उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
छायाचित्रे: कृष्णागरू
अंजली
October 16, 2010 - 11:21 am
छायाचित्रे: कृष्णागरू
फूलांच्या जांभळ्यारंगाच्या विवीध रंगछाटांमुळे ती फुले जवळून बघाण्याचा मला मोह आवरता आला नव्हता. ही फुले कोणत्या झाडांची आहे हे विचारल्यास ,'कृष्णागरू '! असे उत्तर मीळाले. मी एप्रिल-मे महिन्यात ही फुले बघितली होती. बघा, तुम्हालाही आवडतात की नाही?
२) फुले-१
४) फुले-३
७) फुले-६
८)कुंडीतील फुलांनी बहरलेले झाड.
ह्या झाडाची अधिक माहिती माझ्याजवळ नाही. उपक्रमी वाचकांकडून अधिक माहिती मिळेल अशी अपेक्षा करते.
फ्लीकरवरून फोटो चढवताना "शेअर दिस" या दुव्याचा वापर करून एचटीएमएल कोड घ्यावा. आता लेखात बदल करून दिला आहे.
दुवे:
Comments
सुरेख
फारच सुरेख लवेंडर रंग आहे. बाकी झाडाबद्दल माहिती नाही परंतु जाणून घेण्यास उत्सुक आहे.
धन्यवाद
धन्यवाद! फोटो आता नीट दिसत आहे.
ओह किती सुंदर फोटो आहेत!!!!
ओह किती सुंदर फोटो आहेत .आयुष्यात असे सुंदर फोटो पाहीले नाही. असेच चांगले चांगले फोटो पाठवत जा. हं.
चेष्टेचा सूर
ह्या प्रतिसादातून चेष्टेचा सूर भसाभस बाहेर येतोय. असे तुम्ही का करावे समजले नाही. इतकी सुंदर फुले आहेत आणि ती ही नैसर्गिक- कुणीही मोहून जावे, पण तुम्हाला चेष्टा सुचली.
वेळ फुकट घालवणे
करोडो लोक अर्धपोटी/उपाशी असताना आणि काश्मीरमध्ये ६५ वर्षांपूर्वी केलेल्या चुकांमुळे डोकेदुखी झालेली असताना तुम्ही हे फुलांचे फोटो बघत काय बसलात? असे त्यांना सुचवायचे असावे. :-)
नितिन थत्ते
दसर्याच्या लाख - लाख शुभेच्छा ..!
दसर्याच्या लाख - लाख शुभेच्छा ..! तुमच्या शुभकामना पुर्ण होवोत! काळजी घ्या - प्रेमाने पहा :)
कोणत्याही सणाप्रमाणे यावेळी हि समाजातील वेगवेगळे घटक एकत्र येतात त्यामुळे विचारांची आदानप्रदान होते.प्रत्येकाच्या सुख दुखात सहभागी होण्याचे संस्कार यातून घडतात.समाज हि एक मोठी ताकत असून ती कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा फार मोठी आहे हे यानिम्मित्त प्रत्येकाच्या मनावर ठसते.
सोनेरी दिवस, सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी,
सोनेरी शुभेच्छा, सोन्यासारख्या लोकांना ..!
आपल्या साईटवरचे वातावरण खेळकर व आनंदी रहावे हीच दसऱ्याची शुभेच्छा
सुंदर..!
क्रमांक दोन आणि तीन सोडले तर बाकी फोटो सुंदर आले आहेत.
या फुलझाडाला 'कृष्णागरू' म्हणतात ही माहिती नवीन आहे, धन्यु...!
मोहक
फुलांचा रंग मोहक आहे.
मात्र फुलांबद्दल माहिती नाहि. (फोटो थोडे पाणी शिंपडून काढले असते तर अधिक तजेला आला असता)
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
धन्यवाद
प्रतिसादाबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद.
गुगलवर अधिक माहितीचा शोध घेत असतांना आर्द्रा नक्षत्राचा वृक्ष कृष्णागरू आहे अशी माहिती मिळाली.
अधिक माहिती साठी खालील दूव्यांवर टिचकी मारा.
आर्द्रा नक्षत्र
जैन धर्मात पूजे साठी गंध म्हणून कृष्णागरूचा वापर करतात.
कृष्णागरू प्रमुख गंध हुताश माहीं |
खेवौं तवाग्र वसुकर्म जरंत जाही