भारतात द्विपक्षीय राज्यपद्धती आवश्यक

राष्ट्रपती कलाम यांचे हे उदगार आहेत. खरतर या विषयावर चर्चा सुरू करायचा प्रस्ताव अनेक दिवस मनात रेंगाळत होता. वर्तमान पत्र वाचल्यावर हुरूप आला.

भारतात द्विपक्षीय राज्यपद्धती आवश्यक आहे का? या बद्दल आपले मत काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. भारतातले राजकारण कशावर चालते? का चालते? या विषयावरच्या चर्चा चघळून चघळून चोथा झाल्या आहेत. पण जर आपल्याला खरच विकसनशील भारताला विकसित भारत बनवायचा असेल तर महत्वाकांक्षी सरकार येणे गरजेचे आहे जे ठाम निर्णय घेउ शकेल. आज ना उद्या प्रत्येकाला याची नक्किच जाणीव होईल असे वाटते. असे सरकार अनेक पक्ष मिळून कधीच देउ शकणार नाहित. त्यासाठी एकमेकांना पर्याय म्हणून फक्त दोनच राजकिय पक्ष असणे गरजेचे आहे. थोडक्यात भारतात द्विपक्षीय राज्यपद्धती आवश्यक आहे. आपल्याला काय वाटते? दोनच राजकिय पक्ष असणे हि भारताची आजची गरज आहे का?

लेखनविषय: दुवे:

Comments

काशीराम

आरक्षण रद्द करा असे सुद्धा ते म्हणाले एकदा... भारतीयांना विकसित भारताचे महत्व पटवणारे राजकिय नेते हवेत.


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

रिप

महाराष्ट्रातल्या सगळ्या रिपब्लिकन पक्षांच्या पार्श्वभागावर लत्त्ता प्रहार करण्यास कु. मायावतींनी महाराष्ट्रावर बसपाचे लक्ष केंद्रित करावे. - सहमत...

उत्तर प्रदेशात मायावतींना मिळणारे यश हे त्यांच्या बदललेल्या विचारांचे यश मानवे लागेल. त्या आता सर्वांना एकत्र घेउन जायचा प्रयत्न करत आहेत.
दलितांनी सुद्धा योग्य विचार केल्यास त्यांची दैना होणार नाही.

असेच उत्तर प्रदेशात - दलित आणि मुस्लिम समाज राजकिय समिकरणे ठरवतो. असे हि म्हणले जाते कि मायावतींना भाजपचा छुपा पाठिंबा आहे.


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

सर्किटदादा..

आपल्या प्रतिसादाशी मी पुर्णपणे सहमत. आजच मायावतीने देशाच्या सर्वात मोठ्या राज्यात(उ.प्रदेश) बहुमत प्राप्त करून सत्ता काबिज केली आहे. कुठे महाराष्ट्रातील फुटीर रिपाईं नेतृत्व आणि कुठे मायावती.
उ.प्रदेश सारख्या मागास ,जातीयवादी राज्यात महीला व त्यातही दलित (मायावती )मुख्यमंत्री होईल .आतापर्यंत झालेली आहे. आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात महीला मुख्यमंत्री अजुनही झालेली नाही. केव्हा होणार.
आपला
कॉ.विकि

चाणक्य साहेब

आरक्षणावर कशाला घसरलात ते कळले नाही .
आपला
कॉ.विकि

पक्ष

पण मग कोणी पक्षाने कोणत्या पक्षात जायचं, आणि कोणत्या दोघांनी आपली नावं शाबूत ठेवून इतरांना आपल्यात सामावून घ्यायचं हे सर्व पक्ष कसं ठरवतील?
(चिठ्ठ्या टाकून कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या करुन???)
राजकारण अज्ञ अनु.

मी शुद्धीचिकित्सा वापरते.

