राष्ट्रकुल स्पर्धा खेळाडू निवास

खालील दुव्यावरील चित्रे पहा. आणखी काही लिहिण्यासारखे आहे असे वाटत नाही. पण बीबीसी च्या छायाचित्रकाराने घेतलेली चित्रे खूप काही सांगून जातात.अर्थात या प्रकारची दृष्ये भारतात नेहमीच बघायला मिळतात त्यामुळे आपल्याला यात फार काही निराळे वाटणार नाही

लेखनविषय: दुवे:

Comments

स्पीचलेस..

स्पीचलेस..
स्वतःचीच लाज वाटतेय.
कोणीतरी म्हणाले की, पाश्चिमात्यांचे स्वच्छतेचे मापदंड थोडे जास्त असतात म्ह्णून ते याला 'अस्वच्छ' म्हणतात.
पुण्या-मुंबईतील 'सुलभ'पण यापेक्षा वेगळे नसतात.

||वाछितो विजयी होईबा||

:-(

...

शहाजहानने ताजमहाल बांधणार्‍या लोकांचे हात तोडले होते अशी दंतकथा ऐकली आहे (परत अशी वास्तु ते बांधु नयेत म्हणुन) आता ते (वरचे फोटो पाहून) खरे असले तरी फारसे क्रुर वाटत नाही :-)

आपण आपलं काम का करतोय? कशासाठी करतोय?

'आपण आपलं काम कशासाठी करतोय?' ह्याचं उत्तर कोणाकडेच नाही. म्हणून हे असं होत असावं.
-ह्या प्रश्नाचं उत्तर सार्‍या यंत्रणेला कलमाडींनी द्यायला हवं होतं.
-ह्या प्रश्नाचं उत्तर कलमाडींना खेळासंबंधित मंत्र्यांनी द्यायला हवं होतं.
-ह्या प्रश्नाचं उत्तर खेळासंबंधित मंत्र्यांना पंतप्रधांनांनी द्यायला हवं होतं.
-ह्या प्रश्नाचं उत्तर 'कामचलावू पंतप्रधानांना' 'पडद्यामागील पंतप्रधान' सोनिया गांधींनी द्यायला हवं होतं.
-ह्या प्रश्नाचं उत्तर सोनिया गांधी यांना 'तुम्ही पडद्यामागे रहा, मला पंतप्रधान होवू द्या' असा विचार करून त्यांना काँग्रेसचे अध्यक्शपद स्विकारण्याची विनंती करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या शरद पवार यांनी द्यायला हवं होतं.

हड् साला....

उत्तर.... "नियतीची इच्छा!"

दोषारोप

प्रत्येक गोष्टीचा संबंध राजकारण व राजकारणी लोकांशी कशासाठी लावायचा? स्वच्छातागृहे साफ करू नका म्हणून सांगायला कलमाडी. क्रीडा मंत्री, पंतप्रधान, सोनिया गांधी किंवा शरद पवार गेले होते का? आपल्या सामाजिक स्वच्छतेच्या कल्पना अजून 16व्या शतकातल्या आहेत हे याचे कारण आहे हे का मान्य करू नये?

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

जबाबदारी

प्रत्येक गोष्ट राजकारणी करत नाहीत हे खरे आहे. मात्र संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी कलमाडी, क्रीडा मंत्रालय, गिल यांच्यावर आहे. ज्याप्रमाणे ओबामा म्हटले होते की द बक स्टॉप्स हिअर तसेच.

बाकी सार्वनजिक स्वच्छता हा विषयच आपल्याकडे नाही याच्याशी सहमत आहे.

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

डबल स्टॅण्डर्ड्

>>मात्र संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी कलमाडी, क्रीडा मंत्रालय, गिल यांच्यावर आहे
बरोबर. पण रेल्वेने नफा केल्यावर श्रेय देताना मात्र "हाताखालचे लोक चांगले होते म्हणून" असे ऐकू येत होते.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

कामगारांना फासावर लटकवूया का?

