चीनी उत्पादकांचा खोडसाळपणा

चीनचा भारतद्वेष प्रत्येक बाबतीत दिसून येतो. मी नुकतेच चीनमध्ये निर्मित TPLink चा वायरलेस राऊटर घेतला. सर्व सेटिंग्स केल्यानंतर राऊटर वर भारतीय प्रमाण वेळ टाकावी म्हणून "टाईम सेटिंग" चा टॅब बघीतला आणि धक्काच बसला. देशांच्या प्रमाणवेळेच्या यादीत कोठेही भारताचे नाव नाही. इंटरनेटवरुन तुमच्या देशाची प्रमाणवेळ बघण्यासाठी एक टॅब आहे तेथे जाऊन टिचकी मारल्यानंतरही तेथे इस्लामाबाद, कराची अशी प्रमाणवेळ दिसते. मी यासंदर्भात डीलरकडे विचारणा केली असता त्याने फर्मवेअर अपग्रेड केल्यावर हवा तो बदल होईल असे सुचविले. त्याप्रमाणे बदल करुन बघीतला मात्र काहीही फरक पडला नाही. त्यानंतर मी त्यांच्या टेक्नीकल सपोर्ट टीम ला मेल टाकून असे का ? विचारले मात्र काहीही उत्तर आले नाही.

खरोखरच हा भारतद्वेष असावा की तांत्रिक चूक ? मला तर ही तांत्रिक चूक असणे केवळ अशक्य वाटते. खाजगी कंपनी जर असे वागू शकते तर सरकारी पातळीवर काय होत असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी!
तुम्हाला काय वाटते ?

(मदत हवी आहे : मला येथे "टाईम सेटिंग" च्या पेजचा "स्क्रीनशॉट" टाकावयाच होता ते जमले नाही ! कोणी मदत करु शकेल काय ? .png फाईल अपलोड होऊन दिसू शकते काय ? )

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

लेखनविषय: दुवे:

Comments

तसे नसावे

पूर्ण तासाच्या वेळा साठविणे कदाचित सोपे असेल, मिनिटांची वेगळी सोय लावण्याचा त्रास त्यांनी घेतला नसेल. किंवा ती बॅच भारतात विक्रीसाठी पाठविलीच नसेल.
येथे चित्रे अपलोड करता येत नाहीत. इतरत्र अपलोड केलेल्या चित्रांचे दुवे देता येतात किंवा ती हॉटलिंक करता येतात.

किंवा ती बॅच भारतात विक्रीसाठी पाठविलीच नसेल.

पूर्ण तासाच्या वेळा साठविणे कदाचित सोपे असेल, मिनिटांची वेगळी सोय लावण्याचा त्रास त्यांनी घेतला नसेल.

हे पटण्यासारखे आहे मात्र

ती बॅच भारतात विक्रीसाठी पाठविलीच नसेल.
हे पटत नाही.

परत (Get GMT when connected to Internet) ही सुविधा दिली आहे ती काम करत नाहीये.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

चीन ने तोफा रोखल्यास काय करतील भाई भाई म्हणतील

चीनी राजसत्ता भारताला महत्व देतच नाही. हे या वरून स्पष्ट होते. त्यांनी नेहरूच्या पाठीत खंजीर खुपसला होता तर आताचे पंतप्रधान तर हातात दगड घेवून सैन्यावर दगडफेक करणाऱ्या काश्मिरी लोकांना अधिक स्वातंत्र्य देण्यास निघाले आहे. चीन ने तोफा रोखल्यास काय करतील भाई भाई म्हणतील आणि आजची युद्धे लढाई न करता व्यापाराने जिंकता येतात हे चीन ला चांगले माहित आहे.

thanthanpal.blogspot.com

तांत्रिक वाटते

भारतीय वेळ तशी अडनिडी आहे (ग्रिमिटा+५:३०) त्यामुळे कदाचित असेल. केवळ जर तास काटा वापरायचा ठरवला तर +५ व +६ येते.

बाकी तुम्ही म्हणता तसे धोरण असते तर चीन्यांनी हे धोरण सगळीकडे राबवले असते. तेव्हा ही तांत्रिक चुक वाटते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

केवळ

केवळ भारताला खाली दाखवायचे म्हणून ती वेळ नसणे उत्पादनाच्या दृष्टीने कितपत सोपे/अवघड आहे कल्पना नाही.
सध्या तरी तांत्रिक चूक वाटते आहे.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम

+१

शिवाय वस्तूची विक्री करणार्‍याला भारताला खाली दाखवण्यासाठी भारताचे मोठे मार्केट पणाला लावण्याची इच्छा होईल असे वाटत नाही.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

प्रमाणवेळ एकच

चीन आणि भारताची प्रमाणवेळ एकच आहे म्हणून.

?

चीन भारताच्या अडीच तास पुढे आहे ना? की तुम्हाला उपरोध अपेक्षित होता?

तांत्रिक चुक आणि दृष्टिकोन

हि निव्वळ तांत्रिक चुक/अडचण आहे.
आय बी एमच्या ए आय एक्स ऑपरेटिंग सिस्टिमवर सुद्धा हेच पाहिले होते. भारताला सर्वात जवळची वेळ पाकिस्तानची होती - ग्रिमिटा+५ त्या नंतर +६.
कृपया आपला दृष्टिकोन बदला.






अकार्यक्षमता

माझा एकंदरीत सरकार, कंपन्या इत्यादींच्या खोडसाळपणापेक्षा त्यांच्या अकार्यक्षमतेवर अधिक विश्वास आहे. असला मोजूनमापून खोडसाळपणा करण्यासाठी फारच विचार करावा लागतो.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

चिनी उत्पादकांचा भारतद्वेष

श्री राजकुमार हे चीनगंडाने पछाडलेले आहेत असे राहून राहून वाटते. चीनच्या सरकारचा भारताबद्दलचा दृष्टीकोन काहीही असला तरी धंद्याच्या बाबतीत चिनी लोकांचा " धंदा प्रथम बाकी सर्व नंतर" असेच सूत्र असते. अलीकडे बाजारात मिळणार्‍या देवांच्या मूर्ती, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मिळणारे झेंडे व इतर राष्ट्रप्रेम दर्शक साहित्य कोठे बनते असे राजकुमार यांना वाटते? या सर्व गोष्टी चीन हूनच येतात. आपल्या ग्राहकांना काय हवे आहे या बाबतची माहिती जमा करण्यात चिनी उत्पादकांचा हात कोणीही धरू शकणार नाही. राजकुमार यांनी वायरलेस राऊटर कोठून घेतला? बिल मिळाले का? या गोष्टी महत्वाच्या आहेत. दुसर्‍या कोणत्या तरी मार्केटसाठी बनलेले राऊटर्स जर भारतात अवैध रित्या कोणी आणून विकलेले असले तर असे हो ऊ शकते. चिनी उत्पादक आपल्या ग्राहक बाजारपेठेबद्दल असे अज्ञान दाखवणे मला तरी अशक्यप्रायच वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

चीनगंडाने पछाडलेले ?

शंका का घेऊ नये ? चीनी बनावटीची खेळणी, चीनी दुध ह्यांचा गतइतिहास आपणास माहित असेलच. ह्या गोष्टी अज्ञान असल्यामुळे झाल्या आहेत असे वाटत नाही.
टेलिकॉम क्षेत्रात अजूनही चीनी बनावटीच्या उपकरणांकडे संशयाने बघीतले जाते. चीनी बनावटीच्या मोबाईलला IMIE क्र. नसल्यामुळे त्यावरुन बराच गदारोळ झाला होता.

वायरलेस राउटर मुंबईतूनच घेतला आहे त्याचे योग्य बिल व वारंटी कार्ड आहे.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

जस्ट चिल!

आपल्या मनात, तांत्रिक अडचण झाल्याचे जाणावताच जी पहिली भावना उमटली ती थेट 'चीन्यांनी हे मुद्दामहून केले असावे' अशी. ती भावना आहे. तिला तितकेसे महत्व देवू नका. आपण भारतीयांना वस्तू स्वस्त देखील हवी, तंत्राच्या बाबतीत ती अद्ययावत देखील असावी या अशा अपेक्शा ठेवून असतो. आयपॅड, आयफोन, ब्लॅकबेरी ह्यांमध्ये मराठी सोबत भारतीय भाशा दिसतात का? खूप आधी विंडोज मध्ये देखील भारतीय तारीख, आकडे लिहीण्याची पद्धत नव्हतीच. पण तेव्हा आपण युरोप वा अमेरिकेतील उत्पादकांबद्दल 'ते सगळे मुद्दामहून करतात' असे म्हटले होते का? नाही ना?
जगातील बदल फक्त युरोप, अमेरीकेतूनच होत असतो. ह्यावरच आपल्या देशातील लोकांची श्रद्धा आहे. चिनी लोकं जे उद्दमशील आहेत त्यांनी हा दृष्टीकोन बदलून 'आपण जगाला अगदी स्वस्त्यात व लवकरात लवकर काय देवू शकतो' हे द्यानात घेवून शुद्रयुगात जसे वागायला हवे तसेच वागत आहेत.

जस्ट चिल!

अगदी मुद्देसुद प्रतिसाद ! आपली प्रतिक्रिया वाचल्यानंतर नक्कीच मनातली भावना बदलली (मी फक्त ह्या उत्पादनाच्या अनुषंगाने जी चर्चा चालू आहे त्याबद्दल बोलतोय). तशी ती "रिकामटेकडा" यांच्या पहिल्या प्रतिसादानंतरच बदलण्यास अनुकूल झाली होती.

शेवटी ही चर्चा तांत्रिक असल्यामुळे ती उपक्रमावर आधी घडलेल्या धर्म आणी इतर तत्सम चर्चांसारखी मोठी आणि अनिर्णायक अवस्थेत संपणार नाही हे नक्की. मात्र चीन म्हणजे संशय हे समिकरण सहजासहजी बदलेल असे वाटत नाही.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

आयफोन

आयपॅड, आयफोन, ब्लॅकबेरी ह्यांमध्ये मराठी सोबत भारतीय भाशा दिसतात का?

आयफोनमधे मराठी अगदी सुबक आणि छान दिसते. आय ओएस ४.० इन्स्टॉल केल्यापासून सगळ्या मराठी साइट्स आयफोनवर व्यवस्थीत आणि स्पष्ट दिसतात.

IMG_3935" alt="">

आयफोनमधे मराठी

त्यांना बहुतेक आयपॅड, आयफोन, ब्लॅकबेरी ह्यांच्या प्रणालीमधे भारतीय भाषा अंतर्भूत आहेत का असे विचारायचे असावे ?

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

थोडी माहिती हवी होती.

मला भारतीय भाशा (,आकडे व इतर पद्दती यांच्या अंतर्भूत) 'असण्याबाबत' म्हणायचे होते. मी 'दिसण्याबाबत' म्हणालो नव्हतो. राजकुमार यांना मला काय म्हणायचे आहे ते त्यांच्या प्रतिसादातून त्यांनी लिहीलेले आहे.

कोलबेर,
आपण चांगली माहिती दिलीत. चीन्यांसारखी 'उद्यमशील' मनोवृत्ती नसलेल्या पण इतर भारतीयांसारखीच 'ग्राहक' हि मनोवृत्ती असलेल्या मज भारतीयाला आज ना उद्या आयफोन विकत घ्यायची ईच्छा आहे. पण यात मराठी एस्.एम्.एस्. वाचता व टंकीत करता येतात का? ही शंका आहे.

उत्पादकांना त्यांच्या पोटासाठी का होईना महत्व द्यावेच लागते.

चीनी राजसत्ता भारताला महत्व देतच नाही. हे thanthanpal यांचे वाक्याशी सहमत.
चीनी राजसत्ता आजकाल भारतालाच काय जगात कोणालाच महत्व देत नाही.

तरी सुद्धा,चीनी राजसत्ता आणि चीनी उत्पादक ह्या दोघे वेगळे आहेत. राजसात्तेनी जर महत्व दिले नाही तरी उत्पादकांना त्यांच्या पोटासाठी का होईना महत्व द्यावेच लागते.

चीनचे नवीन उत्पादन chinese android IPAD हे सर्वांना माहीतच असेल.
त्यात English(india) इतकीच नव्हे तर Hindi भाषा देखील त्यावर चालू शकते हे माझ्या एक मित्राकडून समजले होते.

जालावर थोडा शोध घेतला असता. हे आढळून आले.
खालचा video १:१८ ला थांबवा आणि बघा
(प्रस्तुत video मध्ये सादरकर्त्याने IPAD ची स्क्रीन थोडी वर सरकविली असती तर तुम्हाला दिसून आले असते.)
http://www.youtube.com/watch?v=Ca8j2dCAcig

" alt="">

चित्रफीत बघीतली.

