निर्बुद्ध खोक्याचे अत्याचार
Every time you think television has hit its lowest ebb, a new type program comes along to make you wonder where you thought the ebb was.
-Art Buchwald.
------------------------------------------------------------------------
#कार्यक्रमाचे नाव- Emotional Atyachaar
वाहिनी- UTV Bindaas
संकल्पना-
तुम्हाला तुमच्या जोडीदारावर संशय आहे? त्याच्या/तिच्या तुमच्यावरील प्रेमाविषयी तुम्ही साशंक आहात?
आमच्याशी संपर्क साधा.
आम्ही त्या व्यक्तीवर गुप्तपणे पाळत ठेऊ. आमचे कॅमेरे सदैव त्याच्यापाठी असतील. आमचा एखादा विरुद्धलिंगी Under Cover Agent तुमच्या जोडीदाराशी संधान बांधू पाहिल. तुमचा जोडीदार त्यास कसा प्रतिसाद देतो/देते, ते आम्ही रेकॉर्ड करू. आमचा हा ’अभ्यास’ आम्ही तुम्हाला स्टुडियोत बसवून सादर करू.
मग तुम्ही यथास्थित आपल्या जोडीदाराची हजेरी घ्या. ऑन कॅमेरा त्याच्या/तिच्या थोबाडीत वगैरे मारा.
हा सर्व तमाशा कोट्यवधी लोक घरबसल्या मिटक्या मारत पाहतील. आम्हाला टीआरपी मिळेल, तुम्हाला आपल्या जोडीदाराला खजिल केल्याचे समाधान !
-----------------
#कार्यक्रमाचे नाव- Axe your Ex
वाहिनी-Channel V
संकल्पना-
तुमचा प्रेमभंग झाला आहे? जोडीदाराने तुम्हाला फसवले आहे? तुम्हाला त्याचा/तिचा सूड घ्यायचा आहे?
आमच्याशी संपर्क साधा.
आम्ही त्याच्यावर गुप्तपणे पाळत ठेऊ. त्याची चारचौघात फजिती/अपमान करायच्या नवनवीन योजना आम्ही आखू. कधी त्याची गाडी पंक्चर केली जाईल, कधी त्याच्यावर मॉलमधे (खोटे खोटे) चोरीचे आळ घेतले जातील, कधी त्याला नकली पोलिस पकडून नेतील...
हा सर्व तमाशा तुम्हाला स्टुडियोत बसवून दाखवला जाईल. कोट्यवधी लोक घरबसल्या (मिटक्या मारत) बघतीलच.
आम्हाला टीआरपी मिळेल, आणि तुम्हाला तुमच्या एकेकाळच्या प्रेमाचा सूड घेतल्याचे समाधान !
हे दोन्ही ’शो’ज आज जोरात सुरू आहेत.
एवढेच नाहीत, ’प्रेम’ आणि ’प्रेमभंग’ ही थीम केंद्रस्थानी असलेले अन्य कार्यक्रमही आहेत- Truth love cash, Love net वगैरे नावे असलेले कार्यक्रम याच संकल्पनेभोवती फिरतात.
दुर्दैवाने "प्रेम" ही भावना आणि तिच्या अनुषंगाने येणारे यच्चयावत मानवी मनोव्यापार आज टीव्हीवर बाजारू सेलेबल कमोडिटीज झाल्या आहेत.
प्रेम म्हणजे काय? या तीन शब्दांवर आजवर अगणित कागद खर्ची पडले असतील.
पण टीव्हीने आपल्या नेहमीच्या सगळे काही Simplify करण्याच्या सवयीनुसार प्रेमाचेही सुलभीकरण केले आहे-
Infatuations, Crush, Hook Ups, Intimacy, Break ups, Revenge, move on...
किती सोपं !
----------------------------------------------------------
प्रश्न आहे-
लोकांचे अत्यंत खाजगी जीवन, (त्यांची अनुमती असली तरी) असे चव्हाट्यावर आणले जावे का?
कोण कोणाला कसे फसवतो, कोणाला कसा राग येतो, कसे रडू येते, प्रेमात असलेल्या दोन लोकांची कशी भांडणे होतात, कशी मारामारी होते... हे एवढे तपशीलवार बघतांना "हे काहीतरी चुकीचे आहे" असे आपल्याला वाटते का?