जनता ही लहान मूलासारखीच असते. मूलाला वळणं लावणं हे पालकांचेच काम असते. पालक म्हणजे गार्डियन. सामाजिक स्तरावर गवर्मेंट हे समाजाचे पालक असतात. 'त्यांना म्हणजे समाजाला चांगल्या पद्धतीने प्रोत्साहीत करणे' हे गवर्मेंट म्हणून काम करणार्‍या राजकिय व्यक्तींचे च असते.
आपण आपल्या कामातून नव्हे, त्याही आधी येणार्‍या घटनांना कशाप्रकारे प्रतिसाद देत सामोरे जातो, त्यातून जी उर्जा प्रसवते ती उर्जा पुढे-पुढे प्रवाहत जाते. असे मी समजतो.

श्रीमती. सोनियांपूढे श्री. शरद पवारांनी 'पक्शाध्यक्श व्ह्या!' म्हणून कोणती उर्जा प्रसवली?
श्रीमती सोनियांनी मग ती 'नाईलाज ला काय ईलाज' ही उर्जा श्री. मनमोहन सिंग यांच्या कडे प्रसवली.
हीच 'नाईलाज ला काय ईलाज' रूपी उर्जा 'आप-आपली सोय पहात, आलिया भोगासी' बनत राश्ट्रकूल खेळांचे आयोजन करणार्‍या लोकांकडून ते निम्न स्तरावरील काम करणार्‍या कामगारांपर्यंत पोहचली. कामगारांकडून काम करून घेणार्‍यांनी कामगारांना प्रोत्साहीत करत काम करून घेतले नाही. ही समस्या आहे.

तुम्ही जे फोटो दाखवत आहात. त्यामध्ये कामगारांकडून घाण झालेली आहे. कामगारांनी कोणत्या परीस्थितीत काम केले होते? हे कोणी विचारले का त्यांना?
सामाजिक स्वच्छतेच्या गोश्टी तुम्ही सलग बारा-तेरा तासापेक्शा जास्त काम करणार्‍या कामगारांकडून कशा काय अपेक्शीता? त्यांच्या कामावर निरीक्शण करणारे मुकादम व त्यांच्या वरही निरीक्शण करणारी यंत्रणा, एक साखळी हे दोशी नाहीत का?

दोशारोप करायचा नाही तर मग दुर्लक्शच करायचे होते.

घाणेरड्या सवयी

कामगारांच्या सवयी बेक्कार आहेतच पण ज्या कंपनीचे हे कामगार आहेत त्यांचा दोष नक्कीच जास्त आहे.

कामगारांकरता खालील फोटोत दिसतात तशी बांधकामाच्या जागेवर एका बाजुला सोय करणे कंपनीचे काम होते. स्पर्धा संकूलातील सुविधा अश्या वापरणे हे चूकच आहे.

सहमत पण

आपल्या सामाजिक स्वच्छतेच्या कल्पना अजून 16व्या शतकातल्या आहेत हे याचे कारण आहे हे का मान्य करू नये?

सहमत. समाजाला वळण लावणे हे काम दोन प्रकारे होऊ शकते. एक प्रत्येकाने स्वतःला आणि यंत्रणेने लोकांना. चांगल्या सवयी लावताना सक्ति गरजेची आहे. पण राहून राहून एक प्रश्न विचारावासा वाटतो, आपल्या संसदेत काय अवस्था असते? तेथे स्वच्छतागृहे कशी असतात? खासदारांची निवसस्थाने कशी असतात?

इतर वेळी मी गांधीजींबद्दल कदाचित आपुलकिने बोलणार नाही. पण स्वतः स्वच्छता गृह साफ करण्याचा त्यांचा गुण कोण्या राजकारण्याने घेतला आहे काय? सगळेच जण जर वर बोट दाखवणार असतील तर मग भारतातल्या सामाजिक स्वच्छतेच्या कल्पना १६व्या काय तर आदिमानवा पर्यंत मागे गेलेल्या असतील.






