शास्त्रीय संगीताचे श्रोते
शास्त्रीय संगीताच्या मैफिलींना जे श्रोते जातात, त्यांचे निरीक्षण करता काही ठोस मतं नोंदवता येतात. त्यातील जे मत मला येथे चर्चेला ठेवायचे आहे, ते इतके आवश्यक का आहे, असे वाटल्यास असे सांगता येते की, आस्वाद घेणे ही सुद्धा एक कलाच आहे व त्या कलेचे सौदर्य वाढीस लागावे असे एखाद्याला वाटल्यास ते चूक ठरु नये.
हे निरीक्षण फक्त महाराष्ट्रीय श्रोत्यांपुरतेच आहे का हे मात्र माहीती नाही. पण जितक्या वेळा शास्त्रीय संगीताच्या मैफिलींना जाण्याचा प्रसंग आला, किंवा टीव्हीवर पाहील्या, त्यात महाराष्ट्रीय प्रेक्षकच होते त्यामुळे सध्यातरी हे निरीक्षण त्यांच्याच पुरते मर्यादीत आहे असे म्हणू.
निरीक्षणे-
१. नाही-नाही बोली- श्रोते सतत मानेने "नाही, नाही" अशा शरीरबोलीने भावना व्यक्त करत असतात. कधीकधी हे नाही-नाही एकदम जास्त झोका घेते.
२. मोटरसायकल वळण बोली- ह्यात एखाद्या १००० सीसीच्या मोटरसायकल शर्यतीत जसे एखादे अवघड वळण गाडी तिरकी करुन घेतले जाते तशी मान स्थिर ताठ असतांना व नाही-नाही करत असतांना निम्म्यातुन डावीकडे (८०% वेळा) किंवा उजवीकडे झपकन वळवली जाते.
३. डोळेमीट वाऽऽ बोली- ह्या प्रकारात श्रोता डोळे मिटून आस्वाद घेत असतो. अचानक चेहरा लांबुळका करुन डोळे शक्य तितक्या स्लो मोशनमधे उघडून अथवा परत बंद करुन वाऽऽ असे अस्पष्टतेने म्हणले जाते. उअजवा हातही उंचावला जातो.
हे इतक्या लयबद्धतेने केले जाते की, आपल्याला हसु येते. नॉन-भारतीय उपखंडीय माणसांनी हे पाहीले की, त्यांना खूप हसु येते. त्यामुळे जेव्हा मी अशा स्वरुपाची विचारणा ऐकली की, तुम्ही शास्त्रीय संगीत ऐकतांना मान अशी-अशी का हलवता? तेव्हा मला स्पष्टपणे उत्तर देऊन त्यांची जिज्ञासा पुर्ण करता आली नाही व मी हे निरीक्षण येथे मांडावे असे वाटले. आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.
Comments
ह्या सगळ्या...
प्रतिक्षिप्त क्रिया आहेत...असं मला वाटतं. त्याचं नेमकं उत्तर देणं कठीण आहे.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
शंका
पण त्या जन्मजात तशाच कराव्या वाटतात की शिकल्या जातात? जन्मजात असतील तर अशाच का?
स्वतः..
अनुभवून पाहा. एरवी सांगता आलं असतं तर नक्कीच सांगितलं असतं. :)
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
थोडे बदल
ह्यात थोडे बदल अथवा जास्तीचे प्रकार घालता येतील का?
उदा- जसे टेबल म्यानर्स असतात, (ई), तसेच शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला गेले की, प्रतिसाद कसा द्यायचा ह्याचे काही नियम घातले तर डीसेन्सी येईल असे वाटते. आता डेसेन्सी नाही असे म्हणायचे नाही, पण लोकांना जर ते पाहून हसू येत असेल तर चॉइस कायकाय आहेत ते बघणे चूकीचे का असावे? शिवाय ह्या जगात एकच गोष्ट स्थिर आहे- अस्थिरता!
