उपक्रम दिवाळी अंक २०१०
गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही उपक्रमचा दिवाळी अंक काढण्याचा विचार आहे! विविध विषयांवर माहितीपूर्ण लेख आणि चर्चांनी उपक्रम या आपल्या संकेतस्थळाने आपले वेगळेपण जपले आहे. उपक्रमींच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि उत्साहपूर्ण सहभागामुळे उपक्रम दिवाळी अंक २००८ आणि उपक्रम दिवाळी अंक २००९ वैशिष्ट्यपूर्ण झाले आहेत. यावर्षीचा दिवाळी अंकही असाच वैशिष्ट्यपूर्ण व्हावा यासाठी सर्व उपक्रम सदस्यांना आवाहन आहे की त्यांनी आपले लेखन उपक्रम दिवाळी अंक २०१० साठी पाठवावे.
लेखांचे विषय आणि प्रकार
भाषा, अर्थकारण, वाणिज्य, व्यवस्थापन, गणित, विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, शिक्षण, संस्कृती, कला, क्रीडा, चित्रपट, पर्यावरण, प्रवास, व्यक्तिमत्व, साहित्य व साहित्यिक, राजकारण इ. कोणत्याही विषयावर अनुभव, अनुवाद, आस्वाद, प्रवासवर्णन, बातमी, माहिती, विचार, व्यक्तिचित्र, संदर्भ, स्फुट, कोडी/तर्कक्रीडा, छायाचित्रे, चलचित्रे, व्यंगचित्रे आणि पानपूरके (वरील विषयांवरील थोडक्यात पण रंजक माहिती, घटना, 'तुम्हाला हे माहीत आहे का?' वगैरे) अश्या प्रकारचे लेखन पाठवावे.
लेखन पाठवताना
- कृपया या अंकासाठी उपक्रमच्या लेखनविषयक धोरणात बसणारे लेखनच पाठवावे.
- सदस्यांनी एकाहून अधिक लेख पाठवण्यास हरकत नाही.
- उपक्रमचे सदस्य नसलेल्यांचे उपक्रमच्या धोरणात बसणारे लेखन त्यांच्या अनुमतीने पाठवण्यासही हरकत नाही.
- लेखन प्रताधिकार कायद्याचा भंग करणारे किंवा उपक्रमवर किंवा इतरत्र पूर्वप्रकाशित झालेले नसावे.
- लेखन शक्यतो २४ ऑक्टोबरच्या आधी पाठवावे. आणखी थोडा वेळ हवा असल्यास २४ ऑक्टोबर पूर्वी लेख पाठवण्याचा मनोदय कळवावा.
लेखनाविषयी मार्गदर्शन
- लेख साधारणपणे किमान ५०० शब्दांचा असावा. (यथोचित अपवाद वगळता)
- लेख मोठा असेल तर दोन किंवा जास्तीत जास्त तीन भागात प्रकाशित करणे शक्य आहे.
- पारिभाषिक शब्दांच्या बरोबर मूळ शब्द देवनागरी आणि रोमन लिपीत कंसात द्यावा.
- आवश्यक तेथे संदर्भ, दुवे वगैरे द्यावेत.
- आवश्यक तेथे चित्रे, आकृत्या, छायाचित्रे, तक्ते द्यावेत. याविषयी कोणतीही संपादकीय मदत लागल्यास कळवावे.
- स्वतःविषयी थोडक्यात माहिती द्यावी, शक्य असल्यास छायाचित्रही. (वैकल्पिक)
लेखन upakramdiwali @ gmail . com या पत्त्यावर पाठवावे. लेखन टेक्स्ट स्वरूपात किंवा थेट विरोपात चिकटवून पाठवावे. लेखनाची एक प्रत स्वतःजवळही ठेवावी. उपक्रम दिवाळी अंकाविषयी सर्व पत्रव्यवहार दिवाळी अंक या सदस्यनामाशी करावा.
अंकनिर्मिती (मुद्रितशोधन, संपादन इ.), अंकाची सजावट, मुखपृष्ठ, चित्रे याबाबतीत सहभागी होण्याची इच्छा असेल तर आपले स्वागत आहे, लागलीच कळवावे.
