मोबाईल फोन, एसएमएस आणी इयरफोन्स
आजकाल रस्त्याने चालतांना बघावे तो १० पैकी ८ व्यक्ती तरी मोबाईलवर बोलतांना दिसतात. लोकांना खरोखरच एकमेकांच्या संपर्कात राहणे इतके महत्वाचे झाले आहे की ती एक न टाळता येणारी सवय झाली आहे याचा अंदाज येत नाहिये.
तीच गोष्ट एसएमएसची. काही व्यक्ती एकमेकांशी बोलणे टाळून सतत एसएमएस टंकताना दिसतात. आता संवाद बोलून साधायचा की टंकन करुन हा ज्याचा त्याचा मर्जीचा प्रश्न आहे. व्यक्तीशः मला मात्र कार्यालयीन वेळ सोडून (म्हणजे फार सकाळी किंवा फार रात्री) इतर वेळेस संपर्क साधायचा असेल तरच एसएमएस चा वापर करणे योग्य वाटते. मोबाईलने आपल्या व्यक्तीस्वातंत्र्यावर आघात केला आहे हे आपण प्रत्यक्ष मान्य केले नाही तरी मग व्यक्तीगत कामांसाठी वेगळा क्रमांक आणि कार्यालयीन कामांसाठी वेगळा क्रमांक वापरण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.
मात्र मोबाईलचाच एक भाग असलेले इयरफोन्स (मराठी शब्द सुचवा) वापरणे फारच घातक आहेत असे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. सतत इयरफोन्स वापरल्यामुळे लहान आवाजातील आवाज ऐकण्याची क्षमता नाहिसी होत आहे. तसेच रस्त्याने चालतांना अपघातांना निमंत्रण ठरत आहेत.
१. इयरफोन्स वापरण्याची सवय घातक आहे काय ?
२. वर नमूद केलेल्या दुष्परीणामांव्यतिरीक्त दूसरे काही घातक परीणाम होतात काय ?
३. ही सवय जर घातक असेल तर ती सोडविण्यासाठी काय उपाय सुचविता येतील ?
Comments
उत्तरे
१. इयरफोन्स वापरण्याची सवय घातक आहे काय ?
होय
२. वर नमूद केलेल्या दुष्परीणामांव्यतिरीक्त दूसरे काही घातक परीणाम होतात काय ?
रेडिओ लहरींचा सतत मारा झाल्याने डोकेदुखी
३. ही सवय जर घातक असेल तर ती सोडविण्यासाठी काय उपाय सुचविता येतील ?
मोबायील चा वापर कमी वापरणे, मोबायील छाती जवळ ठेऊ नये, गाणे ऐकण्यासाठी दुसर्या उपकरणाचा वापर करावा (ज्यातून रेडिओ लहरी येत नाही असा (IPOD , MP4 , etc). मोबायीलची सवय सुटणे केवळ अशक्य, फक्त योग्य वापर करू शकतो.
आमचा अनुभव!
मला तरी फोनवर जास्त बोलायला आवडत नाही. मी व माझी बायको एकमेकांशी बर्याचदा एस्.एम्.एस्. नेच संवाद साधतो. (एकमेकांपासून दूर असताना...ऑबविअसली!) त्यामुळे एकमेकाला वेळ असताना निरोप टंकू शकते व सवडीने निरोप वाचू शकतो.
माझ्या दिसण्यात तरी घराबाहेर पुरुशांपेक्शा स्त्रीया विशेशपणे, तरूण मुली कानाला हेडफोन वा मोबाईल लावून फिरत असतात. रस्ता ओलांडणे, बस पकडणे हे देखील ते त्याच अवस्थेत असताना करीत असतात. बाकी दुश्परीणाम प्रत्यक्शात पहाण्यात आलेले नाहीत.
बोलणे
लोक मोबाईलवर बरेच बोलतात पण निदान गाडी चालवताना तरी नका बोलू. एका हाताने बाईक चालवायची दुसर्या हाताने एसेमेस, नंबर डायल करणे आणि बोलणे. ह्याला काय म्हणावे कळत नाही. इतके महत्वाचे असेल तर दोन मिनिटे थांबा किंवा इअरफोन/माइक तरी वापरा. दुसर्यांचा जीव का धोक्यात घालता?
--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/
स्कूटर-मोबाईल
एक कन्या स्कूटर चालवताना मोबाईलवर बोलत असलेले पाहिले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला एका गल्लीत वळायचे होते तेव्हा मोबाईल वर बोलता बोलता तिने वळण्यासाठी हातही दाखवला.
तेव्हा "स्त्रियांना अनेक कामे एकाचवेळी सहज करता येतात" हा सिद्धांत ताबडतोब पटला.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
कन्या
तुम्ही त्या कन्येकडे कशाला बघत होता?
अरे देवा
अरे देवा! हे जग कुठे चालले आहे ? म्हणून
चन्द्रशेखर
जग?
कन्या म्हणजे जग का? ;) ;)
जे फायद्याचे ते मी करणारच
पीपल डू व्हॉट वर्क्स् फॉर देम. ह्या सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला की, सगळे सुसह्य होइल.
