राजकारण्यांचा पांढरा दहशतवाद संपविण्यासाठी कुठेतरी भगवा दहशतवाद जन्माला यायलाच हवा.

चिदंबरम 'हे कायद्याचे राज्य आहे' असे सांगतात, तिथेच जर कायद्याने कोणी वागले तर त्याला मारून टाकण्यात येते, हे बरोबर आहे का ?
सतीश शेट्टी सुद्धा असेच मारले गेले, काय गुन्हा केला होता त्यांनी ? कायद्याने लढले, इतकेच ना ?
कायद्याने लढून सुद्धा जर समोर मृत्यू येत असेल तर लढायचे तरी कसे ह्यांच्या बरोबर ?
माहिती कायदा वापरणार्यांचा असाच खात्मा होत असेल तर काय फायदा ह्या कायद्याचा ?
अशी एक नाहीतर हजारो उदाहरणे सापडतील, कोणीही त्यांच्या विरुद्ध कायद्याने लढायचे ठरविले कि त्याचा खात्मा होतो.
आनि कोणी शस्त्रे हातात घेतली कि त्याला लगेच अतिरेकी म्हणाले जाते.

अरे ह्यांच्या बरोबर लढायचे तरी कसे ? मी विचारत आहे, कोणी उत्तर देईल का ?

राजकारण्यांचा पांढरा दहशतवाद : भ्रष्टाचार, लाचखोरी, सत्तेसाठी काय वाट्टेल ते करण्याची तयारी, जातीयवाद भडकावून देणे, सीमा प्रश्न चिघळविणे, जमिनी बलाकावीने, एखाद जन जर का आपले गुपित फोडू पाहत असेलत तर लगेच त्याच्यावर वर करून खेळ खल्लास, ह्या दहशतवादाला पांढरा दहशतवाद असे नाही तर काय म्हणायचे ? कसा संपवायचा हा पांढरा दहशतवाद ?

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रश्न - उत्तर

>>कोणीही त्यांच्या विरुद्ध कायद्याने लढायचे ठरविले कि त्याचा खात्मा होतो.
आनि कोणी शस्त्रे हातात घेतली कि त्याला लगेच अतिरेकी म्हणाले जाते.

हे मत ठीक.

पण त्याचे उत्तर म्हणून भगवा दहशतवाद का? लाल का नको? किंवा रंगहीन का नको?

भगव्या दहशतवाद्यांमध्ये काही विशेष गुण असतात का?

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

अपुरी माहिती

दूधविक्रेत्यांचा अध्यक्ष, शिवसेना शाखाप्रमुख, असल्या पदांवरील माणूस धुतल्या तांदुळासारखा असू शकतो?
पेपरवाल्यांना काहीतरी कांगावा हवाच असतो. काळजाला भिडणार्‍या बातम्या ते शोधतच असतात.

दहशतवादाचा रंग

दहशतवादाचा रंग कोणी आणि का ठरवला? मुळातच भारत धर्म निरपेक्ष असल्याने इथे सत्परंगी दहशतवाद आहे. त्याला आपण लोकशाही म्हणतो. त्याचा बेस नेहमीच पांढरा असणार आहे. पुरोगमी लोकांना तुम्ही सांगायला गेलात की आम्ही तोंडाने खातो, तर ते तुम्हाला अनेक असे मार्ग दाखवतील की इतर अनेक मार्गांनी खाता येते आणि तोंडाने खाणे हा समज किती जुनाट आणि कालबाह्य आहे.
सगळ्यांना प्रगत राष्ट्रांची दहशत मान्य आहे. पण त्या दहशतीला कोणी उत्तर दिले की दहशतवाद होतो आणि मग आमचे लोकं त्याला रंग द्यायला बसले आहेतच. बाकी जमते तरी काय हो आमच्या लोकांना? चिन्यांची बॅट घेऊन डास मारतील. पण आपल्याला असे का नाही जमले हा विचार नाही करणार. भारतात हे असेच चालणार.
लोकशाहीचा गोडवा गाणार्‍या पक्षांना येथे पक्षाला अध्यक्ष मात्र हुकुमशहाच लागणार. :) सोनियाचे दिवस आहेत हे गांधीवाद्यांना आम्ही सांगावे काय?