तेव्हा झटपट लिहायला लागा आणि वरील सूचनांप्रमाणे शक्य तितके लेखन पाठवा! आपल्या उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसादाची अपेक्षा आहे!
कळावे, लोभ असावा,
उपक्रम दिवाळी अंक २०१०
Comments
दिवाळी अंकाला शुभेच्छा
दिवाळी अंकाला शुभेच्छा. क्वालिटी 'टाईमपास' होईल अशी आशा आहे.
शुभेच्छा!
दिवाळी अंकाच्या घोषणेबद्दल धन्यवाद आणि अंकाला शुभेच्छा!
शुभेच्छा.......!
दिवाळी अंकासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.......!
-दिलीप बिरुटे
शुभेच्छा
उपक्रमाच्या दिवाळी अंकासाठी अनेक शुभेच्छा.
यंदा प्रयत्न करतो
गेल्यावेळी सहभागी होता आले नाही. यंदा प्रयत्न करतो.
उपक्रमपंताना व (माझ्यासकट) सगळ्या उपक्रमींना शुभेच्छा!
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
+
असेच म्हणतो.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
:-)
:-)
ह्या धाग्याची वाट पहातच होतो. अंकास शुभेच्छा! लेखन पाठविण्यासाठी शेवटचा दिनांक काय आहे ते कळवावे.
धन्यवाद.
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
२४ ऑक्टोबर
लेखन २४ ऑक्टोबरच्या आधी पाठवावे. आणखी थोडा वेळ हवा असल्यास २४ ऑक्टोबरपूर्वी लेखन पाठवण्याचा मनोदय कळवावा.
कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक
यंदाच्या दिवाळी अंकात हैयोंचा अभ्यासपुर्ण लेख
श्री. हैयोहयैयो,
गेल्या वर्षी हैयोहैयैयोंनी कूटलिपीवर अभ्यासपुर्ण लेख उपक्रमच्या दिवाळी अंकासाठी सादर केला होता. त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी यंदाच्या दिवाळी अंकात त्यानी केलेल्या पुढील अभ्यासकार्याच्या संदर्भात लेख सादर करावा.
संपादक मंडळातर्फे त्यांना विनंती केली जावी अशी प्रार्थना,
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
धन्यवाद! आणि अधिक ...
उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल उपक्रमींचे मनःपूर्वक आभार!! आतापर्यंत काही लेख मिळाले असून, अनेकांनी लेख पाठवण्याविषयी कळवले आहे. इतरांनीही कृपया वेळात वेळ काढून एखादा लेख किंवा शक्य न झाल्यास काही थोडक्यात पण मनोरंजक माहिती पानपूरके म्हणून पाठवावी. पानपूरके दिवाळी अंकात वेगवेगळ्या पानांवर दाखवली जातील. याशिवाय कोडी, किस्से, प्रसंग, चित्रे, छायाचित्रे, आपणांस हे ठाऊक आहे का? इ. इ. स्वरूपाच्या साहित्यामुळे दिवाळी अंक रंगतदार होईल! तेव्हा लगेचच लिहायला लागा आणि कळवा!!
प्रश्न/शंका/सूचना/मदत/माहिती इ. साठी दिवाळी अंक या सदस्यनामाशी संपर्क साधावा.
कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक २०१०
लेख, पानपूरके, वाढीव मुदत
उपक्रम दिवाळी अंकासाठी लेखन आणि पानपूरके पाठवलेल्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
ज्या उपक्रमींनी लेख पाठवण्याचा मनोदय कळवला आहे, तुमच्या लेखांची आम्ही वाट पाहात आहोत.
लेख पाठवण्याची इच्छा असूनही वेळेअभावी शक्य झाले नसले तरी लेखनाचा प्रयत्न अवश्य करावा अशी आग्रहाची विनंती! लेखाचा विषय आणि अंदाजे शब्दसंख्या कळवून थोडी वाढीव मुदत घेता येईल!
पानपूरकांसाठी थोडक्यात पण मनोरंजक माहिती अवश्य पाठवावी.
