मुलं हवीत कुणाला?
(विनंती : या विषयावर किंवा संबंधित उपक्रमावर पूर्वी चर्चा झाली असल्यास कृपया दुवे द्यावेत. नसल्यास आपला दृष्टीकोन आवर्जून मांडावा.)
आमचा एक मित्र आहे. त्याच्या लग्नाला पाच-सहा वर्षे होऊन गेली आहेत. नवरा-बायको दोघेही आनंदी, उत्साही आहेत. मुख्य म्हणजे दोघांतही काही कमतरता नाही. आम्ही कुटुंबवत्सल मित्रांनी आजवर अनेक वेळा या जोडीला चिडवले आहे. स्पष्ट शब्दात 'आता बास झाले की नियोजन' असे सांगून पाहिले, पण दोघेही ठाम आहेत. संतती होऊ द्यायची नाही, असा त्यांचा निर्धार आहे. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि दुसर्या कुणी का लक्ष घालावे? असले काही व्यक्तीस्वातंत्र्याचे टोक आम्ही मित्र मानत नाही. त्यामुळे या विषयावर एकदा त्यांची मते स्पष्टपणे जाणून घेतली. आम्ही प्रश्न विचारले, 'तुम्हा दोघांना 'डबल इन्कम नो किड्स' (डिंक) कॅटॅगरीतील जोडपे म्हणून राहायचे आहे का? कोणतीही समस्या नसताना तुम्ही हा निर्णय का घेताय? आजच्या चंगळवादी आणि स्वान्तसुखाय जीवनशैलीचा तुमच्यावर प्रभाव आहे का? अजून २५-३० वर्षांनी निर्माण होणार्या स्थितीचा तुम्ही विचार केलाय का? अशा अनेक प्रश्नांवर त्या जोडीने त्यांची रोखठोक मते मांडली. ती इथे देत आहे.
१) भारताच्या आणि एकूणच जगाच्या वाढत्या पैदाशीत भर घालण्याची आमची इच्छा नाही. उलट आमच्या निर्णयाने जागतिक लोकसंख्येतून तीनजण कमीच होणार आहेत. ते चांगलेच नाही का?
२) आम्ही आमच्या आयुष्यात मानसिक/शारीरिक पातळीवर समाधानी आहोत. मुले जन्माला घालण्यात सुख असते, असे आम्ही मानत नाही.
३) पूर्वजांप्रती कर्तव्य, वंश चालवणे किंवा 'स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळची माता असते' अशा समजुतींवर आमचा विश्वास नाही.
४) प्रसूती वेदना, अपत्याचे संगोपन, त्यांच्यासाठी गुंतवणूक, भविष्याची तरतूद याला आम्ही घाबरत नाही, पण आम्हाला ती रिस्कही नको आणि उद्या मुलांनी ' झेपत नव्हते तर जन्माला का घातलेत?' असे विचारणेही आम्हाला नकोय.
५) आम्ही चंगळवादी नाही, पण सुखाने जगण्याचा मार्ग प्रत्येकजणच शोधतो. त्याला दोष देता येणार नाही. आम्ही अनेक समाजोपयोगी उपक्रमांना मदत करत असतो. हाही त्याच सुखाचा भाग आहे.
६) अजून २५-३० वर्षांनी आमच्या आयुष्यात काही पोकळी येणार नाही. आम्ही आहे ते आयुष्य संपवून शांतपणे मातीत विलीन होऊ.
७) दत्तक घेणार नाही, पण गरजू अनाथ मुलांना मदत करु. इतरांच्या मुलांवर प्रेम करु.
८) बाहेरच्या जगात स्वार्थ, वासना, भ्रष्टाचार, अनैतिकता यांचा इतका बुजबुजाट झाला आहे, की त्या स्थितीत नव्या पिढीला आपण काही चांगले देऊ शकू का, याबाबत आम्ही संभ्रमित आहोत. अशा वेळी सगळे नवे घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच टाकणे आम्हाला पटत नाही.
यावर तुम्हाला काय वाटतं?
