पुण्यातले रस्ते इंजिनीयरींग

मागील शुक्रवारी रात्री, कोथरुड पोलीस चौकीसमोरील ट्रॅफिक आयलंड्ला वळसा घालतांना जाणवले की, वाहन चालकाला ते ट्रॅफिक आयलंड नीट दिसत नाही. सहका-याला म्हणालोही की, हा प्रॉब्लेम आहे. झालेही तसेच, शनीवारी रात्री एक ४-चाकी त्यास धडकुन ते ट्रॅफिक आयलंड आणि गाडी दोघांचेही नुकसान झाले व सुदैवाने एव्हढ्यावरच निभावले. रोड डीव्हायडर पुढे आहे पण त्याची काहीही माहीती न देणे, त्या डीव्हायडरवर एकही रिफ्लेक्टर न बसवणे, हा तर रोजचा खेळ. अशा चुकांमुळे कितीतरी वाहने त्यास धडकलेली आपण पहातो.

पुण्यात रस्ते अभियात्रीकीला फाट्यावर मारण्याचे अनेक उदाहरणे पहायला मिळतात. तसे पाहीले तर "रस्ते बांधकाम इंजि." कामात कोणी ढवळा-ढवळ करुन त्यात बदल घडवुन आणण्याचे प्रमाण नगण्यच असणार. म्हणजे काय तर, एखादा फलक कुठे बसवायचा, त्यावरील फॉंट काय साईजचा असावा, वगैरे कॉमनसेन्स टाईप प्रश्न ते कॉमनसेन्सने सोडवायचे असल्यामुळे त्याच्या वाटेला कुणी जात असेल असे वाटत नाही. त्यामुळेच हे जे ""ऍन्टी रस्ते बांधकाम इंजि." उदाहरणे जागोजागी दिसतात त्यास महापालिका सोडवु शकते.

एखादे वळण येत आहे, हे ४० कीएमपीएचने जाणा-या वाहनचालकाला दिसुन, योग्य तो निर्णय घेण्यास जितका कालावधी लागायला हवा त्याप्रमाणे त्या वळणावरील स्थानांची माहीती एखाद्या बोर्डवर किती आधी आली पाहीजे, ती कुठे लावली पाहीजे, त्यावरील अक्षरे रात्रीही दिव्यांच्या प्रकाशात दिसतील अशा प्रमाणे कशी लावावीत ह्यासंबंधी जे ज्ञान लागते त्यास मी रस्ते इंजि म्हणेन.

महापालीकेने त्यांच्या वेबसाईटवर अशी योजना करावी की, लोकांनी एखादी अशी चुक सापडली तर त्याचा फोटो अपलोड करता यावा व त्याबरोबरीने काय नेमके केले म्हणजे सुधारणा होईल ते ही लिहीता येइल असे पहावे.

लेखनविषय: दुवे:

Comments

सहमत

काही दिवसांपूर्वी तिथे रस्त्यावर खडी देखील होती, अजून बिकट परिस्थिती.
त्याचप्रमाणे आजून एक होऊ शकते ते म्हणजे - शहरात ठिकठिकाणी झालेल्या अपघात माहितीचे जर विश्लेषण केले तर कुठे सुधारणेला वाव आहे हे सहजच ध्यानात येऊ शकते. आता हि माहित कोणची सरकारी यंत्रणा जमवते हे बघितले पाहिजे, सकाळ सारख्या वृत्तपत्रांकडे देखील हि माहिती असू शकते.

अवांतर - पु.म.पा. - आहो, रोज काही हजार वाहने तिथून जातात, एक चारचाकी वाहन जर त्यास धडकले तर ती चूक वाहन चालकाची का पु.म.पा.ची? आपण मद्य प्रश्न करून वाहन चालवणार आणि दोष आमचा?

