उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
पुण्यातील स्वच्छ स्वच्छतागृहांची यादी
आरागॉर्न
August 27, 2010 - 5:52 am
विषय म्हटला तर फालतू वाटू शकतो. पण ही यादी अडचणीच्या वेळेस वाळवंटात पाण्याचा झरा वाटू शकते. पुण्यात कामानिमित्त येणार्यांनाही याची मदत होऊ शकेल असे वाटते.
स्वच्छ म्हटल्यावर शासकीय स्वच्छतागृहे अर्थातच बाद. ही माझी यादी.
१. जहांगीरच्या समोर क्रॉसवर्डची इमारत. क्रॉसवर्डला जाताना तळमजल्यावर स्वच्छतागृह आहे.
२. विद्यापीठ रस्त्यावर इ-स्क्वेअर. मल्टिप्लेक्स + मॉल असल्याने आत जायला तिकीट घ्यावे लागत नाही.
२. इ-स्क्वेअरच्याच रस्त्यावर सिमला ऑफिसच्या दिशेने थोडे खाली आल्यावर विरुद्ध बाजूला आणखी एक पाच मजली मॉल आहे. त्यात तळमजला.
माहिती असेल तशी भर घालावी ही विनंती.
दुवे:
Comments
स्वच्छ स्वच्छतागृहे
स्तुत्य उपक्रम. मला पंचतारांकित हॉटेले सोडली तर अशी स्वच्छतागृहे भारतीय सीमेच्या आत अजून तरी सापडलेली नाहीत. माहिती मिळाली तर ज्ञानात भर पडेल.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
यादी
यादीतील स्वच्छतागृहे या व्याख्येत बसतात असे वाटते. म्हणूनच आणखी असतील तर माहिती मिळालेली बरी.
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
अस्वच्छ
अस्वच्छ असले तरी वापरण्यायोग्य स्वच्छतागृह उपलब्ध असणे हे सुध्दा घाईचे वेळी दिलासा देणारे असते. हे स्वानुभवाने सांगतो.
प्रकाश घाटपांडे
:-)
हा हा हा वर्हाड निघालय लंडनला..
गोऽऽ ना गोऽ! होल वावर इज आवर आठवले.
बाकी अतिशय उपयुक्त धागा. आरागॉर्न व धाग्यात उपयुक्त भर घालणार्या प्रतिसादकांना धन्यवाद!
आंतरराष्ट्रीय शौचालय संघटना
ट्रिप
मागील वर्षी कोकणात गेलो होतो. तिथे एकच स्वच्छतागृह उपलब्ध होत. पहाटे कुणीतरी गेल होत. लवकर येण्याची लक्षणे दिसेनात. मग सरळ जवळच असलेल्या वावराचा रस्ता धरला. वर आकाशात चांदणे पहात कार्यभाग रेंगाळवला. शप्पत शुक्राच्या चांदणीची साक्ष आहे.
प्रकाश घाटपांडे
सहमत
सहमत आहे. म्हणूनच चांगला पर्याय उपलब्ध असेल तर सोन्याहून पिवळे.
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
स्वच्छ इज रिलेटिव्ह
घाटपांडे काकांशी सहमत आहे.
मला पुरेशी घाईची लागली असेल तर कोणतेही स्वच्छतागृह मला 'स्वच्छच' वाटते. :-)
माझ्या घरातले आणि बाहेरचे यांच्या स्वच्छतेच्या स्टॅण्डर्डच्या अपेक्षेमध्ये मी फरक करतो.
बाकी मुंबईतील छ शि ट लोकल स्टेशनवरून प्लॅटफॉर्म क्र ७ च्या बाजूने बाहेर पडण्याच्या दरवाजापाशी असलेले खूपच स्वच्छ आहे. पण तेही कुणाला घाण वाटू शकेल.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
व्याख्या
इथे स्वच्छ म्हणजे जिथे जावे की नको असा संभ्रम मनात येत नाही, बेलाशकपणे जाता येते अशी स्वच्छतागृहे.
बाकी निकड वगैरे बाबींशी सहमत आहेच.
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
सोय महत्त्वाची
अगदी असेच. ( आणि मराठी सायटांबाबतही असेच म्हणता येईल की. कुणी संबंध कसा नाही जोडला अजून :प ) असो.
सोय महत्त्वाची हेच खरे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
विषय नक्किच महत्त्वाचा आहे
या निमित्ताने मायबोलीवरील (बहुतेक निरजा यांचा) या विषयात स्त्रियांची होणारी कुचंबणा यासंबंधीचा लेख आठवला.
मुंबईत आता जवळ जवळ सर्वच भागांत सार्वजनिक शौचालयांची संख्या बर्यापैकी असल्याने तशी सहसा अडचण येत नाही. त्याचबरोबर मॉल्सही मोठ्या प्रमाणात असल्याने काम भागते. (बाकी स्वच्छ / अस्वच्छ हा परिस्थिती सापेक्ष मुद्दा आहे :)
परक्या शहरात गेल्यावर ही अडचण जाणवते. ऑस्ट्रेलियामध्ये सरकारतर्फे 'सार्वजनिक शौचालयांचा ऑनलाईन नकाशा' तयार करण्यात आला आहे. जवळपास १४ हजाराहून अधिक शौचालयांची यात नोंद आहे. भारतात असा कुणी प्रयत्न केला आहे का?