--लोकांना खरोखरच एकमेकांच्या संपर्कात राहणे इतके महत्वाचे झाले आहे की ती एक न टाळता येणारी सवय झाली आहे याचा अंदाज येत नाहिये.--
मी सतत फोनवर बोलतो कारण त्यातुनच माझा बिझीनेस चालतो.
--तीच गोष्ट एसएमएसची. काही व्यक्ती एकमेकांशी बोलणे टाळून सतत एसएमएस टंकताना दिसतात. --
अनेकदा अत्यंत फायद्याचे माध्यम आहे. प्रसंगानुरुप महत्व कमी-जास्त होते.
--व्यक्तीगत कामांसाठी वेगळा क्रमांक आणि कार्यालयीन कामांसाठी वेगळा क्रमांक वापरण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.--
माझ्या बिझीनेससाठी मला आणखी २ फोन घ्यावे लागले तरी ते मी घेइन.
--मात्र मोबाईलचाच एक भाग असलेले इयरफोन्स (मराठी शब्द सुचवा) वापरणे फारच घातक आहेत असे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. सतत इयरफोन्स वापरल्यामुळे लहान आवाजातील आवाज ऐकण्याची क्षमता नाहिसी होत आहे.--
माणूस म्हणजे एखादे प्ल्यास्टीकचे खेळणे आहे का? असे व्हायला अनेक शतके जावी लागतील.
मलाही
मलाही असे वाटते मात्र कधीकधी बाहेर ट्रॅफिकचा आवाज इतका जास्त असतो की इअरफोनमधून गाणीही ऐकू येत नाहीत. याचा अर्थ ध्वनी प्रदूषणाची पातळीही बरीच वाढली/वाढते आहे.
--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/
हे खरे आहे
हे खरे आहे. आपल्या कानाच्या ऐकण्याच्या कॅपॅसिटीवर याचा त्वरित फरक पडतो.
इयरफोन्स मध्ये बाहेरचे आवाज एका प्रमाणाबाहेर कमी करता येत नाहीत. त्यामुळे संगिताचा आवाज मोठा राखावा लागतो. यासाठी अगदी कानात आता जाणारे इयर बड्स् मिळतात. पण कानाच्या पडद्याच्या अति जवळ नेलेला आवाजाही कान निकामी करण्यास तितकाच कारणीभूत असू शकतो. मग याला उपाय काय?
याला उपाय म्हणजे कानावर बसणारे हेडफोन्स वापरणे. आपण आवाजाच्या ठिकाणी संगित ऐकणार असाल तर कानाला झाकून टाकणारे हेडफ़ोन्स वापरणे उत्तम.
यात दोन प्रकार आहेत. एक बाह्य आवाज बंद (क्लोज्ड) हेडफोन्स व बाह्य आवाज चालू (ओपन) हेडफ़ोन्स. मला आवाज चालू हेडफोन्स रोजच्या वापरासाठी योग्य वाटतात. कारण यात हवेला बाहेर जाण्यास जागा असते. त्यांमुळे कानावर कोणताही ताण नसतो. यात कानावर ताण न येता बाहेरचे आवाज 'कमी' असून संगिताचा दर्जा उत्तम मिळतो. पण बाहेरील आवाज पूर्ण बंद होत नाहीत हे ध्यानात घ्या! या साठी बाह्य आवाज बंद म्हणजेच क्लोज्ड हेडफोन्स वापरणे उत्तम. सर्वसाधारणपणे म्युझीक डिजे हे वापरतांना दिसतात. बाह्य आवाज बंद हेडफोन्स फारकाळ वापरता येत नाहीत असा माझा अनुभव आहे. दिवस उष्णता असेल तर ते नकोसे वाटतात. मात्र ओपन हेडफोन्स मध्ये हा त्रास होत नाही. तसेच कानावर बसणारी गादी जर कापडी असेल तर उत्तम. या शिवाय वायरलेस असल्यास अजून बरे!
चांगल्या हेडफोन्स विषयी अधिक माहिती येथे आहे
-निनाद
महाभाग
असेच एक महाभाग रस्त्याच्या मध्यभागी फोनवर बोलण्यासाठी थांबले आणि आमच्या हातावरच्या रेषा त्यांच्या डोक्याच्या मागच्या भागी उमटल्या, हा चमत्कार कसा झाला हे मात्र त्यांच्या ध्यानी आले नसावे.
आणि हो एक नमूद करावे वाटते ते म्हणजे आमच्या गाडीच्या रेषा त्याच्या अंगावर न उमटण्यासाठी आम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागली, म्हणून फुल नाही निदान फुलाची पाकळी ह्या नियमाने आम्ही त्यांचा सत्कार केला.
जागा चुकीची वाटते.
>>आमच्या हातावरच्या रेषा त्यांच्या डोक्याच्या मागच्या भागी उमटल्या
जागा चुकीची वाटते. खरे तर पायाच्या रेषा उमटावयास हव्या होत्या.