हडपसर

काही महिन्यांपूर्वी हडपसर मध्ये रोज कमीत कमी एक चार(किंवा अधिक) चाकी गाडी बीआरटीच्या दुभाजकावर चढत असे. नंतर मगरपट्टा चौकात उड्डाणपुलाचे काम चालू झाले आणि वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला. मग हे दुभाजक (१.५० कोटी खर्चून बांधलेले) काढण्यात आले. व वाहने त्या दुभाजकावर चढणे बंद झाले.

||वाछितो विजयी होईबा||

मानाचे स्थान

पुण्यात हडपसर रस्त्याला जे मानाचे स्थान आहे, तेच मुंबईला अंधेरी-कुर्ला रस्त्याला आहे. हा रस्ता मुंबैतील इतर ठिकाणी होणा-या कामाचे ट्रायल ग्राउंडचे काम करतो. हडपसर रस्त्यावर विकासकामे गेली २० वर्षे थांबलेलीच नाहीत.

अजून

तसाच कांजुर ते पवई (एल् & टी) हा रस्ताही आहे. यावरचेही काम कधी संपत नाही.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

यात नागरिकांचा दोष आहे.

यात नागरिकांचा दोष आहे. ज्या गोष्टीवर चर्चा विचारमंथन करायचे ते न करता आपला कांही संबंध नाही असे वागायचे. आणि नंतर ओरडत बसायचे. सत्य सांगितलं की सांगणार्याची टर उडवायची. हेच चुकते.

१.५० कोटी खर्चून बांधलेले दुभाजक काढण्यात आले.

सहाबजी ही समस्या देल्ही मुंबई पुण्या पासून थेट चांद्याबांद्या ते खानापूर सारख्या खेड्या पर्यंत आहे. आपण जनतेने कितीही विधायक सूचना केल्या तरी गेंड्याची कातडी असलेली नोकरशाही आणि राजकारणी कांहीही सुधारणा करणार नाहीत .आणि तुम्ही ह्या व्यवस्थे मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला तर सरकारी यंत्रणा शासनाच्या कामात अडथळा आणल्या बद्दल तुमच्यावरच गुन्हा दाखल करून तुम्ही गुन्हेगार आहात हे सिद्ध करून दंड करेल. १.५० कोटी खर्चून बांधलेले दुभाजक काढण्यात आले.यालाच ४ आण्याची कोंबडी १२ आण्याचा मसाला म्हणतात

thanthanpal.blogspot.com

कदाचित

खटला भरणे एकवेळ परवडले. कोणी आवाज उठवलाच तर, त्याचा जीवही घ्यायला कमी नाही करणार ते.

||वाछितो विजयी होईबा||

बिहारमध्ये तर जीव घेतलासुद्धा...

बिहारमध्ये एका अभियंत्याने कंत्राटदार, सरकारी अधिकारी आणि राजकारणी यांच्या या साखळीविरुद्ध आवाज उठवल्यावर बिचार्‍याला जीव गमवावा लागला. (त्याचे नाव आठवत नाही, पण फार मोठा इश्यू झाला होता तो.)

नियोजन आणि जनतेची सोय यापेक्षा आपण आणि आपल्या मिंध्यांची सोय बघणारे असल्यावर दुसरे काय होणार?

सत्येंद्र दुबे

सत्येंद्र दुबे
http://en.wikipedia.org/wiki/Satyendra_Dubey

त्याचा जीवही घ्यायला कमी नाही करणार ते

एव्हढे जीवाला घाबरले तरं देव सुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही.

चर्चासत्र

ह्या विषयात कुणी हस्तक्षेप करत असेल अजिबात वाटत नाही. दुभाजक, खूणा, चिन्हे, माहीती फलक, विविध प्रकारचे रंग व प्याटर्न, बेस्ट प्र्याक्टीसेस ह्या विषयावर एखादे चर्चासत्र आयोजित करणेही शक्य असेल तर तेथे मत मांडायला आवडेल.

हस्तक्षेप

माहिती इथे आहे. या सर्वासाठी यथोचित मानके उपलब्ध आहेत.