लाच

लाचखोरी हा तर जागतिक मुद्दा आहे. कदाचित येथे विषयांतराचा. आपण लाचखोरीचे समर्थन करत आहात असा प्राथमिक अंदाज येतो. आपल्याला तसे म्हणायचे नसेल कदाचित.
भारतात खरतर गेला १५-२० वर्षांपुर्वी इतर राजकिय पक्ष इतके प्रभावीच नव्हते. अलिकडच्या या १५-२० वर्षात फारच खिचडी झाली आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही वा जस्तित जास्त माहित नाही असे द्या असे असताना भारतात हा प्रश्नच बरोबर नाही. याचे उत्तर असेच का? हो-नाही हा पर्याय का नाही? असेच जास्त आढळून येते.
भारताचे जे मुख्य प्रश्न आहेत. जसे कि लोकसंख्या नियंत्रण/व्यवस्थापन, पायाभूत सुविधा इत्यादींकडे लक्ष देणारे पक्ष आज भारताला गरजेचे आहे असे वाटते. पण भारताचा इतिहास सुद्धा हे सांगतो कि आम्हाला आमचे असे मत जरा कमीच आहे. गुलामगिरीची आम्हाला सवय पडली आहे. मग भारता बाहेर जाउन सन्मानाने म्हणवून घ्यायची बौद्धिक का असेना? प्रत्येकाला या प्रश्नांपासून आपले अंग बाजूला काढून घ्यायचे आहे.
आज अनेक पर्याय आहेत. पण कोणताच हवा तसा नाही. जर असे आहे तर आपल्याला हवा तो पर्याय आपण तयार करणे गरजेचे नाही का?


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

ठिक आहे..

आपण आपला मुद्दा ग्राह्य धरू. पण लाच खोरीचा खेळ काहि प्रमाणात कमी होईल. कारण जर दोनच पक्ष असले तर हो किंवा नाही हा एकच पर्याय राहतो. आज अनेक पर्याय असल्याने खोबरं तिकडं चांगभल हा प्रकार जास्त आहे. भारतात पक्षाची मान्यता रद्द होण्याचे कायदे आहेत. त्याचा फायदा व्हायला हवा.

अवांतरः संगणकाचा वापर शासकिय कार्यालयात सुरू झाल्या पासून लाच खोरीचे प्रमाण बरेच कमी झाले आहे असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. पण हा अनुभव व्यक्तिगत पातळीवर झाला. आपण म्हणता तसा वरच्या पातळीला आळा घालणे हा एक गंभीर मुद्दा आहे.


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

आपण

पण मग कोणी पक्षाने कोणत्या पक्षात जायचं, आणि कोणत्या दोघांनी आपली नावं शाबूत ठेवून इतरांना आपल्यात सामावून घ्यायचं हे सर्व पक्ष कसं ठरवतील? हे पक्षांनी नाही. आपण मतपेटीच्या माध्यमातून दाखवून द्यायच.


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

आमचे मत..

आर्य,

आपण उपस्थित केलेल्या चर्चेत आम्ही खालील मुद्दे मांडत आहोत-

भारतात द्विपक्षीय राज्यपद्धती आवश्यक आहे का? या बद्दल आपले मत काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

१) असे आम्हाला वाटत नाही. द्विपक्षीय पद्धतीपासून एक पक्षीय 'हुकुमशाही' फार दूर नाही, असे आमचे मत आहे, आणि हुकुमशाहीला आमचा कडवा विरोध आहे!

२) त्यापेक्षा मिलिजुली सरकारच उत्तम, असे आमचे मत आहे!

३) शिवाय भारतात लोकशाही असल्यामुळे कायद्याने कुणीही नागरीक पक्ष काढू शकतो आणि निवडणुका लढवू शकतो. त्यामुळे दोनच पक्ष, किंवा १०० पक्ष हे कुणीच ठरवू शकत नाही असे आम्हाला वाटते.

आपल्याला काय वाटते? दोनच राजकिय पक्ष असणे हि भारताची आजची गरज आहे का?

असेच काही म्हणता येणार नाही. आज तरी जे काही आहे ते लोकशाही पद्धतीनेच चाललेले आहे, लोकांनीच ठरवलेले आहे. आणि आम्ही लोकेच्छेला मान देणे नेहमीच पसंत करतो. लोकशाहीत लोकांची मर्जी महत्वाची आणि लोक प्रत्येक पक्षाला त्याची त्याची जागा बरोब्बर दाखवून देत असतात असे आमच्या पाहण्यात असून तसा आमचा विश्वासही आहे!

सदर चर्चा येथे उपस्थित करून आमचे मत मांडायची संधी दिल्यामुळे आम्ही आपले आभारी आहोत.

