छायाचित्र : मेणबत्या

मेणबेत्त्या एका ओळीत मांडून घरीच केलेले साधेच कंपोजिशन आहे. पण १.८ इतके मोठा ऍपर्चर साइझ ठेवला की चित्रातल्या हव्या त्या भागावर लेन्स केंद्रित करुन अतिशय शार्प चित्र काढता येते. जिथे लेन्स केंद्रित झाली आहे त्या भागापुरते अतिशय उथळ क्षेत्र फोकसमधे येते आणि तेवढाच भाग कमालिचा शार्प येतो आणि बाकिचे चित्र धूसर बनल्याने वेगळाच परीणाम साधला जातो.

candles

कॅमेरा कॅनन रेबेल् टीआय
लेन्स : ५० मीमी/१.८ एफ स्टॉप पोर्ट्रेट लेन्स

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्त!

काही चलतचित्रांमधे हा परिणाम साधलेला बरेचदा जाणवतो / दिसतो. स्थिरचित्रात केलेला हा प्रयोग आवडला

मेणबत्ती क्र.२ देखील काहिशी फोकस मधे आली आहे (फक्त समोरील काही भाग).. तो टाळता आला असता का?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

एक उजवी-डावी असंमिती

चित्र सुंदर आहे, तांत्रिक वर्णन शिकण्यासाठी उत्तम आहे.

चित्राची मांडणी एक सुबक "चौकोनाचा कर्ण" रचना आहे. कर्णातल्या रचनेत गती असते. नजर स्थिर न राहाता कर्णावरून धावते, म्हणून चित्रातही काहीतरी गन्तव्य आहे, असे जाणवते. येथील रचना ईशान्य-नैरृत्य कर्णात जाणारी आहे.

चित्र बघताना माझ्या लक्षात आले, की माझ्यासाठी तरी दोन कर्ण गतिमानतेच्या दृष्टीने समसमान नाहीत. माझी नजर जमल्यास डावीकडून उजवीकडे जाते (मराठी किंवा इंग्रजी वाचल्यासारखी). म्हणजे दर्शनी लाल मेणबत्तीवरून नजर अंधुक हिरव्या मेणबत्त्यांवर जाते तिथून मागच्या मेणबत्त्यांवर. त्यामुळे विचार वर्तमानापासून धुकट स्मृतींकडे जात आहेत, असा भास होतो. भावना गोड-दु:खी स्मृतिरम्यतेची होते (नोस्टॅल्जिया).

मात्र हेच चित्र आरशात बघितले तर काय होते?

आरशात पालटलेल्या मेणबत्त्या

माझे डोळे अजूनही डावीकडून उजवीकडेच (मराठी-इंग्रजी वाचल्यासार्‍अखे) कर्णावर धावतात. म्हणजे मागल्या मेणबत्तीपासून नजर अंधुक हिरव्या मेणबत्तीवरून दर्शनी लाल मेणबत्तीकडे येते. त्या गतीमुळे ही मेणबत्ती अंगावर आल्यासारखी भासते. धस्स होते. मूळ मांडणीपेक्षा पुरती वेगळी भावना आहे.

मला असा प्रश्न पडलेला आहे - नजरेला अशी विवक्षित "मराठी वाचल्यासारखी" दिशा असणे सामान्य असते का? वाचकांपैकी कोणाच्या नजरेत त्या उलट "हिब्रू-उर्दू वाचल्यासारखी" दिशा सातत्याने येते का?

हा अनुभव सामान्य असला, तर याचा वाचनाच्या सवयीशी संबंध आहे का? की मेंदूच्या उजव्या-डाव्या गोलार्धांच्या बलाबलाशी संबंध आहे?

(छिद्रान्वेश : लाल मेणबत्तीवरचे प्लास्टिकचे कवच नजरेला बोचते. फोकस उत्तम असल्याचा अनपेक्षित तोटा.)

सहमत

असाच अजून एक अनुभव येथे आहे.

याचे कारण वाचनाची सवयच असावे पण मुळात सवय तशी असण्याचे कारण जैविकच असणार. हृदय डावीकडे असल्यामुळे तलवार/चाकू उजव्या हातात पकडण्याचा फायदा होई अशी एक जस्ट सो स्टोरी वाचली आहे.

  • उजवा हात अधिक कुशल असल्यामु़ळे त्याला प्राधान्य
  • उजव्या हाताने उर्दू/हिब्रू लिहिणे अधिक कठीणः शाई पुसली जाऊन/हाताने झाकले जाऊन लेखन अवघड

मेणबत्तीचे वेष्टन मलाही खटकले.