Comments
चर्चा
खरे तर या विषयावर इतकी चर्चा झाली याचे आश्चर्य वाटले. जनरीतीच्या थोडे विरूद्ध गेले तर इतकी कारणमीमांसा करण्याची गरज आहे का?
--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै
नव्हे!
अजिबात नाही आणि या जोडप्याचा निर्णय अजिबात चुकीचा नाही. त्यांनी पुढे केलेली कारणे भंपक आहेत. अशी भंपक कारणे देऊन उदात्तपणा दाखवण्यापेक्षा परखड खरे बोललेले चुकीचे का?
मुळात
मुळात जोडप्याला इतके प्रश्न विचारण्याची गरज कुणाला का भासावी?
--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै
ओह असे
मी नसते विचारले. :-) त्यांच्या वैयक्तिक जागेत अतिक्रमण नसते केले परंतु हे माझे वैयक्तिक विधान झाले. असे होताना दिसते*. त्यात समोरच्याचा हेतू वाईट असतोच असे नाही. कुतूहलाने म्हणा किंवा असा टोकाचा निर्णय का घ्यावासा वाटला याचे उत्तर म्हणून किंवा माझ्याकडे समोरचा माणूस मोकळेपणे उत्तर देईल वगैरे वाटल्याने प्रश्न विचारले जात असावेत. कधी कधी आपुलकीने, काळजीनेही विचारले जातात. विचारणारा कधीतरी मर्यादा सोडून विचारण्याची शक्यताही असते.
म्हणूनच, उत्तर देणार्याने मोजक्या शब्दांत उत्तर देऊन नको असलेले प्रश्न बंद करावेत असे मला वाटते.
*असे होताना भारतातच दिसते असे नाही. अमेरिकन्सही बर्यापैकी भोचक असतात. "तुला एकच मूल का?" असा प्रश्न माझ्याशी संबंध आलेल्या प्रत्येक अमेरिकन व्यक्तीने मला विचारला आहे. त्यपैकी जवळीक असणार्या दोन-चार जणांनी एकापेक्षा जास्त मुले असणे कसे चांगले असते यावर मला लेक्चर मारले आहे. यावरून ही साधारण मानवी प्रवृत्ती आहे असे मानण्यास जागा आहे. :-)
प्रश्न
लेखातील प्रश्न उलटतपासणी केल्यासारखे वाटतात. :)
--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै
काय बिघडले?
प्रश्न विचारले तर काय बिघडते? 'प्रश्न विचारायला आवडते' आणि 'प्रश्न विचारलेले आवडत नाही' या दोन गटांनी एकमेकांशी मैत्री ठेवू नयेत!
हा मुद्दा केवळ याच धाग्याविषयी नसून अधिक खोल आहे. हा आक्षेप 'श्रद्धेविषयी प्रश्न' या संदर्भातही घेतला जातो आणि तो का घेतला जातो ते विचारण्याची मला अतितीव्र गरज आहे.
खाजगी
एखाद्याच्या खाजगी निर्णयाबद्दल इतकी चर्चा करणे मला प्रशस्त वाटत नाही. माझे वाक्य या धाग्यापुरतेच आहे त्यामुळे तुम्ही श्रद्धेशी जोडलेल्या संबंधाबद्दल काही बोलू शकत नाही.
--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै
टू वे संवादातला एक भाग
त्यांच्या मित्रमंडळींनी भंडावून सोडले असेल म्हणून एवढी कारण मीमांसा असावी.
प्रत्यक्षात ते जोडपे आणि मित्रमंडळी यांच्यात जो संवाद झाला असेल त्यातली जोडप्याने उच्चारलेली वाक्ये इथे उद्धृत झाली असावी.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
शक्यता नाकारता येत नाही.
लोक काय काय बोलतील याचा भरवसा नाही. योगप्रभूंनी उदाहरण दिलेले जोडपे नक्की भारतातले असावे.
आम्हाला लग्नानंतर ६ वर्षांनी मूल झाले आणी ओळखीतले विमा एजंट बाळाचा विमा काढण्यासाठी मागे लागले. मी एकाला वैतागून सांगीतले की माझ्याकडे पैसे नाहित तर म्हणतो कसा की अरे मूल होण्यासाठी डॉक्टरला एवढे पैसे मोजले आणी आता विमा काढायला पैसे नाहित काय ?