धन्यवाद!

आपला,
(लोकशाहीवादी राजकीय विश्लेषक!) तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

पक्ष आणि निवडणुका

गेल्या २ दशकात मध्यावधी निवडणुका झाल्या. त्याचे मुख्य कारण अनेक पक्षांचे सरकारे हेच आहे. अशा निवडणुका म्हणजे आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाच्या पैसा वापरला जातो. याचे भान आपल्याला नको का?

राजकारण्यांनी आपले नुकसान ओळखुन आता निवडणुका टाळल्या आहेत आणि म्हणून सरकारे चालतात असे दिसते आहे. कदाचित द्विपक्षीय लोकशाहीकडे हि वाटचाल असावी असे मानायला हरकत नाही.


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

काहीच हरकत नाही!

गेल्या २ दशकात मध्यावधी निवडणुका झाल्या. त्याचे मुख्य कारण अनेक पक्षांचे सरकारे हेच आहे.

कबूल. पण लोकांनीच तसा निवाडा दिला त्याला कोण काय करणार? लोकांनी कोणत्याच एका पक्षाला बहुमत दिले नाही म्हणूनच तर अनेक पक्षांचे सरकार आले. आणि ज्या अर्थी लोकांनी कोणत्याच एका पक्षाला बहुमत दिले नाही त्याअर्थी लोकांचे चॉईस वेगवेगळे आहेत असेच मानावे लागेल.

अनेक पक्षांचे सरकार टिकू शकले नाही आणि मध्यावधी निवडणुका घेण्याची वेळ आली हा Political Revolutionary Process चा एक भाग आहे/होता असे आम्ही समजतो!

अशा निवडणुका म्हणजे आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाच्या पैसा वापरला जातो. याचे भान आपल्याला नको का?

नक्कीच हवे. पण इलाज काय? एक चाणक्य किंवा तात्या अभ्यंकरच्या हातात काय आहे? यावर गांभिर्याने चर्चा करणारे चाणक्य किंवा तात्या अभ्यंकरांसारखे लोक सव्वाशे करोडहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात किती टक्के आहेत हे सांगा पाहू? अगदीच नगण्य! Right?

राजकारण्यांनी आपले नुकसान ओळखुन आता निवडणुका टाळल्या आहेत आणि म्हणून सरकारे चालतात असे दिसते आहे.

That's it and you said it! ;)

गेल्या दोन दशकात आर्थिक उदारीकरणापसून आर्थिक क्षेत्रात भारतात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्याच की! किती म्हणून बदल सांगावेत? ज्या चतुर्थश्रेणी कामगाराचे अगदी ७०/८०/९० च्या दशकापर्यंत फोन हे केवळ एक स्वप्न होते, तोच चतुर्थश्रेणी कामगार आज नोकिया वापरतो. १० पैशात मिळणारं मशीन का थंडा पानी जाऊन आज ठिकठिकाणी बिसलेरीच्या बाटल्या आल्या. अगदी कांदेबटाटे सुद्धा मिळणारे वातानुकुलीत मॉल आले. फियाट आणि ऍबेसेडॉर केव्हाच गेल्या आणि त्या जागी इंडिका, वॅगन आर आल्या. शेअर मार्केट १४००० पर्यंत गेले!!

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की आर्थिक काय किंवा राजकीय काय, कुठल्याही क्षेत्रात होणारे चांगले किंवा वाईट बदल हा सगळा एका मोठ्या प्रोसेसचा एक भाग असतो असे आम्ही मानतो!

भारतासारख्या एवढ्या मोठ्या महाकाय, जिथे प्रचंड लोकसंख्या आहे, हजारो जाती, पंथ, धर्म आहेत अश्या देशात मिलिजुली सरकार, मध्यावधी निवडणुका, या सगळ्या गोष्टी चालायच्याच, असे आम्ही म्हणू!

विषयांतर करायचे झाल्यास आम्ही असे म्हणू की भारताच्या प्रत्येक समस्येच्या मुळाशी दिवसेंदिवस कँसरसारखी वाढणारी भारताची लोकसंख्या हे एक अतिमहत्वाचे कारण आहे. त्यामुळे द्विपक्ष काय, किंवा मिलिजुली सरकार काय, कुठलेही सरकार आले तरी ते पुरी पडू शकणार नाही, असे आम्हाला वाटते!