खरंच की...

मेणबत्तीचे वेष्टन काढायचे राहूनच गेले :) बारीक निरिक्षण आवडले!

'सुरेख चित्र'

रचना आवडली - सगळ्या मेणबत्त्या सारख्या उंचीच्या असत्या तर चित्रात् वेगळीच बहार आली असती. (असे आपले माझे मत)

बाकी धनंजयांचा प्रतिसाद त्यांच्या 'लौकिकाला' साजेसाच (म्हणजे उत्तम -:))

+

धनंजयशी सहमत आहे.

फोटो मस्त आहे.

मी कदाचित तिसरी मेणबत्ती फोकस केली असती. मागच्या आणि पुढच्या मेणबत्त्या आउट ऑफ फोकस.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

दुसरी मेणबत्ती

मी कदाचित तिसरी मेणबत्ती फोकस केली असती. मागच्या आणि पुढच्या मेणबत्त्या आउट ऑफ फोकस

दुसरी मेणबत्ती फोकस करुन काढला होता.

candles1

अरे वा !!!

ह्म्म्म्.

१. हाही फोटो छान दिसतो आहे. पण पहिली मेणबत्ती पुरेशी आउट ऑफ फोकस झाली नाही. फोटो लांबून झूम करून काढला आहे का?
जवळून काढल्यास आउट ऑफ फोकस जास्त झाला असता असे वाटते (ते बरोबर आहे का?).

२. होम्सगिरी : वेष्टन असलेल्या मेणबत्त्या भारतात नसतात. त्या अर्थी कोलबेर यांनी फोटो परदेशात तरी काढला आहे किंवा मेणबत्त्या तरी बाहेरून आल्या आहेत. :-|)

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

आउट ऑफ फोकस

दोन्ही फोटोत झूम केलेले नाही.
पुरेशी आउट ऑफ फोकस होण्यासाठी मेणबत्ती पुरेशी लांब असली पाहिजे. म्हणूनच पहिल्या चित्रातही फोकस मेणबत्ती न.१ वर असला तरी न.२ ही तितकी आउट ऑफ फोकस झालेली नाही.
म्हणूनच मला पहिले चित्र जास्त आवडले कारण त्यात आउट ऑफ फोकस झालेला इफेक्ट ग्राज्युअल आहे. दुसर्‍या चित्रात तसा परीणाम साधला जात नाही.

होम्सगिरी परफेक्ट! फोटो परदेशात काढला आहे :)

+१

फोटो पहिल्यांदा बघितला तेव्हा "मधली एखादी मेणबत्ती केंद्रित करायला हवी होती का?" असे क्षणभर मनात आले. पण लगेच ही शक्यता फेटाळून लावली.

एका रांगेतल्या समसमान वस्तूंपैकी मधली वस्तू केंद्रित केली आहे, असे कुठलेही चित्र प्रभावी असू शकते का? मला कल्पना करता येत नाही. उदाहरण बघायला आवडेल.

बघा :
(गूगलवरून साभार)

समोरची वस्तू १
समोरची वस्तू २
मधली वस्तू १
मधली वस्तू २ अंकुरामुळे वाचले, नाहीतर कंटाळवाणे चित्र असते

गर्दीतले विशिष्ट

>>एका रांगेतल्या समसमान वस्तूंपैकी मधली वस्तू केंद्रित केली आहे, असे कुठलेही चित्र प्रभावी असू शकते का? मला कल्पना करता येत नाही. उदाहरण बघायला आवडेल.

मला काही फार कळत नाही. :(

@कोलबेर- माझ्या गणित आणि भौतिकशास्त्राच्या ज्ञानानुसार कॅमेरा वस्तूपासून जितका लांब असेल तितकी सगळ्याच/जास्त संख्येने मेणबत्त्या फोकसमध्ये दिसण्याची शक्यता जास्त वाटली.

@धनंजय
पहिली वस्तू फोकस केल्यावर "ही जवळ आहे म्हणून 'नीट' दिसत आहे, बाकीच्या दूर आहेत म्हणून अस्पष्ट दिसताहेत" असा फील येतो.
मधली फोकस केली तर "छायाचित्रकाराला विशिष्ट वस्तू दाखवायची आहे" असा फील येतो. [तसे कोलबेर यांना दाखवायचेच असेल असे नाही].

काही जाहिरातींत गर्दी ब्लॅक/व्हाईट मध्ये आणि एकच व्यक्ती रंगीत दाखवतात तसे काहीसे.

