उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
शादी.कॉम
टिंकरबेल
August 9, 2010 - 11:17 pm
नमस्कार,
माझ्या एका जवळच्या नातेवाइकामुळे शादी.कॉम, भारतमॅट्रिमोनी.कॉम अशा साइट्शी संबंध आला. माझ्या काही इतर नातेवाइकांनीही अशा साइट्सवर नोंदणी केली आहे. त्यांच्या प्रत्येकाकडे काहितरी विचित्र् कथा आहेत आणि नोंदणी करून दोन्-तीन वर्षे झाली तरी कोणाचेच लग्न ठरले नाही.
कोण म्हणते या साईटवर दिलेली माहिती खोटी असते, चुकीची माहीती दिलेली असते. फोटोमधून व्यक्ति कशी आहे हे सांगता येत नाहि, स्थळाची माहीती काढायचे मार्ग बंद होतात आणि खुप.
तुमच्यापैकी कोणाचा कींवा ओळखीच्या कोणाचा या साईट्सबद्दल चांगला अनुभव आहे का? अशा साईट्सवरून तुमची किंवा मित्रांची लग्ने ठरली आहेत का? ते साईटवर दिलेल्या माहीतीपेक्षा पुढची माहिती कशी मिळवतात?
मला थोडी माहीती मिळाली तर बर् होईल.
दुवे:
Comments
जागरूक रहा, अखेरपर्यंत! म्हणजे बोहल्यावर चढेपर्यंत.
तुम्हाला ख्ररचं लग्न करायचं आहे कां? तर मग 'लग्न म्हणजे लॉटरी असते.' लॉटरीचा निकाल हाती काय लागणार? हे आपल्या नशिबावरच अवलंबून असते, हे आधी मनाशी पक्के करून घ्या.
मी स्वतः माझ्या लग्नासाठी 'शादी.कॉम', जीवनसाथी.कॉम', 'मराठी मॅट्रीमोनी.कॉम' ह्या संकेत स्थळांवर माहिती टाकली होती. मला तरी, म्हणजे मी ज्या विवाहेच्छू मुलींशी वा त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला त्यावरून तरी, असे वाटते कि दिलेली माहिती काही प्रमाणात खरी असते. म्हणजे मुलीचा रंग सावळा लिहीला असेल तर ती काळी, गव्हाळ लिहीला असेल तर ती सावळी, गोरा लिहीला असेल तर ती गव्हाळ असू शकते.
उंची, शिक्शण, तब्येत याबाबतीत ही असेच लिहीलेले असते. मुलींच्या अपेक्शा वाचू नका, नाहीतर न्यूनगंड येईल. तुम्हाला तुमच्या अपेक्शेनुसार वाटली तर त्या वेबपेजवर खूण करून ठेवा. अशा बर्याच मुली अपेक्शेत बसणार्या वाटल्या कि मगच पैसे भरा.
कारण या अशा संकेत स्थळांवर पैसे दिल्यानंतर फक्त ठराविक काळापूरतेच संपर्काचे दुरध्वनी क्रमांक, इमेलचे पत्ते मिळतात. मुदत संपली की संकेतस्थळवाले पैसे मागत बसतात.
निवडलेल्या मुलींशी फोनवरून बोलण्यापेक्शा प्रत्यक्श भेटून बोलण्याकडे कल ठेवा. फोनवर बराच घोळ होतो. इमेल पाठवताना मुलीनेच त्याचे उत्तर पाठवावे, असे सांगून टाकावे. कारण (शेंबड्या व भित्र्या) मुली पालकांकडून, मैत्रिणींकडून, नातेवाईकांकडून उत्तर पाठवतात. त्यामुळे देखील घोळ होतो. मुलीं नेहमी ताकाला जावून भांडे लपवतात.
मी या सगळ्याला कंटाळून जातीतल्याच एका व्यक्तीने आणलेल्या स्थळाला होकार दिला. पण मुलगी पदवीधर आहे असे खोटे आधी सागितले गेले होते. पण आता काय उपयोग? लग्न झालं ना?