गांधीजी

>>इतर वेळी मी गांधीजींबद्दल कदाचित आपुलकिने बोलणार नाही. पण स्वतः स्वच्छता गृह साफ करण्याचा त्यांचा गुण कोण्या राजकारण्याने घेतला आहे काय?

गांधीजींचे एक वाक्य आठवले, ते कुणाच्याही घरी गेले की प्रथम टॉयलेट बघायला जात. त्यांचे म्हणणे होते की माणूस टॉयलेट कसे ठेवतो यावरून बरेच काही समजते. यापुढे अजून बोलण्याची गरज नसावी. :(

:(

हे बघुन लाज वाटली.. बाकी काय बोलणार :(

@ तुषार, सुलभ याहून बरेच स्वच्छ असतात

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

पझेशन

लाज का बरे वाटली? बीबीसी वाल्याला ते खटकणे ठीक आहे पण आपल्याला का खटकावे?

आपण नवीन घराचे पझेशन घेण्यापूर्वी घराच्या टॉयलेटची परिस्थिती साधारण अशीच असते. म्हणजे प्रत्येक घराची नाही पण बिल्डिंगमध्ये १५-२० फ्लॅट असतील तर २-३ फ्लॅटची परिस्थिती अशीच असते.

माझ्या आधीच्या घराचे पझेशन घ्यायच्या आधी त्या फ्लॅटमध्ये बिल्डर सिमेंट, टाईल्स वगैरे ठेवत होता त्यामुळे घर अत्यंत घाण झाले होते. पझेशन देताना त्याने ते सगळे साफ करून दिले होते.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

अगदी सपशेल सहमत

आपण नवीन घराचे पझेशन घेण्यापूर्वी घराच्या टॉयलेटची परिस्थिती साधारण अशीच असते. म्हणजे प्रत्येक घराची नाही पण बिल्डिंगमध्ये १५-२० फ्लॅट असतील तर २-३ फ्लॅटची परिस्थिती अशीच असते.

-किंबहुना नव्या बांधलेल्या घराचे टॉयलेट घाण करणे हे येथील कामगारांचे 'आद्य कर्तव्य आणि जन्मसिद्ध हक्क' दोन्ही असते. तसे केले नाही तर त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होते हे बीबीसी वाल्याला आपण समजावून सांगायला हवेत.
'भारतीय बांधकाम मजूरांचे नाजूक मनोव्यापार' समजणारे सूज्ञ भावी मालक म्हणूनच बांधकाम पूर्ण होताच टॉयलेट/बाथरूमला कुलुपे ठोकतात. जसे -आम्ही ;)

मुद्दा समजला पण असहमत

>>>माझ्या आधीच्या घराचे पझेशन घ्यायच्या आधी त्या फ्लॅटमध्ये बिल्डर सिमेंट, टाईल्स वगैरे ठेवत होता त्यामुळे घर अत्यंत घाण झाले होते.

कस्ट्रक्शन वेस्ट आणि ह्युमन वेस्ट मध्ये फरक असतो. शिवाय मॅट्रेसवर कुत्र्यांच्या पावलांचे ठसे असणे - हे देखील एक आठवड्यावर सर्व आलेले असताना...

मॅट्रेसवरचे ठसे

शिवाय मॅट्रेसवर कुत्र्यांच्या पावलांचे ठसे असणे - हे देखील एक आठवड्यावर सर्व आलेले असताना...