कदाचित द्विपक्षीय लोकशाहीकडे हि वाटचाल असावी असे मानायला हरकत नाही.

काहीच हरकत नाही! शेवटी लोक ठरवतील तेच खरे!

आपला,
(सामाजिक आणि लोकशाहीवादी राजकीय विश्लेशक!) तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

लोकसंख्या

भारतातल्या अनेक समस्यांचे मुळ लोकसंखेतच आहे. हा आता तो एका वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. आपण लिहिलेले सगळे मुद्दे मान्य आहेत. पण खरा मुद्दा उरतोच तो म्हणजे लोकांनी असे का केले?
थोडा विचार केलात तर असे लक्षात येईल कि लोकांना हवा असा नेताच नव्हता. मग प्रत्येकाने आपल्या विचारांना जवळचा असा नेता निवडला. त्यानंतर नेत्याच्या जोरावर लढलेली आणि जिंकलेली निवडणुक म्हणजे या आधिची.
मला वाटत कि देशाची ध्येय धोरणे आणि त्या बद्दल जाण असलेला पक्ष-नेता गरजेचा आहे. मग आहे रे आणि नाही रे हे दोनच पर्याय उरतात. अलिकडच्या काही निवडणुका असे दाखवुन देतात कि लोकांना शांतता आणि विकास हवा आहे.

खरतर धर्माला एक वैचारीक बैठक असते, अन देशाला एक धर्म. भारताचे धर्मनिरपेक्ष धोरण हे सुद्धा अस्थिरतेचे एक कारण आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. धर्मनिरपेक्षतेमुळे प्रत्येक जण आमचा तोच बाब्या दुसर्‍याच ते कार्ट म्हणतो. त्यात भर म्हणून स्वतःला धर्म निरपेक्ष म्हणवून घेणारे जातियतेचे विष पेरत आले आहे. ते आता इतके भिनले आहे, लोकांना त्याची इतकी नशा आली आहे कि भारता बाहेरचे विकसीत जग आहे याची जाणीव एक समाज विसरूनच गेला आहे. कदाचित त्यांना त्याची जाणिवपुर्वक कल्पना दिली जात नाही.

लोक ठरवतील ते खरे आहेच. पण लोकांना कसे ठरवायचे हे ज्ञान द्यायला हवे. ते काम नक्किच एक तात्या, एक चाणक्य करू शकतात. असे अनेक लोक तयार होणे गरजेचे आहे आणि होतील सुद्धा.


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

चाणक्यराव,

लोक ठरवतील ते खरे आहेच. पण लोकांना कसे ठरवायचे हे ज्ञान द्यायला हवे. ते काम नक्किच एक तात्या, एक चाणक्य करू शकतात.

हम्म!

असे अनेक लोक तयार होणे गरजेचे आहे,

खरं आहे!

आणि होतील सुद्धा.

Let's hope for the Best! ;)

तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष

आत्ताचे आणि या पुर्वीचे सरकार पाहिल्यास, राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्ष त्यांच्या संसदेतील सदस्य संख्येवर खेळ करत आहेत असे दिसुन येते. एक विचार असा सुद्धा होऊ शकतो कि राज्य पातळीवर, प्रादेशिक प्रश्न हाताळणारे पक्ष यांना राज्या पुरतेच सिमीत करावे. प्रादेशिक पातळीवर राष्ट्रीय पक्षांनी निवडणुक लढूच नये. यासाठी कायदा असावा.

एखादे राज्य देशाचाच काय दुसर्‍या राज्यचा सुद्धा कारभार नाही चालवू शकत. त्यात भाषावार प्रांत रचनेमुळे एक मेकांच्या समस्या समजुन घ्यायला आधीच सीमा येतात. मग प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारणात हवेतच कशाला?


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

लोकशाही बरी.