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

अतिप्रशस्त रस्ते - हायवे बांधून झाल्यावर

वरील लिंकवरील माहीती चाळली पण ती खूप वरच्या स्तरावर आहे, मुख्यत्वे ती हायवे स्ट्यांडर्डायझेशनसाठी चांगली आहे. मी काळजी व्यक्त केली आहे ती हे अतिप्रशस्त हायवे बांधून झाल्यावर् त्यावरील सेफ्टीसाठी जे काही करावे लागते ते.

झाल्यावर नाही

झाल्यावर नाही, रस्ते बांधण्याच्या बर्‍याच आधी रस्ता वापरणार्‍याच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घेणे अपेक्षित आहे. बांधकाम झाल्यावर उरते फक्त पुरवलेल्या सुविधांचे अनुरक्षण (मेन्टेनन्स,सौजन्य- भारतीय रेल) आणी वाहतुक नियमांची पायमल्ली रोखणे.

दुभाजक/चिन्हे/दिवे का/कुठे/किती/कसे असावेत हे रस्ता बनवण्यापूर्वीच ठरलेले असते. किंबहुना रस्ता कुठल्या प्रतीचा आहे (दृतगती मार्ग,राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग) या वरून यासाठी कुठले मानक वापरावे हे ही ठरलेलेच असते.

भारतीय रोड काँग्रेस याविषयी संशोधन करून मानके बनवते. ही पाळली जात आहेत हे पाहणे, नियुक्त केलेल्या अभियंत्याचे काम आहे व ती न पाळणे हा बांधकामाच्या कराराचा भंग आहे.

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

मुंबईतील संस्था

मुंबईत बिगर सरकारी संस्था या कामात पुढाकार घेऊन, व्यवस्थित अभ्यास करून काही सोल्यूशन देत आहे. त्याची माहिती इथे पहा. या साठी भरपूर सर्व्हे केलेले आहेत. त्याचे रिपोर्ट पण पाहता येतील. पुण्यात कोणी या स्वरूपाचे काम करणे आवश्यक आहे.

अगदी असेच

अतिशय महत्वाची लिंक दिल्याबद्दल आभारी आहे. होय, अगदी असेच पुण्यात घडणे आवश्यक आहे.

सहमत

रस्ते अभियांत्रिकी आपल्याकडे नसल्यात जमा आहे. आणि हे फक्त पुण्यात नाही तर बहुतेक शहरांत दिसते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

५० वर्षांपुर्वी

अनेकदा नवख्या राज्यरस्त्याने जातांना तुम्हाला एखाद्या फाट्यावर वळायचे असेल तर तो फाटा कधी येतोय ह्याची हुर्हूर लागून राहते. तुमची आधुनिक गाडी १०० च्या स्पीडने जात असते आणि अचानक तुम्हाला ते टीपिकल त्रिकोणी आकारचे स्ट्रक्चर दिसते - अगदी फाट्याला लागून. मग तुम्ही करकचूक ब्रेक दाबायचा (मागे कुणी नाही ह्याची खात्री करुन) आणि शिव्या हासडत गाडी मागे घेऊन वळायचे. मला वाटते महाराष्ट्रातील बैलगाडीने आणि त्या गतिने प्रवास करण्याचे दिवस ५० वर्षांपुर्वीच संपले.

अभियांत्रिकी

यातील तांत्रिक ज्ञान नाही पण खड्डे बुजवण्याची भारतातील पद्धत आणि परदेशातील पद्धत यात फरक आहे असे जाणवते. तिकडे यासाठी लागणारा वेळ फारच कमी असतो, त्यासाठी वाहतूक थांबवणे वगैरे प्रकार क्वचित दिसतात.