अगदी हेच डोक्यात आले. आपल्याकडे बांधकाम करताना मजूरांच्या सोयीचा किंवा गरजेचा विचार कमी केला जातो; त्यामुळे फरक हा आलाच. परंतु जेथे मॅट्रेस घातली आहे. खोली सजवण्याची वेळ आली आहे तिथे कुत्र्याच्या पावलांचे ठसे? तो कोणते काम करत होता? ;-)

लाज वाटलीच

लाज का बरे वाटली? बीबीसी वाल्याला ते खटकणे ठीक आहे पण आपल्याला का खटकावे?

माहित नाही . मी आतापर्यंत एकदाच नवे कोरे घर विकत घेतले आहे. व तिथे असे काहिहि नव्हते. पहिल्या २-३ घरांपैकी एक आवडल्यावर फार वणवण केली नव्हती. शिवाय स्वतःच्या घरी स्वच्छतागृह हे स्वच्छच असते. अगदी परदेशात एकटं रहात असतानाही कधीही किचनचा सिंक भरलेले नसायचे किंवा स्वच्छतागृह चकाचक असे.

बाकी भारतीयांच्यात स्वच्छता नाही हे विधान सर्वत्र खरे नाही. ट्रेकिंग निमित्त मी अनेक गावांत (विविध राज्यांतील) फिरलो आहे. बरीचशी गावे अगदी सुंदर किंवा चकाचक नसली तरी नेटकी होती. गावांतील घरांतील स्वच्छतागृहेदेखील स्वच्छ असत.

त्यामुळे हे दिसणारे चित्र मला भारतीयांचे प्रातिनीधीक न वाटल्याने मला हे बघुन लाज वाटली.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

+ १

त्यामुळे हे दिसणारे चित्र मला भारतीयांचे प्रातिनीधीक न वाटल्याने मला हे बघुन लाज वाटली.

असेच म्हणतो.

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

खरी बातमी आहे का?

बी बी सी वाल्यांनी कुठल्या रूमचे फोटोस टाकले आहेत ?

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

उणिवांचा गाजावाजा....!

दिल्लीतील आशिया क्रीडा स्पर्धेचं कौतुक अनेकांनी केलं त्यातल्या उणिवा कुठेच दिसल्या नाहीत. उणिवा असतील पण त्यावर रवंथ झालेले दिसले नाही. दुर्दैवानं राष्ट्रकुल स्पर्धेला सुरुवातीपासूनच गालबोट लागले. भ्रष्टाचार, पुल कोसळणे, निवासस्थानाच्या तक्रारी, प्रमु़ख खेळाडूंची स्पर्धेतून माघार आणि गेले दोन दिवस विविध दैनिकातून वरील दुव्यावरील छायाचित्रे. शेवटी पंतप्रधानांना स्पर्धेच्या तयारीबाबत आढावा घ्यावा लागतो त्याचे कारण एक की स्पर्धेच्या निमित्ताने जी नाचक्की होत आहे ती कुठेतरी थांबावी आणि ती थांबेल असे वाटते . मोठी स्पर्धा म्हटल्यावर उणिवा या असणारच. त्या उणिवांचा गाजावाजा खूप झाला, होत आहे. स्पर्धा यशस्वी होऊन संपेलही पण राष्ट्रकूल स्पर्धेच्या निमित्तानं जी नाचक्की होत आहे ती भरुन निघणार नाही असे वाटते. बरं...! प्रसिद्ध माध्यमांनी तर राष्ट्रकुल स्पर्धेच्या विरोधात असल्यासारखे लेखनी चालवली आहे. स्पर्धा सुरु होईपर्यंत अजून काहीतरी जोरदार "न्यूज'' येतच राहतील. सध्या उठतो तो राष्ट्रकुलच्या निमित्तानं 'ध' चा 'मा' करत असतांना बुद्धीबळपटू विश्वनाथ आनंदला राष्ट्रकुलच्या गोंधळाबद्दल विचारल्या गेले तेव्हा त्यांनी एक शब्दही सावळ्या गोंधळाबद्दल काढला नाही. स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होऊन भारतीय खेळाडूंनी खूप पदकं मिळवावीत अशी भावना व्यक्त केली. च्यायला, अशावेळी आपला उर भरुन येतो....!