महाराष्ट्रात,एक मराठ्यांचा, एक बामणांचा, आणि एक दलितांचा. द्विपक्षीय पद्धतीत ह्यातील दलितांच्या पक्षाची दैना होईल
सहमत.
कोणी पक्षाने कोणत्या पक्षात जायचं, आणि कोणत्या दोघांनी आपली नावं शाबूत ठेवून इतरांना आपल्यात सामावून घ्यायचं हे सर्व पक्ष कसं ठरवतील?
त्यासाठी ही निवडणूका घ्याव्या लागतील.
द्विपक्षीय राज्यपद्धतीतून हुकूमशाहीचा जन्म होईल.काही राज्यांचा भरमसाठ विकास तर काहींचा वाळवंट होईल. संसदीय मंडळे,आणि कायदेमंडळ यात संसदीय मंडळे प्रभावी राहतील.आणि ज्याच्या हातात काठी तो गुराखी असेल.
सारांश :- जे चालू आहे,ते उत्तम चालवण्याचा प्रयत्न करणे.

आपला.
लोकशाहीवादी.

प्रादेशिक पक्ष

प्रादेशिक पक्षांमुळे स्थानिक समस्या चांगल्या लक्षात येतात व जनतेला आपल्या अडचणि स्पष्टपणे शासनासमोर मांडता येतात. याची देशाच्या प्रगतीला मदत होते.प्रादेशिक पक्षातुन स्थानिक नेतृत्वाला वाव मिळतो.
काही प्रादेशिक पक्षांच्या निर्मितीला कॉग्रेस पक्ष जबाबदार आहे स्थानिक नेतृत्वाला वाव न देणे ,प्रादेशिक समस्या वेळच्या वेळी न सोडवणे,मध्यवर्ती ठीकाणाहुन नेतृत्व लाभणे इ.
द्विपक्षीय पध्दत नसावी असे मला वाटते. जर जनतेला राष्ट्रीय पक्षांबद्दल काही वाटत असेल तर ते मतदानाच्या आधारे दाखवुन देऊ शकतात.
आपला
कॉ.विकि

काँग्रेस

काही प्रादेशिक पक्षांच्या निर्मितीला कॉग्रेस पक्ष जबाबदार आहे. - चर्चेचा वेगळा विषय होऊ शकतो...


मराठीत लिहा. वापरा.

फरक काय?

लोकशाहीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्यं म्हणजे लोकांना लायक असंच सरकार त्यांना मिळतं.
त्यामुळे प़क्ष २ असले काय किंवा १००, जोपर्यंत जनता सुधारत नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधीही असेच बेजबाबदारपणे वागत राहतील.
अर्थात् ह्या लोकसुधारणेसाठी एखादी मोठी क्रांती तरी झाली पाहिजे, ज्याला कारण एखादी मोठी नैसर्गिक/अनैसर्गिक आपत्ती असू शकते, किंवा मग उत्क्रांतीच्या मार्गाने ही प्रक्रिया सुरू राहील. आणि ह्या उत्क्रांतीमधे प्रत्येकाचंच योगदान अनमोल राहील.

देशात किती पक्ष असावेत?

अमित तेली यांचे म्हणणे बरोबर आहे. राज्य पद्धती सुधारण्याकरता निवडणुक नियमात बदल करणे आवश्यक आहे. त्या बद्दल माझे कांही विचार आहेत. त्या वर चर्चा करण्याची तयारी असेल तर बोला.

करूयात

नक्कि चर्चा करूयात...
मला आवडेल..





मराठीत लिहा. वापरा.

राज्य शासन व्यवस्था.

राज्य शासन व्यवस्था ही एखाद्या व्यक्ती वर निर्भर न राहता जन कल्याणाच्या दिशेने कार्यरत असावी हे ध्येय बाळगुन विचार केला तर, म्हणजे हे उदिष्ठ किंवा ध्येय किंवा लक्ष ठरवले तर मला जो मार्ग दिसतो त्या मध्ये खालील अडथळे दिसतात.

  1. पक्षांतर
  2. आवळ्या भोपळ्यांची मोट
  3. शासन स्थापन पद्धत.
  4. शासन चालवण्याची पद्धत.

पक्षांतरावर आता पर्यंत खूप कायदे झालेत तरी पण या समस्येवर कायम तोडगा अजुनही सापडला नाही. माझ्यामते, निवडणुक कायद्यात सुधारणा करुन या वर कायम स्वरुपी तोडगा निघु शकेल. त्याच बरोबर सक्षम, निस्वार्थी, गरीब उमेदवाराना निवडणुक लढण्याची संधी मिळू शकेल. सर्व प्रथम उमेदवाराला करावा लागणारा प्रचार खर्च शून्य कसा करता येईल याचा विचार करु या.

