उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
धन्य ते भक्त!!!
ग्रीन गॉबलिन
October 13, 2010 - 12:23 am
देव स्वर्गात राहतात कारण त्यांना रजनीकांतमुळे पृथ्वीवर राहणे परवडत नाही असे वाक्य आम्ही नुकतेच महाजालावर वाचले आणि या वाक्याचा लगोलग अनुभवही घेतला.
आमचा हा अनुभव सर्व आस्तिकांना, नास्तिकांना आणि उपक्रमींना आवडेल अशी आम्ही आशा करतो.
कृपया, हा विडिओ बघून कुपोषित बालके वगैरे मुद्दे चर्चेस आणू नयेत. रजनी अण्णाचे पोस्टर पिळले तर भारतातल्या सर्व कुपोषित बालकांना दूध मिळेल याची आम्हाला खात्री आहे.
- राजीव.
दुवे:
Comments
:-)
रजनी अण्णा यांचा अभिषेक आहे असे कळल्यावर तेथील गाईंनी (रजनी अण्णांवर काही बालंट येउ नये म्हणून) त्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त दूध दिले.
फॅन्टॅस्टिक
फॅन्टॅस्टिक, आय लव्ह माय इंडिया
(ऍन्ड रजनी अण्णा ऑफकोर्स)
चन्द्रशेखर
व्यक्तीपूजा
व्यक्तीपूजेचे हे (लिटरल आणि मेटाफोरिकल) दुसरे टोक आहे. पण याहून कमी तीव्रतेची व्यक्तीपूजा आपल्याकडे सर्रास बघायला मिळते. अमुक गायिका सुट्टीच्या दिवशी वांग्याची मसालेदार भाजी स्वतःच्या हाताने बनवतात, बेसिनमध्ये मुंगी दिसली तर ती जाईपर्यंत पाणी सोडत नाहीत (मग मासे खाताना काय करतात?) इ. इ. लेख मासिके, वर्तमानपत्रे चवीने छापत असतात. मला त्यांच्या गाण्याशी कारण, त्या कसली भाजी करतात यात कुणाला का इंटरेस्ट असावा कळत नाही.
कलाकाराची कला आणि त्याचे वैयक्तिक जीवन यातील फरक आपले चाहते लक्षात घेत नाहीत. परिणामतः कलाकाराने देवासारखे रहावे अशी मागणी होते. तसे झाले नाही, की तीच प्रतिमा रस्त्यावर जाळायची.
--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/
म्हणजेच आपणास या संदर्भातील चर्चा अपेक्षित आहे.
कुपोषित बालके वगैरे मुद्दे चर्चेस आणू नयेत असे म्हणत आपणच हा विषय पुढील प्रकारे उपस्थित केला. भारतातल्या सर्व कुपोषित बालकांना दूध मिळेल याची आम्हाला खात्री आहे. म्हणजेच आपणास या संदर्भातील चर्चा अपेक्षित आहे. याची खात्री आहे. भारतीय जनतेची मानसिकताच व्यक्ती पुजेची आहे, त्यामुळे अश्या घटना भारतात नेहमी घडतात. या व्यक्ती पूजेचा गैरफायदा घेत नेते, देवाचे ठेकेदार जनतेला गुमराह करून स्वतःचा फायदा करून घेत असतात. आणि मग कोणी कार्यकर्ता सोनियाच्या घरा समोर आतम्हत्या करण्याचे नाटक करतो तर दक्षिणेत एम .जी रामचंद्रन मेल्यावर अनेक जण जीव देतात. तर एखाद्या नटी चे मंदिर उभारतात.
तर शनी मूर्तीला दररोज हजारो लिटर तेल वाहील्या जाते. आणि परतपरत तेच तेल दुप्पट दराने भाविकाला विकल्या जाते. दुसरीकडे जिंदगीभर फकीर राहिलेल्या साई बाबांना सुवर्णाने मढविण्यात येते तर तिरुपतीच्या बालाजीला भ्रष्ट्राचाराच्या पापात १०% देणगी देवून भक्तीचा बाजार मांडला जातो. भारतातील विविध मंदिरात दररोज लाखो लिटर दुध देवाच्या अभिषका करता वापरले जाते. आता अनैसर्गिक दुध मोठ्या प्रमाणात तय्यार होत आहे .हे दुध या अभिषकाच्या कामा करता वापरता येईल. यामुळे पूजा होवून भक्त खुष आणि नैसर्गिक दुध जनतेला पिण्यास तरी मिळेल
+१
ऐडिया चांगली वाटते.
पूर्वी शाडूच्या मूर्तीच वापरण्याची प्रथा असूनही आता प्लास्टर ऑफ पॅरिस, कागद, (विसर्जनासाठी) प्लॅस्टिक, धातू, संगमरवर (कायमस्वरूपी) अशा मूर्ती वापरल्या जातात. त्याचप्रमाणे नकली दूध अभिषेकाला वापरण्यास सुरुवात झाली तर दुधाची नासाडी थांबेल. मूर्तींच्या बाबतीत लोकांची मानसिकता परिस्थितीमुळे बदलली असावी (शाडूच्या मूर्ती महाग, नाजूक, जड, छोट्या?). जाहिरातींनी अभिषेकासाठीचा द्रव असे उत्पादन लोकप्रिय झाले तर ही समस्या कदाचित सुटू शकेल.