कदाचित या केसेस डमी असतील..हे कार्यक्रम scripted असतील पण त्यामुळे होणार्या परिणामांत याने काहीही फरक पडू नये.
’दुसर्यांचे पत्र फोडून वाचू नये/ दुसर्याची डायरी वाचू नये’ हे सभ्यतेचे सामाजिक संकेत असतात. या कार्यक्रमांच्या निमित्ताने दुसर्यांचा आयुष्यात डोकावण्याच्या मर्यादांचे कुठेतरी उल्लंघन होते आहे, असे आपल्याला वाटते का?
उपक्रमींचे विचार जाणून घेण्यास उत्सुक आहे !
Comments
हे सगळे जगभर चाललेच आहे
ज्ञानेशजी
भारतीय टीव्ही वाहिन्यांच्यावर हा प्रकार पहिल्यांदा सुरू झालेला असल्याने तुम्हाला धक्का बसलेला दिसतो. अहो अमेरिकेतील वाहिन्या खाजगी भांडणे(यात प्रसिद्ध ओफ्रा वि न्फ्रीचा कार्यक्रम सुद्धा समाविष्ट आहे) अगदी सासू सून, नवराबायकोची सुद्धा, वगैरे व्यवस्थित दाखवत असतात व हे कार्यक्रम तिशय लोकप्रिय आहेत. तेंव्हा आपल्याकडे पण ते होतीलच.
चंद्रशेखर
एयन्ट इट ऑफुल?
गेम्स पीपल प्ले नावाच्या पुस्तकात एरिक बर्न ने लोकं वेळ घालवण्यासाठी कुठचे मानसिक 'खेळ' खेळतात याविषयी लिहिलं होतं. त्यातला जगभर अतिशय पॉप्युलर असलेला खेळ म्हणजे 'ain't it awful?' किंवा 'बई गं! काय काय गोष्टी चालतात (आजकाल)!' ही जगभरच्या जनतेची गरज आहे बहुतेक. समधर्मी लोक एकत्र करायचे आणि आपण जे करण्याचा विचारही करणार नाही तसलं काहीतरी इतर लोकं करतात याबद्दल गास्प करून त्रागा व्यक्त करायचा. आपण चांगले व एकमेकांसारखे हे घट्ट करण्याचा, इतर कसे वाईट हे म्हणणं अतिशय छान मार्ग आहे.
कुठच्या तरी निनावी (आपल्याला माहीत नसलेल्या) जोडप्याच्या बाबतीत असलं काहीतरी चालतं (जे अर्थातच आपल्या समाजात, आपल्या जवळच्यांबाबत होत नाही) ते कस्सं कस्सं वाईट बरं का... असं म्हणण्याची गरज असणारे खूप आहेत - असावेत. म्हणूनच रिअॅलिटी टी.व्ही. वर असले शोज चालतात.
उपक्रमावर 'बई गं, हे शोज कित्ती कित्ती वईट, नं?' अशा चर्चा चालतात. एयन्ट इट ऑफुल?
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
उपक्रमावर
उपक्रमावर आणखीही काही खेळ बघण्यात आले आहेत. :)
--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै
शंका
अन्य काही संस्थळांवर 'बई गं, अमुक एका शहरातले दुकानदार कित्ती वाईट असतात नै?' अशा स्वरूपाच्या चर्चा वाचल्या आहेत. त्या 'एयन्ट इट ऑफुल' कॅटेगरीत येतात की नाही किंवा कसे...? ;)
खटकलेल्या गोष्टी चर्चेसाठी मांडण्यास हरकत नसावी.
हा हा हा
अहो, संस्थळांवर कसले कसले खेळ चालतात यावर पीएचडी करता येईल. बाकी त्या विशिष्ट चर्चेत आपला तो बाब्या चा ऑरवेलियन खेळ प्रकर्षाने दिसला.
एखाद्या खटकलेल्या गोष्टीविषयीच्या लेखनाचं वर्गीकरण करणे, गरज वाटल्यास चेष्टा करणे म्हणजे हरकत घेणे नव्हे. हरकत घेणे म्हणजे काय याची उदाहरणं भरपूर दिसतात.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
ग्राउचो
I find television very educating. Every time somebody turns on the set, I go into the other room and read a book. ~ Groucho Marx
--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै
खेळ मनाचा, पर्याय नियतीचा!
