बी ईटर आणि तीन बगळे

सकाळी केबलच्या तारेवर बसलेले काही बी ईटर पक्षी दिसले.

या पक्षांचे आवडते भक्ष म्हणजे मधमाशी. पण तसेच उडणारे कीटक (इतर माशा) ते खातात. आमच्या इमारतीच्या काही भागात मधमाशांचे पोळे होत असते. त्यात ते आले असणार. पक्षी मान इकडे तिकडे करून भक्ष शोधित होता. इतक्यात एक पक्षी भक्ष घेऊन आला. पहिल्यांदा पक्षी नंतर पक्षी आणि भक्ष दोन्ही कॅमेरात बंद झाले.
कॅमेरा आता जुना झाला आहे (कॅनन ३५० ईओएस, लेन्स ३०० एम. एम. स्टॅन्डशिवाय आणि म्यन्युयल फोकस पण इतर ऑटो वापरून शटर स्पीड १/४००)

थोडे दूर नाल्याकाठी काही बगळे पिंपळाच्या झाडावर बसले होते. पानगळतीतही हे बगळे या झाडावर बसलेले दिसतात. तेव्हा ते जास्त उठून दिसतात.

प्रमोद

लेखनविषय: दुवे:

Comments

फोटो

कास पठाराचे फोटो चिकटवताना काही गफलत झाली होती. त्यानंतर मी सुधारण्याचा प्रयत्न केला पण जमले नाही.
आता नवीन तर्‍हेने हे चिकटवून बघतो.

bee eater" alt="">
bee eater eating bees" alt="">
bagale" alt="">

प्रमोद

अजूनही गडबड होत आहे.

परत लिंक देतो

फोटो आवडले.

फोटो आवडले. २-३ महिन्यांपुर्वी एकजण मला म्हणाला होता, "आपल्या अवती-भोवती निसर्ग इतके काही मनोरंजक करत असतो की, एखाद्याला त्या पलिकडे कोणत्याही कृत्रिम मनोरंजनाची गरज पडणार नाही. आपण निसर्गाचे निरीक्षण, ह्या बारीक-सारीक गोष्टी पहातही नाही इतके बधीर झालो आहोत." त्याचे बरोबरही आहे. पक्षी बसलेले पाहून तुम्हाला त्यांचे फोटो काढावेसे वाटले हेच किती चांगले आहे

मस्त

दुसरा फोटो मस्तच!

अवांतर: बाकी कासचे पठार आता पाहवत नाही. दुसर्‍यांदा का गेलो असे झाले आहे. १० वर्षांपूर्वीचा गालिचा स्मरणात राहिला होता तोच बरा होता.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

 
^ वर