

१) निरनिराळे राग,
२) तरूण व बुजूर्ग कलाकार, त्यांची माहिती व त्यांची कला (गायकी अथवा वादन),
३) शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांविषयी चर्चा, वृत्तांत, आणि त्यांचे समिक्षण,
४) निरनिराळया घराण्याच्या ख्यालगायकी विषयक विचारांचे आदान-प्रदान,
५) होऊ घातलेल्या कार्यक्रमासंबंधी निवेदन,
६) रागदारी संगीतावर आधारीत गाणी, त्यांचे संकलन, रसग्रहण,

इत्यादी विषयांकरता हा समुदाय आहे.

हिंदुस्थानी रागसंगीताबद्दल प्रेम, अभ्यास, कळकळ, आवड, असणार्‍या सर्व व्यक्तींचे या समुदायावर सहर्ष स्वागत आहे..

कळावे,

आपला नम्र,
तात्या अभ्यंकर.
(प्रसारक व प्रचारक, हिंदुस्थानी रागदारी संगीत.)

 
^ वर