टीप्पीकल स्टाइल
मला वाटतं की, लोकं दुस-याचे पाहून डीट्टो कॉपी मारतात.
आणखी एक कॉपी पाहून हसू येते- नवशिक्या गायक चुकला की, कानाला हात लावतो, अनुभवी गायकाशी उगीचच अति-अदबीने बोलतो, पाया-बिया पडतो. ह्यांची टीप्पीकल स्टाइल असते.
नाही-नाही बोली
हा प्रतिसाद अवांतर आहे पण एक जुनी गोष्ट आठवली म्हणून.
एकदा हापिसात आमच्या चीफ आर्किटेक्टने येऊन मला काहीतरी विचारले. त्यावर मी हसून होकारदर्शक (वर-खाली) मान हलवली. त्यावर त्याने मला विचारले की याचा अर्थ हो की नाही असा घेऊ?
मी म्हटले मान वर-खाली करणे म्हणजे अर्थ हो असाच होतो ना आणि मान डावी-उजवीकडे किंवा उजवी-डावीकडे (हॉरिझाँटल) हलवणे म्हणजे नाही असा होतो ना. यावर तो म्हणाला की माझ्यामते तरी असाच होतो पण काही भारतीयांना मी नाही अशा अर्थाने मान वरखाली हलवताना पाहिले आहे. मी म्हटले मला असा काही अनुभव नाही यावर त्याने 'पुढच्यावेळेस मी असे पाहिन तेव्हा तुला नक्की बोलवेन' असे सांगितले.
असो तर काही दिवसांनी हापिसातील एका तेलुगू मुलीला असे करताना त्याने पाहिले आणि मला बोलवले. नाही या शब्दासाठी डावीकडून अर्धचंद्राकार म्हणजे डावीकडून डोके वर घेऊन ते उजवीकडून खाली घेऊन नाही म्हणताना पाहिले. :-) (एकंदरीत ते हॉरिझाँटल आणि वर्टिकल दोन्ही पद्धतीने हलत होते.)
लोक हसतात.
ह्या मानहलवेपणाला खूप लोक हसतात. :-)
बापरे!
ती किती वेळ डोके हलवीत होती?
हाहा!
नव्हे. मी तिथे गेल्यावर तिला काही प्रश्न पुन्हा विचारले आणि डोके हलवून उत्तर दे असे सांगितले पण तो प्रकार बघून हीची मान लचकत कशी नाही असा प्रश्न मला पडला.
(खरं म्हणजे त्या अमेरिकनने जेव्हा मला हो का नाही असा प्रश्न विचारला तेव्हा हा मुद्दाम टवाळकी करतोय असे मला वाटून गेले होते पण हा प्रकार पाहिल्यावर संशय नाहीसा झाला.)
डावीकडून अर्धचंद्राकार म्हणजे डावीकडून डोके वर घेऊन
अनेक मराठी मुलामुलींना (मुलांमध्ये मीही आलो) अशा पद्धतीने मान हलवून हो हो म्हणताना पाहिले आहे. (मला स्वतःला आरशात पाहिले.)
डोलक्या बाहुल्या
सहमत्! पुर्वी डोलक्या बाहुल्या यायच्या त्यांच्यासारखे डोके हलवले म्हणजे हो-हो असा प्रतिध्वनी येतो.
एक सुसंदर्भ पीडीएफ आणि एक यूट्यूब
या बाबतीत ससंदर्भ असलेल्या एका निबंधाचा पीडीएफ दुवा.
यात गायकाच्या देहबोलीचे विश्लेषण आहे. दूरान्वये ते रसिकाच्या देहबोलीशीसुद्धा संबंधित आहे. (अशा प्रकारचे एक वाक्य निबंधलेखकही दुसर्या पानावर देतो.) रसिकाची देहबोली लयबद्ध आहे, हे येथील चर्चाप्रस्तावकाच्याही लक्षात आलेले आहे.