वरच्या पहिल्या चित्रांत कुंपणाची सुरुवात फोकस केली तर कुंपण इथून सुरू होऊन डावीकडे लांबवर आहे असे वाटेल. मधला भाग फोकस केल्यास कुंपण दोन्ही बाजूंस लांबवर आहे असे सूचित होईल का?

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

सुंदर

तांत्रिक बाबी समजून सांगण्यासाठी केलेला उत्तम आणि सुंदर प्रयत्न. आपल्याकडून हिच अपेक्षा आहे. नाहीतर नेहमीची फक्त वाहवा वाटणारी नुसती छायाचित्रे असतातच. काहीतरी चांगले शिकायला मिळाले. घरी प्रयोग करायला हरकत नाही. बायदवे,पॉईंट आणि शूट कॅमेराने हे शक्य आहे का? माझ्याकडे निकॉन कूलपिक्स पी३ आहे.






डेप्थ ऑफ़ फ़िल्ड

हा परिणाम अतिशय उथळ क्षेत्र फोकसमधे आणून , म्हणजेच 'डेप्थ ऑफ़ फ़िल्ड' कमी ठेवून , साघला आहे .
'डेप्थ ऑफ़ फ़िल्ड' हे . . .
- वरील फोटोप्रमाणे ऍपर्चर मोठा ठेवल्यास कमी होते. (म्हणजेच लहान एफ़ नंबर ठेवल्याने)
- वस्तू व कॅमेरा यातील अंतर कमी केल्याने कमी होते.
- लेन्सची फ़ोकल लेन्थ वाढवल्याने कमी होते
- कॅमेरातील फ़िल्म / सेन्सर चा आकार वाढवल्याने कमी होते. (?)

कूलपीक्स पी३ कॅमेराने वरील फ़ोटोइतकी कमी 'डेप्थ ऑफ़ फ़िल्ड' मिळणार नाही, कारण . . .

- सगळ्यात लहान एफ़ नंबर २.७ (वरील फोटोत १.८)
- वरील फोटोत फ़ोकल लेन्थ ५० मीमी आहे. पी३ मध्यॆ ह्याइतकीच फ़ोकल लेन्थ ठेवल्यास एफ़ नंबर २.७ पेक्षा वाढेल.
- 'पी३' च्या सेन्सर चा आकार 'रेबेल टीआय' पेक्षा निम्याहून लहान .

धन्यवाद

समजावणार्‍या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
तज्ञांकडून अशाच मार्गदर्शनाची अपेक्षा आहे :)






शंका

बोका यांची वाटचाल बघताना या जुन्या धाग्यावर आलो.

लेन्सची फ़ोकल लेन्थ वाढवल्याने कमी होते

हे पटले नाही, नाभीय अंतर वाढविल्यास अधिक स्पष्ट खोली मिळेल.

हे बघितलेत का

याबाबत विकिपेडियावरील समीकरणे

वरील समीकरणात DOF म्हणजे डेप्थ ऑफ फील्ड, तर f म्हणजे फोकल लेंग्थ. बाकी चिह्ने विकीपानावर वर्णित - पण या चर्चेपुरत्या स्थिरसंख्या मानूया.
तर f वाढल्यास DOF कमी होईल. मात्र हा फर्क f अधिक-अधिक वाढत गेल्यानंतर नगण्य होत जाईल.

(खूप मोठ्या फोकल लेंग्थच्या भिंगाने काढलेले पक्ष्यांचे वगैरे फोटो बघता असे दिसते की डेप्थ ऑफ फील्ड खूपच आखूड असतो.)

छान

फोटो छान आहे. लाल मेणबत्तीवर फोकस असल्यामुळे तिच्या वातीवर आपोआप नजर रोखली जाते. मला धनंजयसारखा नजर फिरण्याचा अनुभव आला नाही. दोन्ही चित्रं समान वाटली. माझ्यासाठी फोकसच्या तंत्रामुळे त्या वातीभोवती गुरुत्वीय आकर्षणासारखं झालं होतं.

एकच फोटो वेगवेगळ्या अॅपर्चरवर काढता आला तर हेच तत्त्व समजून घ्यायला मदत होईल.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

बरोबर

>फोकसच्या तंत्रामुळे त्या वातीभोवती गुरुत्वीय आकर्षणासारखं

धनंजय यांनी लिहल्याप्रमाणे दिशा म्हणायची तर 'टिक मार्क' च्या दिशेत नजर गेली. लाल मेणबत्ती पासुन. व मिरर इमेज मधे टिक मार्कची मिरर इमेज दिशा.

छान प्रात्यक्षिक

प्रात्यक्षिक फार सुबोध झाले आहे. छान प्रयोग!

 
^ वर