निवडणुक प्रचार खर्च शासनाने करावा या माझ्या म्हणण्यावर सभासदानी आपली मते मांडावीत.

निवडणुक प्रचार खर्च शासनाने करावा.

थोडा विस्तार. पक्ष तसेच उमेदवार कोटी कोटी रुपये प्रचारावर खर्च करतात तो कोठुन येतो. शेवटी पदाचा दुरुपयोग करुन उमेदवार हा खर्च वसुल करतातच वर त्याच्या कितितरी पट माया जमवतात. म्हणजेच शेवटी जनतेचा पैसाच निवडणुकीत वापरला जातो. मग डोक्यामागुन हात घेऊन घास खाण्यापेक्षा सरळ घास का खाऊ नये? शासनाने निवडणुक खर्च केला तर काही बिघडत नाही. उलट प्रचारात काही शिस्त येईल.

सहमत ... पण

शासनाने निवडणुक करायचा प्रस्ताव उत्तम. पण आत्ता सुद्धा खर्चाला मर्यादा दिल्या आहेतच. समजा शासनाने खर्च केला. तर याची शाश्वती काय कि उमेदवार छुपा खर्च करणार नाही? कदाचित शासनाचा खर्च हा बोनस ठरेल.





मराठीत लिहा. वापरा.

याची शाश्वती काय कि उमेदवार छुपा खर्च करणार नाही?

जर उमेदवाराला खर्च करण्याची मुभा नसेल तर त्याने (तिने) एक पैसा जरी खर्च केला तर दिसेल. खर्च करण्यास परवानगी असेल तर १० रुपये खर्चून, एक रुपया खर्च केला असे उमेदवार पटवुन देऊ शकतो. परंतु, जेथे खर्चच करण्याची परवानगी नाही तेथे एक पैसा जरी खर्च केला तर उमेदवाराला पकडणे सोपे.

बरेच दिवस झाले. चर्चेत प्रगती नाही. प्रचार कसा करावा?

शासनाने प्रचार करण्याची पद्धत आखावी. प्रचार साहित्य बनवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने आपली संपूर्ण माहिती शासनाला द्यावी. त्या महितीची पूर्ण जबाबदारी उमेदवाराचीच. शासनाने त्या माहिती मध्ये फक्त कोठे चिखलफेक केली असली तर तो भाग गाळावा. बाकी माहिती मध्ये बदल करु नये. प्रचार करण्याची पद्धत ठरवावी जसे पुस्तिका, ध्वनिफीत, सीडी, फलक, सभा बगैरे.

आपल्याल काय वाटते?

प्रचार

खरतर जाहिर सभा/भाषणे करण्याआधी उमेदवारांनी केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा निवडणुक आयोगाकडे सुपूर्त करायला हवा. तसेच भाषणांबद्दचे काही मसुदे सुद्धा. निवडणुक आयोगाने तसेच काही नियुक्त अधिकार्‍यांनी या आढाव्याची सत्यता पडताळून पाहून तो उमेदवार पात्र कि अपात्र ठरवावे. थोडक्यात

  1. उमेदवाराचे केलेले खरे काम
  2. उमेदावराची काम करण्याची क्षमता
  3. जे काम करायचा वादा केला जाणार आहे ते कसे करणार आहे या बद्दलचा एक मसुदा

हे सर्व जाहिर करून, सत्यता पडताळून आणि त्याचा खरा अहवाल जनतेत वाटूनच प्रचाराची सुरूवात व्हावी.





मराठीत लिहा. वापरा.

सामाजिक कार्याचा आढावा निवडणुक आयोगाकडे सुपूर्त करायला हवा.

बरोबर. आढावा सुपूर्त करण्यापर्यंत ठीक आहे. परंतु त्याची सत्यता पडताळणे जवळ जवळ अश्यक्य काम आहे. निवडणुक आयोग जनतेला सर्व कागदपत्रे दाखवु शकतो, प्रसिद्ध करु शकतो. पडताळणीचे काम करु शकत नाही. त्यातुन बरेच वाद निर्माण होतील

 
^ वर