आपल्याकडे सर्व खात्यांचा एकमेकांशी संवाद शून्य आहे असे दिसते. नवीन रस्ता केल्यानंतर महिन्याभरातच टेलिफोन किंवा पाणीपुरवठा खात्याने तो खोदणे असे बरेचदा बघायला मिळते. हा क्रम उलटा का करत नाहीत कळत नाही. वर शहरात सगळीकडे हिरव्या-निळ्या बोर्डवर भयाण मराठी पाट्या लावल्या आहेत त्यांचे प्रयोजनही कळत नाही. (उभी करू वनराई, माणूस - वृक्ष होतील भाई-भाई) त्यापेक्षा खरी झाडे लावली तर अधिक चांगले.

--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/

भयाण पाट्या!

-- त्यापेक्षा खरी झाडे लावली तर अधिक चांगले.-- :-) नक्कीच फायदा होईल, त्या भयाण पाट्यांपेक्षा.

+

ही ही ही.

आमच्या वॉर्डात टेलिफोनचे कर्मचारी बहुतेक नाक्यावर कुदळी फावडी घेऊन उभे राहतात. रस्ता नीट करून झाल्यानंतरच मग ते कुदळी घेऊन खणायला येतात.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

सरकारात सहभाग

रस्ते बांधायचे कित्येक नियम आहेत॑. 'इंडीयन रोड कॉन्ग्रेस' यांचे कोड याबाबतीत बंधनकारक असतात. याशिवाय आश्टो चे नियम ही सूचना म्हणून वापरले जातात.

या स्टॅन्डर्डस् बद्दल ढिसाळवृत्तीने पाहण्याची सवय सरकारात आहे. कधी कधी याची कारणे ढिसाळपणा वा लाचखाऊपणा या पलीकडची असतात. म्हणजे स्थानिक दबाव (हा बहुदा राजकीय असतो.) यामुळे रस्त्याची हवी ती कामे होत नाहीत. (उदा. रुंदीकरण, अडथळे दूर करणे), आर्थिक मंजूरी न मिळणे हे असतात.

तुम्ही सांगितलेला प्रश्न हा बहुदा ढिसाळ कारभारातला असू शकतो. रिफ्लेक्टर लावणे हे अगदी मामुली खर्चाचे काम. पण त्यापेक्षा महत्वाचे काम म्हणजे आंधळी वळणे (ही स्टॅन्डर्ड मधे बसत नाहीत) असल्यास त्यांना डोळस बनवणे. (यात मधे असलेल्या भिंती/इमारती तोडाव्या लागतात.) किंवा रात्रीची प्रकाशयोजना जास्त चांगली करणे. (दिवसा वळण आंधळे नसते असे तुमच्या लेखातून वाटते.) सरकारने वेबसाईट उघडावी आणि त्यात तक्रारी नोंदता याव्यात हे जेवढे हवे आहे तेवढेच तक्रारदार नागरीक तयार होणे गरजेचे आहे.

सरकारात केवळ भ्रष्टाचार चालतो, आमच्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, सरकारी अधिकारी केवळ उर्मटखोर असतात असे दरवेळेला मानत गेले तर आपण त्यात कधीच सुधारणा घडवू शकणार नाही. ही विचारधारा व्यक्त न करता तक्रार करता येते. ती पूर्ण होण्यासाठी धोशा लावता येतो. खूपदा ही कामे होतात. ज्यावेळी होत नाही त्यावेळी न्यायालयात जाता येते. माझ्या माहितीत अशी कित्येक कामे सजग नागरिकांनी केली आहेत. मुबई ठाण्यात एके काळी स्पीडब्रेकर चे पेव फुटले होते. (याचे कारण स्थानिक नागरिकांची मागणी.) पण हे स्पीडब्रेकर कुठलीही सूचना न देता अचानक समोर यायचे. कोणीतरी हायकोर्टात गेले आणि मुख्य रस्त्यांवरचे स्पीडब्रेकर काढावे लागले.