आता मुल उशीरा झाले म्हणजे ते डॉक्टरकडे जाऊन उपचार करुन घेतल्यामुळेच झाले हा त्याचा ठाम विश्वास.
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
एक प्रयत्न :-)
-का रे बाबांनो, मूल का नको म्हणता?
भारताच्या आणि एकूणच जगाच्या वाढत्या पैदाशीत भर घालण्याची आमची इच्छा नाही. उलट आमच्या निर्णयाने जागतिक लोकसंख्येतून तीनजण कमीच होणार आहेत. ते चांगलेच नाही का?
-तसं नाही. मूल होऊ देण्यात एक शारिरिक आणि मानसिक समाधान असतं.
आम्ही आमच्या आयुष्यात मानसिक/शारीरिक पातळीवर समाधानी आहोत. मुले जन्माला घालण्यात सुख असते, असे आम्ही मानत नाही.
-बरं. पण आपल्याला जन्माला घालून आपल्या आईवडिलांनी त्यांचं कर्तव्य केलं. तुम्ही तुमचं कर्तव्य करा. शेवटी वंश चालायला नको का?पूर्वजांप्रती कर्तव्य, वंश चालवणे किंवा 'स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळची माता असते' अशा समजुतींवर आमचा विश्वास नाही.
-मूल होण्याच्या अनुषंगाने येणार्या गोष्टींना घाबरता म्हणा की!!!
प्रसूती वेदना, अपत्याचे संगोपन, त्यांच्यासाठी गुंतवणूक, भविष्याची तरतूद याला आम्ही घाबरत नाही, पण आम्हाला ती रिस्कही नको आणि उद्या मुलांनी ' झेपत नव्हते तर जन्माला का घातलेत?' असे विचारणेही आम्हाला नकोय.
- हम्म्म्. म्हणजे कसली जवाबदारीच नको. नुसती मजा हवी. आजच्या चंगळवादी जगात हे साहजिकच आहे म्हणा.
आम्ही चंगळवादी नाही, पण सुखाने जगण्याचा मार्ग प्रत्येकजणच शोधतो. त्याला दोष देता येणार नाही. आम्ही अनेक समाजोपयोगी उपक्रमांना मदत करत असतो. हाही त्याच सुखाचा भाग आहे.
-बरं पण एकदा करिअर संपायला आलं की मग आयुष्यात पोकळी जाणवायला लागेल. तेव्हा काय कराल?
अजून २५-३० वर्षांनी आमच्या आयुष्यात काही पोकळी येणार नाही. आम्ही आहे ते आयुष्य संपवून शांतपणे मातीत विलीन होऊ.
- स्वतःचं मूल जाऊ द्या दुसर्याचं मूल दत्तक घ्या. त्या मुलाचं तरी भलं करा.
दत्तक घेणार नाही, पण गरजू अनाथ मुलांना मदत करु. इतरांच्या मुलांवर प्रेम करु.
-!!!!!!!!!
बाहेरच्या जगात स्वार्थ, वासना, भ्रष्टाचार, अनैतिकता यांचा इतका बुजबुजाट झाला आहे, की त्या स्थितीत नव्या पिढीला आपण काही चांगले देऊ शकू का, याबाबत आम्ही संभ्रमित आहोत. अशा वेळी सगळे नवे घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच टाकणे आम्हाला पटत नाही.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
अभिनंदन .. छान प्रयत्न !
छान प्रयत्न.
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
निर्णय
त्या मित्राच्या आई-वडीलांनी असा निर्णय घेतला असता तर बरे झाले असते.
त्या मित्राच्या आई-वडीलांनी
व्हाट अबाउट मित्राच्या बायकोचे आई-वडील ?
होय तिच्या पण
होय तिच्या पण पालकांनी हेच विचार केले असते तर बरे झाले असते.
असे
असे मलाही काही लोकांच्या आईवडिलांबद्दल वाटत असते. :)
--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै
तर्कविसंगत
बाकी, 'बुढापे का सहारा' या मुद्याविषयी काही टिपण्णी केली नाही काय?