पाश्चिमात्य अभिजात संगीताचे श्रोते आजकाल गाणे संपेपर्यंत स्तब्ध बसतात. मात्र असे पूर्वी नसावे, अशी वर्णने आपल्याला वाचायला मिळतात. अभिजात संगीताला उत्स्फूर्त दाद (आवडीची किंवा नावडीचीही दाद) देण्याची व्हिएन्ना मधील रसिकांची परंपरा अव्याहत चालू आहे, असे ऐकलेले आहे.
पाश्चिमात्य संगीताच्या अन्य प्रकारांत रसिक गाणे-संगीत चालू असताना देहबोलीने लयबद्ध दाद देतात.
येथे राहुल देशपांडे यांच्या गाण्याची एक चित्रफीत आहे. ही चित्रफीत निवडण्याचे कारण असे, की बर्याच ठिकाणी श्रोत्यांचे चित्रण केलेले आहे.
आलापात लय असते, पण ती मुक्त असते. ती लय देह/मान/हात डोलवून पकडण्याचा प्रयत्न श्रोते करत आहेत, आणि नीट जमत नाही हे ०:४७ ते ०.५४ भागात बघावे. मात्र तबला सुरू होताच १:४० ते १:४६ भागात श्रोत्यांच्या माना तबल्याच्या ठेक्यात डोलावल्या जात आहेत. चित्रफितीत अधूनमधून अनेक उदाहरणे दिसतात.
लय आणि ठेका देहबोलीने व्यक्त करायची उर्मी वैश्विक आहे. पण त्यासाठी नेमक्या कुठल्या हालचाली वापरल्या जातील त्या प्रत्येक संस्कृतीत वेगळ्या आहेत. या संदर्भात काही चित्रफितींची उदाहरणे देऊन मी लेख लिहिला त्याचा दुवा :- (लय आणि ताल शरिरातून व्यक्त करणे). यात शारिरिक हालचाली फक्त कलाकारांच्या आहेत. पण कलाकारांच्या हालचाली, आणि त्यांचे अंधुक पडसाद असलेल्या रसिकांच्या हालचाली संस्कृतीनुसार वेगवेगळ्या असतात, त्याची कल्पना यावी.
संस्कृतीचा परीणाम
पीडीएफ चाळली व राहूलचे गाणेही पाहीले. नाही-नाही वाले दिसले.
--लय आणि ठेका देहबोलीने व्यक्त करायची उर्मी वैश्विक आहे. पण त्यासाठी नेमक्या कुठल्या हालचाली वापरल्या जातील त्या प्रत्येक संस्कृतीत वेगळ्या आहेत. --
उर्मी सगळ्यांत नसावी, मैफिलीला गेलो असता ढीम्म बसण्यापेक्षा अधुनमधुन वा-वा म्हणत दाद देण्यास काय सोयीचे आहे ते अवती-भवती पाहून लोक ठरवत् असतील. कारण सगळ्यांना सगळे शास्त्रीय गायन समजते असे नसते.
संस्कृतीचा परीणाम नक्कीच मोठा असावा.
उभे राहणे- टाळ्या वाजवणे
श्री. धनंजय यांच्याशी सहमत. एखाद्याने कुठल्या हालचाली वापराव्यात हे माणूस लहानपणासून बघितलेल्या सवयींच्या अनुकरणातून शिकतो.
(आदराने किंवा मान देण्यासाठी)उभे राहणे आणि (एखादी गोष्ट आवडल्यावर) टाळ्या वाजवणे ह्या शारीरिक क्रिया दाद देण्यासाठी जागतिक स्तरावर सर्वत्र वापरल्या जाणार्या मोजक्या क्रियापैंकी असाव्यात. हळुहळु हात मिळवणे ही क्रियादेखील जागतिक स्तरावर बर्याचदा दोन व्यक्ती भेटल्यावर केली जाणारी पहिली क्रिया होत चालली आहे.
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
हळुहळु हात मिळवणे ?