अपयशाला कोणता दहशतवाद म्हणायचे?

--- बाकी जमते तरी काय हो आमच्या लोकांना? चिन्यांची बॅट घेऊन डास मारतील.---

भारतातील ५० हजार आयायटी झालेल्या उच्चशिक्षीत, हुशार लोकांना ह्याचा जाब विचारला पाहीजे. ह्या आयायटी वाल्यांच्या अपयशाला कोणता दहशतवाद म्हणायचे?

नवीन धाग्याचं मटेरियल...

भारतातील ५० हजार आयायटी झालेल्या उच्चशिक्षीत, हुशार लोकांना ह्याचा जाब विचारला पाहीजे. ह्या आयायटी वाल्यांच्या अपयशाला कोणता दहशतवाद म्हणायचे?

५० हजार आयायटीयन्सवर झालेला खर्च - दहा हजार कोटी. (दरडोई वीस लाख प्रमाणे)

इन्फोसिस -
संस्थापक - मोजके दोनचार आयायटीयन्स.
२०१० चं उत्पन्न (रेव्हेन्यू) - (५ बिलियन डॉलर्स) २२० अब्ज रुपये - २२ हजार कोटी रुपये
२०१० चा फायदा - (३१४ मिलियन डॉलर्स) - १३ अब्ज रुपये - तेराशे कोटी रुपये
२०१० चा सरकारला भरलेला टॅक्स (अंदाजे) - दोनशे कोटी रुपये
पगारी नोकर - १,१४,०००+ त्यांनी सरकारला भरलेला टॅक्स - अंदाजे पाचशे कोटी रुपये (किमान)
त्यांच्यामुळे इतर धंद्यातले पोसले जाणारे - ५,००,०००+ त्यांनी सरकारला भरलेला टॅक्स - अंदाजे तीनशे कोटी रुपये (किमान)

दहा हजाराच्या इन्व्हेस्टमेंटवर हजारचं रिटर्न.... १० टक्के. यात मी इन्फोसिस देशांतर्गत किती खर्च करते हा हिशोब धरलेलाही नाही.

इतर ४९९९५+ आयायटीयनांविषयी बोलतही नाही...

उगाच कशाला दहशतवाद वगैरे बोलता? की तुम्हालाही सत्याकडे दुर्लक्ष करण्याची गांधीवादी-ठणठणपाळी सवय लागली आहे?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

आपल्या सारख्या सुज्ञाकडून अपेक्षित नाही.

>>तुम्हालाही सत्याकडे दुर्लक्ष करण्याची गांधीवादी-ठणठणपाळी सवय लागली आहे
राजेश साहेब, मी जास्त खोलात जात नाही, पण १००/५०० लोक इथे मिपावर, उपकारामावर येऊन आपली मते मांडतात ते म्हणजे सत्य असे आपल्याला म्हणायचे आहे काय ? मी कित्येक वर्षे (३०) अशा लोकांच्या समवेत राहिलो आहे कि ज्यांचे महिना उत्पन्न ४/५००० रुपये आहे, मला स्वताला सुद्धा आर्थिक परिस्थिती मुळे कित्येक वर्षे ह्या आपल्या आधुनिक सेवेचा (इंटरनेट)चा लाभ घेता येत नव्हता. अजूनही कित्येक पीडितांना ह्याचा लाभ घेता येत नाही आणि आपले म्हणेन इथे येऊन मांडता येत नाही.
चीनी जे उत्पादन बनवितात ते उत्पादन भारतात बनवायला IIT वाल्यांना मध्ये खेचायची खरंच गरज नव्हती हे मला देखील समजते. उलट आपली TATA NANO ह्याचे चीन मधील लोकांना आकर्षण वाटते.
पण म्हणून नवीन धाग्याचं मटेरियल... हाय शीर्षकाखाली आपण जी गांधीवादी-ठणठणपाळी सवय हा शब्दप्रयोग केला तो नक्कीच आपल्या सारख्या सुज्ञाकडून अपेक्षित नाही.