मोठा गुरु
--बाकी, 'बुढापे का सहारा' या मुद्याविषयी काही टिपण्णी केली नाही काय?---
स्वानुभव माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो, नाही का? त्यामुळे सगळ्यांना माहीती आहे ह्या प्रश्नाचे उत्तर.
निर्णयस्वातंत्र्य मान्य
हा प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय आहे, मुले व्हावीत का, किती व्हावीत, कधी व्हावीत, कशी व्हावीत. इ. इ.
त्यात पडण्याचे कारण नाही.
पण माझी मते अशी.
१. चांगला हेतू आहे.
२. बाळंतपणात कसले सुख?! कधी एकदा त्या तपासण्या आणि बाळंतपणातून बाहेर पडतो असे होते. पण बाळ झाल्यावर वाढवण्यात गंमत असते हेही खरे. ती नको असली तर हरकत नाही.
३. डिट्टो. पण बाकीचे लोक केवळ पूर्वजांसाठी मुलांना जन्म देतात असे नसावे.
४. ठीक, समजू शकते.
५. ठीक, पण हे कारण नसावे.
६. हेही ठीक. एवढा विश्वास आहे हे चांगले आहे. मी दोन वर्षांपुढचादेखील विचार एवढ्या विश्वासाने बोलू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे, पण दुसर्याला तसा विचार करता येईल याच्याबद्दल शंका नाही.
७. समजू शकते.
८. हे उत्तर अजिबात पटले नाही. बाकीचे जे लोक जन्म देत आहेत ते बदलण्याची जबाबदारी नवीन पिढीवर टाकत आहेत हे कोणी सांगितले? उलट आपल्या मुलांसाठी का होईना, पण परिस्थिती सुधारावी असे वाटण्याची शक्यता मूल असल्यास तयार होऊ शकते.
योग्य निर्णय व उत्तरे
जोडप्याचा निर्णय त्यांच्यापुरता योग्यच आहे. त्यांची उत्तरेही समर्पक आहेत.
'जबाबदारी टाळणे' हा आरोप जाणीवपूर्वक केलेल्या निवडीशी निगडीत सर्व पर्यांयाबाबत करता येईल. उदा. 'फलाणा लग्न करत नाही. त्याला विचारल्यास इच्छा नाही असे म्हणतो. बायको सांभाळण्याची जबाबदारी अंगावर घ्यायची नाही म्हणून उगाच इतर काही (भंपक) कारणे बरळतो.'
शांतता कोर्ट चालू आहे
'शांतता कोर्ट चालू आहे' नाटकाची आठवण झाली.
तसे
तसे वाटते आहे खरे.
--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै
भंपक-भंकस-भोंदू
योगप्रभू यांनी मांडलेला विषय `ज्वलंत` `पेटता` वगैरे वगैरे आहे.
माझ्या मित्राने मला याविषयी अलीकडेच सांगितलेला एक किस्सा आठवला.
त्याची एक मैत्रीण आहे. वय ३६ व्रर्षे. तिने लग्न उशिरा म्हणजे तिसाव्या वर्षी केले. (आजच्या हिशेबाने म्हणायचे तर तसे लवकरच !). हेही जोडपे `डिंक`च आहे ! म्हणजे ती तरी तसे सांगते. हे सांगताना तिला कसल्याही प्रकारची लाज वगैरे वाटत नाही. (विचार सुस्पष्ट असतील, तर लाज का वाटावी ?) पण आता आता तिच्या शरीराच्या तक्रारी आता सुरू झाल्या आहेत...म्हणजे संप्रेरकीय असमतोल वगैरे वगैरे... आणि तिच्या शरीरावर व तिच्या वागण्यातही हा असमतोल आता दृश्य स्वरूपात दिसू लागला आहे इत्यादी इत्यादी...
शेवटी कुठलाही निर्णय असो, त्या निर्णयाचे परिणाम त्या त्या व्यक्तीलाच शारीरिक, मानसिक, मनोकायिक, आर्थिक अशा विविध पातळ्यांवर भोगावे लागतात आणि असा निर्णय घेणारे लोक तो ते निमूटपणे भोगतही असतात. (अशा वेळी भोचक मंडळी त्यांच्या मदतीला धावताना कधी दिसत नाहीत !)