-दिलीप बिरुटे

विश्वनाथन आनंद

हे बोलले हा त्यांचा चांगुलपणा, नक्की.
पण लक्षात घ्या.

१. स्पर्धा २ आठवड्यांवर आली. स्पर्धक येऊ लागले आहेत. आपण साधे हॉटेलमध्ये राहायला गेलो तर आपली अपेक्षा अशी असते की आत शिरताना रूम स्वच्छ असावी. कल्पना करा की तुम्ही तिथे आत गेलात आणि हे दृष्य पहायला मिळाले. कसे वाटेल?
२. आर्किटेक्ट किंवा जे कोणी खोलीतले इंटिरीअर डिझाईन केले आहे, त्यांनी पलंग कसले निवडले आहेत? कँपिंगला आले आहेत का लोक? त्यांना आणलेल्या वस्तू ठेवण्यासाठी कपाटे, हँगर यांची व्यवस्था नको? - असली तर दिसत नाही आहे.
२. नाचक्की थांबावी असे वाटत असल्यास कामकाज चुकले आहे हे मान्य करायला हवे. दीक्षित बाई काय बोलल्या? १००० बसेससाठी व्यवस्था केली ते तुम्हाला दिसत नाही, आणि हे दिसते. म्हणजे काय म्हणायचे आहे? ही चूक मान्य करणे आहे का?
३. हे नेहमी राहतो त्या बिल्डिंगांचे बांधकाम नाही, की पझेशन मिळेपर्यंत कामगारांनी वापरावे. कामगारांना वेगळी व्यवस्था, टेम्पररी टॉयलेट बांधण्याचा खर्च एवढ्या मोठ्या कंत्राटात घालता आला असता. कंत्राटदाराने स्वच्छता ठेवायला हवी. अशा प्रकारचे क्लॉज कंत्राटात घालायला हवे. हे सर्व सुचायला अनुभवी लोकांना घेतले पाहिजे.
४. आज ही वेबसाईट अपग्रेड करणे चालले आहे. http://www.cwgdelhi2010.org/?q=node/1816 ही वेळ आहे अपग्रेड करण्याची?

हा सर्व दोष कलमाडींचा आहे असे नाही. कलमाडी मला वाटते २००९ पासून यात आहेत. त्याआधी काय प्लॅनिंग चालले होते? हे सर्व बोलले जाणार. हा सर्व सार्वजनिक पैसा आहे, खाजगी मालमत्तेचा प्रश्न नाही. तेव्हा आपण भारताची अजून पुढेही अशीच नाचक्की होऊ नये यासाठी काय करावे हे पाहिलेच पाहिजे.

४ - तुम्ही कुठे क्लिक केलेत् ?

http://www.cwgdelhi2010.org/ ही तर व्यवस्थित चालु आहे.
आणि सर्व कामाची पेजेस चालू होती (आज सकाळ पर्यंत तरी..).

नक्की कुठे क्लिक केलेत ?

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

काल

चालू नव्हती. वरची लिंक गूगल दुव्यात आली ती अपग्रेड करत आहे म्हणून. आता ती काढून टाकलेली दिसते.
याचाच अर्थ काम चालू होते.

मान्य...!

खेळाडूंच्या राहण्याची जेवणाची उत्तम व्यवस्था व्हायला हवीच हे मान्यच आहे. योग्य नियोजन झाले नाही त्यामुळे जेव्हा स्पर्धा जवळ येऊ लागली तेव्हा संयोजक धावपळ करतांना दिसत आहेत. जे स्पर्धेपूर्वी व्हायला हवे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले.

>>>भारताची अजून पुढेही अशीच नाचक्की होऊ नये यासाठी काय करावे हे पाहिलेच पाहिजे.
सहमत आहे..!