व्यक्तिगत

तुम्हाला ते विधान व्यक्तिगत वाटलं असेल तर मी बिनशर्त मागे घेतो.

मला त्याठिकाणी अतिरेकी नकारात्मक असं म्हणायचं होतं. भारतात सगळंच काही चांगलं चाललेलं नाही, तसंच सगळंच काही वाईट चाललेलं नाही. संतुलित विचार करणं योग्य. ते संतुलन तुमच्या किंवा ठणठणपाळ यांच्या विचारांतून दिसत नाही, हे मी आधीच म्हटलेलं आहे. त्यात तुम्ही 'लोकशाहीची कीड वाढलेली नाही' यासाठी दिलेल्या पुराव्यांचं खंडन करण्याऐवजी ते मिसळपाववर चेष्टेने 'बघा भारताने कित्ती कित्ती प्रगती केली आहे' असं म्हणून उद्धृत केलंत. यावरून मी काही तक्रार करत नाही, फक्त तुमच्यात तुम्ही एक दणका दिला तर एक पचवण्याची शक्ती आहे असं वाटलं. ती तुमच्यात नाही, ठीक आहे. असो. आधीच्या आयायटीयनांच्या 'अपयशाला' दहशतवाद म्हणणं हे तुमच्याच विचारपद्धतीचा अतिरेक वाटला इतकंच.

समर्थन दिलं, पण तुम्हाला माझं विधान बोचलं म्हणून मागे घेतो आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सहमत,

सहमत,
बाकी माझे विचार थोडे अतिरेकी आहेत, हे मान्य.
पण काय करू मी ज्या लोकांचे प्रतिनिधित्व करीत आहे, त्यांचे हाल बघूनच झालेले आहेत ते.
राजकारण्यांविषयी माझे मत इतक्या लवकर बदलू शकत नाही.

बाकी, आपले दणके आवडले, आणि खिलाडू वृत्ती सुद्धा.

दणके देणे/घेणे आवडत असलेला,
गांधीवादी.

प्रतिनिधी

>>मी ज्या लोकांचे प्रतिनिधित्व करीत आहे,

म्हणजे तुम्ही पण लोकप्रतिनिधी (पक्षी=राजकारणी) आहात की.
कोण म्हणतो लोकप्रतिनिधींना लोकांच्या प्रश्नाबद्दल काही पडलेले नसते?

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

गणित असेही.

वरील हिशोब पाहून मी न शिकलेल्या इतर लोकसंख्या - ५०००० लोकांचे उत्पन्न किती होईल आणि त्यांच्याकडील ट्याक्स, वगैरे रीटर्न किती असतील ह्याचा विचार केला. नाही जमले गणित.

चीप

सर्व प्रकारची गणितं सतत करत रहावीत. काही मनाला लोभवणारी असतात, काही दुःखी करणारी असतात. फक्त दहशतवादासारखा शब्द सगळीकडे वापरून चीप करू नये. जिथे तो लागू होत नाही तिथे वापरू नयेच.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

बिनशर्त माफी.

होय, दहशतवाद हा शब्द खूपच जास्त होतो- त्याबद्दल बिनशर्त माफी.

ज्यांनी संसदेत वेडीवाकडी विधाने केली, ते कधी माफी मागणार ?

'राजेशघासकडवी' यांचा मान राखून 'असा मी आसामी' ह्यांनी माफी मागितली,
पण समस्त हिंदू लोकांचा मान राखून, ज्यांनी भर संसदेत संपूर्ण देशासमोर वेडीवाकडी विधाने केली, ते कधी माफी मागणार ?

संदर्भ?

कोणती विधाने?