----
शेवटी, आपल्याला मूल होऊ द्यायचे की नाही, होऊ द्यायची असतील तर किती हे आणि याअनुषंगाने येणारे सगळेच प्रश्न हे केवळ त्या आणि त्याच जोडप्याचे अत्यंत खासगी असे असतात. पण भारतीय समाज ही एक अतिशय विचित्र गोष्ट आहे. अर्थात, मानवी प्रवृत्ती या इथून-तिथून सारख्याच असल्याने अन्य देशांतही थोड्याफार प्रमाणात असेच असू शकेल...पण भारतीय समाज जरा जास्तच विचित्र असावा.
`तू असाच का बसलास?, `तू हाच शर्ट का घातलास?`, `तू अशी पुस्तके वाचतोस ?` (गीतेच्या आडोशाने उत्तान चित्रे असलेले पुस्तक वाचत असल्याचे पाहून जणू काही पृच्छकाला धक्का बसला आहे !), अशी लुडबूड दुसऱयाच्या आय़ुष्यात सर्रास करणारे महाभाग अगणित असतात...मग एखादे जोडपे बिनअपत्याचे राहणार असेल तर मग काय, या महाभागांमधले कावळे जागे झालेच ! (अर्थात, कावळ्यांना इतरांविषयी आपुलकी वाटत नसते, असे थोडेच आहे ! सारे काही दुसऱयाविषयी वाटणाऱया आपुलकीपोटी...स्वतःच्या कुतूहलशमनार्थ नव्हे !)
---
बाकी, योगप्रभूंच्या ओळखीतील जोडप्याने `डिंक` राहण्यासंदर्भात जी कारणमालिका दिली आहे, ती एकदम भंकस, भंपक आहे.
तुम्हाला राहायचे आहे ना बाबांनो दुकटे, राहा ना ! कशाला उगाच शहराची-राज्याची-देशाची-जगाची चिंता वाहण्याचे नाटक करता ?
यातले शेवटचे म्हणजे हे (बाहेरच्या जगात स्वार्थ, वासना, भ्रष्टाचार, अनैतिकता यांचा इतका बुजबुजाट झाला आहे, की त्या स्थितीत नव्या पिढीला आपण काही चांगले देऊ शकू का, याबाबत आम्ही संभ्रमित आहोत. अशा वेळी सगळे नवे घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच टाकणे आम्हाला पटत नाही.) कारण वाचून तर मी हसून हसून अक्षरशः गडबडा लोळायचाच राहिलो होतो...पण लोळलो नाही. उगाच दुसऱयासाठी आपले कपडे खराब का करून घ्या !!!
---
अशा विचारांच्या दांपत्याने अपत्य जन्माला न घालण्याचा विचार केला, हे रास्तच झाले. नाहीतर ते अपत्यही आई-बाबांच्या वरताण निघाले असते, विचारांच्या बाबतीत. आणखी एक भोंदू-भंपक-भंकस व्यक्ती जन्माला यायच्याआधीच अस्तित्वहीन झाली, हे खूपच बरे झाले !
---
मला एक जोडपे असे माहीत आहे की, त्यांच्या एकुलत्या एका सुकन्येने उच्छाद मांडला आहे. ती नसती तर बरे, असे त्या जोडप्याला झाले आहे. या उदाहरणाबाबत तुम्ही काय म्हणणार ? ते त्रिकोणी कुटुंब पाहून मलाही वाटते की, कशासाठी ही तिन्ही माणसे (किमान ती तिसरी तरी) एकत्र आली असावीत ?
दोन आली होती एकत्र, तेवढीच पुरेशी नव्हती का ? पण अशा बाबतीत पाहणारा काहीच करू शकत नाही...केवळ हळहळू शकतो आणि संबंधितांना दिलासा देऊ शकतो : हेही दिवस जातील. (दिवस गेल्यामुळेच हे घडले, तो मुद्दा अलाहिदा!)