म्हणजे स्लो मोशनमध्ये का ?
हाहाहा
"हात मिळवणे ही क्रियादेखील, हळुहळु, जागतिक स्तरावर दोन व्यक्ती भेटल्यावर बर्याचदा पहिली केली जाणारी क्रिया होत चालली आहे" असे वाचावे का? की झिम्माफुगडीची वेगळी व्याख्या ठेवण्यासाठी "हळुहळु हात मिळवणे" यालाच हस्तांदोलन म्हणावे?
क्लिष्ट वाक्यरचना
वाक्याचा आशय इतका सुलभ असताना वाक्यरचना इतकी क्लिष्ट का बरे?
१ नंबर
प्रतिसाद आवडला :)
:)
हा हा हा! हे म्हणजे 'विशाल महिलांचा मेळावा' सारखं झालं :)
असो. वाक्य बदलणे आता शक्य नाही. हळुहळु नंतर स्वल्पविराम कल्पावा.
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
एलेगन्स
ज्या सवयी वरच्या स्तरावर घेतल्या गेल्या त्यात एलेगन्स असलेल्या देहबोल्या होत्या. मान देण्यासाठी उभे राहणे, हात मिळवणे ह्यात तो एलेगन्स दिसतो.
पुन्हा एक अवांतर :-(
यातले क्रिस टकरचे माना वेळावणे (आणि सोबत देहही) आमचे आवडते आहे. सुमारे १:३० ला सुरू होते.
हाहा!
गंमतीदार.
दोघे मस्त मजा आणतात प्रसंगात.
बाकी गाणे ही एक कला असली तरी मुख्यत्वे दुसर्याशी संवाद साधणे होत असावे. गाणे ऐकता ऐकता असा संवाद देहबोलीनेही सुरू होत असेल असे मनात आले.
व्हिडिओ
व्हिडिओ बघताना मजा आली. माझ्या सिंगापूरमधल्या नातीला ण, ठ, आणि ळ ही अक्षरे कशी उच्चारायची या बद्दलचा माझा वृथा प्रयत्न आठवला. चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
रष अवर
रष आऱ मधील गाणे आहे ते. चित्रपट पाहिला नव्हतात काय? पांचट चित्रपट आहे. जॅकी चॅनमुळे जरा सुसह्य होतो इतकेच.
चित्रपट
मी थेटरात जाऊन शेवटचा चित्रपट बहुदा 2003 साली बघितला असावा. टीव्ही वर सिनेमा जास्तीतजास्त 5 ते 10 मिनिटे बघू शकतो. नाही म्हणायला विमानात मात्र आवाज बंद करून चित्रपट बघतो, दुसरे काही करायला नसल्याने. माझ्या दृष्टीने रश अवर काय किंवा स्लॅक अवर काय सगळे समानच आहे हाहाहा
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
मूळ गाणे
ते गाणे रश अवर चित्रपटाच्या तीनही भागांत (१९९८, २००१, २००७) आहे.
@टापा: ते गाणे चित्रपटात असले तरी त्याची ओळख 'रश अवर चित्रपटातील गाणे' अशी नाही.
हो हे माहीत होते
वार व्हाट इज ईट गुड फार हे 'मूळ' गाणे रष अवर मधील नाही याची कल्पना होती. किंबहुना चित्रपटातही तो संदर्भ आहे.
मीही
मीही थेटरात जाऊन पाहिलेला शेवटचा चित्रपट म्हणजे 'येस मॅन'. तेव्हापासून टीव्हीवरही चित्रपट पाहिले नाहीत. टोरंट लावून चोरलेले चित्रपट मात्र संगणकावर नियमितपणे पाहतो.
दया.
मला त्यांची दया येते व त्यांच्याबदल सहानुभुती वाटते..
बाकी चालू द्या..
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
का?
--मला त्यांची दया येते व त्यांच्याबदल सहानुभुती वाटते--
का?