दशपदी

मला कवी अनिल यांच्या दशपदी या काव्यप्रकाराबद्दल माहिती हवी आहे. दशपदीच्या उदाहरणांसह असल्यास फारच उत्तम! गझलेच्या बाराखडीप्रमाणे दशपदीचेही काही नियम असल्यास त्यांची माहिती कुठे मिळेल?

लेखनविषय: दुवे:

Comments

दोन उदाहरणे

दशपदीची दोन उदाहरणे येथे पहा. नियमांबाबत विशेष कल्पना नाही. :(

कल्पना नाही

याबाबत मलाही काही कल्पना नाही. सुनीताला निदान थोडेसे ऐतिहासिक महत्त्व आहे, काही प्रकार/नियम् आहेत हे विकीवर आढळले. दशपदीबाबत तसे काही आहे का याचा जाणकारच अधिक खुलासा करू शकतील.

हा मुक्तछंद वाटला नाही

दुव्यावर दिलेली उदाहरणे मुक्तछंद वाटली नाहीत.

दोन्हीत पाच दोन-ओळींची कडवी आहेत (तुम्ही ते ओळखलेच).
प्रत्येक कडव्याच्या शेवटी यमक आहे.

कविता जुन्या काव्यपद्धतीने न वाचता, मराठी गद्य उच्चाराने वाचावीत.
म्हणजे "वाटतात" शब्द "वाट्-तात्" असा वाचावा.
तसे करता प्रत्येक ओळ छंदोबद्ध आहे. प्रत्येक ओळीत साधारण १६ मात्रा आहेत.

दोन कवितांच्या भांडवलावर इतकेच.

 
^ वर