पाण्यात आपण फूटपट्टी बुडवतो तेव्हा ती कशी तिरपी झाल्यासारखी वाटते, अगदी तसेच लग्नाचे असते. एका आयुष्यातून दुसर्या आयुष्यात प्रवेश करताना सरळसोट व्यवहार होत नाहीत. (काही नशीबवान असतील ही!)
गैरसमज
टिंकरबेल हा आयडी स्त्रीलिंगी आहे.
"पण मुलगी पदवीधर आहे असे खोटे आधी सागितले गेले होते. पण आता काय उपयोग? लग्न झालं ना?"
म्हणजे? तुम्ही अटेस्टेड कॉप्या मागितल्या नाही?
ह्म्म्म्म्!
>>मला तरी, म्हणजे मी ज्या विवाहेच्छू मुलींशी वा त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला त्यावरून तरी, असे वाटते कि दिलेली माहिती काही प्रमाणात खरी असते.
दिलेली माहिती बरिचशी खरी असते पण लपवलेली माहितीही खुप असते असा आम्हाला अनुभव आला. एका मुलीने आपले फोटो एकाच अँगलने दिले होते भेटीत कळले की तिच्यात थोडे व्यंग होते. दुसरे एके ठिकाणी मुलगा प्रत्यक्ष भेटल्यावर फक्त दारुच्या गप्पा मारत होता. शेवटी माझी बहिण कंटाळून् गेली.
पुर्वी लोक् मध्यस्थी करत. माहीती देत आता अशा वेबसाइटवरून माहीती मिळणे अशक्य झाले आहे.
माझ् लग्न झालं आहे. मला मुलगा शोधत नाहीये. माझ्या जवळच्या नातेवाइकांपैकी एक मुलगा आणि दोन मुलींनी या सईटवर रजिस्टर केले आहे. त्यांचे सर्वांचे अनुभव बरे नाहीत.
प्रेम विवाह करा
प्रेम विवाह करा म्हणजे दुसर्या कोणीतरी फसवले असे वाटणार नाही. स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्यावर दुसर्याला दोष कसा देता येणार?
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
कसे करायचे
प्रेमविवाह करा म्हणल्यावर प्रेमविवाह होतात का? जगात सर्वांचे प्रेमविवाहच झाले असते ना.
माझा तर् चांगला अनुभव् आहे
हो, माझं लग्न् शादी.कॉमवरुन्च् जुडलं, तसं मी तिथे पेड् मेंबर बनल्यावर् ब-याच् पोरी फिरविल्या. पण् शेवटी एक् मात्र "मॅरेज् पॅकेज्" वाटली. इतर् ब-याच् वेगवेगळया पॅकेज् होत्या.
मुलिंच्या अपेक्षामात्र वाचु नये. खरच् न्युनगंड् येतो. नंतर् हयाच् मुली मागे लागतात् तो भाग् वेगळा. पण् सुरुवातिला त्यांच्या अपेक्षा वाचुन् आपण् उगीच् या साईटवर् नोंदणी केली असं वाटु लागतं.
आई वडिलाना नक्की भेटा. त्यामुळे ब-याच् गोष्टी क्लिअर् होतात्.
शिक्षणाची कागदं तपासुन घ्यावित्.
-----------------
भवतु सब्ब मंगलम.
आहे
तुमच्यापैकी कोणाचा कींवा ओळखीच्या कोणाचा या साईट्सबद्दल चांगला अनुभव आहे का?
ओळखीच्या मुलीचे लग्न ठरले आहे असे ऐकले आहे- ते अशाच एका साईटमुळे. त्यामुळे अनुभव बरा असावा असे वाटते. हल्ली मुले-मुली थेट भेटण्यासाठी ह्या साईटांचा वापर करतात असे आढळून आले आहे :)
सुरूवातीला ऐकायला विचित्र वाटले, पण असे झाले आहे खरे.