भाषेचा जपून वापर केला जावा,' असा सूचक इशारा दिला

आपल्याला माहित नव्हते असे (बळजबरी) गृहीत धरून,

http://72.78.249.126/esakal/20100828/4677604256064169720.htm
"दहशतवादाला कोणताही रंग नाही. असेलच तर तो काळा रंग आहे,'' असे स्पष्ट शब्दांत सांगून कॉंग्रेसने आज केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या "भगवा दहशतवाद' या शब्दप्रयोगाबद्दल विरोध दर्शविला.
चिदंबरम यांच्या वक्तव्याशी पक्ष सहमत नसल्याचे स्पष्ट केले. ""दहशतवादाला कोणताही रंग नसतो. असलाच तर त्याचा रंग काळाच असेल,'' असे ते म्हणाले. "भाषेचा जपून वापर केला जावा,' असा सूचक इशारा त्यांनी प्रसारमाध्यमांना आणि चिदंबरम यांचे नाव न घेता दिला.

http://72.78.249.126/esakal/20100827/5098112936950833282.htm
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी भाषणात वापरलेल्या "भगवा दहशतवाद' या शद्बांवरून सुरू झालेला वाद संपवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने दहशतवादाला कोणताही रंग नसल्याचे सांगत शद्बांचा वापर काळजीपूर्व करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.

ओह!

या बातम्या माहिती होत्या.

असे पहा: काही दहशतवादी इस्लामच्या वर्चस्वासाठी लढतात. इस्लाममध्ये हिंसेचा खरोखरीच पुरस्कार आहे की नाही हा विषय वेगळा. पण ते दहशतवादी मात्र इस्लामसाठीच स्वतः दहशत पसरवीत असल्याचा दावा करतात. त्यांना मुस्लिम दहशतवादी म्हटल्याने संपूर्ण इस्लामचा/मुस्लिम समाजाचा अपमान होत नाही असे मला वाटते. त्याचप्रमाणे काही दहशतवादी हिंदू धर्माच्या वर्चस्वासाठी लढतात. त्यांना हिंदू दहशतवादी म्हणावे असेही मला वाटते. चिदंबरम यांच्या विधानांत वेडेवाकडे काय आहे?

विचार करा.

>>चिदंबरम यांच्या विधानांत वेडेवाकडे काय आहे?
जर चिदंबरम ह्यांच्या भगवा दहशतवाद ह्यात काही वाकडे नाही, अगोदर उदृत केलेले हिरवा दहशतवाद हे हि काही वाकडे नाही. मग, मी नमूद केलेला पांढरा दहशतवाद हाही मान्य करावाच लागेल.
जर असे सगळे रंगच जर का दहशतवादी ठरले, तर मग ह्या रंगातूनच पुढे तिरंगा निर्माण होतो. तर 'ति** दहशतवाद' ह्या शब्द प्रयोगाला देखील आपला काहीच आक्षेप नसावा काय ?

आपल्या प्रतिक्रिये वरून तरी नसावाच.

** (हे शब्द् देखिल् टंकायला त्रास होत होता.)

तसे नाही

तुम्ही ज्या गुन्ह्यांचा उल्लेख केला आहे, ("भ्रष्टाचार, लाचखोरी, सत्तेसाठी काय वाट्टेल ते करण्याची तयारी, जातीयवाद भडकावून देणे, सीमा प्रश्न चिघळविणे, जमिनी बलाकावीने, एखाद जन जर का आपले गुपित फोडू पाहत असेलत तर लगेच त्याच्यावर वर करून खेळ खल्लास") त्यांपैकी कोणत्याही गुन्ह्याचे समर्थन करण्यासाठी ते गुन्हेगार, 'देशहितासाठी केले' असे स्पष्टीकरण देतात का? तसे कारण दिले तर त्यांना पांढरे/तिरंगी दहशतवादी म्हणता येईल.

हि दहशतवादाची व्याख्या आहे काय

>>कोणत्याही गुन्ह्याचे समर्थन करण्यासाठी ते गुन्हेगार, 'देशहितासाठी केले' असे स्पष्टीकरण देतात का? तसे कारण दिले तर त्यांना ***/*** दहशतवादी म्हणता येईल.
हि दहशतवादाची व्याख्या आहे काय ?

नाही

लोकांना त्रास देणे हीच गुन्ह्याची व्याख्या आहे.
"त्रास नको असेल तर अमुक करा" असे सांगणे ही दहशतवादाची व्याख्या आहे.
ते 'अमुक म्हणजे देशहित' असे त्यांचे मत असेल तरच तिला पांढरी/तिरंगी कृती म्हणता येईल. ('अमुक म्हणजे हिंदुराष्ट्र' असे साध्वी प्रज्ञाचे आणि 'अमुक म्हणजे स्वतंत्र काश्मीर' असे अफजलचे मत आहे म्हणून त्यांना भगवे/हिरवे म्हणतात.)

जोडणी महत्त्वाची

पोलिटिशियन्स लाय - सत्य विधान
कास्ट आयर्न सिंक्स - सत्य विधान

ही जर दोन सत्य विधानं विशिष्ट पद्धतीने जोडली तर निरर्थक विधान तयार होतं

पोलिटिशियन्स लाय इन कास्ट आयर्न सिंक्स.

आपण जोडणी कशी करतो हे महत्त्वाचं ठरतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

मी उल्लेख केला शब्द आपल्याला मान्य आहे काय ?

>>पोलिटिशियन्स लाय इन कास्ट आयर्न सिंक्स.
भले निरर्थक का असेना, मला आपले हे वाक्य मान्य.

मी उल्लेख केला शब्द (अर्थहीन/निरर्थक/अनर्थ/गलीच्च/चांगला/वाईट) आपल्याला मान्य आहे काय ?

तुम्हाला माझा मुद्दा कळला नाही...

सत्य विधान १ + चुकीची जोडणी + सत्य विधान २ = निरर्थक विधान. असं ते उदाहरण होतं. तुम्ही एक निरर्थकपणा मान्य केलात म्हणून मी दुसरा मान्य करावा याला काय तार्किक अधिष्ठान आहे? एक निरर्थक अथवा असत्य विधान सत्य म्हणून मान्य केलं की सर्व सत्यासत्यतेचा तर्काधिष्ठित डोलारा कोसळतो हे तुम्हाला माहीत नाही काय? तुम्ही जो हिरवा, भगवा, पांढराचा गुगली तयार केलात त्यावरून तुम्ही खूप हुशार आहात असं वाटलं होतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

असा काही नियम आहे काय ?

आपण केवळ अर्थहीन आणि निरर्थक ह्या बाबतीतच बोलत आहोत असे मला आपल्याला आठवून द्यावे लागत आहे.
आपण सत्य/ असत्य ह्या बाबतीती अजून बोलणे चालूच केले नाही.
अर्थहीन / निरर्थक आणि सत्य / असत्य ह्याच्या वेगवेगळ्या कसोट्या आहेत.
हिरवा, भगवा, पांढराचा ह्यांची गुगली निरर्थक आहे हे केवळ आपले म्हणणे आहे. माझे नाही.
आपल्याला निरर्थक वाटणारे एखादे विधान मला अर्थपूर्ण वाटू शकते, तसेच आपल्याला अर्थपूर्ण वाटणारे एखादे विधान मला निरर्थक वाटू शकते. त्यामुळे मी हेच म्हणेन कि अर्थपूर्ण / अर्थहीन हे व्यक्ती सापेक्ष आहेत.
आपण माझ्या विषयी जे काही मत केले. काही हरकत नाही. पण सरतेशेवटी आपण माझ्या प्रश्नांचे उत्तर दिले नाही.

"विधान १ + चुकीची जोडणी + विधान २ = निरर्थक विधान" असा काही नियम आहे काय ?

विधान १ = मला भूक लागली आहे.(अर्थपूर्ण विधान)
विधान २ = मला जेवायला वाढ.(अर्थपूर्ण विधान)
विधान १ + विधान २ = मला भूक लागली आहे, मला जेवायला वाढ. (अर्थपूर्ण विधान)

बर जाता जाता,
(एक गंमत : कोणत्यातरी गाण्याच्या ह्या ओळी आहेत ,"तेरे दिल मी रहेंगे, तुझको अपना घर बना लेंगे" एखाद्या सामान्य ज्ञानाप्रमाणे हे किती निरर्थक आहे, पण एखाद्या कवीच्या दृष्टीकोनातून ह्यात सुद्धा काही गुढ अर्थ लपलेला असू शकतो)

सत्य, असत्य

"विधान १ + चुकीची जोडणी + विधान २ = निरर्थकच विधान"

निरर्थक हा शब्द मी तितक्या काटेकोरपणे वापरला नाही, क्षमस्व. तुमच्या लेखनाबाबतीत तितकी काळजी घ्यावी लागेल असं सुरूवातीला वाटलं नव्हतं. मला असत्य, किंवा निरुपयोगी या अर्थाने तो शब्द वापरायचा होता. उदाहरणावरून ते स्पष्ट होतंच.

मुद्दा असा होता की जर जोडणी चुकीची झाली, तर तयार होणार विधान सत्य वा उपयुक्त असेलच असं नाही. त्यामुळे ती जोडणी करताना काळजी घेतली पाहिजे इतकंच. आणि हे फक्त वाच्यार्थाविषयी... व्यंगार्थ वगैरे यायला लागले की तर आणखीनच घोळ होऊ शकतात.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

जागे व्हा

कुठेतरी भगवा दहशतवाद जन्माला यायलाच हवा.
जन्माला यायला हवा काय म्हणता. जागे व्हा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

'पांढरा दहशतवाद' हा शब्दप्रयोग आवडला...

गांधीवादी यांनी वापरलेला 'पांढरा दहशतवाद' हा शब्द भारीच आहे. हाच दहशतवाद सर्वांत भयानक आहे कारण इतर दहशतवादांसारखा तो एका फटक्यात नव्हे, तर हळू हळू पिचवून मारतो.

Power Corrupts; Absolute power corrupts absolutely.
(सत्ता व्यक्तीला भ्रष्ट बनवते. निरंकुश सत्ता तर उन्मत्तच करते.)

'निवडणुकांच्या वेळी फसायचं आणि मधल्या काळात सोसायचं ' हे जनतेच्या अंगवळणी पडले आहे.
असो. या धाग्याच्या शीर्षकाशी अजिबात सहमत नाही कारण दहशतवादाचा रंग कोणताही असो, भोगावे लागते ते सर्वसामान्यांनाच. त्यामुळे कुठलाच दहशतवाद नकोच.

यांचा दहशदवाद काळ्या रंगाचा आहे हे काळ्या रंगाचा अपमान आहे.

पांढरा दहशदवाद हा शब्दच चुकीचा आहे. हे लोक पांढरे कपडे घालत असले तरी यांच्या दहशतवादाला पांढरा रंग देवू नका. यांचा दहशदवाद काळ्या रंगाचा आहे हे म्हणणे म्हणजे सुद्धा काळ्या रंगाचा अपमान आहे. माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्यांना फक्त मारले जाते एव्हढेच आपणास माहित आहे. आत्ता नोकरशाही माहिती अधिकार मागणाऱ्या व्यक्तीला जीवनातून, समाजातून उठविण्याचा प्रकार करत आहे. त्या व्यक्तीस जिवंत ठेवायचे, पण त्याच्यावर सरकारी अघोषित बहिष्कार टाकायचा आणि त्याचे जीणे जीणे नकोशे करायचे हा नवीन प्रकार. यांचा खातमा करायचा तर निवडणूक प्रक्रियेत अमुलाग्र बदल करावे लागतील. भ्रष्ट्राचार , भूखंड हडप, इत्यादी गुन्ह्यास अजामीनपात्र गुन्हा ठरवून त्यास सरळ जेल मध्ये टाकणे, त्याची मालमत्ता जप्त करणे आणि त्याच्या भ्रष्ट्राचारात सहभागी झालेल्या त्याच्या वैवाहिक सहकार्याला ( पती/पत्नी) यांना सुद्धा जेल मध्ये टाकणे. सामान्य माणसावर लहानसहान करणा करता अजामीनपात्र कायदा करणारे नेते असा कायदा करणार नाहीत. असा कायदा करा म्हणून टाकलेल्या पत्राला एकाही नेत्याने उत्तर दिले नाही. कारण आधी या सर्वाना जेल मध्ये जावे लागेल. स्वच्छ नेता दाखवा १००० रुपये बक्षीस मिळावा .

इकडे आड, तिकडे विहीर.

>>भ्रष्ट्राचार , भूखंड हडप, इत्यादी गुन्ह्यास अजामीनपात्र गुन्हा ठरवून त्यास सरळ जेल मध्ये टाकणे, त्याची मालमत्ता जप्त करणे आणि त्याच्या भ्रष्ट्राचारात सहभागी झालेल्या त्याच्या वैवाहिक सहकार्याला ( पती/पत्नी) यांना सुद्धा जेल मध्ये टाकणे. सामान्य माणसावर लहानसहान करणा करता अजामीनपात्र कायदा करणारे नेते असा कायदा करणार नाहीत. असा कायदा करा म्हणून टाकलेल्या पत्राला एकाही नेत्याने उत्तर दिले नाही.
कोणताही नेता ह्याचे उत्तर कधीच देणार नाय, आपणच काहीतरी करायला पाहिजे, पण काय/कसे ?
जनतेपुढे एकच मोठा प्रश्न आहे हा.
घाण इतकी पसरली आहे कि हजारो/ लाख्खो लोकांनी जरी जीवनदान दिले तरी हि घाण काय साफ होणार नाय.
कोणी 'हातात शस्त्र घेतली कि दहशतवादी, आणि कायद्याने लढले तर डोक्यावर टांगलेली तलवार',
इकडे आड, तिकडे विहीर,
हि कोंडी कुठेतरी फोडली पाहिजे.

मला बक्षीस हवंय

स्वच्छ नेता दाखवा १००० रुपये बक्षीस मिळावा .

तुम्ही हे गमतीने म्हटलेलं आहे की खरंच? 'देवीचा रोगी कळवा व १००० रुपये मिळवा' ही स्लोगन पस्तीसेक वर्षांपूर्वी होती. त्याकाळी हजार रुपयात बऱ्याच गोष्टी यायच्या. आजकाल १००० रुपये बक्षीस लावून फारसं महत्त्वाचं काही करता येत नाही. तुम्ही हे बक्षिस ५,००,००० करायला तयार आहात का? आणि त्याचबरोबर स्वच्छची व्याख्या कृपया सांगा. नाहीतर मी तुम्हाला शोधून दिला तर तुम्ही त्यावर तक्रार कराल.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

हजार रुपयात कांही येत नाही हे खर नाही.

मी हे गमतीत म्हणालो नाही. हे खरच सांगितले आहे. आत्ता असा जमाना आला का स्वच्छतेची व्याख्या सुद्धा सांगावी लागेल? हजार रुपयात कांही येत नाही हे खर नाही. भारतातील ५०%च्या वर जनता या हजार रुपयात महिनाभर आनंदात जीवन जगतात हे आपणास माहित नाही हे दुर्देव्य.

thanthanpal.blogspot.com

कंजुषपणा

हा तुमचा कंजुषपणा झाला. ७५ साली १००० रुपये बक्षीस होतं, देवीचा रोगी शोधून दाखवण्यासाठी. स्वच्छ राजकारणी शोधून दाखवणं हे त्यापेक्षा कठीण आहे असं तुमचं म्हणणं आहे की सोपं आहे असं तुमचं म्हणणं आहे? ७५ सालच्या हजार रुपयांत जे यायचं त्याच्याइतकं मिळवायचं झालं तर आता काही लाख नको का? तेव्हा दूध १ रुपया लीटर मिळायचं, आहात कुठे! आता सगळ्याच्या किमती किमान शंभर दोनशे पट तरी झाल्या नाहीत का?

बरं, निदान तुमची स्वच्छची व्याख्या तरी सांगा. बक्षिसाच्या किमतीचं आपण नंतर बोलू.

आत्ता असा जमाना आला का स्वच्छतेची व्याख्या सुद्धा सांगावी लागेल?

तुम्ही जर बक्षीस लावत असाल तर नक्की तुम्ही कशाला स्वच्छ म्हणाल हे कळायला नको का? आयला नायतर मी म्हणायचो, घ्या मनमोहन सिंग स्वच्छ आहेत. तर मग तुम्ही नंतर तक्रार करायचात. आधीच बक्षीसाच्या बाबतीत कंजुषपणा करत आहातच. तेव्हा व्याख्या सांगा नाहीतर तुमची ऑफर जाहीरपणे मागे घ्या. उगाच माझा वेळ मी फुकट घालवणार नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

द्रौपदीचे सत्त्व सात जन्मात लाभणार नाही

मनमोहन सिंग हे मुखवटा आहेत. याच्या मुखवट्या खाली काँग्रेसजन हे आपले भ्रष्ट्राचारी चेहरा लपवतात हे कोणीही सांगेल. माणसाच्या चारित्र्याचे मोजमाप तो ज्या लोकांच्या संगतीत राहत असतो त्यांच्या चारित्र्या वरून ठरत असते. आणि या मिस्टर क्लीन च्या अवतीभोवती भ्रष्ट्राचाराची जी भुतावळ फेर धरून नाचते ती पाहीली तर कोणी त्यांना स्वच्छ म्हणण्याचा अपराध करणार नाही. आणि अश्या लोकांना चारित्र्यवान म्हणत असाल तर द्रौपदीचे सत्त्व सात जन्मात लाभणार नाही . आणि अंधानुकरण करून भावनेला
शास्त्र-काट्याची कसोटी सुद्धा करता येणार नाही.

thanthanpal.blogspot.com

बक्षीस द्यायचंच नाही म्हणून सरळ सांगा ना

बक्षीस द्यायचंच नाही म्हणून सरळ सांगा ना. मी तुम्हाला तुमची स्वच्छची व्याख्या विचारली तर भलतंच काय बोलताय? मनमोहन सिंग कुठच्या व्याख्येप्रमाणे स्वच्छ नाहीत हे सांगा नाहीतर हजार रुपये पाठवा.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

माणसाच्या चारित्र्याचे मोजमाप

माणसाच्या चारित्र्याचे मोजमाप तो ज्या लोकांच्या संगतीत राहत असतो त्यांच्या चारित्र्या वरून ठरत असते. आणि या मिस्टर क्लीन च्या अवतीभोवती भ्रष्ट्राचाराची जी भुतावळ फेर धरून नाचते ती पाहीली तर कोणी त्यांना स्वच्छ म्हणण्याचा अपराध करणार नाही. thanthanpal.blogspot.com

कानौघडणी कराल

आम्ही तरीही त्यांना स्वच्छ म्हणूच कारण स्वच्छ माणसाला आपण सपोर्ट द्यायचा नाहीतर कोणी? नाही दिलातर तुम्ही तरीही आमची कानौघडणी कराल.

कारण या मुखवट्याला सपोर्ट.............

आम्ही तरीही त्यांना स्वच्छ म्हणूच कारण स्वच्छ माणसाला आपण सपोर्ट द्यायचा नाहीतर कोणी?
बरोबर आहे तुमचे म्हणणे .कारण या मुखवट्याला सपोर्ट दिला की आपण आपले लहान सहान भ्रष्ट्राचार करण्यास मोकळे होतो. उदाहरण मुलाचे नर्सरी स्कुल चे डोनेशन देवून प्रवेश आणि त्याचा आपल्या INCOME TAX मध्ये उल्लेख लपवणे . छोट्या छोट्या गोष्टी करता लाच देणे.वगेरे thanthanpal.blogspot.com

 
^ वर