प्रश्न/शंका/सूचना/मदत/माहिती इ. साठी दिवाळी अंक या सदस्यनामाशी संपर्क साधावा.
कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक
मालक भेटले तर...
दिवाळी अंकासाठी लेखन येत आहे ही आनंदाची गोष्ट. उपक्रमचे नवसदस्य अनेक दिवसापासून सदस्य होण्याच्या प्रक्रियेत अडकून पडले आहेत त्यांना सदस्यत्त्व मिळाले तर नवीन सदस्यही दिवाळी अंकासाठी लिहू शकतील. तेव्हा अनेक महिन्यापासून अडकलेल्या सदस्यांना सदस्यत्त्व देण्याची प्रक्रिया सुरु केली पाहिजे असे वाटते. [उपक्रमचे व्यवस्थापकांना खरड, व्य.नि. टाकून झाले आहे. कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून प्रतिसाद इथे]
fggeraxnew, mbtshoes497 god2n9nhome ह्या अशा अनामिक सदस्यांना प्रवेश मिळतांना दिसत आहे आणि प्रामाणिकपणे उपक्रमचे सदस्यत्त्वाची नोंदणी करुन सदस्यत्त्वाची वाट पाहावी लागते, ही आश्चर्याची गोष्ट वाटते.
-दिलीप बिरुटे
अडचणीचे निवारण
उपक्रम सेवादात्याकडे आलेल्या काही अडचणींमुळे नवीन सदस्य बनतानाचे, परवलीचा शब्द बदलण्याचे इ. विरोप (इमेल) जात नव्हते. आता ती अडचण येत नाही. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.
लेख, पानपूरके इ. इ.
उपक्रम दिवाळी अंकासाठी लेखन आणि पानपूरके पाठवलेल्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
ज्या उपक्रमींनी लेख पाठवण्याचा मनोदय कळवला आहे, तुमच्या लेखांची आम्ही वाट पाहात आहोत.
लेख पाठवण्याची इच्छा असूनही वेळेअभावी शक्य झाले नसले तरी लेखनाचा प्रयत्न अवश्य करावा! लेखाचा विषय आणि अंदाजे शब्दसंख्या कळवून थोडीशी वाढीव मुदत घेता येईल!
पानपूरकांसाठी थोडक्यात पण मनोरंजक माहिती अवश्य पाठवावी.
प्रश्न/शंका/सूचना/मदत/माहिती इ. साठी दिवाळी अंक या सदस्यनामाशी संपर्क साधावा.
कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक
शेवटचे ३ दिवस!
तुमच्या मनातला दिवाळी अंकासाठीचा लेख संगणकावर उतरवण्यासाठी शेवटचे ३ दिवस! झटपट ठरवा आणि लिहायला लागा. लेखाचा विषय आणि अंदाजे शब्दसंख्या लागलीच कळवा. त्याशिवाय पानपूरके, छायाचित्रे इ. पाठवा.
लेख आणि पानपूरके पाठवलेल्यांचे मनःपूर्वक आभार!
कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक
मुखपृष्ठासाठीच्या कल्पना
उपक्रम दिवाळी अंकाचे मुखपृष्ठही अंकातील साहित्याइतकेच वैशिष्ट्यपूर्ण असावे यासाठी आपल्या मुखपृष्ठासाठीच्या कल्पना, छायाचित्रे इ. पाठवाव्यात अशी विनंती.
कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक
लेख, छायाचित्रे, पानपूरके, स्वतःविषयीची माहिती
लेखन आणि छायाचित्रे पाठवलेल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद! ज्यांनी स्वतःविषयी थोडक्यात माहिती पाठवलेली नाही त्यांनी ती कृपया पाठवून द्यावी.
ज्यांनी लेखन पाठवण्याविषयी कळवले आहे त्यांनी ते लवकरात लवकर पाठवून द्यावे.
अजूनही छायाचित्रे, पानपूरके तुम्ही पाठवू शकता. छायाचित्रांबरोबर तांत्रिक माहिती आणि चित्राविषयीचा मजकूर पाठवावा.
कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक