पुरुष म्हणजे काय?

२८ ऑगस्ट ला मटा ची श्रावण क्वीन ची फायनल झाली.सगळ्याच मुली खुप हुशार होत्या.एका राऊंडला परिक्षकांनी एका मुलीला विचारल की सगळेजणच नेहमी define female अस विचारतात तर तु मला 'MAN' Define करुन दाखव.so i was also confused.
खरतर अजुनही आपली पुरुष प्रधान संस्कती मग अजुनही हा प्रश्प आपल्याला का नाही पडला,कदाचित स्त्रीयांना पुधे आणण्यात त्यांच्या वरही थोडाफार अन्याय होत असावा,असा मला वाटत.खरच स्त्री म्हणजे काय ह्या प्रश्नाचं उत्तर देणं सोप्प नाहिये ,पण पुरुष म्हणजे काय हे सांगणही कथीन आहे.

तुम्हाला काय वाटत?

लेखनविषय: दुवे:

Comments

खरेच की

पण मी यापूर्वी पहिलाही प्रश्न ("मादी"ची व्याख्या द्या) ऐकलेला नव्हता आणि दुसराही प्रश्न ("पुरुष"ची व्याख्या द्या) आताच ऐकतो आहे. तुम्ही उल्लेखलेले दोन्ही प्रश्न कठिणच आहेत की!

बहुतेक वेळेला अशा प्रश्नांचा मथितार्थ "साम्ये आणि फरक सांगा" असा काही असतो. त्यामुळे एकाच वेळी नर-मादी, किंवा स्त्री-पुरुष दोन्हींचे तुलनात्मक वर्णन होते.

तुलना न-करतासुद्धा शारिर व्याख्या शक्य आहे म्हणा :
"स्तनकेशवती नारी लोमशः पुरुषः स्मृतः ।" अशी बिगरतुलनात्मक व्याख्या वाचलेली आठवते.
पांढर्‍या शाईत भाषांतराचा मजकूर :
"स्तन आणि योनी असलेली ती नारी" आणि
"शिश्न असलेला तो पुरुष"
यामुळे स्तन-योनी-शिश्न हे सर्व असलेले एकक पुरुषही आणि स्त्रीसुद्धा. स्तन-योनी आणि शिश्न नसलेले एकक पुरुषही नाही आणि स्त्रीही नाही.
:

भाषांतर

सदर व्याख्येच्या आपण केलेल्या भाषांतराबद्दल मी साशंक आहे. वरील व्याख्येत केश= डोक्याचे (लांबसडक!) केस आणि लोम म्हणजे अंगावरचे केस असे अर्थ होतात असे मला वाटते. योनी आणि शिस्न हे शब्द या व्याख्येत नाहीत. [व्याख्या अर्थातच अपुरी आहे.]

अवांतर- भाषांतराचा मजकूर पांढर्‍या शाईत लिहावासा का वाटला, हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.

कवीचा भिडस्तपणा

व्याख्या "लिंगानुशासन" ग्रंथातली आहे. ग्रंथाच्या प्राचीन टिप्पणीकारांनीच "केश" आणि "लोम" सांकेतिक शब्द असल्याचे नमूद केलेले आहे.

त्यांना "केश" आणि "लोम" म्हणण्यात व्याख्याकार-कवीचा भिडस्तपणा असावा.
पुरुषाला लांबसडक केस असू शकतात, आणि स्त्रीच्या अंगावरही केस असतात, हे निरीक्षण तसे सोपे आहे. "केश" आणि "लोम" शब्दांचा वाच्यार्थ घेतला, तर व्याख्याकार-कवी निरीक्षणाच्या बाबतीत भलताच अधू असण्याची शंका यायची!

व्याख्याकार-कवीच्या भिडस्तपणाचे आचरट अनुकरण म्हणून पांढर्‍या शाईत भाषांतर दिलेले आहे.

धन्यवाद

एकंदर भिडस्तपणा बराच पुरातन आहे असे दिसते. :)

+

+ सहमत आहे.

वर्ल्ड पीस

पुरुष म्हणजे काय हा प्रश्न नेमका कुठे आणि कुणी विचारला आहे हे लक्षात घेऊन उत्तर दिले तर प्रश्न फारसा कठिण नाही. पुरुष या शब्दाद्वारे सहज दिसणारे शारीरिक वर्णन वगळल्यास एखाद्या दोन वर्षाच्या पोरीला पुरुष म्हणजे आपला बाप वाटेल. एखाद्या षोडशवर्षीयेला पुरुष म्हणजे आपला स्वप्नातला राजकुमार वाटेल. विवाहीत बाईला पुरुष आपला नवरा वाटत असेल आणि कदाचित नसेलही एखाद्या बलात्कारितेला पुरुष या शब्दाची वेगळीच व्याख्या समोर येत असेल तर गे-लेस्बियन या शब्दाकडे वेगळ्या अर्थाने बघत असतील.

माझ्यामते या स्पर्धेतील या प्रश्नाचे उत्तर

जगात शांती प्रस्थापित करू शकेल (गेला बाजार, गरीबी दूर करू शकेल असे उत्तरही चालेल) असा एक मूलभूत घटक म्हणजे पुरुष असे उत्तर देता आले असते.

..... क्वीन या स्पर्धेतील कोणत्याही उत्तरात "वर्ल्ड पीस" असा शब्द आला तर ते उत्तर परीक्षकांना भावते असे मी ऐकून आहे. मिस युनिवर्स स्पर्धेत मधुश्रीताई सप्रेंनी आपण भारताचे पंतप्रधान झाल्यास भारतासाठी क्रिडासंकुल बांधू असे काहीसे उत्तर देऊन स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला होता.

बायदवे, अशा स्पर्धांमध्ये कोचच्या हँडबॅग्ज चांगल्या की गुचीच्या आणि २०१० साली दोन्ही कंपन्यांनी कोणते नवे डिझाईन मार्केटमध्ये आणले? किंवा लॉरियलची हिप मेक-अप प्रॉडक्ट्स कोणत्या वयाच्या स्त्रीने आणि दिवसातील कोणत्या वेळी वापरावीत? असे प्रश्न का विचारले जात नाहीत? हे प्रश्न विचारण्यात परीक्षकांना कमीपणा वाटतो की स्पर्धकांना? आणि वाटत असल्यास का बुवा?

______________________

विवाहितेला आपला नवरा पुरुष वाटत नसतो तेव्हा तो सासूच्या कुक्कुल्या बाळापासून नेभळट, बावळट, आचरट या सर्व शब्दांचा धनी वाटत असतो. ;-)

.... च्या जागी श्रावणपासून ब्रह्मांडापर्यंत कोणताही शब्द टाकता येईल.


स्टॅन फील्ड्स : वॉट इज द वन मोस्ट इम्पॉर्टन्ट थिंग अवर सोसायटी नीड्स?
ग्रेसी हार्टः दॅट वुड बी हार्शर पनिशमेंटस फॉर परोल वायोलेटर्स, स्टॅन!
[सर्व अचंबित]
...
ग्रेसी हार्टः अँड "वर्ल्ड पीस!"
[टाळ्यांचा कडकडाट]

संदर्भ: मिस कॉन्जेनिऍलिटी

ऋग्वेद आणि पुरुष

ऋग्वेदातील एका सूत्रात (पुरुष सूक्त) संपूर्ण विश्वाला पुरुष असे नाव दिलेले आहे. त्यामुळे पुरुष या शब्दाचा अर्थ सर्वव्यापी आहे असेच म्हणावे लागेल.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

:)

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम

आपण म्हणजे जे असतो -'जे आपण व्यक्त करतो'

अशा सौंदर्यस्पर्धेत मुलींचा 'चारचौघात स्वत:ला मिरवता येणं' व 'हजरजबाबीपणा' यांवरचा आत्मविश्वास किती आहे हेच पाहिले जाते.

आत्मविश्वास म्हणजे, 'आजूबाजूला ज्या घटना घडताहेत, त्यामुळे आपल्या मनात कोणते तरंग, लहरी उत्पन्न होत आहेत त्यातील कोणत्या तरंगांकडे दुर्लक्श करायचे व कोणते तरंग अनुभवत मनाबाहेरील घडणार्‍या घटनांना आपण स्वत: काय व कसा प्रतिसाद द्यायला हवा व प्रत्यक्शात काय व कसा प्रतिसाद देत आहोत' ह्या सगळ्या बाबींकडे अगदी त्रयस्तपणे पहात प्रत्येक क्शण जगणे.

स्त्री व पुरुश यांची व्याख्या विचारली तर उत्तर केवळ शाररीक स्तरावरील भेद ध्यानात घेवूनच देता येवू शकेल. ते मी सांगायची गरज नाही.
स्त्री व पुरूशाचा भावनिक प्रतिसाद व्यक्त करणं जरी भिन्न-भिन्न स्वरूपाचे असले तरी देखील दोघांमध्ये मानसिक व बौद्धिक स्तरावर तितके अंतर नसावे असेच अनुभव मलातरी आतापर्यंत आलेले आहेत.

मधुलेखा, कृपया आपण 'ह्या स्पर्धेतील अनुभव' ह्या विशयावर थोडं लिहा. वाचायला आवडेल आम्हाला.

ही कसली स्पर्धा??????????

खरतर मी हि श्रावण क्वीन ह्या स्पर्धेचा एक भाग होते.ते जगच निराळ आहे,तिथले नियम वेगळे आहेत.तिथे उभ रहायच म्हणजे तुम्हाला कोडगेपणा,पैसा,निर्लज्जपणा आणि राजकारण खिशात घेउन फिराव लागत. Beauti with Brain हे फक्त आपल्या सारख्या अनभिद्न्या लोकांसाथि,बाकी काहीही नाही.आपण नियम बदलू (?)ह्या विचाराने मी गेले अगदी 'select' सुद्धा झाले,पण मोरुंचे मोर व्हायला वेळ लागत नाही,आणि अशी शंका उपस्थित होताच तो फक्त एक अनुभव आहे ह्याच भावनेने बघायला लागले...................

वरील पातळीवर

वेगळ्या लेव्हलची स्पर्धा आहे ती. जितक्या वरील पातळीवर माणूस जाऊन भिडायला सुरुवात करतो, तितक्या जास्त तीव्रतेने असे अनुभव येतात.

ब्युटी विद ब्रेन

आपण आपल्या अनुभवाविषयी वेळ काढून थोडे विस्ताराने लिहावे. सध्या आपण जे लिहिले आहे त्यातून फारसा बोध होत नाही.

ब्युटी विद ब्रेन म्हणजे काय? ज्यांना गरीबांची कळकळ/ जागतिक शांती/ आफ्रिकेतल्या भुकेजलेल्या लोकांबद्दल अपार दया असते त्या बाया बुद्धिमान असतात का?

तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप-खूप शुभेच्छा!

असो! तुम्हाला काय म्हणायचे ते कळले!

झाले गेले विसूरूनी जावे पूढे-पूढे चालावे,
जीवन गाणे (आनंदाने) गातच र्‍हावे, जीवन गाणे.

तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप-खूप शुभेच्छा!

 
^ वर