मी हा कार्यक्रम पाहतो. हो! बायकोला आवडत नसला तरी मी (वर म्हटल्या प्रमाणे) पाहतो व पण त्यातून काय शिकता येईल? हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो.
* 'आपल्या जोडिदाराला आपण आतापर्यंत व्यवस्थित समजू शकलोय का?' ह्या प्रश्नाचं उत्तर बर्याच जणांच्या मनाच्या कोपर्यात लपलेला असतो. जी बाजू 'द्न्यात' असते तीच्या बाबत सांशकता निर्माण होण्यानेच हा प्रश्न निर्माण होतो. जी बाजू द्न्यात आहे तीच्या अगदी विरूद्ध बाजू असते 'अद्न्याताची'! माणसाला जीवनाच्या 'द्न्यात' बाजूपेक्शा 'अद्न्यात बाजूबाबत' ओढ (कल / झुकाव) निर्माण झाली की तो वा ती एखादी विचित्र कृती करणारच!
'द्न्यात बाजूला' आतापर्यंत कसे समजून घेतले होते? ती माहीत असताना आपण कोणते निर्णय घेतले होते? कसे वागलो होतो? हे माणूस वरील कृती करत असताना विसरून जात असावा.
पण 'अद्न्यात बाजू' जाणण्याची कृती केल्यानंतर, 'अद्न्यात बाजू' जाणणल्यानंतर (द्न्यात झाल्यानंतर) नव्या कृतीसाठी दोन पर्याय निर्माण होत असतात/असावेत. त्यावेळी जो पर्याय निवडला जाणार तो पर्याय भावी आयुश्यात पुन्हा-पुन्हा सतावत राहणार.
त्यासाठी उदाहरण रामायणातील रामाचच घेवूया!
प्रणयासाठी सुपर्णकेने (शुर्पणखा हे नाव बदललेले वाटते. जसे महाभारतातील सुर्योधन, सु:शासन च्या एवजी दुर्योधन, दु:शासन )
जेव्हा रामाला विचारले तेव्हा रामाने तीचा प्रस्ताव 'लक्शुमणाला विचारून बघ!' असे म्हणून अव्हेरले.
त्यावेळी रामाच्या मनात, 'सुपर्णकेचा प्रस्ताव स्विकारला तर सीतेला काय वाटेल? सीता म्हणाली तर, 'अरण्यात आहोत हे सागूंन मला मेलीला आतापर्यंत ताटकळत ठेवलं आणि स्वत: मात्र...! ' हा/ असा विचार आला होता का?' *
ह्या टप्प्यावर दोन पर्यायांपैकी
1- 'आत्मप्रतिश्ठा जपणं' व 'त्यासाठीच माझ्या जोडीदाराला असं म्हणायची संधीच मी देणार नाही', हा की
2- 'याचक म्हणून समोर असलेल्या स्त्रीचा मान राखणं' व 'त्यासाठी मी माझ्या जोडीदाराशी सल्ला-मसलत करेन.'
रामाने पहीला पर्याय निवडला. त्यानंतर आयुश्यातील इतर ही दोन वळणांवर त्याला हाच पर्याय निवडावा लागला.
चर्चा प्रस्तावात उल्लेखलेल्या कार्यक्रमांमध्ये जी मंडळी आपणहून जोडीदाराच्या चारीत्राची चाचणी त्यांच्या नकळत घेत आहेत. त्यांच्या आयुश्यात त्यांना यापुढे आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवणे जमेल असे मला तरी वाटत नाही. ज्या मंडळीचे जोडीदार ह्या 'लॉयल्टी टेस्टमध्ये' पास झालेत ते बहुदा भविश्यात त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत.
समजून घेणे...
>>>'आपल्या जोडिदाराला आपण आतापर्यंत व्यवस्थित समजू शकलोय का?'
नवीन धाग्यावर काथ्याकूट करावा असे वाटते. खूपच अवघड प्रश्न आहे. च्यायला, आयुष्याच्या कोणत्या तरी वळणावर थांबून जोडीदाराच्या समजून घेण्याबद्दल विचार केलाच पाहिजे. स्वाभिमान,अहंकार, हा समजून घेण्याच्या बाबतीतला मुख्य अडथळा आहे असे वाटते. बाकी, असे कार्यक्रम म्हणजे सुखी संसाराची वाट लावणारे कार्यक्रम आहेत असे वाटते. आजच्या दै.सकाळ च्या सप्तरंग पुरवणीत 'बायकोचा मित्र आणि नवर्याची मैत्रीण' एक चांगली चर्चा आहे. दुवा शोधतो...!