अवांतरः दुधातील युरिया ओळखण्यासाठी एखादी घरगुती चाचणी कोणाला सुचते आहे काय?
देवाला चालेल का
असे नकली दूध देवाला चालेल का?
विनंतीः दुध हा शब्द दूध असा लिहावा. तेच तुपाबाबत.
असे नकली दूध देवाला चालेल का?
जर बेईमानीचा काळा पैसा तिरुपती बालाजीला चालतो आणि तो हा पैसा घेवून भक्ताला पावतो. जेथे लाखो भारतीय हे दूध पितात सणावाराला या याच्या मिठाया खातात तर या नकली दूधाचा धंदा नेमका सणावाराला दाखवून TV चेनल आपला TRP वाढवत धंदा करतात, असे सर्वाना पावणारे नकली दूध देवाला का चालणार नाही?
सामान्यरुप
दूध या शब्दाला प्रत्यय लावताना त्याचे दुध होते. उदा. दुधाचा, दुधाला, दुधाने वगैरे.
बाकी तुमच्या प्रतिसादाशी सहमत आहे. मी तर म्हणतो नकली दूध तरी कशाला द्यायचे. त्या दुधानेही तिथे चिखल, घाण, चिकटपणा, माश्या होणारच.
नकली दूध म्हणजे काय?
नकली दूध म्हणजे काय? ते इको-फ्रेंडली असते का? अनैसर्गिक दूध नकली असते का? नकली दुधाच्या अभिषेकाने देव पावला असे भक्तांना वाटेल का?
एखादा मुद्दा काढू नका सांगितल्यावर सन्नी देवलप्रमाणे ठण्याकाका चवताळून उठणार हे माहित होतेच.
- राजीव.
ताकाला जावून भांड लपवण्याची ठण्याकाका ची वृत्ती नाही.रोखठोक
ताकाला जावून भांड लपवण्याची ठण्याकाका ची वृत्ती नाही.रोखठोक सांगितले जर कुपोषिताचा मुद्दा नव्हता तर लिहिला गेला नसता. कोणतीही नकली गोष्ट इको-फ्रेंडली नसते. नकली दूध म्हणजे युरिया आणि घातक रसायन पासून बनवलेले दूध . वरील प्रतिसाद आपण वाचला नसावा म्हणून पुन्हा खाली देत आहे.
जर बेईमानीचा काळा पैसा तिरुपती बालाजीला चालतो आणि तो हा पैसा घेवून भक्ताला पावतो. जेथे लाखो भारतीय हे दूध पितात सणावाराला या याच्या मिठाया खातात तर या नकली दूधाचा धंदा नेमका सणावाराला दाखवून TV चेनल आपला TRP वाढवत धंदा करतात, असे सर्वाना पावणारे नकली दूध देवाला का चालणार नाही?
thanthanpal.blogspot.com
आकांडतांडव कशाला?
मी तुमचा मुद्दा मारल्याने तुमचा रतीब - उपक्रमावर लेख टाकण्याचा हो! कमी झाला काय?
आणि तरीही तुम्ही ते वापरावं असा सल्ला देत आहात. त्या विडिओत काही भक्त ते दूध पित आहेत हे पाहिले नाही काय?
मी दूध भक्तांना का चालावे असे विचारले आहे. देवाला नाही. तुमच्या वरील वाक्यांचा आणि यांना चालते म्हणून त्यांना चालावे याचा परस्परसंबंध नाही. इथल्या उपक्रमींना परदेशात स्थायिक व्हायला आवडते म्हणून उपक्रमी या नात्याने तुम्हालाही ते आवडावे असे आहे काय?
-राजीव.
तुम्हीच अकांडतांडव करत आहात
राजीवकाका,
तुम्हीच अकांडतांडव करत आहात असे वाटते. ठणठणपाळकाकांनी योग्य मुद्दे उपस्थित केले होते. जर देवाला नकली दूध चालत असेल तर ते भक्तांना चाललेच पाहिजे. जर भक्तांना ते चालत नसेल तर देवाने ते चालवण्यायोग्य केले पाहिजे.
काही मजकूर संपादित.
मस्त!
विडिओ बघून संतोष वाटला. ;-)
रजनिकांत
नटनट्यांमागे हे दक्षिणात्य् वेडे असतात त्याच उदाहरण आहे. मागे त्यांचा एक अभिनेता राजकुमार वारला तेव्हा लोकांनी खुप तोडफोड केली होती.
काल शिवाजी पार्कात
व्यक्तीपुजा भारताला नवी कुठाय?
काल शिवाजी पार्कात काय पाहिलेत मग?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?