या कामात मी (वेळेअभावी ?) गुंतलेला नाही. त्यामुळे मीही अशा काही गोष्टी खपवून घेतो. पण असे विचार करून कृती करणारे माझ्या परिचयाचे आहेत. अशा सजग (तक्रारदार) नागरिकांकडे प्रशासन कित्येकदा आशेने बघते. मूंबईत महानगरपालिकेची 'मॅनेजमेंट कमिटी' (किंवा तसेच काहीसे नाव असलेली) नागरीक स्थापन करतात. रस्त्यावरचा कचरा, दिवे, खड्डे यावर या समितीतून तक्रार जाते. आणि कार्यवाही फोनवरील तक्रारीतून होते असे एका ने मला हल्लीच सांगितले. याच प्रमाणे पोलिसांची सुद्धा नागरिकांची एखादी समिती असते ज्यात गुन्हेगारी/सुव्यवस्था यात नागरिकांना सहभागी केले जाते. (ठाण्यात माझ्या माहितीचे काही या समितीत आहेत.) लोकप्रतिनिधींबरोबरही चर्चा करावी येथेही मदत मिळते. असा कित्येकांचा अनुभव आहे.

वेबसाईट सुरु करायची असेल तर खाजगी रित्या ही सुरु करू शकाल (किंवा कुणाला त्यावर उद्युक्त करू शकाल). मला वाटते लोकांचे पाठबळ तुम्हाला मिळेल.

प्रमोद

अवन ह्यांनी दिलेला दुवा

वर अवन ह्यांनी दिलेला दुवा खरंच चपखल आहे. त्याच वेबसाईटवर थोडी जागा मिळून त्यावरच पुण्यातील रस्त्यांबद्दल लिहीता आले तर चाचपणी करता येईल.

--तुम्ही सांगितलेला प्रश्न हा बहुदा ढिसाळ कारभारातला असू शकतो.--
होय, तसेच म्हणायचे आहे. तांत्रिक मुद्दा आहे पण मला शंका आहे की, ह्यात कॉमनसेन्सचा जास्त पोठा भाग आहे. इंजि.ला हे समजणे आवश्यक आहे की, चौकातील आयलंडची उंची, त्यात लावलेली झाडे ह्यांची एकत्रित उंची एव्हढीच असावी की, जेणेकरुन कारमधे बसलेल्या व्यक्तिला चौकातील इतर रस्ते स्पष्ट दिसले पाहीजेत. इतकेही न समजणे हे जरा जास्तच वाटते.

वरील कोथरुड पो.स्टे. समोरील आयलंडचा परीघ जर तुम्ही पाहीलात तर लगेच शंका निर्माण होईल की, मागील उतारावरुन येणा-या गाड्या ह्याला सहज धडकू शकतील.

मला वाटते जसे एअरक्र्याश इंव्हेस्टीगेशन होते तसेच प्रत्येक अपघाताचे व्हायला हवे.

जी संस्था अशा अपघातात समप्रमाणात पोळून निघते ती म्हणजे, विमाकंपनी. त्यांनी अशा स्वरुपाच्या कामात पुढाकार घेऊन रस्ते तांत्रिक दृष्ट्या योग्य करण्यावर दबाव आणला पाहीजे.

सहमत

असे दरवेळेला मानत गेले तर आपण त्यात कधीच सुधारणा घडवू शकणार नाही. ही विचारधारा व्यक्त न करता तक्रार करता येते.

याच्याशी सहमत आहे. एका ओळखीच्या अधिकार्‍याने मला मागे हेच सांगितले होते, की आपल्याकडे आपणहून केल्या जाणार्‍या गोष्टी कमी असतात हे कबूल! मात्र कोणी तक्रार केली तर आम्ही ती दुर करण्याचा प्रयत्न करतो. लोक अधिकृत तक्रार न करता फक्त आपापसात बडबड करतात आणि नगरपालिकेने/महानगरपालिकेने जणु ती बडबड ऐकून सुधारणा कराव्यात अशी अपेक्षा ठेवतात. तक्रार करूनही कामे झाली नाहित तर आवाज करा ना!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

कामे झाली नाहित तर आवाज

--तक्रार करूनही कामे झाली नाहित तर आवाज करा ना!--

+ १ सहमत.

 
^ वर