-दिलीप बिरुटे

मी एक विनोद सांगतो...

भारतीयांच्या सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींवरुन एक जुना विनोद आठवला तो सांगतो (चर्चेत असा टाईमपास बरा असतो मधून अधून)

पंडित नेहरुंनी मोठ्या अगत्याने रशियाचे अध्यक्ष क्रुश्चेव्ह यांना भारतभेटीचे आमंत्रण दिले. क्रुश्चेव्ह भारत दौर्‍यावर आले. नेहरु म्हणाले, ''चला. आपण आमच्या ग्रामीण भागात जाऊया. त्यानिमित्त बापूंचा भारत तुम्हाला बघायला मिळेल.' दोघे मोटारीतून निघाले. सकाळची वेळ होती. वाटेत अनेक ठिकाणी क्रुश्चेव्ह यांना रस्त्यावर नि:संकोच विधी उरकणारे लोक बसलेले दिसले. त्यावर ते उपहासाने हसून नेहरुंना म्हणाले, 'हा काय बापूंच्या आणि तुमच्या स्वप्नातला भारत. लोकांना अजून सार्वजनिक स्वच्छतेचे भान नाही. कशी प्रगती करणार तुम्ही? आमच्याकडे बघा. एक माणूस रस्त्यावर विधी सोडा, पण थुंकतानाही दिसणार नाही.' नेहरुंना हा अपमान झोंबला, पण वस्तुस्थिती नजरेसमोर दिसत असल्याने ते चरफडत गप्प बसले.
पुढे क्रुश्चेव्हनी नेहरुंना रशियाच्या दौर्‍यावर बोलावले. त्यावेळी ते नेहरुंना म्हणाले, 'चला मीपण तुम्हाला ग्रामीण रशियाचे दर्शन घडवतो.' दोघे मोटारीतून जात होते. नेहरुंची शोधक नजर कुठे काही अस्वच्छता दिसते का, याकडे होती. पण सगळीकडे चकाचक. रस्त्यावर माणसे होती, पण ती कामात गुंग होती. आणि एकदम नेहरुंनी टाळी वाजवली आणि विजयी नजरेने ते क्रुश्चेव्हना म्हणाले, 'तुम्हीच म्हणाला होतात ना, की रशियात कुणी रस्त्यावर विधीला बसत नाही. तो बघा तिथे एक माणूस बसला आहे. आता काय म्हणाल?' त्यावर क्रुश्चेव्ह लालबुंद झाले. त्यांनी त्या माणसाला पकडून आणण्याचा आदेश सुरक्षा रक्षकांना दिला. तो माणूस समोर येताच ते रशियनमध्ये कडाडले, 'आपल्या पितृभूमीचा असा अपमान करताना तुला लाज वाटत नाही. कोण आहेस तू?'
त्यावर घाबरलेला तो माणूस म्हणाला, 'अहो. मला रशियन समजत नाही. मी एक भारतीय माणूस आहे. पहिल्यांदाच येथे आलो आहे. सवयीप्रमाणे सकाळी बाहेर पडलो अन् ....'

(आपले एक नेते लंडनला तंबाखू खाऊन रस्त्यावर थुंकले होते. ते बघणारी शेजारची एक म्हातारी कडाडली, 'हे असले प्रकार तुमच्या देशात चालत असतील. आमच्याकडे नाही. मुकाट्याने ती घाण साफ करा नाहीतर तुरुंगात जा.' अखेर दादापुता करुन पाणी मागून घेतले आणि साफ केल्यावरच मग जाऊ दिले. हे नक्की कुणाच्या बाबतीत घडले ते माहीत नाही.)

अजित पवार यांनी आर. आर. आबा पाटील यांना तंबाखू खाऊन पचापचा थुंकण्याच्या सवयीवरुन जाहीर सुनावल्याचा किस्साही दोन वर्षांपूर्वीचाच..

 
^ वर