----
शेवटी, एक बाब मला खूपच गंभीरपणे करायची आहे व ती म्हणजे या जोडप्याला शुभेच्छा देण्याची. या जोडप्याचे `सहजीवन` सुखाचा परमोच्च बिंदू गाठणारे, परमोत्कट, सतत आनंददायी जावो. त्यांच्या या आनंदात कधीही खंड न पडो. आणि हो, समाजोपयोगी उपक्रमांना त्यांच्याकडून भरघोस मदत होवो.
----
काहीसे परखड लिहिल्याबद्दल योगप्रभू मला माफ करतील, अशी मला (आगाऊ !) खात्री आहे.
कारणे भंपक वाटत नाहीत
१) भारताच्या आणि एकूणच जगाच्या वाढत्या पैदाशीत भर घालण्याची आमची इच्छा नाही. उलट आमच्या निर्णयाने जागतिक लोकसंख्येतून तीनजण कमीच होणार आहेत. ते चांगलेच नाही का?
चांगला विचार. पुण्याच्या वाहनांच्या वाढत्या पैदाशीत भर घालण्याची माझी इच्छा नसल्याने आर्थिक क्षमता व त्यासोबत मिळणारे इतर इन्सेंटिव (टॅक्स बेनेफिट, सोशल स्टेटस?) असूनही मी गाडी घेतलेली नाही.
२) आम्ही आमच्या आयुष्यात मानसिक/शारीरिक पातळीवर समाधानी आहोत. मुले जन्माला घालण्यात सुख असते, असे आम्ही मानत नाही.
हे थोडेसे क्षणिक समाधान वाटते. मूल जन्माला घालण्यात सुख नसले तरी मुलाचे बालपण अनुभवण्यात सुख असते असे माझ्या भावाच्या अनुभवावरुन सांगावेसे वाटते.
३) पूर्वजांप्रती कर्तव्य, वंश चालवणे किंवा 'स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळची माता असते' अशा समजुतींवर आमचा विश्वास नाही.
ठीक.
४) प्रसूती वेदना, अपत्याचे संगोपन, त्यांच्यासाठी गुंतवणूक, भविष्याची तरतूद याला आम्ही घाबरत नाही, पण आम्हाला ती रिस्कही नको आणि उद्या मुलांनी ' झेपत नव्हते तर जन्माला का घातलेत?' असे विचारणेही आम्हाला नकोय.
हे मात्र खरे. आजकालची मुले असे स्पष्टपणे विचारतात.
५) आम्ही चंगळवादी नाही, पण सुखाने जगण्याचा मार्ग प्रत्येकजणच शोधतो. त्याला दोष देता येणार नाही. आम्ही अनेक समाजोपयोगी उपक्रमांना मदत करत असतो. हाही त्याच सुखाचा भाग आहे.
सहमत
६) अजून २५-३० वर्षांनी आमच्या आयुष्यात काही पोकळी येणार नाही. आम्ही आहे ते आयुष्य संपवून शांतपणे मातीत विलीन होऊ.
३० वर्षे हा खूप मोठा काळ झाला. भविष्यात काय घडेल हे सांगता येणार नाही. देव न करो परंतु या जोडप्यांपैकी एखाद्याला काही कारणास्तव दुसऱ्यापासून विभक्त व्हावे लागले तर जगण्यासाठी आवश्यक असा मुलांचाही आधार नसेल. (मुले आधार देतील असे अभिप्रेत नसून, मुलांसाठी तरी जगण्याची इच्छा शाबूत राहील.)
७) दत्तक घेणार नाही, पण गरजू अनाथ मुलांना मदत करु. इतरांच्या मुलांवर प्रेम करु.
थोडक्यात मुलांची जबाबदारी नको.
८) बाहेरच्या जगात स्वार्थ, वासना, भ्रष्टाचार, अनैतिकता यांचा इतका बुजबुजाट झाला आहे, की त्या स्थितीत नव्या पिढीला आपण काही चांगले देऊ शकू का, याबाबत आम्ही संभ्रमित आहोत. अशा वेळी सगळे नवे घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच टाकणे आम्हाला पटत नाही.
