जिना व टिळक

काल उपक्रमवर या पुस्तकाचे परिक्षण बघितले होते. आज ते गायब आहे. ते काय कारणासाठी काढून टाकण्यात आले? ते कळेल काय? मला तर ते पुस्तक आणि त्याचा करून दिलेला परिचय हे अतिशय आवडले होते.
चंद्रशेखर्

लेखनविषय: दुवे:

Comments

कॉपी पेस्ट

तो लेख कुमार केतकरांचा होता. श्री. बैरागी हेच कुमार केतकर नसतील, तर लेख इथून उडवणे सयुक्तिक आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कॉपीराईट भंग

तोच लेख् तुम्हाला लोकसत्तच्या संकेतस्थळावरही मिळावा.
ऑफीसातून ऍक्सेस नाहि नाहितर दुवा दिला असता.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

लिंक

ही घ्या लिंक

इतिहास आवडणा-यांचे मात्र कौतुक वाटते.

गैरसमज

१. लेख हा कुमार केतकरांचाच आहे. या लेखाच्या सुरुवातीला त्यांच्या नावाचा उल्लेख होता. या लेखामध्ये अनेक कच्चे दुवे होते. कुमार केतकरांचा लेख असल्यामुळे अनेकांनी विचार न करता, त्यांच्या लेखाचे कौतुक केले होते. प्रत्यक्षात त्या लेखात केतकरांनी अनेक विधाने करण्यापूर्वी त्याची ऐतिहासिक सत्यता देखील पडताळून पाहिली नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या कच्च्या दुव्यांवर चर्चा व्हावी या उद्देशानेच केतकरांचा लेख उपक्रमवर चिकटवला होता.
२. तो लेख लोकसत्ताच्या वेबसाईटवरून घेण्यात आला होता. कुमार केतकरांचे नाव लेखाच्या सुरुवातीला असल्यामुळे त्याचे अन्य स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता वाटली नाही. बहुतेक लेखाची लिंक दिली असती तर बरे झाले असते वाटते.
३. अशा पद्धतीचा चर्चेचा प्रस्ताव उपक्रमवर कसा टाकायचा हे माहित नसल्यामुळे असा गैरसमज झाला असावा. हा विषय महत्त्वाचा असल्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेला टाकणार आहे. या विषयी मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल.

 
^ वर