युबंटुच्या कळा

युबंटुच्या कळा

काल मी युबंटु १०.०४ टाकून पाहिले. नेटबुकचे मराठी व्हर्जन उतरवले आहे.
दोन्ही सिस्टीम्स हाताशी असाव्यात म्हणून मी ते वुबी वापरून लोड केले.
लोड झाल्यावर पहिल्या स्क्रिनला त्याने युबंटु की एक्सपी असे विचारले. युबंटु असे सिलेक्ट केल्यावर लोड करू शकत नाही असे म्हणून नेटबुक थंड बसून राहिले.
परत सुरु केले तरी तेच. मग एक्सपी सुरु करायचा प्रयत्न केला. सिस्टीमने परत युबंटु की एक्सपी असे विचारले. मी दुसर्‍यांदा युबंटु सिलेक्ट केले.
मग युबंटु सुरु झाले.

मला वाटले की पहिल्यांदाच लोड होत आहे म्हणून काहीतरी घोळ असेल.
पण तीन चार वेळा सुरु केले तरी दोन वेळा विचारणा आणि दुसया वेळी युबंटु सुरु करणे तसेच येते आहे.

कुणाला हा प्रश्न आला आहे का?

एचपी नेट बुक कॉन्फिगरेशन - एच पी मिनी ऍटम एन२८० प्रोसेसर, १ जीबी रॅम, १६० जीबी डिस्क, १० इंची स्क्रीन.

युबंटु सुरु झाल्यावर आयपॉड जोडला तर त्याने तो लगेच स्वीकारला पण त्यातली एमपी३ प्रकारची गाणी वाजवण्यासाठी अजून काही डाउनलोड करावे लागेल असे सांगितले. आंतरजालाचे वायरलेस कनेक्शन मात्र त्याला अजून सापडत नाहीये. :(
बाकी आयबस वगैरे मस्तच!

आता काय करावे?

  • सहजतेने युबुंटु सुरु होण्यासाठी काय बदल केले पाहिजेत?
  • करायचे तर कसे?
  • केलेले प्रस्थापन संपुर्ण काढून नवीन टाकू का?
  • काढणे योग्य असेल तर ते काढण्याचा सर्वात चांगला मार्ग उपाय कोणता?

मला माझे एक्सपी (अजून तरी) हवे आहे. तसेही ते नेटबुक बरोबर आलेले असल्याने सोडून देण्याची इच्छा नाही :)

मी लिनक्सवासी झालो त्याची कथा येथे ५०+ प्रतिसाद झाले आहेत हा भाग २ मानायला हरकत नसावी.

Comments

रेस्ट्रिक्टेड एक्स्ट्राज़

https://help.ubuntu.com/community/RestrictedFormats हे पाहा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

.

सहमत

त्यामुळे वायरलेस आणि गाणी वाजविण्याची अडचण दूर होईल पण हे दोनदा बूट करण्याची अडचण मजेशीर आहे.

@निनादः तुम्ही कृपया काही प्रयोग करून पहा.
एक्सपी रिस्टार्ट करून उबुंटू बूट करता येतो का?
एक्सपी शटडाउन केल्यावर नेटबुक बूट केल्यास उबुंटू बूट करता येतो का?
उबुंटू रिस्टार्ट करून उबुंटू बूट करता येतो का?
उबुंटू शटडाउन केल्यावर नेटबुक बूट केल्यास उबुंटू बूट करता येतो का?
यातून काही ठोस निष्कर्ष काढण्याचा हेतु नाही पण वुबी टाकल्यावर लूपमाऊंट डिवाईस बनते असे वाचले आहे. ही फाईल विंडोजच्या पार्टिशनमध्ये असते. ती सापडण्यात अडचण येत असेल असे वाटते.

कटी पतंग

bcmwl-kernel-source आणि b43-fwcutter प्याकेजेस टाकल्यावर वायरलेसचा प्रॉब्लेमही सुटावा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

क्रॅशड्

bcmwl-kernel-source इन्स्टॉलेशन क्रॅश्ड!
दुसरे मात्र बसले.