मजकूर संपादित.
-दिलीप बिरुटे
हे घ्या.
हे घ्या.
बायकोचा मित्र आणि नवऱ्याची मैत्रीण
धन्यु....!
दुव्याबद्दल आभारी....!
मजकूर संपादित.
-दिलीप बिरुटे
लॉयल्टी तेस्ट
+1
प्रतिसाद व आपला विचार आवडला. फक्त एक गोष्ट समजली नाही. या विषयाबद्दलचे इतके तर्कसंगत विचार तुमच्या मनात परिपक्व झालेले असातानाही आपण हा कार्यक्रम कशासाठी बघता?
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
वयानूसार वागण्यात गैर काहीच नाही.
वैचारीक प्रगल्भतेचा मी माझ्या तारूण्यावर दुश्परीणाम का बरे होवू द्यायचा? ज्या वयात जे करायचे, जे पहायचे ते शौक पूरे करायलाच हवेत. पहायची वा इतर गोश्टी करायची इच्छा दाबून का ठेवायची?
निर्बुद्ध खोक्याचे अत्याचार
खरोखरच ह्या विषयावर काय प्रतिक्रिया देऊ ते कळत नाहीये कारण या विषयातले काहीच माहिती नाहीये.
१९९५ साली घरातून इडीयट बॉक्स काढलाय तो अजून परत घेतला नाहीये. लोक चवीने याच्या दुष्परीणामांची चर्चा करतात मात्र त्यावर काही उपाय करतात की नाही ते माहित नाही.
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
त्रास होतो तर बघता कशाला?
मला समजत नाही अशा कार्यक्रमांचा जर तुम्हाला त्रास होतो तर तुम्ही बघता कशाला. उगीच एखादी चर्चा चघळत बसायची याला काही अर्थ नाही.
सभ्यतेचे सामाजिक संकेत
सभ्यतेचे सामाजिक संकेत वेगवेगळ्या संस्कृतींत वेगवेगळे असू शकतात. सामाजिक संकेत बदलतही जातात. कधीकधी एक संस्कृती, दुसर्या एका संस्कृतीप्रमाणे स्वतःला बदलू इच्छिते. त्यानुसार, बदलणे न बदलणे नेहमीच व्यक्तीच्या हातात असेल असे नाही. समाज बदलला की त्यानुसार अनिच्छेने का होईना पण बदल घडतो.
बाकी, जोपर्यंत माझ्या हातात रिमोट आहे तोपर्यंत मला टेलेव्हिजन इडियट बॉक्स वाटत नाही. :-)
स्टार वर्ल्ड
स्टार वर्ल्डवर आणखी एक असाच कार्यक्रम असतो. नाव विसरलो. त्यात जोड्यांना बोलावून प्रश्न विचारतात आणि खरी उत्तरे दिली की पैसे देतात. शेवटचे बक्षीस बहुधा $५००,००० आहे. पॉलीग्राफ टेस्टमुळे खरे बोलत आहात किंवा नाही हे कळते. ९९% प्रश्न तुम्ही तुमच्या जोडिदाराला कसे, केव्हा, किती वेळा फसवले या संकल्पनेभोवती असतात.
--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/
वैविध्य
वैविध्य नसते तर जग चालले नसते... टिव्ही आणि अशा सिरीयल्स नसत्या तर अजून काही...आपण सांगितलेल्या मालीका पहाणारे अनेक जण लवकरच कुठल्यान् कुठल्यातरी बाबाच्या मागे जातील अथवा कुठले तरी तर्र दिसणार्या डोळ्यांच्या व्यक्तीचे टिव्ही वरच प्रवचन ऐकणे चालू करतील असा माझा कयास आहे. ;)
बाकी आधी "बुद्ध धर्माच्या (प्राचीन) र्हासावरून" चर्चेनंतर एकदम "निर्बुद्ध खोक्यांचा अत्याचार" असे वाचून मला "बुद्ध नसलेले (म्हणून निर्बुद्ध असलेले) बुद्ध धर्माच्या र्हासास कारण कसे झाले" यावर माहीतीपूर्ण लेख असेल असे आधी वाटले ;)