भारतातील मोठ्या शहरांमधील सार्वजनिक शौचालयांच्या नकाशाचे मोबाईल अॅप्लिकेशन बनविण्यास वाव आहे. किमान उपलब्ध गुगल वा विकिमॅपियावर शौचालयांची नोंद करु शकतो.
जयेश
छान
छान कल्पना. यादी वाढली की हे करता येईल.
मुंबईत पैसे देऊन सुलभ ची व्यवस्था आहे. तशी पुण्यात किती ठिकाणी आहे कल्पना नाही. मनपाजवळ एक आहे, कधी वापरले नाही.
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
स्वच्छतागृह
होय नीरजाचाच लेख आहे तो.
१) स्वच्छतेच्या बैलाला
२) परत एकदा स्वच्छतेच्या बैलाला
प्रकाश घाटपांडे
आणखी
१. पुण्यातील सुलभ बर्यापैकी चांगली असतात. (अर्थात हे निरिक्षण स्थळानुसार बदलते.)
२. कल्याणीनगर : मारीप्लेक्स(गोल्ड ऍडलॅब्स)-मल्टिप्लेक्स + मॉल असल्याने आत जायला तिकीट घ्यावे लागत नाही.
३. मोलेदिना रस्ता, कॅम्पः मॅग्नम मॉल, दोराबजीसमोर
४. स्वारगेट एसटी स्थानक
||वाछितो विजयी होईबा||
वेस्ट एंड
वेस्ट एंड रस्त्यावर लँडमार्क हा आणखी एक मॉल आहे पण तिथे स्वच्छतागृह दिसले नाही. (तिथे चांगली पुस्तके मिळतात.)
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
लँडमार्क
हे दुकान आता समोरच्या मॉलमध्ये विलीन केले आहे का?
मागच्या वर्षी त्याची तयारी सुरू होती असे वाटते.
बाकी माहिती उपयुक्त आहे :)
मॉल
आता लँडमार्क हा एक मोठा मॉल झाला आहे. खालच्या मजल्यावर डिव्हीडी, मोबाइल वगैरे, वरचा अख्खा मजला पुस्तके. (मॅनीजऐवजी आता इथे जायला आवडते.)
शेजारच्या इमारतीत तळमजल्यावरूनच जाता येते. तिथे कपड्यांची दुकाने, खाणेपिणे आणि काही गेम्स. एकुणात टैमपास करायला चांगली जागा आहे. :)
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
होय
लँडमार्क आता समोरच्या मॅग्नम मॉल मध्ये शिफ्ट झाले आहे. लँडमार्क मध्ये नाही, तर मॉल मध्ये (खालच्या मजल्यावर ईशान्य कोपर्यात-दिशाभूल झाली तर, खाली उतरायला जिना जेथे आहे त्याच्या डायगोनली अपोझिट) पंचतारांकित स्वच्छतागृह आहे.
||वाछितो विजयी होईबा||
कोथरुड बिगबझार
कोथरुड सिटीप्राईड जवळ बिग बझार येथे पण स्वच्छ आहे. बेसमेंटला पार्कंग फ्री आहे व मोठे आहे. (स्वतःच्या जबाबदारीवर)
पुण्यात बहुतेक मल्टिप्लेक्स व मॉल मधे स्वच्छतागृहांची परिस्थिती बरी आहे.
दै सकाळने स्वच्छतागृहांच्या चळवळी बाबत पुढाकार घेतला आहे. अस्वच्छ स्वच्छतागृहांच्या बातम्या कायम असतातच.
मागच्याच महिन्यात तुळशीबागेत महिलांसाठी स्वच्छतागृहाचे उदघाटन झाले. एवढ्या गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहच नव्हते
प्रकाश घाटपांडे
छे.. माझा अनुभव वेगळा आहे.. :(
कोथरूडच्या सिटी प्राईडशेजारच्या बिग बझारचा माझा अनुभव बेकार आहे. रेस्टरूम्सची अवस्था अतिशय वाईट होती,व तिथे रेंगाळणार्या कर्मचार्यांना त्यांना नेमून् दिलेले काम करावे असं मुळीच वाटत् नव्हते!!
तेव्हा खच्चून शिव्या (मनातच) घातल्या असल्याने व्यवस्थित आठवते आहे... :(
निरीक्षण/प्रश्न
सर्वप्रथम , एक उत्तम धागा.
पुण्या-मुंबईकडच्या अगदी उत्तम सुविधा असलेल्या कमोडयुक्त स्वच्छतागृहांमधे पाण्याचे थारोळे साचलेले असते. कमोडचे भांडेसुद्धा स्वच्छ असते, परंतु आजूबाजूला झालेल्या चिखलाने स्वच्छता बिघडते.
कमोड असलेल्या स्वच्छतागृहात पाणी वापरून स्वच्छता करण्यात थोडी विसंगती आहे असे मला वाटते. या बद्दल अन्य लोकांची मते जाणून घ्यायला मला आवडेल.
+१
कमोड असलेल्या स्वच्छतागृहात पाणी वापरून स्वच्छता करण्यात थोडी विसंगती आहे असे मला वाटते.
असेच म्हणते.