बाहेर एवढेही काही वाईट वाईट झालेले नाही.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मानवी इतिहास
--बाहेर एवढेही काही वाईट वाईट झालेले नाही--
पूर्ण सहमत. सध्याच्या जगात जे चालले आहे तो मानवी इतिहासातील सगळ्यात चांगल्या घटनांचा काळ आहे.
सर्व प्रतिसाददात्यांचे आभार...
या विषयावर प्रतिसाद देणार्या सर्वांचे आभार.
मी प्रतिसादांचे विश्लेषण करणार नाही. दोन मित्रांचे खास आभार मानतो. ते म्हणजे नितीन थत्ते आणि आजानुकर्ण. नितीनजींनी आमच्या मित्रांमधले संभाषण कसे झाले असावे, हे उत्तरांवरुन ताडले ते बरोबर आहे. आजानुकर्ण यांनी जो दुवा दिला तो उपयुक्त आहे.
आता थोडेसे मनातले.
मी सुरवातीलाच सांगितले, की दुसर्याच्या खासगी गोष्टींत लक्ष घालू नये, असे काही व्यक्तीस्वातंत्र्याचे टोक आम्ही मित्र मानत नाही. (आणि अर्थात हे तत्त्व आमच्या गटापुरतेच पाळतो) आमच्या मित्रगटात अनेक विषयांवर खुलेपणाने चर्चा होतात आणि त्यांचे स्वरुप निकोप वादसंवाद (हेल्दी डिबेट) असे असते. त्यात कुणी चिडत नाही. प्रश्न वैयक्तिक आयुष्याबद्दल असले तरी त्यांची 'भोचक' म्हणून संभावना करत नाही. आता आम्ही ज्यांना विचारले त्या जोडप्यालाच जर हा 'आमचा भोचकपणा' किंवा 'स्वतःच्या खासगी आयुष्यावर केलेले अतिक्रमण' वाटले नसेल तर तेवढे पुरेसे आहे. आमच्या अशा चर्चा काहीवेळा अभिरुप न्यायालय प्रकारच्या असतात. त्यात नवरा आणि बायको या दोघांना त्यांच्याशी संबंधित जिव्हाळ्याच्या आणि गंमतीदारसुद्धा विषयावर आपली बाजू मांडावी लागते. (अवांतर : गेल्या महिन्यात मी व माझी बायको आरोपीच्या पिंजर्यात उभे राहिलो होतो. विषय होता 'माझे वाढलेले वजन'. माझ्यावर आळशीपणाचा आरोप होता आणि बायकोवर माझ्या पोटाचे नको इतके चोचले पुरवल्याचा.) सांगायचा मुद्दा हा, की आमचा मित्र आणि त्याची पत्नी यांनी तिरसटपणे किंवा वैतागून आमच्या प्रश्नांना उत्तरे दिलेली नाहीत. त्यांच्या उत्तरांना मी 'भंपक' म्हणणार नाही कारण त्यातून आम्हाला सगळ्यांनाच विचार करायला भाग पडले आहे. (प्रियाली व प्रदीप यांच्या मताचा आदर आहेच.)
असो. हा विषयही महत्त्वाचा आहे. (७० प्रतिसाद आणि हजाराच्या आसपास वाचने, यावरुन मला तरी तसे वाटते.) काही विचारमंथन व्हावे, एखादे सोल्यूशन मिळते का बघावे, या उद्देशाने मी तो येथे मांडला होता. प्रदीप यांनी त्यांच्या प्रतिसादात एक महत्त्वाची बाजू (वयानुसार शरीरात होणारे संप्रेरकीय असमतोल) लक्षात आणून दिली आहे.
(आता थोडा गंमतीचा भाग : आम्ही लेकुरवाळ्या कुटुंबांनी अद्याप हार मानलेली नाही. आमचा मित्र आणि त्याची बायको (त्यांना श्री व सौ. गटणे म्हणावे का?) यांना सहजासहजी सोडणार नाही. त्यांना एखादे मूल तरी व्हावे, असे डॉ. बिरुटे म्हणतात, ते पटते.) :)