दर वेळी रिस्टार्ट करावे लागते का?

-निनाद

करून पाहिले

@ रिकामटेकडा
मलाही तसे वाटले होते-

आपण दिलेले सर्व काँबिनेशन्स ट्राय केले अजूनही काही फरक नाही.
युबुंटु सुरु होतांना रेग्युलर, सेफमोड, अणि व्हिस्टा असे काही तरी विचारतो आहे.
स्नॅपशॉट घेता येत नाहीये, पण एररचा फोटो काढून तो लावायचा प्रयत्न करतो.

-निनाद

धन्यवाद

@ आजानुकर्ण,
करून पाहतो.
धन्यवाद.

आता मी नेटबुक सरळ वायरने कनेक्ट केले आहे आणि अपडेटस (२३९!) डाउनलोड करतो आहे. आशा आहे की त्या नंतर हा प्रश्न निकाली निघेल.

* चर्चा टाकून गायब व्हायचे नव्हते, पण आजारपणांमुळे ऑनलाईन येणेही शक्य झाले नाही कृपया गैरसमज नसावा.

-निनाद

उबंटू १०.०४ आणि नेटबूक

माझ्याकडचे उबंटू १०.०४ हे ९.१० वुबीने टाकून मग अपग्रेड केलेले आहे. पण मला हि अडचण आली नाही. ज्या अडचणी आल्या त्या मागच्या चर्चेतल्या प्रतिसादांवरुन शिकलेल्या गोष्टींमुळे नाहीश्या झाल्या. सध्या लिनक्स मिंटची बुटेबल युसबी वापरुन पाहतो आहे. अशी बुटेबल युसबी करुन उबंटु वापरुन पहा.
वायरलेस कनेक्शन उबंटु आणि लिनक्स मिंट यांनी आपोआप शोधले मला फक्त पासकोड द्यावा लागला. अर्थात हि अडचण नेटबूकमुळे/नेटबूक व्हर्जन मुळे येत असावी असे वाटते.






उबंटु चुकुनही उडवू नका...

वुबी चा अनुभव नाही, पण मी एकदा एक्सपी मधून उबंटूची पार्टिशन फॉर्मॅट केली होती. परत माझा एक्सपी सुद्धा बूट झाला नव्हता.
तुमचा प्रॉब्लेम हा एक्सपी मधून परिपूर्ण शटडाऊन न झाल्याचा हा परिणाम असू शकतो. उबंटूच्या फोरमवर अधिक माहिती मिळेल. (आम्हीही शोधत आहोतच.)
"<एरर मेसेज>" असे गुगलून पाहा. (उदा. "the Operating System cant be loaded" -अवतरणचिन्हे आवश्यक आहेत.आणि मेसेजही एक्झॅक्ट हवा.)

||वाछितो विजयी होईबा||

हो..

सहमत. ५-६ वर्षांपूर्वी निष्काळजीपणामुळे लिनक्स उडवले व् हा प्रॉब्लेम आला होता.
लिनक्सचा ग्रब विंडोजचे बुटस्ट्रॅप रूटीन देखील ओव्हरराईड करते. फार कष्टाने विंडोजच्या बुट रेकॉर्डमधून ग्रबची निशाणी काढून टाकल्यावर सर्व नीट् चालू झाले होते.

बाकी, मूळ पोस्टला काही उत्तर नाही माझ्याकडे. असा कधी प्रॉब्लेम आला नाहीये.

धन्यवाद्!

सुचनेबद्दल धन्यवाद!
खुपच महत्त्वाची आहे - उबुंटु उडवणार नाही.

वायरने जोडल्यावर उपक्रमाचे लेखन सुंदर दिसते आहे.
फाँट आवडला.

-निनाद

उबंटु नॉटीलस ह्याक्स

काही विशेष परिचित नसणारे उबंटु नॉटीलस ह्याक्स इथे मिळतील.
याखेरीज ह्या ब्लॉगवर उबंटूतील विविध प्याकेज, ह्याक इ. बद्दल बरीच रोचक माहिती आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

 
^ वर