चित्रफीत बघीतली. हे म्हणजे ऍपल आयपॅड ला नवे दुखणेच की ! असे असूनही ऍपल आपले निर्मिती केंद्र चीनमधून हलवेल की नाही याबाबत शंकाच वाटते.
आमच्या युएसए (उल्हासनगर सिंधी असोसिएशनपेक्षा) भारीच की हे लोक !

(अवांतर : चंद्रशेखर यांनी सांगीतलेला बराचसा चीनी बनावटीचा माल युएसए मध्ये बनून त्यावर मेड इन चायना चा शिक्का तर मारत नसावेत ना ?)

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

बनावट

चिनी बनावटीचा माल यूएसए मध्ये कसा बनवणार?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

उल्हासनगर

उल्हासनगरचे उत्पादक कितीही स्वस्त असले तरी चिनी उत्पादकांच्या किंमतीहून स्वस्तात माल विकणे त्याना केवळ अशक्य आहे कारण चिनी उत्पादक असल्या गोष्टी कंटेनर (बोटीवर चढवतात ते) लोडने विकतात,

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

मँड्रिवा

मँड्रिवा २०१० आवृत्तीची प्राणप्रतिष्ठा करताना वेळ निवडण्याच्या पर्यायात भारताचा समावेश नव्हता. हा निष्काळजीपणा मानता येईल. मँड्रिवा किंवा फ्रान्स हा देश खोडसाळपणा करुन भारताचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहे असे मला वाटले नाही. मात्र मँड्रिवा न आवडल्याने पुढे मी लिनक्समिंटकडे वळलो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मँड्रिवा

नवीन आवृत्तीमधे याचा समावेश आहे. मात्र मी वायरलेस नेटवर्क कार्ड स्थापित करु न शकल्यामुळे पुन्हा उबंटूकडे वळालो.
लिनक्समिंट चांगले आहे. जुन्या कॉन्फीगरेशनवरही बर्‍यापैकी चालते. मात्र "सर्च" (विशिष्ट फाईल शोधणे ) सुविधा मला नीट वापरता आले नाही.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

ही सुविधा नॉटिलसमध्येच असते

नॉटिलसमध्येच ही सुविधा अंतर्भूत असते की. सरळ टर्मिनल वर जाऊन खालील युक्ती वापरा.

find <फाईल जिथपासून शोधायची आहे ती मूळ डिरेक्टरी) -name <फाईलचे नाव> {} \; असे द्या. फाईलचे नाव मिळेल. यात वाईल्ड कार्ड्स आणि रेग्युलर एक्सप्रेशन्सही वापरता येतात.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बॅच

|किंवा ती बॅच भारतात विक्रीसाठी पाठविलीच नसेल.

काही प्रतिसादात असा उल्लेख आहे. पण मग ती बॅच भारत सोडून इतर सर्व जगासाठी आहे, असा त्याचा अर्थ आहे का? त्यामूळे हा मुद्दा मला गैरलागू वाटतो. आळस/टेस्टिंगमधील गफलत असू शकेल.

||वाछितो विजयी होईबा||

बॅच

आफ्रिकेत जाणार्‍या उत्पादनांत भारतीय वेळ असण्याची काय जरूरी आहे?

चन्द्रशेखर

तेच तर

आफ्रिकेत जाणार्‍या उत्पादनांत भारतीय वेळ असण्याची काय जरूरी आहे?
मान्य. १००% मान्य. जरूरी नाही. पण भारतात येणार्‍या प्रत्येक उत्पादनात अगदी युगांडा-झेकोस्लोवाकियापासून झाडून सगळ्या देशांची यादी असतेच की.त्याची तरी काय गरज आहे? म्हणजे एखादे उत्पादन कोणत्या देशात निर्यात होणार आहे वा वापरले जाणार आहे, हे त्या उत्पादनात अंतर्भूत असणार्‍या देशांच्या यादीशी irrelevant आहे. असे असताना मूळ चर्चेतील उत्पादन भारतासाठी नसणार्‍या बॅच मधील असेल, म्हणून त्यात भारताचा समावेश नाही, असे विश्लेषण योग्य नाही. त्यात इतर सगळ्या देशांची यादी आहे, म्हणजे ते उत्पादन भारत सोडून दुनियाभरात पाठविण्यासाठी निर्मित आहे, असा अर्थ घ्यायचा का?

||वाछितो विजयी होईबा||

 
^ वर